Back
गोंडिया के आमगांव में 9 वर्षीय विद्यार्थी को शिक्षिका मारहाण, परिवार ने पुलिस में शिकायत
PTPRAVIN TANDEKAR
Feb 12, 2026 08:30:29
Bhandara, Maharashtra
विद्यार्थ्याला बेदम मारहाण.... आईची पोलिसांत तक्रार... गोरठा (ता. आमगाव) येथील घटना.... विद्यार्थी शाळेत जाण्यास भयभीत – मुख्याध्यापकांकडून दखल नसल्याचा आरोप....
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोरठा गावातील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धैर्य मनोज मिश्रा (वय ९ वर्ष) या चिमुकल्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षिका शोभा गिरडकर यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकाराची दखल घेतली नसल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात येत आहे.
Vo :- धैर्य दुपारच्या सुट्टीत वॉशरूमकडे जात असताना त्याच्या मित्राकडे लॉलीपॉप होता. ग्रामीण भागात लॉलीपॉपला “चूपरी” असे संबोधले जाते. धैर्यने आपल्या मित्राला “माझी चूपरी मला दे” असे म्हटले. मात्र, हा शब्द एका विद्यार्थिनीच्या कानावर पडला. त्या विद्यार्थिनीला गैरसमज होऊन धैर्यने शिक्षिका शोभा गिरडकर यांना “चूपरी” म्हटल्याचे वाटले आणि तिने ही बाब शिक्षिकेला सांगितली.
या गैरसमजातून शिक्षिकेने धैर्यला बोलावून घेत बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. सायंकाळी घरी आल्यानंतर धैर्यच्या मोठ्या भावंडांनी आईला मारहाणीबाबत माहिती दिली. आईने धैर्यची विचारपूस केली असता, त्याला बेशुद्ध पडण्याइतपत मारहाण झाल्याचे सांगितले जाते. यामुळे संतप्त झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी आमगाव पोलीस स्टेशन गाठून संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर धैर्यचे मनोबल खचले असून तो शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. शिक्षण हक्क कायदा (Right to Education) अंतर्गत विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा देण्यास बंदी असताना, या प्रकरणात शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाईट :- धैर्य मनोज मिश्रा – विद्यार्थी
बाईट:- राणी मनोज मिश्रा – विद्यार्थ्याची आई
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
SPSANDIP PRAMANIK
FollowFeb 12, 2026 10:02:17Kolkata, West Bengal:সারা ভারত শ্রমিক ধর্মঘটে দক্ষিণ কলকাতার বেহালয় কর্পোরেশনের সামনে সিআইউ এর কর্মীদের মিছিল এবং বিক্ষোভ ।
0
Report
RVRaunak Vyas
FollowFeb 12, 2026 10:02:000
Report
RRRAJA REHBER JAMAL
FollowFeb 12, 2026 10:01:220
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 12, 2026 10:01:070
Report
MPMAHESH PARIHAR1
FollowFeb 12, 2026 10:00:340
Report
VKVijay1 Kumar
FollowFeb 12, 2026 09:51:040
Report
STSumit Tharan
FollowFeb 12, 2026 09:50:310
Report
0
Report
VSVaibhav Sharma
FollowFeb 12, 2026 09:50:150
Report
AKAshok Kumar sharma
FollowFeb 12, 2026 09:49:270
Report
AOAjay Ojha
FollowFeb 12, 2026 09:49:080
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowFeb 12, 2026 09:46:300
Report
SKSantosh Kumar
FollowFeb 12, 2026 09:46:10Noida, Uttar Pradesh:लखनऊ: कानपुर लेम्बोर्गिनी एक्सीडेंट केस में यूपी के मंत्री जेपीएस राठौर ने कहा, "कानून अपना काम कर रहा है, और कानूनी कार्रवाई की जाएगी और हो भी रही है"
0
Report
BSBHUPENDAR SINGH SOLANKI
FollowFeb 12, 2026 09:45:580
Report
DCDILIP CHOUDHARY
FollowFeb 12, 2026 09:45:270
Report