Back
शिंदे की टोका: सचिन पोटे का शिवसेना में प्रवेश, चुनाव में महाविकास आघाड़ी को झटका
ABATISH BHOIR
Dec 18, 2025 16:31:31
Kalyan, Maharashtra
सचिन पोटे यांच्या येण्याने टीम खा.श्रीकांत शिंदे आणखी मजबूत, महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे घोडेही फरार होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे माजी नगरसेविका जानव्ही पोटे, कॉग्रेस शहर अध्यक्ष विमल ठक्कर,मनसे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई ,माजी नगरसेविका कस्तृरी देसाई यांच्यासह मनसे चे पदाधिकारी आणि अनेक काँग्रेस पदाधिकारी सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा टांगा पलटी झालाय येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांचे घोडेही फरार होतील अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला. तसेच सचिन पोटे एक लढवय्या कार्यकर्ता असून जिथे काम केले तिकडे प्रामाणिकपणे केले अशा शब्दांत शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन पोटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर झालेल्या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात सचिन पोटे, जान्हवी पोटे, मनसेचे माजी नगरसेवक कौस्तुभ देसाई, कस्तुरी देसाई यांच्यासह काँग्रेस, मनसे आणि उबाठा पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेत पक्षप्रवेश सोहळ्यात निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला.
त्यांच्या टिका, टोमण्यांकडे आपण लक्ष देत नाही...
राज्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत असताना आपल्यावर कोण टिका करतंय, टोमणे मारत आहे, याकडे अजिबात लक्ष देत नाही. आरोपाला आरोपातून नाही कामातून टीकेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर देतो अशा शब्दांत त्यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकाकारांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलेआ
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची टीम आणखी मजबूत...
येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महायुतीचीच टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ असून सचिन पोटे यांच्या पक्षात येण्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम आणखी मजबूत झाली आहे. या टीममध्ये आधीच धोनी, विराट, रोहित होते त्यात आता सचिन पोटे यांचीही एन्ट्री झाली असून येणाऱ्या निवडणुकीत आपली महायुती जिंकणार यामध्ये कोणताही संशय नसल्याचा विश्वास व्यक्त केला. कारण सर्वसामन्यांना न्याय द्यायचा असेल आणि विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष कोणी मालक नाही, नोकर नाही. सचिन पोटे आमच्याकडे आल्याने शिवसेनेला मोठी ताकद मिळणार असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल अशा शब्दांत सचिन पोटे यांना आश्वस्त केले.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
JCJitendra Chaudhary
FollowDec 18, 2025 17:45:510
Report
RRRakesh Ranjan
FollowDec 18, 2025 17:45:140
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowDec 18, 2025 17:33:080
Report
IAImran Ajij
FollowDec 18, 2025 17:32:510
Report
ASAshok Singh Shekhawat
FollowDec 18, 2025 17:32:320
Report
IAImran Ajij
FollowDec 18, 2025 17:32:210
Report
RSRAJEEV SHARMA
FollowDec 18, 2025 17:32:070
Report
RSRAKESH SINGH
FollowDec 18, 2025 17:31:470
Report
0
Report
KAKapil Agarwal
FollowDec 18, 2025 17:31:140
Report
ADASHISH DWIVEDI
FollowDec 18, 2025 17:31:010
Report
HBHeeralal Bhati
FollowDec 18, 2025 17:30:330
Report
RRRakesh Ranjan
FollowDec 18, 2025 17:30:150
Report