Back
नाशिकमध्ये येणार ५० इलेक्ट्रिक बसेस, जाणून घ्या महत्त्व!
SGSagar Gaikwad
Aug 31, 2025 03:01:26
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_new_citykink_bus
जानेवारीत सिटीलिंकच्या ताफ्यात येणार ५० 'ई-बसेस'
अँकर
केंद्र सरकारकडून नाशिक महापालिकेला पीएम ई-बस योजनेंतर्गत १०० इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय... त्यानुसार पहिल्या टप्प्यात पन्नास नाशिकला ई-बसेस मिळणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया काही महिन्यांपासून महालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून सुरू होती. वीजजोडणीचे काम अंतिम मोकळा झालाय.... त्यामुळे पुढील वर्षीच्या जानेवारीत ५० ई-ब सेस सिटीलिंकच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शहरांत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको-लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार नाशिकला ५० बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या ताफ्यात २०० सीएनजी व ५० डिझेल बसेस आहेत. मात्र, यातील ५० डिझेल बसेस थांबविण्याच्या विचारात प्रशासन होते. त्या बसेसही सुरूच असणार आहेत. केंद्र शासनाने पीएमई बस योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको-लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. नाशिक मनपाला पहिल्या टप्प्यात ५० बसेस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 01, 2025 03:02:47kolhapur, Maharashtra:
नागपूर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे... ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरता मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे... तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले जाऊ नये म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपुरात संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी साखळी उपोषणाच्या दोन दिवसात दिवशी प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांनी उपस्थिती लावली... भाजपाचे आमदार प्रविण दटके,आशिष देशमुख, आमदार परिणय फुके, काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी,खासदार नामदेव किरसान या सह अनेक आजी-माजी आमदार तसेच काही नेत्यांनी उपस्थिती या आंदोलनाला पाठिंबा दिला... दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारकडून पुन्हा लेखी आश्वासन मागितले आहे.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 01, 2025 03:02:42Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात श्वास गुदमरल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध तर यापैकी दोघां बहिण भावांचा घटनेत दुर्दैवी मृत्यू
- सोलापुरात गॅस गळतीमुळे पाच जणांचं कुटुंब बेशुद्ध अवस्थेत तर बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू
- सोलापुरातील लष्कर भागातील घटना, सकाळी 11:00 च्या सुमारास घटना आली उघडीस
- वडील, आई, आजी या तिघांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू
- रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केला नव्हता आणि त्याच दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत पाच जणांचा कुटुंब झोपले होते.
- यातच पाच जणांचा श्वास गुदमरल्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडल्याचा प्राथमिक अंदाज.
- युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय : 40), रंजना युवराज बलरामवाले (35), विमल मोहन सिंग बलरामवाले (60) यांच्यावर उपचार सुरू आहेत तर हर्ष बलरामवाले (6), अक्षरा बलरामवाले(4) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला..
- सदर पाच जणांच्या कुटुंबातील रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे..
- बलरामवाले कुटुंब दोन दिवसापूर्वीच तिरुपती वरून दर्शन घेऊन परतले होते..
- लष्कर परिसरातील बेडर फुल जवळ युवराज बलराम वाले हे आपल्या कुटुंबासह राहतात..
- युवराज हा गवंडी तर रंजना ही विडी कामगार म्हणून काम करते, आई विमल ही एका रुग्णालयात कामाला होती.
- रंजना हिच्या सोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते आणण्यासाठी गेले असता परत आल्यानंतर संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आलं आढळून.
- या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून याचा पुढील तपास होत आहे
Byte : प्रत्यक्षदर्शी
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 01, 2025 03:02:32Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_old_man_Education
( साक्षर अभियानाचे स्टॉक व्हिज्युअल्स वापरा)
नाशिक जिल्ह्यात तब्बल २८ हजार ज्येष्ठ झाले साक्षर
अँकर
शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे प्रत्यक्षात उतरवत नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी नवीन आदर्श घालून दिला आहे. वयाच्या ६५ वर्षापुढे जाऊनदेखील ज्ञानाची ओढ कायम ठेवत तब्बल ५० ज्येष्ठ नागरिकांनी यंदा परीक्षेत सहभाग नोंदवला आणि उल्लेखनीय यश मिळवले आहे....'उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम' अंतर्गत जिल्ह्यातील ३,१४६ केंद्रांवर एकाचवेळी परीक्षा घेण्यात आली. यातून जिल्हाभरातील २९ हजार १५ पैकी २८ हजार २६२ परीक्षार्थी उपस्थित राहिले. त्यापैकी तब्बल २८ हजार २४० जण उत्तीर्ण होऊन नाशिकने ९९.९९ टक्के निकालाचा विक्रम नोंदवला आयए इमेज नागरिकांनी दाखवलेल्या जिद्दीमुळे आहे. या यशामुळे नाशिक जिल्हा राज्यातच नव्हे तर देशभरात साक्षरतेचा नवा दीपस्तंभ ठरत आहे. ज्येष्ठ तरुण पिढीसाठीही प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. परीक्षा देणाऱ्यांमध्ये १८ हजार ०६१ स्त्रियांचा समावेश होता. तर पुरुषांची संख्या ही १० हजार १९५ एवढी होती. पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या सुमारे दुप्पट होती. त्याशिवाय ६ ट्रान्सजेंडर व्यक्तींनीही परीक्षेला हजेरी लावली....
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 01, 2025 03:01:57Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 0109ZT_MAVAL_VANRAI_KARAR
Total files : 05
Headline : मावळात पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मोठं पाऊल…
Anchor:
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मावळात मोठं पाऊल… सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय यांच्यात करार झाला असून मावळातील सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरातील विदेशी झाडे हटवून स्थानिक भारतीय वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमामुळे मावळची जैवविविधता वाचेल, हिरवेगार जंगल फुलेल आणि भावी पिढ्यांसाठी समृद्ध नैसर्गिक वारसा निर्माण होईल. या करारावेळी सह्याद्री देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे, मावळचे आमदार सुनील शेळके तसेच उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते..
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 01, 2025 03:01:46Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Japan Ganpati
File'05
Rep: Hemant Chapude(Shirur)
Anc: जपान मध्ये हि लाडक्या बाप्पाच जल्लोषात आगमन झालं असून,जपान च्या टोकीयो शहरा मध्ये अमित गुंदेचा या भारतीय नागरिकाने आपल्या घरी आकर्षक असा देखाबा बनवून लाडक्या बाप्पाला विराजमान केलंय,महत्वाचं म्हणजे त्यांनी श्रींची मुर्ती खास करून मुंबई वरून मागवलीय...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे..
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 01, 2025 03:01:21Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_murder_updet
भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या मागावर ६ पथके
अँकर
नाशिक मध्ये झालेल्या धोत्रे खुन प्रकरणात फरार झालेला भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या शोधार्थ गुन्हे शाखेचे ६ पथके रवाना झाले आहे.... मृत धोत्रेच्या नातेवाइकांना जो पर्यंत निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र तपास आणि निमसे यांच्या मागावर पोलिस पथक असल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाइकांनी शनिवारी राहुल धोत्रे याच्यावर शोकाकूल वातावरणात नांदूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रा निमसे यांच्या बंगल्यासमोरून गेल्यानंतर नातेवाइकांनी निमसेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिस बंदोबस्त असल्याने वाद टळला. गुन्हे शाखा युनिट १ चे पथक निमसे यांच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांकडून दिलीये. निमसे यांच्यावर भाजपकडून कारवाईची चर्चा सुरू आहे...
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 01, 2025 03:00:12Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 0109ZT_MAVAL_DEKHAVA
Total files : 05
Headline : मावळ मधील वाळुंज कुटुंबाने लाडक्या बाप्पाजवळ साकारला ऑपरेशन सिंदूर चा देखावा
Anchor :
मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे आगमन घरोघरी झाले आहे. त्यासाठी घरोघरी विविध संकल्पना राबवत लाडक्या बाप्पा समोर डेकोरेशन केले जाते. मावळ तालुक्यातील इंदोरी गावातील महेंद्र वाळुंज यांच्या घरी या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने झाले आहे. दरवर्षी वेगळ्या संकल्पनेवर आधारित देखावे सादर करणारे वाळुंज यावर्षी समाजासमोर देशभक्ती जागवणारा एक अनोखा संदेश घेऊन आले आहेत. पहलगाममध्ये घडलेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय जवानांनी केलेले “ऑपरेशन सिंदूर” यावर आधारित प्रभावी देखावा त्यांनी आपल्या घरी साकारला आहे. या देखाव्यात भारतीय जवानांची शौर्यगाथा, सीमेवरील परिस्थिती आणि दहशतवाद्यांचा केलेला प्रतिकार याचे हृदयाला भिडणारे चित्रण पाहायला मिळते. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागदी पुठ्ठा आणि टाकाऊ वस्तूंमधून साकारण्यात आला आहे. पर्यावरणाचा विचार करून, कमी खर्च आणि मर्यादित वेळेत, अवघ्या दहा दिवसांत उभारलेला हा देखावा आकर्षक ठरला आहे. यात पत्नी, मुले आणि आई यांनी महेंद्र वाळुंज यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली आहे. विशेष म्हणजे हा देखावा भारतीय जवानांना समर्पित करण्यात आला आहे.आजच्या पिढीला पहलगामसारख्या हल्ल्यांची भीषणता आणि त्याला उत्तर देणाऱ्या जवानांचे शौर्य जवळून दाखवण्याचा प्रयत्न या देखाव्यातुन साकार केला गेला आहे. बाप्पाच्या दरबारात भक्तीबरोबरच देशभक्तीची जाज्वल्य भावना जागृत व्हावी, समाजाने जवानांविषयी कृतज्ञता बाळगावी आणि तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा यामागचा वाळुंज कुटुंबाचा उद्देश आहे. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt Chaitralli (file.no.04)
बाईट : महेंद्र वाळुंज (file no.05)
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 01, 2025 02:46:42Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_nmc_tax
घरपट्टीसाठी तीन महिने आत भरात तर मनपा करणार ९५ टक्क्यांपर्यंत दंडमाफी....
अँकर
नाशिक महानगरपालिकेकडून मागच्या वर्षी शास्तीवर तब्बल ९५ टक्के माफी देऊन अभय योजना महापालिकेकडून राबविण्यात आली होती, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे नियमित करदात्यांसाठी मनपाकडून १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ९५ टक्के दंड माफ, तर १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ८५ टक्के दंड माफ करण्यात येणार आहे...मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घेत कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा महापालिकेने रेकॉर्डब्रेक २५६ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला. त्यात सवलत योजना महत्त्वपूर्ण होती. नियमित करदात्यांना प्रोत्साहन म्हणून महापालिका करसंकलन विभाग सवलत योजना राबवते. मालमत्ताधारकांनी सवलतीच्या कालावधीत कर भरणा केल्यास त्यांना एकूण बील रकमेवर आठ टक्के सूट दिली जाते. हाच कर भरणा ऑनलाइन अदा केल्यास दहा टक्के सूट मिळते. आर्थिक सवलत मिळत असल्याने मालमत्ताधारकही त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. मागील वर्षी या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११० कोटींचा मालमत्ता कर भरणा झाला होता.....
0
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 01, 2025 02:45:51Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_visrjan
पाचव्या दिवशी सुमारे ४० हजार मूर्तीचे संकलन
अँकर
नाशिक महापालिकेच्यावतीने विसर्जनाच्या पाचव्या दिवशी सुमारे ४० हजार मूर्तीचे संकलन करण्यात आले आहे.... पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाकडून श्रीगणेश विसर्जनासाठी २९ नैसर्गिक, तर जलप्रदूषण टाळण्यासाठी ५६ कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले होते. ज्या भाविकांकडे पी.ओ.पी.च्या मूर्ती होत्या, त्या विसर्जनासाठी महापालिकेने विनामूल्य अमोनियम बायकार्बोनेट पावडरची व्यवस्था केली होती. या पावडरमुळे पी.ओ.पी.च्या मूर्ती सहजपणे विरघळतात आणि प्रदूषण टाळले जाते. जीवरक्षक दलांची नेमणूक केली होती... भक्ती भावाने पाचव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आलाय...
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 02:01:59Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_CSN_RATION(1 FILE)
छत्रपती संभाजीनगर :रेशन दुकानावरून धान्याऐवजी थेट अनुदान,जानेवारी 2025 चे अनुदान रखडले, अनुदान देण्याची मागणी
अँकर : राज्य सरकारने रेशन दुकानातून गोरगरीब शेतकरी कुटुंबाना अन्न धान्या ऐवजी थेट रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी 2025 पासून लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं नाही.राज्य सरकारने जिल्ह्यासाठी तब्बल 15 कोटी रुपयांचा अनुदान मंजूर केले मात्र हे अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळालेलं नाही.थकीत अनुदान देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
1
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 01, 2025 02:01:49Bhandara, Maharashtra:
गणेशपूर येथे ८५ फूट उंचीच्या स्वर्णद्वारी पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान...
Anchor : - भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून लोकमान्य टिळकांनी रुजविलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेला मागील अडीच दशकांहून अधिक काळ गावकऱ्यांनी सातत्याने उजाळा दिला आहे. यंदाच्या मंडपाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तिरुअनंतपुरम येथील प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिराची साकारलेली भव्य प्रतिकृती सन्मित्र गणेश मंडळातर्फे उभारण्यात आलेला हा देखावा मंदिरातील सहा सुवर्णद्वारांची कलात्मक रचना, प्राचीन शिल्पकलेचा राजेशाही ठसा आणि शेषनागावरील प्रभू विष्णूची देखणी मूर्ती भाविकांना विशेष भावते
BYTE :- राधे भोंगाडे,
BYTE :- भाविक
3
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 01, 2025 02:01:25Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0109_BHA_BUFFALO_RESCUE
FILE - 5 VIDEO
सरपंचांने दिले म्हशी ला जीवदान
Anchor - लाखनी शहरातील लहान पुलावर नॅशनल महामार्गाने नाला तयार केला होता. मात्र त्या नाल्यावर मोठे पॅच होते तिथून म्हशी चा झुडं जात असताना त्या पॅच मध्ये ऐक म्हश त्या मध्ये अडकल्याची माहिती मुरमाडी चे सरपंच शेषराव वंजारी यांना कळताच जेसीबी बोलावून त्या म्हशी ला तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आले असून सरपंच वंजारी यांचं गावात कौतुक होत आहे.
3
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 01:46:53Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_CSN_AGRI_STACK(3 FILES)
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पावणे दोन लाख शेतकरी अँग्री स्टॅकपासून दूर
अँकर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावणे दोन लाख शेतकरी अँग्री स्टॅक नोंदणी पासून दूर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना आता अँग्रिस्टॅकची नोंदणी करून फार्मर आयडी क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांनाच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी अँग्रिस्टॅकची नोंदणी करणे अनिवार्य असताना जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार 222 शेतकरी यापासून दूर असल्याची माहिती समोर आलीय.
7
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 01, 2025 01:46:43Bhandara, Maharashtra:
चित्रा वैद्य यांनी रांगोळीतून साकारली 3D गणरायाची प्रतिकृती.
Anchor : भंडारा येथील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी दोन दिवस मेहनत घेत ४/३ फुटांची गणरायांचे बालस्वरूप दाखविणारे ३D रांगोळी चित्र काढले आहे. ही रांगोळी चित्र हुबेहूब मूर्तीचे स्वरूप दिसत असून भक्तांसाठी दर्शनाचे मध्यम ठरत आहे.रांगोळी कलेतून गणपती बाप्पा बद्दल असलेली भक्ती रेखाटल्याचे रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी सांगितले आहे.
6
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 01, 2025 01:46:22Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0109ZT_CSN_CORPORATION(1 FILE)
छत्रपती संभाजीनगर : 44 टक्के अधिकारी, कर्मचारी ई-ऑफिसचा वापर करत नसल्याने कारवाईचे प्रशासकांचे आदेश
अँकर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा संपूर्ण कारभार अलीकडेच प्रशासक जी. श्रीकांत यांनी ऑनलाइन केला. प्रत्येक विभागाला फाइल आता ऑनलाइनच सादर करावी लागते. प्रशासकापर्यंत फाइल ऑनलाइनच मंजूर केली जाते. मात्र, अजूनही 44 टक्के अधिकारी-कर्मचारी ई-ऑफिसचा वापर करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासकांनी दिलेत.
6
Report