Back
कल्याण के कुणबी समाज की पैदल दिंडी आळंदी के लिए रवाना, लाखों वारकरी शामिल
UJUmesh Jadhav
Nov 07, 2025 08:21:37
Thane, Maharashtra
गोवेली ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे शुक्रवारी आळंदीकडे प्रस्थान..! कल्याण तालुका कुणबी समाज वारकरी संप्रदायाच्या पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान..! शेकडो वारकरी झाले पायी वारीत सहभागी..! पायी दिंडीत तरूणाचा भरणा..! टिटवाळा:- सालाबाद प्रमाणे महाराष्ट्रातील लाखो वारकरी शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करत, ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता आळंदी कडे प्रयस्त होत असतात. याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळाची गोवेली ते आळंडी पायी दिंडी शुक्रवारी सकाळी आळंदीकडे प्रस्थान झाले. या दिंडी सोहळ्यात शेकडो लहान थोर वारकरी सहभागी झाले असल्याचे चित्र दिसून आले. भेटी लागे जीवा लागलीसे आस.. तसेच आपुल्या माहेरा जाईन मी... या संत उक्तीप्रमाणे येत्या १७ नोव्हंबर २०२५ रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची वर्षेभर वाट पहाणारे वारकरी माऊलीच्या भेटीसाठी पायी दिंडीच्या माध्यमातून खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेऊन, हाताने टाळ-मृदूंगाचा गजर व मुखाने हरिनामाचा जयघोष करत हजारो पायी दिंड्या आळंदीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. या धर्तीवर कल्याण तालुक्यातील कुणबी समाज वारकरी संप्रदाय मंडळाच्या पायी दिंडीचे शुक्रवारी आळंदीकडे प्रस्थान झाले. शेकडो महिला, पुरूष, तरूण, तरूणी व बाळ वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. ज्ञानेबा...तुकुबांचा जयघोष करत दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाली आहे. सदर दिंडीत तरूणांचा भरणा जास्त असल्याचे जेष्ठ वारकरी हभप बाळाराम महाराज चौधरी, हभप दिलीप बुवा देवकर व हभप दामोदर धोरडे यांनी सांगीतले. तसेच तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखविला तरच पुढे या दिंड्या अशाच अनादीकाळा पर्यंत चालतील असे मत व्यक्त ही त्यांनी व्यक्त केले.
8
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
AGAdarsh Gautam
FollowNov 07, 2025 11:14:510
Report
DSDM Seshagiri
FollowNov 07, 2025 11:14:320
Report
ASAkash Sharma
FollowNov 07, 2025 11:14:050
Report
DDDeepak Dwivedi
FollowNov 07, 2025 11:12:590
Report
SRSANDEEP RATHORE
FollowNov 07, 2025 11:12:360
Report
KSKISHORE SHILLEDAR
FollowNov 07, 2025 11:12:020
Report
ADAjay Dubey
FollowNov 07, 2025 11:11:210
Report
AAANOOP AWASTHI
FollowNov 07, 2025 11:11:100
Report
PSPIYUSH SHUKLA
FollowNov 07, 2025 11:10:40Panna, Madhya Pradesh:इस खबर पर असर और अपडेट
जिला शिक्षा अधिकारी ने शहपुरा हाई स्कूल का किया दौरा
प्राचार्य को हटाया गया, जांच टीम गठित, एक सप्ताह में जांच टीम देगी रिपोर्ट
zee mpcg ने प्रमुखता से दिखाई थी खबर
0
Report
VMVimlesh Mishra
FollowNov 07, 2025 11:10:260
Report
0
Report
RKRakesh Kumar
FollowNov 07, 2025 11:10:000
Report
DBDURGESH BISEN
FollowNov 07, 2025 11:09:460
Report
RNRajesh Nilshad
FollowNov 07, 2025 11:09:050
Report
WMWaqar Manzoor
FollowNov 07, 2025 11:08:490
Report