Back

यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे “फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह” रॅली उत्साहात पार
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ : भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या "फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह" या विशेष उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत “फिटनेस के डोस – आधा घंटा रोज” या संदेशाचा प्रसार करत नागरिकांना दररोज किमान अर्धा तास व्यायाम करण्याचे आवाहन करण्यात आले.
ही रॅली दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायकलिंग ड्राईव्ह पोलीस मुख्यालय यवतमाळ ते दारव्हा रोड या 10 किलोमीटर अंतरावर शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली.
14
Report