Back
चंद्रपूर नगरपालिका टिकट वितरण में धानोरकर समर्थकों के टिकट कटे, विजय वडेट्टीवार प्रचार प्रभावित
AAASHISH AMBADE
Jan 05, 2026 14:00:47
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर मनपा तिकीट वाटपावरून खा. धानोरकर झाल्या लक्ष्य, तिकीट वाटपात खा. धानोरकर यांनी केलेल्या मनमानीमुळे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार प्रचारात नाहीत , नगरसेवक पदाची तिकीट नाकारलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची प्रतिक्रिया
अँकर:--चंद्रपूर मनपा तिकीट वाटपावरून काँग्रेस खा. धानोरकर लक्ष्य झाल्या आहेत. तिकीट वाटपात खा. धानोरकर यांनी केलेल्या मनमानीमुळे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार प्रचारात नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक पदाची तिकीट नाकारलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिली आहे. खा. धानोरकर यांनी वडेट्टीवार समर्थकांची तिकिटे कापताना स्वतःच्या वयाचा नव्हे पण पदाचा मान ठेवायला हवा होता अशी शेलकी टीका होत आहे.
व्ही. ओ. १) चंद्रपूर शहर मनपाच्या काँग्रेस पक्षाच्या तिकीट वाटपाचे महाभारत अधिक रंगत होत चालले आहे. प्रत्यक्ष तिकीट वाटपात खा. धानोरकर यांच्या समर्थकांना झुकते माप दिले गेल्याचे आता उघडपणे बोलले जात असून तिकीट वाटपात खा. धानोरकर यांनी केलेल्या मनमानीमुळे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार प्रचारात नाहीत ,अशी प्रतिक्रिया नगरसेवक पदाची तिकीट नाकारलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी दिली आहे. काँग्रेसने यंदा अनुभवी नगरसेवकांना दूर सारत 12 पैकी एखाद- दोन वगळता सर्वांच्या तिकीट कापल्या असून यात वडेट्टीवार समर्थकांची संख्या अधिक आहे. यामुळे आ. वडेट्टीवार समर्थकांत रोष आहे. यातील बहुतांश नगरसेवकांनी अपक्ष मैदानात उडी घेतली आहे.
बाईट १) सुनीता लोढीया, नाराज माजी नगरसेवक, काँग्रेस
व्ही. ओ. २) खा. धानोरकर यांनी वडेट्टीवार समर्थकांची तिकिटे कापताना स्वतःच्या वयाचा नव्हे पण पदाचा मान ठेवायला हवा होता. खा धानोरकर यांचे प्रभावक्षेत्र केवळ त्यांचा जुने वरोरा- भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघ असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केलाय. आपण खा. धानोरकर यांना वारंवार प्रत्यक्ष स्थितिची माहिती दिल्यावरही तिकीट वाटपात अन्याय करण्यात आल्याचे ते म्हणाले.
बाईट २) नंदू नागरकर, नाराज माजी नगरसेवक, काँग्रेस
व्ही. ओ. ३) निवडणूक प्रचाराच्या प्रारंभीच काँग्रेसच्या दोन बड्या नेत्या मधील नाराज समर्थकांचे सूर काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या पुढच्या काळात या सर्व नाराजांना शांत करत काँग्रेस यातून मार्ग कसे काढते यावरच जय -पराजय अवलंबून आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
APAnand Priyadarshi
FollowJan 07, 2026 05:41:330
Report
BCBasudeb Chatterjee
FollowJan 07, 2026 05:41:040
Report
TCTanya chugh
FollowJan 07, 2026 05:39:530
Report
KAKapil Agarwal
FollowJan 07, 2026 05:39:410
Report
KKKARAN KHURANA
FollowJan 07, 2026 05:39:280
Report
ASAkash Sharma
FollowJan 07, 2026 05:39:050
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 07, 2026 05:38:140
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 07, 2026 05:37:310
Report
AKAtul Kumar
FollowJan 07, 2026 05:37:180
Report
SJSantosh Jaiswal
FollowJan 07, 2026 05:36:500
Report
YMYadvendra Munnu
FollowJan 07, 2026 05:34:580
Report
AKAshok Kumar1
FollowJan 07, 2026 05:32:540
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 07, 2026 05:32:25Noida, Uttar Pradesh:stone pelting at Turkoman gate
0
Report