गणपतीच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल का?
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मनोज जरांगे पाटील यांना सल्ला LIVE LINK (((( https://www.facebook.com/share/v/18wWXmpfMW/ )))) *मंत्री चंद्रकांत पाटील ऑन गणपती* मी गणपतीला प्रार्थना करतो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा भयानक झाला आहे सरकारची आर्थिक परिस्थिती बिकट असताना शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही गणपतीला आम्ही अशी प्रार्थना करतो, आम्ही माणूस म्हणून प्रयत्न करतो, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गणपती राया आम्हाला ताकद दे आणि दुसरी प्रार्थना आम्ही करतो मराठा समाजाला एकता सुबकता असूनही तुकडे पडतात तो एक किंवा दोन गुंठ्यांचा मालक झाला आहे त्या मराठा समाजाची आर्थिक सुबकता होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे 2017 सण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकलं *टिकणार आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकलं, 50 टक्के च्या वरती दिलं तरी ते टिकला, पण ते महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही.* त्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षण दिलं, ते न्यायालय टिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जरांगे पाटील यांचं आजही म्हणणं आहे. 50 टक्के आतील आरक्षण द्या, ओबीसी मधलं द्या म्हणजे ते टिकेल असं जरांगे पाटील म्हणतात, पण मी बाप्पाकडे प्रार्थना करतो, यातून काहीतरी मार्ग निघावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं. गणरायाकडे प्रार्थना करून न थांबता आम्हीही प्रयत्न करतो, मी गणपतीची आरती करण्यापूर्वी एका कायदे तज्ञांची मोठी बैठक झाली. आम्ही सांगितलं आहे काहीतरी मार्ग काढा मराठा समाजाला जे आरक्षण देत आहोत ते कायद्यात टिकलं पाहिजे *ऑन जरंगे पाटील विधान* *मनोज जारंगे पाटील आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात अनेक बैठकांना जरांगे पाटील यायचे, त्यामुळे माझ्या आणि जरांगे पाटील यांच्यात भांडण लावू नका* मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणं आहे की, कुणबी आणि ओबीसी मधून आरक्षण मिळेल, मी चार वेळा ते म्हणतो पण ते म्हणण्याने मिळणार आहे का! त्यासाठी राज्य सरकारकडून कायदेशीर सर्व प्रयत्न सुरू आहेत, ओबीसीतून मिळेल किंवा कुणबीतून मिळेल यासंदर्भातले जर तरचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही तज्ञांसोबत घेतलेल्या बैठकीत तज्ञ मंडळी सकारात्मक आहे. पहिलं तीन ते चार दाखले दिले की कुणबी दाखला मिळायचा. *मात्र 23 कागदपत्रे समितीने सांगितले आहेत, आतापर्यंत नोंदी 58 लाखापर्यंत गेले आहेत. दाखले दहा लाखापर्यंत मिळाले आहेत.* मुख्यमंत्री आत्ताचे पण आधीचे पण यांना खोटं बोलणं अजिबात जमत नाही, राजकीय परिणीमाची ते चिंता करत नाहीत, जे खरं आहे तेच खरं म्हणतात,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यातून काय मार्ग काढता येईल ते पाहत आहे. *मराठा समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे भांडण लावून काही होणार नाही* मुख्यमंत्री यांनी आझाद मैदानावरती पाच हजार लोकांची परवानगी दिली होती, आझाद मैदानावर पेक्षा बाहेर लोकांची जास्त गर्दी दिसत आहे. पहिल्या दिवशी नियोजनाचा गोंधळ झाला..आता महापालिकेने उत्तम व्यवस्था केली आहे. *ऑन उपसमिती बैठक* राज्याचे जनरल एडवोकेट यांच्यासोबत बैठक आहे. ते मुख्यमंत्री यांच्यासह विविध जणांसोबत बोलत आहेत. आज दिवसभर प्रस्ताव काढले असून त्याच्यावरती विचारविनिमय झाला आहे. त्यातून आम्ही मुद्दे मांडल्या आहेत हे हे पर्याय असू शकतात. यामध्ये भावना आणि कायदा हा वेगळा विषय आहे. *ऑन जरागे पाटील टीका* जरांगे पाटील अनेक वर्षापासून मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी काम करत आहेत,त्यातून त्यांच्या तब्येतीकडे त्यांचं लक्ष नाही त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे *जरांगे पाटील यांची एक भाषा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर रागवत नाही* जरांगे पाटलांना एक विनंती आहे त्यांना जे बोलायचं आहे त्यांनी तेच बोलावं.. जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस वर बोलला बोलतात.. फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी काय खस्ता खाल्ल्या आहेत.. *फडणवीस यांच्या पारदर्शकतेवर आणि हेतूवर चॅलेंज करणे हा त्यांच्यावरचा अन्याय आहे* तरी ते मुख्यमंत्री झाले आहे त्यामुळे त्यांनी सहन केलं पाहिजे.. *तरी त्यांच्या आई आणि बायकोवर बोलतात* जरांगे पाटील यांची ग्रामीण भाषा आहे आणि त्याच्यावर अतिक्रमण करण्यात आमचा हेतू नाही.. *यावरही जरांगे पाटील काही बोलू नये, त्यांना मैत्रीच्या नाते विनंती आहे* *ऑन सुप्रिया सुळे प्रकरण* मी याच्यावर काही टिपणी करणार नाही.. याचं कारण आंदोलनाच्या मनातल्या भावना तीव्र आहेत.. त्यामुळे त्यांनी काय करावे हे मी कसं सांगणार.. *ऑन ओबीसी आरक्षण* मुख्यमंत्र्यांचा हा आदेश आहे की जाती-जातीत भांडण नको.. जे कायद्याच्या चौकटीत बसत आहे ते करूया.. लोकशाहीतच्या चौकटी सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.. आम्ही फक्त असं सांगतो की एकमेकांच्या मनात कायमची कडूता निर्माण होईल असं काही करू नका.. *Byte : चंद्रकांत पाटील, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री*0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दिल्ली बंद: गिरफ्तारी के बाद आंदोलन तीखा, मोदी-शाह पर निशाना
Nagpur, Maharashtra:नागपूर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तुमच्या आई-वडिलांना सांगा की तुम्हाला अटक झालेली आहे. माझी आजी वारली, तरी मला घरच्यांशी बोलू दिलं नाही.. हा काय प्रकार आहे? भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होता. दुपारी मी दिल्ली पोलिसांना सांगितले की, मला फोन लावू द्या आणि माझ्या भावाशी बोलू द्या. माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि मला नंबर पाठ नव्हता. मोबाईल वरती नंबर पाहून मी तुम्हाला नंबर देतो आणि मला बोलू द्या, असे मी दिल्ली पोलिसांना सांगितले. मात्र, दिल्ली पोलिसांनी मला दोन मिनिटांसाठीही फोन दिला नाही. कायद्यानुसार, जेव्हा तुम्ही अटक करता, त्यावेळेस वकिलांनाही हजर करावे लागते. ऑन आंदोलनाची भूमिका कोर्टात असे काहीही लिहून दिलेले नाही आणि लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत. आजी वारल्या म्हणून मी घरी आलो आहे. ऑन अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आंदोलन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तानाशाही संपवावी लागेल. ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी अख्खी दिल्ली बंद करून ठेवली आहे. रस्ते बंद केले आहेत, मेट्रो बंद केल्या आहेत. मागच्या ७० वर्षांच्या काळात कोणाला विमानातून अटक केली आहे का? मला थेट उचलून अटक करण्यात आली. आम्ही काय आतंकवादी होतो? मी महात्मा गांधीजींचा टी-शर्ट घातला आहे. तोच घालून चाललो होतो. नरेंद्र मोदी हा तानाशाह आहे आणि त्याची तानाशाही आता संपवावीच लागेल. आता हा देश विकून खाईल. अदाणींनी राज्याचा देश विकला आहे, तसा हा संपूर्ण देश विकून खाईल. ऑन आंदोलकांवरील लाठीचार्ज कधीपर्यंत पोलिसांना आदेश मिळणार की, आंदोलकांना उचला? लहान-लहान मुलांना मारले जात आहे. मुलींनासुद्धा मारले जात आहे. पोलिसांनाही विचार करावा लागेल. असेच सुरू राहिले, तर दिल्ली पोलिसांना एके दिवशी आंदोलकांचा खूनसुद्धा करावा লাগेल. आंदोलकांचा खून करण्यास सांगण्याचे काम मोदी आणि अमित शहा करत आहेत आणि हे दिल्ली पोलीस करू शकतात. ऑन आंदोलकांसोबत गैरवर्तन दिल्ली पोलिसांच्या अमित शहा यांनी प्रमोशन केले आहे. ए.सी.पी विनय भगत यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यांचे सुद्धा प्रमोशन केले आहे. जेव्हा देश गुंडे चालवतात, तेव्हा गुंडांचेच प्रमोशन होते. ऑन मोदी आणि अमित शहांवरील टीका मला किती शांत बसवणार? त्यांनी मला अटक केली, तरी आम्ही घाबरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या धोरणांवर चालणारे आम्ही लोक आहोत. नरेंद्र मोदींसारखे तानाशाह जातील, तेव्हाच देश बदलेल. त्यांच्यामुळे देश गुलाम होणार आहे. ऑन पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका कुठलाही बॉण्ड मी साइन केलेला नाही. मी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांसारख्या लोकांना आम्ही सहन करणार नाही. शंभर वेळा जरी मला तुरुंगात टाकले, तरी तुमची तानाशाही मी सहन करणार नाही.0
0
Report
सीएम फडणवीस ने नाशिक कुंभ मेले के मार्ग और कुंड संरचना का किया निरीक्षण
Nashik, Maharashtra:नाशिक नाशिक त्र्यंबक रोडवरील सुरू असलेल्या श्रेष्ठ कुंभमेळाच्या रस्त्याची पाहणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलीये.. त्याच बरोबर त्रंबकेश्वर मधील दर्शन पथ आणि यांच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या कुशावर्त कुंडाची पाहणी देखील पाहणी केलीये.... त्रंबक पाहणीनंतर नाशिकहून ओझर एअरपोर्टला जात असताना नाशिक नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरात नव्याने सुरू करणार असलेल्या टनेल बाबतीत करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहणी केलीये...0
0
Report
अलिबाग के राम Malta में दत्तक प्राप्त कर नए परिवार से मिला
Chendhare, Maharashtra:अलिबागच्या ‘राम’ला माल्टात मिळाले मायेचे छत्र शिशुगृहातून नव्या आयुष्याची सुरुवात परदेशातील दांपत्याने घेतले दत्तक ‘राम’ला मिळाले हक्काचे कुटुंब ........ उपस्थितांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू ..........0
0
Report
Advertisement
नाशिक कालिका माता मंदिर में नवरात्र में भक्तों की रिकॉर्ड भीड़, सुरक्षा बढ़ाई गई
Nashik, Maharashtra:नाशिक कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे साडेतीन वाजताच मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असून, काकड आरतीने देवीचं दर्शनाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, भाविकांना देवीचं दर्शन घेता यावं यासाठी मंदिर २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने ५५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी कालिका माता ट्रस्टच्या वतीने पाच कोटी रुपयांचं विमा संरक्षणही घेण्यात आलं आहे. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील व्यवस्था, सुरक्षा आणि भाविकांच्या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.0
0
Report
सोलापुर स्पा सेंटर पर पुलिस ने छापा, चालक गिरफ्तार, दो महिलाओं को छुड़ाया गया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील स्पा सेंटर पोलिसांचा छापा, चालकाला अटक तर दोन महिलांची सुटका - शहरातील जुळे सोलापूर भागातील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा - स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस - स्पा सेंटर चालवणाऱ्या अजय कांबळे याच्यावर गुन्हा दाखल - स्पा सेंटर मधील दोन पिढीत महिलांची सुटका - सोलापूर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक पथकाने केली कारवाई0
0
Report
नवरात्रि के पहले दिन नागपुर के आग्याराम देवी मंदिर में भक्तों की भारी भीड़
Nagpur, Maharashtra:आज नवरात्रि उत्सव की शुरुआत हो चुकी है और भक्त सुबह से देवी मंदिरों में भीड़ देखी जा रही है। नागपुर के गणेश पेठ क्षेत्र स्थित आग्याराम देवी मंदिर में भी भक्तों की बड़ी भीड़ सुबह से दिख रही है। मंदिर परिसर फूलों से सजाया गया है और एक मंगलमय वातावरण का निर्माण हुआ है। शंखनाद और जय मातादी की घोषणाएं परिसर को प्रसन्न वातावरण दे रही हैं। नवरात्रि के शुभ मुहूर्त पर पहले दिन दर्शन के लिए भक्त भीड़ कर रहे हैं।0
0
Report
Advertisement
नागपुर में बोरवेल खोदाई पर पूर्ण बंदी, राहत कार्यों को छूट
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्यात बोअरवेल, खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी....संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - नवीन बोअरवेल खोदणे आणि जुन्या बोअरवेल अधिक खोल करनेास मनाई...शहरी आणि ग्रामीण भागात बंदी लागू - शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि खासगी व्यक्तींनाही आदेश लागू...शासकीय पाणीटंचाई निवारणाच्या कामांना मात्र अपवाद - बंदीचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई...विद्यमान बोअरवेलचा वापर सुरू ठेवण्यास बंदी नाही0
0
Report
शारदीय नवरात्र शुरू, अंबाबाई मंदिर में भक्तों की भीड़; विदेश भक्त भी पहुँचे
Kolhapur, Maharashtra:शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली है. इसलिए करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात पहाटेपासून भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. देश विदेशातील भक्त देखील मोठ्या संख्येने देवीचे दर्शन करण्यासाठी अंबाबाई मंदिरात दाखल झाला आहे. दर्शनासाठी दाखल झालेल्या याच भाविकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
किटाड़ी जंगल में बाघ के हमले में चार गायों की मौत, किसान बाल-बाल बचा
Bhandara, Maharashtra:किटाडी जंगलात वाघाचा हल्ला; चार गाईचा मृत्यू,पशुपालक थोडक्यात बचावला. लाखनी तालुक्यातील किटाडी शिवारात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात चार गाईचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास किटाडी जंगल बीटमधील कक्ष क्रमांक ३८९ मध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी अमरपाल ठवरे यांच्या मालकीची दोन गाय, दोन गोन्हे वाघाने ठार केले आहेत दरम्यान, जनावरांना वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वाघाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी झाडाचा आसरा घेत स्वतःचा बचाव केला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर पदवीधर सीट पर सुधाकर कोहळे की बगावत भाजपा की मुश्किल बढ़ाती है
Nagpur, Maharashtra:अनिल सोले और गिरीश व्यास यांचे शॉट काल पाठवले आहे ( -- ) जे आम्हालासमजत तेच आज निराशेत का गेले ? असा सवाल नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल सोلے आणि माजी आमदार गिरीश व्यास यांना उपस्थित केलाय... नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीवरून बंड करून अनिल सोले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे... त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाढल्या आहे. अनिल सोले यांना माजी आमदार गिरीश व्यास यांचीही साथ मिळाली आहे.. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी हे दोन्ही नेते माझे गुरुवर्य आहे. अनेकदा समजवण्याकरता ते आमच्याकडे आले आहेत. एकदा तर निराशेत असताना मला पक्ष प्रक्रियेत पुन्हा आणणारे गिरीश व्यासच होते असेही सुधाकर कोहळे यांनी सांगितले. मात्र आता आम्हाला समजावणारेच गुरुवर्य निराशेत का गेले असा सवाल उपस्थित करत त्यांच्या बंडखोरीवर कोहळे यांनी सवाल उपस्थित केला आहे... मी महायुतीचा उमेदवार असून आमचाच विजय होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.0
0
Report
कोल्हापुर अंबाबाई मंदिर में नवरात्र उत्सव की भारी तैयारी, दर्शन मंडप व CCTV
Kolhapur, Maharashtra:साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवदरम्यान लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केलीय. या तयारीचाच एक भाग म्हणून अंबाबाई मंदिर परिसरात भव्य, सुसज्ज असे दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर भक्तांना दर्शन सुलभ करता यावा यासाठी मंडप, कुलर, पाणी, फॅनची व्यवस्था या दर्शन मंडपात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर आणि परिसरात तंत्रज्ञान विकसित CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत.0
0
Report
नाशिक-निफाड मार्ग पर भीषण दुर्घटना: अभिषेक वाघचौरे और भिका धुळे की मौत
Niphad, Maharashtra:नाशिक-निफाड मार्गावर शिरवाडे वाकद परिसरात भीषण अपघात झाला असून रस्त्याच्या कडेला नवरात्रोत्सवासाठी घट विक्री करणाऱ्या अभिषेक (नागेश) वाघचौरे (वय 31) आणि भिका धुळे (वय 60) यांना भरधाव आयशरने चिरडले. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पावणेसहाच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पसार झाल्याची प्राथमिक माहिती असून, निफाड पोलिसांकडून चालक आणि वाहनाचा शोध सुरू आहे. अभिषेक यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या भीषण घटनेमुळे दोन कुटुंंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर पदवीधर मतदाता सूची: मुंबई हाई कोर्ट में याचिका, 98,782 नाम अंतिम सूची से बाहर?
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर पदवीधर मतदार यादीचा वाद आता मुंबई हायकोर्टात....९८ हजार ७८२ मतदारांची नावे अंतिम यादीत नसल्याचा याचिकाकर्त्याचा दावा निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी सचिन कालबांडे यांची याचिका दाखल केली होती.. नागपूर खंडपीठाकडून याचिका मुंबईतील मुख्य खंडपीठाकडे वर्गीकृत करण्यात आली.. प्रलंबित अर्जांची छाननी करून पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची मागणी0
0
Report
नागपुर-अमरावती हाईवे पर बारूद से भरे कंटेनर ट्रक पलटा; यातायात थमे, चालक घायल
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर-अमरावती महामार्गावर १३.५ टन बारूदचा कंटेनर ट्रक रस्त्यावर पलटी.. शुक्रवारी रात्री 8 वाजताची घटना... - चालकांचा नियंत्रण सुटून दुभाजकला जाऊन धडकला.. - धामणा शिवारात ट्रेलर उलटल्याने कंटेनर चेसिसपासून निखळल्यानं रस्त्यावर वाहतूक खोळंबा - रोशन हरिजन कंटेनर चालक जखमीच नाव आहेय.. - कंटेनरमधील बारूद बाहेर न आल्याने मोठा अनर्थ टळला...अपघातात ट्रेलर चालक जखमी - कंटेनर पडल्याने नागपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.. - कंटेनरमध्ये बारूद कंपनीकडून कच्चा माल असल्याचे स्पष्टीकरण...हिंगणा पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू0
0
Report
कोल्हापुर में 25वीं ऊस परिषद: राजू शेट्टी की भूमिका और ऊस मूल्य पर चर्चा
Kolhapur, Maharashtra:ऊस दराच्या प्रश्नावरून आज कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमध्ये रणशिंग फुंकलं जाणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २५ वी ऊस परिषद आज पार पडणार असून, राजू शेट्टी या परिषदेत काय भूमिका मांडणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष्य लागलं आहे. ऊस गाळप हंगाम, उसाची पहिली उचल, साखर आणि इथेनॉलला मिळणारा दर आणि शेतकऱ्यांच्या पदरात दर या प्रमुख मुद्द्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे. गाळप हंगाम सुरू करण्याच्या निर्णयासह ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी कोणती भूमिका मांडतात आणि आंदोलनाची पुढील दिशा काय ठरवतात हे पहावे लागणार आहे.0
0
Report
Advertisement
