Back
पत्नीने प्रियकरासोबत पतीचा खून केला, सत्य उघडकीस!
Nagpur, Maharashtra
वाठोडा पोलीस स्टेशनचे संग्रहित shots पाठवले आहे
----
नागपूर
*पत्नीने प्रियकराच्या सहाय्याने पतीला संपविल असल्याची घटना वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे ...
पती अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं खून केल्याच समोर आले....
*पत्नीने पतीच्या हत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला... मात्र पोस्टमॉर्टम अहवालातून ती हत्या असल्याचं आलं समोर.*
38 वर्षीय चंद्रसेन रामटेके असे मृताचे नाव आहे.
30 वर्षीय दिशा रामटेके ही पत्नी असून चंद्रसेन यांच्याशी तिचे तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक सहा वर्षांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी चंद्रसेन याला अर्धांगवायू गेल्यानं तेव्हा पासून तो घरीच राहत होता...
दिशा रामटेके खर्च भागविण्यासाठी पाण्याची कॅन भरून विक्रीचा व्यवसाय करत होती....
काही महिन्यांपूर्वी तिची आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला या दुचाकी दुरुस्ती आणि पंक्चरचे काम करणाऱ्या व्यक्तीशी असलेली ओळख प्रेम संबंधात पडली...
*दिशांचे पती चंद्रसेन 4 जुलै रोजी घरी निपचित पडलेले दिसले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम अहवालात गळा, नाक आणि तोंड दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने तपासाची दिशा बदलली.*
पोलिसांनी शासकीय रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम कक्षाजवळ दिशाला बोलवून तीची चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली.
*अनैतिक संबंधांची चंद्रसेन याला माहिती मिळाली होती... आणि त्यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे त्याला संपविण्याचा प्लॅन आखण्यात आल्याच तपासात समोर आल...*
*दोघांनी चंद्रसेन याचा गळा आवळला आणि नाका तोंडावर दाबून धरली. श्वास गुदमरून तडफडून चंद्रसेन याचा मृत्यू झाल्याच तपासात समोर आलं..*
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Sinnar, Maharashtra:
अँकर
नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नांदूर मधमेश्वर गावाजवळ असलेल्या निफाड व सिन्नर सह तालुक्यातील गावांना जोडणारा गोदावरी नदी वरील पुलाला पाणी टच झाले आहे नांदूर मधमेश्वर धरणातून 50 ते 55 हजार क्युसेक परंतु पूर पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्यास पुलावरून पाणी जाईल आणि निफाड-सिन्नर सह तालुक्यातील गावांचा संपर्क तुटेल यामुळे पुलावरून पाणी राहिल्यास वाहनधारकांनी आपली वाणी न येण्याचा प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे
7
Share
Report
Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीला पाहिला पूर्ण आला आहे. पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असून, अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा वाढला असून, अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अक्कलपाडा धरणातून नदी पात्रता पाणी सोडण्यात आले आहे.पांझरा जरा नदी पात्रात अक्कलपाडा धरणातून 5230 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
7
Share
Report
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn samaj kalyan av
Feed attached
ANCHOR : छत्रपती संभाजीनगर समाजकल्याण विभागाच्या तत्कालीन प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे या घरातील काम करण्यासाठी सक्ती करीत होत्या. एवढेच नाही तर स्वतःची आणि आईची मसाज करून घेत असल्याचे आरोप होत आहे. विशेष म्हणजे याबाबतचे व्हिडीओ देखील समोर आले आहे. याबाबत कंत्राटी महिला कामगारांनी चौकशी समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीसोबत त्यांनी पुरावे म्हणून काही व्हिडिओ आणि फोटोही दिले आहेत. ज्यात वसतिगृहासाठी कामगार म्हणून नियुक्ती असताना सोनकवडे यांच्या घरीच कामे करण्यासाठी सांगण्यात येत होते. झाडून काढणे, फरशी पुसणे, भांडे घासणे, फ्रीज साफ करणे, किचन साफ करणे अशी कामे करण्यास सांगितले जात होते. एवढेच नाही तर स्वतःची आणि आईची मसाजही करावयास लावली जात होती असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या तक्रारींची दखल घेऊन शासनाने त्यांची बदली जातपडताळणी समितीचे उपायुक्त म्हणून केली आहे.
4
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड : भाटुंबाच्या माळरानात माणूस बनला बैल... शेतकऱ्याची कहाणी अंगावर शहारे आणणारी!
Anc: शेतकऱ्याचं दुःख पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणणारं ठरतंय... केज तालुक्यातील भाटुंबा गावातील अल्पभूधारक शेतकरी नामदेव मोरे यांनी बैलजोडी नसल्यामुळे आपल्या खांद्यावर जु घेत थेट शेतात उतरून कोळपणी केली. त्यांच्या या संघर्षात पत्नीही खांद्याला खांदा लावून मदत करताना दिसतेय. हालाखीची परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा आणि व्यवस्थेचा पाठिंबा नाही, तरीही शेतकरी आपल्या मातीतून पिकं उगवण्याची आस सोडत नाही... लातूरच्या घटनेनंतर आता केजचा व्हिडिओ समाजाला अंतर्मुख करणारा ठरतोय.
4
Share
Report
Dhule, Maharashtra:
anchor - यंदा सातपुड्यात पाऊसाने आरोग्य विभागाची लक्तर वेशीला तंगली आहेत. बांबूच्या जोळीतून एका गर्भवती महिलेची सात किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ आली. गावापर्यंत कुठल्याही वाहन किंवा रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने बांबू झोळीतून यां महिलेला रुग्णालयात पोचवलं गेलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपुर येथे नेण्यासाठी तब्बल 7 किलोमीटरचे अंतर झोळी करून आणि पायपीट करत पार करावे लागले. रस्ता नसल्यामुळे आणि कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पावसाळ्याच्या तोंडावर दुर्गम भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका तर दूरच, दुचाकीचीही ने-आण शक्य होत नाही. त्यामुळे आपत्कालीन वेळी ग्रामस्थ, महिलावर्ग आणि आशा कार्यकर्त्यांना मिळून रुग्ण झोळीत ठेवून पायवाटेने रुग्णालय गाठावे लागले. ही घटना या भागात नित्याची आहे. बुरीनमाळपाडा आणि आसपासच्या वाड्यांना आजही मूलभूत सुविधा नसल्याचे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार.
4
Share
Report
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ शहरात भूमिगत गटार योजनेच्या कमांमुळे रस्ते चिखलमय झाले असून या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले आहे, याकडे जीवन प्राधिकरण चे दुर्लक्ष असल्याने काँग्रेस च्या संतप्त कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालय धडक देऊन कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अनिल देशमुख यांनी भूमिगत गटार योजनेचे ठेकेदार आणि जीवन प्राधिकरण चे अधिकारी कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याने नागरिकांचा जीव खराब रस्त्यामुळे धोक्यात आला असल्याचा आरोप केला. यावेळी चार दिवसात रस्ते दुरुस्त करून देऊ असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
बाईट : अनिल देशमुख : शहराध्यक्ष काँग्रेस
4
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड: खासगी सावकाराकडून कर्जदाराला पत्नीची मागणी; हतबल आणि त्रस्त झालेल्या कर्जदाराने आयुष्य संपवलं..!!
Anc : बीडच्या सावकारकीने एक बाप हिरावून नेला... एक पती गमावला... आणि एका कुटुंबावर काळाचं सावट ओढवलं...‘पैसे नाहीत? मग तुझी बायको माझ्या घरी सोड’ — हे विकृत वाक्य आज एका कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेलंय. सात जणांच्या सावकारी त्रासाला कंटाळून राम फटाले यांनी चौकटीला दोरी बांधली… आणि गळफास घेवून जीव दिला. पाहुयात बीडच्या सावकारकीचा समाजात दडलेला काळाकुट्ट चेहरा...!!!
Vo 1 -------
Opening byte दिलीप फटाले, वडील...
अश्रूंनी डोळे नाही, तर काळीज ओलं झालंय... धाय मोकलून रडणारे हे आहेत पीडित राम फटाले यांचे वडील दिलीप फटाले. त्यांचा हा थरथरता आवाज, आणि डोळ्यांमधून निघणारा हुंदका – कोणाचंही मन हेलावून टाकतो. कारण, त्यांचा मुलगा राम... आज या जगात नाही. फक्त एवढंच कारण तो सावकाराच्या व्याजाने गळ्यात दोरी घालून गेला... "पैसे नाही देत? मग तुझी बायको माझ्याकडे सोड!" अशी विकृत, अपमानास्पद धमकी दिली होती त्याला. आणि तीही कोणी साधासुधा नव्हे, तर भाजपचा पदाधिकारी डॉ.लक्ष्मण जाधव. हो याच सावकाराच्या विकृत बोलण्यातून एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. घरातील कर्ता पुरुष या कुटुंबांनी कायमचा गमावला..
सात वर्षांपूर्वी घेतलेलं कर्ज होतं फक्त 2 लाख 55 हजार... पण महिन्याला 25 हजार व्याज. सात वर्षांत साडेसात लाख रुपये फेडूनही मुद्दल तशीच... मागे फक्त अपमान, छळ आणि अपकीर्ती. एक दिवस, घरात बसलेली पत्नी ती धमकी कानावर घेताना ढासळली... आणि दुसऱ्या दिवशी, रामने घराच्या चौकटीला दोरी बांधून, अखेरचा श्वास घेतला. आज त्याच्या वडिलांच्या डोळ्यात फक्त अश्रू नाहीत... तर जीवन कसे जगायचे हा प्रश्न उरला आहे
बाईट : दिलीप फटाले, मयताचे वडील
Vo 2 :
एक नवरा होता... दोन लहान मुलं होती... आणि त्यांचं छोटंसं घर होतं..हसतं, खेळतं, स्वप्नांनी भरलेलं… पण एक सावकारकीचा जीवघेणा फास आल्यानं, ते घर आता काळ्या कपड्यांनी झाकलेलं आहे. रामा फटाले जो आपल्या कुटुंबासाठी लढत होता, तो आता या जगात उरला नाही. कारण, एका लक्ष्मण नावाच्या सावकारानं त्याला मनानं तोडलं… आत्म्यापर्यंत जखमी केलं. रोज धमक्या, अपमान, "बायकोला माझ्याकडे सोड" अशा अमानवी वाक्यांनी तो घुसमटला… आणि जेव्हा हातात काही उरलं नाही, तेव्हा गळ्यात दोरी घेतली. फक्त लक्ष्मण जाधव नव्हे, तर सहा सावकार सगळेच त्याचं रक्त चोखत होते. रामा ला इतकं छळण्यात आलं की, त्यांनी आत्महत्येच्या आधी चिठ्ठीत सगळ्यांची नावं लिहूनच गेले. आता या सगळ्या नराधमांवर गुन्हा दाखल झालाय. मात्र याचा तपास पोलिसांकडे नकोय तर सीआयडीने करावा अशी मागणी रामाच्या वृद्ध आईने केली आहे..
बाईट : विमल फटाले, मयताची आई
Vo 3....
बीडमधील खंडणी, खून आणि दरोड्याच्या घटनांनंतर आता सावकारीचा सावट पुन्हा डोकं वर काढताना दिसतंय. शेकडा दहा ते तीस रुपये व्याजदराने बीडमधील नागरिकांची कंबरडे मोडली आहेत. अडचणीत सापडलेले व्यापारी कर्ज घेतात, पण परतफेडीच्या नाहक दबावामुळे अनेकांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो.
अशाच एका प्रकरणानंतर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. तिघांना अटक केली आहे. अटकेतील प्रमुख आरोपी म्हणजे भाजपचा पदाधिकारी डॉ. लक्ष्मण जाधव, त्याची पत्नी वर्षा जाधव आणि आणखी एक साथीदार आहे. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं आहे.
बाईट : अशोक मोदीराज,पोलीस निरीक्षक बीड
------
Vo 4...
बीड जिल्ह्यातील सावकारीचा बळी हा पहिलाच नाही… याआधीही अनेकांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून जीव दिलाय. बीड शहरात शेकडो अवैध सावकार बिनधास्तपणे व्यवहार करतायत. विशेषतः सर्वाधिक सावकार हे पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय आहेत. त्यामुळे या सावकारांवर फक्त गुन्हे नाही, तर थेट मोकासारख्या कायद्यांतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
बाईट : तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते
End vo -----
घडलेल्या या सगळ्या प्रकरणानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ते म्हणजे बीडच्या ‘दबंग’ पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे....
शब्दांनी नाही, तर कृतीतून आणि धाडसातून विश्वास निर्माण करणाऱ्या या पोलीस अधीक्षकांपुढे आज बीड जिल्ह्यात पसरलेल्या सावकारीच्या दलदलीला कायम उखडून टाकण्याचं आव्हान आहे.
4
Share
Report
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ दलित महासंघाचा महापालिकेवर ढकल गाडा मोर्चा.
अंक - सांगली महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर ढकलगाडा मोर्चा काढण्यात आला.महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधींच्याकडून शहरातल्या हातगाडी- फेरीवाल्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे,मात्र याला दलित महासंघाने विरोध दर्शवला आहे,केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाले धोरण अंतर्गत हातगाडी फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची भूमिका असताना आयुक्त गांधींच्याकडून मात्र केंद्राच्या आणि न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करण्यात येत असल्याचा आरोप करत महापालिका कार्यालयावर ढकलगाडा मोर्चा काढत कारवाईचा निषेध नोंदवला आहे,महापालिका कडून कारवाई सुरूच राहिल्यास आयुक्तांना कोंडून घालू,असा इशारा यावेळी दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
बाईट - उत्तम मोहिते - अध्यक्ष,दलित महासंघ .
4
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0707ZT_WSM_FARMERS_BANK_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या रिठद परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली अनुदान रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रने होल्ड केल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बँकेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं. 'आधी कर्ज भरा, मगच पैसे काढा' या अटीला विरोध करत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.पोलिस मध्यस्थीनंतर बँकेने होल्ड हटवून शेतकऱ्यांना रक्कम देण्यास सुरुवात केली.बँक मॅनेजरने यापुढे कोणत्याही खात्यावर होल्ड न लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असल्याचे आंदोलकांनी सांगितले
बाईट:सतीश इडोळे,आंदोलन शेतकरी
4
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - आजच्या राज्यकर्त्यांना शाहू , फुले आंबेडकर यांच्याबाबत आस्था किती ? ...... शरद पवारांनी व्यक्त केली शंका ..... महाराष्ट्राचे चित्र बदलावे लागेल ...... डाव्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज .........
अँकर - महाराष्ट्राचे चित्र बदलावे लागेल महाराष्ट्र पुन्हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आणावे लागेल आज ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सुत्र आहेत त्यांना शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या विचारांची किती आस्था आहे याच्या बाबतची शंका वाटते अशी टिका शरद पवार यांनी राज्य सरकार वरती केली. डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत रिपब्लिकन पक्ष देखील एकत्र आल्यास राज्यात बदल होऊ शकतो असे सुतोवाच त्यांनी केले अलिबाग येथे शेकाप नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
साऊंड बाईट - शरद पवार
2
Share
Report