Back
कल्याण-शीळफाटा मार्ग पर तीन दिन ट्रैफिक डायवर्जन, पुल ऊँचाई बढ़ाने का काम
ABATISH BHOIR
Nov 06, 2025 17:04:34
Kalyan, Maharashtra
कल्याण शीळ रोडवरील निळेज ब्रीजच्या तीन दिवस राहणार बंद
शिळफाटा पलावा ब्रिज वरुण दोन पैकी एका ब्रिज वरुण वाहतूक सुरु करणार..
निळजे रेल्वे वरील जुना ब्रिज तीन दिवस बंद राहणार..
Anc -दिल्ली ते जेएनपीटी डेडीकेट फ्रेट कॉरिडोर रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. कल्याणहून पलावाच्या दिशेने जाणारा मार्गावरील निळजे पूलाची उंची कमी असल्याने त्या पूलाची उंची वाढविण्याचे काम हाती घेते जाणार आहे. या कामाकरीता वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. ७ ते ९ नोव्हेंबर या तीन दिवसात या पूलावरची वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग वाहतूक शाखेकडून सुचविण्यात आले आहे.
कसा आहे वाहतूकीत बदल
कल्याणहून शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण शीळ रोड निळजे कमानीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने निळजे कमानी जवळून उजवीकडे वळण घेऊन लोढा पलावा कडून कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीवरुन महालक्षअमी हॉटेल कडे जाऊन पुढे इच्छीत स्थळी जातील.
लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन, एक्सपिरीया मॉलकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे पूलाच्या चढणीला एक्सपिरिया मॉल या बाजूला कल्याणकडे जाणाऱ्या वाहिनीवर प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने कल्याण शीळ रोडने शिळफाट्याच्या दिशेने देसाई खाडी पूलावरुन सरस्वती टेक्सटाईल समोरुन उजवीकडे यू टर्न घेऊन नव्या पलावा फ्लाय पुलावरून मार्गस्थ होतील.
मुंब्रा कल्याण फाट्याहून कल्याणकडे येणारी सर्व प्रकारची सहा चाकी जड अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने कल्याण फाटा, शीळ फाटा, मुंब्रा बायपास, खारेगाव नाका, मार्गे जातील. कल्याणकडून कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड सहा चाकी वाहनांना काटई चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने काटई चौक, बदलापूर चौक, खोणी नाका, तळोजा एमआयडीसी मार्गे जातील. नवी मुंबई तळाेजा एमआयडीसी मार्गो खोणी नाका, निसर्ग हा’टेल, येथून काटई चौक कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या सहा चाकी जड अवजड वाहनांना निसर्ग हा’टेलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने निसर्ग हा’टेल येथून उजवीकडे वळण घेऊन बदलापूर पाईप लाईन, नेवाळी मार्गे इच्छीत स्थळी जातील. अंबरनाथ बदलापूरकडून काटई नाका कडे येणारी वाहनांना खोणी नाका येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने खोणी नाका डावीकडे वळण घेऊन तळोजा मार्गे इच्छीत स्थळी जातील. पनवेल नवी मुंबई कडून महापे नवी मुंबई मार्गे कल्याण आणि शीळफाटा जंक्शनकडे येणाऱ्या सहा चाकी, जड अवजड वाहने कल्याण जंक्शन, शीळफाटा, मुंब्रा बायपास, खारेगाव टोलनाका या मार्गे जातील.
हलक्या वाहनांकरीता काय आहे बदल ?
नवी मुंबईकडून कल्याण फाटा कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कार, मोटार सायकल या हलक्या वाहनांना कल्याण फाटा, शीळ फाटा, दीवा, आगासन फाटक, दिवा संदप रोड, मानपाडा कल्याण शीळ रोडचा वापर करावा. ठाण्याकडून कल्याण फाटाकडे येणाऱ््यांनी नाशिक मार्ग, माणकोली, मोठा गाव, डोंबिली तसेच नाशिक मार्ग, राजनोली बायपास, कोनगाव, कल्याण मार्गाचा वापर करावा. कल्याण, डोंबिवलीहून ठाण्याकडे जाणाऱ्यांनी डोंबिवली, मोेठागाव ठाकूर्ली, माणकोली नाका, दुर्गाडी नाका कोनगाव, नाशिक मुंबई महामार्गाने जावे.
Byte... पंकज शिरसाठ
वाहतूक पोलीस आयुक्त ठाणे
14
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
2
Report
AKAMAN KAPOOR
FollowNov 06, 2025 19:00:502
Report
AKAMAN KAPOOR
FollowNov 06, 2025 19:00:322
Report
RGRupesh Gupta
FollowNov 06, 2025 19:00:082
Report
RMRoshan Mishra
FollowNov 06, 2025 18:46:396
Report
AMALI MUKTA
FollowNov 06, 2025 18:46:289
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 06, 2025 18:46:1410
Report
RRRakesh Ranjan
FollowNov 06, 2025 18:45:357
Report
HBHemang Barua
FollowNov 06, 2025 18:45:27Noida, Uttar Pradesh:आलसी लोगों जो सिर्फ बेबुनियाद आरोप लगाते हैं न स्वाध्याय करते हैं न तथ्यों को परखने की इच्छा शक्ति रखते हैं उनके लिए मैं चुनाव आयोग का डॉक्यूमेंट्स रख रहा हूँ
7
Report
HBHemang Barua
FollowNov 06, 2025 18:45:158
Report
HBHemang Barua
FollowNov 06, 2025 18:34:229
Report
RMRoshan Mishra
FollowNov 06, 2025 18:34:0911
Report
HBHemang Barua
FollowNov 06, 2025 18:33:5613
Report