Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गावर दुसऱ्या दिवशीही आक्रमक विरोध!

Sarfaraj Musa
Jun 28, 2025 09:36:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला दुसऱ्या दिवशीही विरोध,तिसंगी मध्ये आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी सलग दुसऱ्या दिवशीही धरली रोखून.. अँकर - शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन सुरूच आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या तिसंगी येथे सलग दुसऱ्या दिवशीही शेतकरयांनी मोजणी रोखून धरली आहे.कालपासून शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलीस फौज फाट्यासह प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय,मात्र शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध करण्यात येतोय दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला शेतकऱ्यांनी मोजणीपासून रोखून धरला आहे कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही,अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे तिसंगी या ठिकाणची मोजणी प्रक्रिया थांबलेली आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा देखील तैनात आहे,मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता प्रशासनाकडून मोजणी थांबवण्यात आली आहे. बाईट - दिगंबर कांबळे - नेते - शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समिती.
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement