Back
भंडारा में नवजात बच्ची की ब्लैक मार्केटिंग: डॉक्टर समेत पांच गिरफ्तार, मुख्य आरोपी फरार
PTPRAVIN TANDEKAR
Feb 12, 2026 02:46:06
Bhandara, Maharashtra
नवजात बलिकेला डॉक्टराने अडीज लाखात विकले... पाच जणांवर गुन्हा दाखल....एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात... मुख्य सूत्रधार असलेला डॉक्टर मात्र फरार..... चित्रपटात पाहायला मिळणारा मुलांच्या विक्रीचा प्रकार आता थेट भंडारा जिल्ह्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे हिच्या घरी दहा दिवसांची नवजात बालिका असल्याची माहिती २ फेब्रुवारी रोजी महिला व बालकल्याण विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर अज्ञात व्यक्तीने दिली. माहिती मिळताच जिल्हा समन्वयक व कर्मचाऱ्यांचे पथक वाघमारे यांच्या घरी पोहोचले. तेथे बालिका आढळून आली. ही मुलगी गोंदिया येथून आणल्याचे मालतीने सांगितले. अधिक चौकशीसाठी ३ फेब्रुवारी रोजी तिला भंडारा येथील महिला व बालकल्याण कार्यालयात बोलावण्यात आले होते. मात्र ती उपस्थित राहिली नाही. यानंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या समन्वयकांनी संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. वरठी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ पांढराबोडी येथे दाखल झाले. मात्र तोपर्यंत संबंधित महिला बालिकेला घेऊन चारचाकी वाहनातून पसार झाली होती. पोलिसांनी नाकाबंदी करून कुशारी फाटा येथे वाहन अडवले. वाहनात महिला आणि दहा दिवसांची चिमुकली आढळून आली. बालिकेच्या अधिकृत माता-पित्यांबाबत किंवा आवश्यक कागदपत्रांबाबत समाधानकारक माहिती देण्यात ती अपयशी ठरली. गोंदिया येथील एका डॉक्टरांच्या सांगण्यावरून मुलीला गोंदियाला घेऊन जात असल्याचे तिने कबूल केले. तपासात पुढे धक्कादायक बाब समोर आली. संबंधित दाम्पत्याला मुलगी अशक्त असल्याचे सांगून उपचारासाठी नागपूरला पाठवण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्याच वेळी गोंदिया येथील टोळीने या नवजात बालिकेची अडीच लाख रुपयांत विक्री केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एक आरोपी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असलेला गोंदिया येथील नामांकित डॉक्टर सध्या फरार आहे. डॉक्टर अटकेत आल्यानंतर या एका बालिकेपुरताच प्रकार मर्यादित आहे की यामागे आणखी मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
DPDharmendra Pathak
FollowFeb 12, 2026 04:02:420
Report
VKVijay1 Kumar
FollowFeb 12, 2026 04:02:180
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowFeb 12, 2026 04:02:060
Report
RKRANJEET Kumar OJHA
FollowFeb 12, 2026 04:01:540
Report
CRCHANDAN RAI
FollowFeb 12, 2026 04:01:420
Report
KBKuldeep Babele
FollowFeb 12, 2026 04:00:570
Report
ASAJEET SINGH
FollowFeb 12, 2026 04:00:420
Report
ADArjun Devda
FollowFeb 12, 2026 04:00:250
Report
0
Report
0
Report
ADAbhijeet Dave
FollowFeb 12, 2026 03:51:090
Report
RVRaunak Vyas
FollowFeb 12, 2026 03:50:580
Report
SDShankar Dan
FollowFeb 12, 2026 03:50:460
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowFeb 12, 2026 03:50:200
Report
0
Report