Back
कोपरखैरणे दुर्घटना: ट्यूशन क्लास पर स्लैब गिरने से 14 वर्षीय छात्र की मौत
SNSWATI NAIK
Mar 05, 2026 17:31:33
Navi Mumbai, Maharashtra
कोपरखैरणे परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सेक्टर-२ मधील 'विद्याभवन' या तीन मजली इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावरील घरगुती ट्युशन क्लासवर कोसळला. या घटनेत एकूण १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. मदतकार्यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याने उपचारादरम्यान प्राण गमावला.
कोपरखैरणे, सेक्टर-२, प्लॉट नंबर १२ येथील 'विद्याभवन सोसायटी' या २८ वर्षे जुन्या इमारतीत सायंकाळी ५:२० च्या सुमारास ही घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावर शिक्षिका शामली चौधरी (५३) या मुलांचा ट्यूशन घेत होत्या. त्याचवेळी पहिल्या मजल्याचा स्लॅब अचानक खाली कोसळला.
या दुर्घटनेत मनीष राहुल म्हसे (वय १४ वर्ष) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या बातमीमुळे संपूर्ण नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १२ विद्यार्थी आणि १ शिक्षिका अशा एकूण १३ जणांना जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले.
बाईट- पुरुषोत्तम जाधव - अग्निशमन अधिकारी
बाईट- डॉ.कैलास शिदे - म्हापलीक आयुक्त
रेस्क्यू करण्यात आलेल्यांची नावे:
सिद्धांत गुप्ता (८), प्रिन्स सोनी (११), आयशा, कुसूम (१५), निष्का धनवाडे (१४), मनीष म्हसे (१४ - मृत), आराध्या बोडसे (१४), तन्वी श्रीवास्तव (७), देवांश पुजारी (१२), राजदीप वानखडे (१०), पार्थ खैरनार (१४), रुद्र येलूरकर (५) आणि शिक्षिका शामली चौधरी (५३).
इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत २८ वर्षे जुनी असून तिची अवस्था धोकादायक होती. या इमारतीमध्ये १६ कुटुंबे राहत होती. या दुर्घटनेमुळे जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DKDebojyoti Kahali
FollowMar 05, 2026 19:02:540
Report
DKDebojyoti Kahali
FollowMar 05, 2026 19:01:51Cooch Behar, West Bengal:কোচবিহার মাথাভাঙ্গা বিধানসভার নিশিগঞ্জে ব্যাপক উত্তেজনা বিজেপির রথযাত্রা কে কেন্দ্র করে তৃণমূল বিজেপি
0
Report
PPPraveen Pandey
FollowMar 05, 2026 19:00:160
Report
RMRoshan Mishra
FollowMar 05, 2026 19:00:090
Report
NCNITIN CHAWRE
FollowMar 05, 2026 18:46:070
Report
RKRAJESH KUMAR
FollowMar 05, 2026 18:45:510
Report
SHSAYED HUSSAIN AKHTAR
FollowMar 05, 2026 18:45:430
Report
RSRAJEEV SHARMA
FollowMar 05, 2026 18:45:310
Report
VSVishnu Sharma
FollowMar 05, 2026 18:45:120
Report
MSManish Sharma
FollowMar 05, 2026 18:30:260
Report
RKRAJESH KUMAR
FollowMar 05, 2026 18:30:170
Report
RKRAJESH KUMAR
FollowMar 05, 2026 18:30:07Noida, Uttar Pradesh:तेजस्वी यादव ने टीम इंडिया को दी बधाई
T20 World Cup के फाइनल मुकाबले में जाने पर टीम इंडिया को दी बधाई
0
Report
0
Report
अनोखी होली,गौ माता के सानिध्य में खेला गया रंगों का पर्व,गौ सेवा के साथ दिया सनातन संस्कृति का संदेश
0
Report
0
Report