Back
ड प्रभाग के चुनाव कार्यालय में नामांकन प्रक्रिया के दौरान हंगामा, उम्मीदवारों ने एक-दूसरे पर आरोप लग...
ABATISH BHOIR
Jan 01, 2026 06:21:35
Kalyan, Maharashtra
कल्याण पूर्वेतील ड प्रभाग निवडणूक कार्यालयात उमेदवारी छाननीवेळी गोंधळ. भाजप उमेदवाराच्या तीन अपत्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस–ठाकरे गट आणि अपक्ष उमेदवार आक्रमक. निवडणूक अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचे गंभीर आरोप करत अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच घातला गोंधळ, अर्धा तास तणावपूर्ण वातावरण.
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 13, ड प्रभागाच्या निवडणूक कार्यालयात आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मधुर उमेश म्हात्रे आणि काँग्रेस उमेदवार राहुल काटकर सह काही उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अनेक उमेदवारांचे अर्ज केवळ सही नसल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज बाद केले मात्र भाजपचे उमेदवार सरोज मनोज राय यांच्या उमेदवारी अर्जात तीन अपत्यांबाबत आवश्यक पुरावे जोडले नसतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना अतिरिक्त संधी व सवलत दिल्याचा आरोप करत गोंधळ घातला. तब्बल अर्धा तास निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गोंधळ सुरू असल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मात्र यानंतर अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार देण्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्यानंतर हा वाद थांबला त्या नंतर उमेदवारांनी लेखी अर्ज दिला आहे तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. एखाद्या उमेदवाराला वेगळा आणि इतरांना वेगळा न्याय का? असा सवाल काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला केला आहे तर या उमेदवारांच्या आरोपावर भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळत आमच्यावर लावलेले आरोप पूर्णपणे हास्यास्पद आहेत. आमच्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रात आवश्यक ती सर्व माहिती योग्य पद्धतीने भरलेली आहे. तीनही अपत्य 2001 पूर्वीची असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कायदेशीर अडचण येत नाही. तसेच हरकती घेणाऱ्या उमेदवारांनी चुकीच्या माहितीचा पुरावा दिल्यास कायदेशीर हरकत ग्राह्य धरली जाईल, अन्यथा या तक्रारी कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या प्रकरणी लेखी अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित दस्तावेज उमेदवारी अर्ज ला जोडत नसल्याचे लेखी पत्र इतर उमेदवारांना दिलेले आहेत तसेच त्या वेळचे सीसीटीव्ही देखील लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे दखल घेतली नाही तर मुख्य निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात येईल.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
KRKishore Roy
FollowJan 01, 2026 07:47:030
Report
VRVikash Raut
FollowJan 01, 2026 07:46:210
Report
MKMUKESH KUMAR
FollowJan 01, 2026 07:45:540
Report
0
Report
KSKartar Singh Rajput
FollowJan 01, 2026 07:45:110
Report
MDMahendra Dubey
FollowJan 01, 2026 07:44:460
Report
NJNaynee Jain
FollowJan 01, 2026 07:44:23Noida, Uttar Pradesh:Pool cleaning
Pool deep cleaning in action
0
Report
SJSubhash Jha
FollowJan 01, 2026 07:44:000
Report
1
Report
JRJAIDEEP RATHEE
FollowJan 01, 2026 07:43:240
Report
NJNaynee Jain
FollowJan 01, 2026 07:43:10Noida, Uttar Pradesh:The precision of these firefighters is next level.
0
Report
RKRAMAN KHOSLA
FollowJan 01, 2026 07:43:020
Report
SDSurendra Dasila
FollowJan 01, 2026 07:42:400
Report
AAAsrar Ahmad
FollowJan 01, 2026 07:42:29Noida, Uttar Pradesh:Punjabi singer/actor Parmish Verma wishes happy new year Happy New Year 2026 people
0
Report