Back
No roads, no water: न्यायाधीश दापूरमाळा के आदिवासी पाडों का दौरा
UJUmesh Jadhav
Oct 03, 2025 04:05:24
Thane, Maharashtra
रस्ता नसलेल्या पाड्याने पहिल्यांदाच पाहिला न्यायाधीश...
पाड्यांचा विकास होण्याची चिन्हे....
नाशिक आणि पालवर जिल्ह्याच्या वेशीवर वसलेला शहापूरमधील दापूरमाळ हा अतिदुर्गम पाडा. स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सोयीसुविधांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला. ना रस्ता ना पाणी. चिखल तुडवत पाण्यासाठी वणवण भटकणे हे नित्याचेच, नेहमीप्रमाणे हा गावपाडा आपल्या कामात व्यस्त असताना अचानक काही साहेबलोक पोलिसांसह धडकतात आणि त्यांची ओळख कळताच अचंबून जातात. कारण रस्ता नसलेल्या या पाड्याने पहिल्यांदाच चक्क न्यायाधीशाला पाहिले होते. निमित्त होते ३० सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश रवींद्र पाजणकर यांनी दिलेल्या भेटीचे, ठाणे जिल्ह्यातील सर्वात शेवटचा पाडा असलेला दापूरमाळ आजही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक वास्तव या वेळी समोर आले.
शहापूर तालुक्यातील दापूरमाळ येथे असलेला ठाकूरपाडा आणि खोरगडेवाडी हे आदिवासी पाडे कसाऱ्यापासून १४ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगरावर बसले आहेत. या पाड्यांच्या दळणवळणाकरिता फक्त पायवाट आहेत. डोंगरकपारीतून जाणाऱ्या या वाटेने चालणे म्हणजे जीवावर उदार होण्याचा प्रकार आहे. सध्या या दोन्ही पाड्यांतील लोकसंख्या २७३ असून, पिड्यांपिङयापासून ते येथे राहत आहेत. बाजूला धरण असूनही त्यांनी पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मूलभूत सुविधांपासूनही हे पाढे आज ही वंचित आहेत. याबाबतचे वृत्त समजताच मुंबईच्या न्यायाल्याने त्याची दखल घेतेली. त्यांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांना दिले. त्यांनी प्राधिकरणाचे सचिव न्या. रवींद्र पाजणकर यांना तेथे पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी ३० सप्टेंबर रोजी सर्व शासकीय विभाग अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दोन्ही पाड्यांना भेट दिली. तेथील लोकांसोबत संवाद साधला.
ठाणे ते कसारा लोकल प्रवास. त्यानंतर पोलिसांच्या गाडीने माळगावपर्यंत जाता आले; पण पुढे रस्ताच नसल्याने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रवींद्र पाजणकर हे स्वतः चिखल झालेल्या पायवाटेवरून पाच किलोमीटर अंतर चालत गेले. तीन डोंगरांचा चढ उतार आणि कडेकपारीतून मार्ग काढत त्यांनी दापूरमाळमधील दोन्ही पाडे गाठले. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट दिलेला
त्यांनी हे धाडस केले. तेथे
पोहोचून आदिवासींची अवस्था पाहून तेही चकित झाले. दापूरमाळमधील दोन्ही पाड्यात येताच पथकाने येथील रहिवाशांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दापुरमाळा येथे असलेल्या ठाकूरपाडा आणि खोरगडेवाडी या दोन पायांतील रहिवाशांनी कधी पक्का रस्ता पाहिला नाही. तिथे चक्क न्यायाधीश आपल्या घराच्या दारात आल्याचे पाहून चक्क झाले. घरोघरी जाऊन न्यायाधीश त्यांच्याशी संवाद साधत होते. महिला व वृद्धांची विचारपूस करीत होते. विद्याथ्यांसोबत संवाद साधत होते. तरुणांची मते जाणून घेत होते. शहरापासून दूर राहणाऱ्या लोकांसाठी हे नवे होते. त्यामुळे प्रचंड कुतूहल त्यांच्या डोळ्यात दिसत होते.
दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी पायाभूत सुविधां, रस्त्याची दुरवस्था, पाणीपुरवठा आदी समस्या मांडल्या. अधिकारी वर्गाने या समस्या गांभीर्याने ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीमुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून लवकरच त्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. सदर गावाची दखल मुंबई हायकोर्टाने घेतली आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowOct 03, 2025 06:21:100
Report
ASARUN SINGH
FollowOct 03, 2025 06:20:510
Report
MGMohd Gufran
FollowOct 03, 2025 06:20:340
Report
VSVISHAL SINGH
FollowOct 03, 2025 06:20:230
Report
AAAsrar Ahmad
FollowOct 03, 2025 06:20:000
Report
AMATUL MISHRA
FollowOct 03, 2025 06:19:461
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 03, 2025 06:19:301
Report
SJSantosh Jaiswal
FollowOct 03, 2025 06:19:160
Report
KAKapil Agarwal
FollowOct 03, 2025 06:18:550
Report
ABAnnu Babu Chaurasia
FollowOct 03, 2025 06:18:400
Report
PKPramod Kumar Gour
FollowOct 03, 2025 06:18:240
Report
DIDamodar Inaniya
FollowOct 03, 2025 06:18:130
Report
DSDevendra Singh
FollowOct 03, 2025 06:17:450
Report
AVArun Vaishnav
FollowOct 03, 2025 06:17:330
Report
JAJhulan Agrawal
FollowOct 03, 2025 06:17:130
Report