Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

परळीत देवीच्या मिरवणुकीत जादूटोण्याचा थरकाप! माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल

Mahendrakumar Mudholkar
Jul 06, 2025 07:31:26
Beed, Maharashtra
बीड : परळीत देवीच्या मिरवणुकीत कोंबड्याचा बळी देत जादूटोण्याचा उघडपणे प्रयत्न! अजित पवार गटाच्या माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल Anc : शहरात सप्तश्रृंगी देवी मूर्तीस्थापना मिरवणुकीदरम्यान अंधश्रद्धेचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी रस्त्याच्या मधोमध कोंबड्याचा बळी देत नागलीची पाने, हळद, कुंकू आणि लिंबू टाकून जादूटोणासारखे अघोरी कृत्य केल्याचा आरोप केला आहे. ही कृती सार्वजनिक ठिकाणी करून परिसरात अंधश्रद्धा पसरवण्यात आली, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement