Back
आठ हजार के बकाये पर बिजली कटौती: कल्याण के सब-रजिस्ट्रार कार्यालय में अफरातफरी
ABATISH BHOIR
Mar 11, 2026 07:21:11
Kalyan, Maharashtra
आठ हजारांच्या थकबाकीमुळे वीज खंडित
कल्याणच्या जॉइंट सब-रजिस्ट्रार कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड
उन्हात नागरिकांची परवड!
कल्याणच्या Karnik Road परिसरातील जॉइंट सब-रजिस्ट्रार क्रमांक १ कार्यालयात आज प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या ८ हजार रुपयांच्या थकबाकीमुळे महावितरणकडून कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मालमत्ता नोंदणीसारखी महत्वाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली. मालमत्तेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दूरदूरवरून आलेले नागरिक कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर भर उन्हात ताटकळत उभे राहिले. अनेकांनी कामासाठी विशेष सुट्टी काढून कार्यालयात हजेरी लावली होती. मात्र वीज नसल्याने संगणकीय प्रक्रिया बंद पडली आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली.यामध्ये गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. पिण्याच्या पाण्याचीही योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.दरम्यान, कार्यालयातील काही कर्मचारी मात्र मोबाईलवर व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर बाहेर नागरिक त्रास सहन करत असल्याने संतापाची लाट उसळली. अवघ्या काही हजारांच्या थकबाकीमुळे महत्वाच्या सरकारी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित होणे ही बाब प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देणारी असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे कल्याणच्या सब-रजिस्ट्रार कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
MMManoj Mondal
FollowMar 11, 2026 08:50:330
Report
RKRampravesh Kumar
FollowMar 11, 2026 08:50:140
Report
ANAnil Nagar1
FollowMar 11, 2026 08:50:020
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 11, 2026 08:49:410
Report
JPJai Prakash
FollowMar 11, 2026 08:49:270
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowMar 11, 2026 08:48:380
Report
CDChampak Dutta
FollowMar 11, 2026 08:48:080
Report
ADAnup Das
FollowMar 11, 2026 08:47:410
Report
DDDeepak Dwivedi
FollowMar 11, 2026 08:46:27Gwalior, Bhopal, Madhya Pradesh:भोपाल
टाकीज के पास पाइप लाइन फूटी
वेसमेंट की दुकानों में भरा पानी
खुदाई के काम के दौरान फूटी पाइपलाइन
जनता में आक्रोश,किया चक्काजाम
0
Report
AMATUL MISHRA
FollowMar 11, 2026 08:46:020
Report
RSRajendra sharma
FollowMar 11, 2026 08:45:510
Report
JSJitendra Soni
FollowMar 11, 2026 08:45:330
Report
ASAVNISH SINGH
FollowMar 11, 2026 08:45:230
Report
0
Report
RBRAMESH BALI
FollowMar 11, 2026 08:32:470
Report