Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

विनय कोरे ने क्यों पूछा—क्या विचारधारा टिक पाई महाराष्ट्र में?

SMSarfaraj Musa
Sept 29, 2025 01:32:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - विचारधारा म्हणून लोकांच्या समोर गेलेले पक्ष,आपली विचारधारा टिकवू शकले का ? - आमदार विनय कोरे अँकर - विचारधारा म्हणून लोकांच्या समोर गेलेले पक्ष,आपली विचारधारा टिकवू शकले का ? उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत बसतील स्वप्नात देखील वाटलं होतं का ? आणि शरद पवारांच्या पक्षाचा एक गट भाजपासोबत जातो,अशी प्रकारची विश्वासार्हता लोकांच्या पातळीवर कधी अपेक्षित केले नव्हती,पण सर्व महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षात घडलं,असे विधान जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे यांनी केले आहे,तसेच या विचारधारेवर लोकांना संघटित केलं त्यांचा विश्वास राखला का ? असा प्रश्न देखील आमदार कोरे यांनी उपस्थित करत याप्रकारामुळे महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये आपण राजकारणात आणि समाजकारणामध्ये का आलो असं प्रश्न निर्माण झाला असे देखील नंतर कोरे यांनी व्यक्त केलं,सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. साऊंड बाईट - विनय कोरे - आमदार - जनसुराज्य शक्ती पक्ष.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Sept 29, 2025 03:34:27
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia Slug - 2909_GON_LEOPARD FILE - 7 VIDEO अखेर त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश,चार दिवसांच्या शोधमोहीमेनंतर शर्थीचे प्रयत्न यशस्वी Anchor : - गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील संजयनगर येथे 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर अखेर वनविभागाने नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.या बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.यानंतर संतप्त नागरिकांनी गोठणगाव-केशोरी मार्ग अडवून ठिय्या आंदोलन करत बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी केली होती. वनविभागाने घटनेची गंभीर दखल घेत तातडीने शोधमोहीम राबवली व अखेर बिबट्याला जेरबंद केले आहे..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 29, 2025 03:31:29
Nagpur, Maharashtra:Ngp Congress Sanvidhan rally live u ने फीड पाठवले ------------------------ नागपूर काँग्रेसची आजपासून नागपूर दीक्षाभूमी येथून संविधान सत्याग्रह रॅली सुरू झाली.. *संविधान रक्षणासाठी 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी ते सेवाग्राम अशी ‘संविधान सत्याग्रह अशी पदयात्रा असणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह पदयात्रेचे’ आयोजन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा सुरु झालीय... दोन ऑक्टोबरला ही संविधान सत्याग्रह पदयात्रा सेवाग्राम येथे पोहचेल... यावेळी काँग्रेस नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उद्धव ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांसह अनेक नेते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत... त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी ------- बाईट -- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उभाठा नेत्या सुषमा अंधारे तसेच तुषार गांधी यांच्यासोबत डब्ल्यू के टी केला आहे ----------- यात्रेमध्ये काही कार्यकर्ते पॅलेस्टेनियन च्या समर्थनार्थ छत्री घेऊन सहभागी झाले होते... याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगात शांतता नांदावी असे म्हणतं याचे समर्थन केले ------ बाईट--- हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 29, 2025 03:30:48
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री फडणवीस आज यवतमाळ मध्ये दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दीनदयाल उपाध्याय जयंती कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हॉटेल दि वेनेशियन लाॅनवर आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पालकमंत्री संजय राठोड, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके व माजी मंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित राहतील. तत्पूर्वी मुख्यमंत्री निळोणा येथील दीनदयाल प्रबोधिनीला भेट देऊन या ठिकाणी संस्थेतर्फे चालणारे सेंद्रिय शेतीतील प्रयोग समजून घेतील. प्रबोधिनी परिसरातील गोशाळा व दुर्मिळ देशी बियाणांच्या प्रदर्शनीचे भेट देतील. त्यानंतर जांब मार्गावरील पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानात उभारलेल्या भव्य पुतळ्याचे अवलोकन करून अभिवादन करतील. बाईट : कुमार चिंता : पोलीस अधिक्षक
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 29, 2025 03:30:25
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_girish_mahajn गिरीश महाजन आणि रात्री उशिरा घेतला पुराचा आढावा अँकर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय... राज्याचे जलसंपदा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल पूर परिस्थितीशी रात्री उशिरा पाहणी केली पंचवटी परिषद सराफ बाजार भांडी बाजार या ठिकाणी नदीचे पाणी शिरले असून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे या सगळ्या परिस्थितीची माहिती गिरीश महाजन यांनी जाणून घेतली...या परिस्थितीची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. “ज्या ठिकाणी नागरिक अडकले आहेत, तेथे प्राधान्याने बचाव कार्य हाती घ्यावे. कोणत्याही भागात मदतीस विलंब होऊ नये,” असे स्पष्ट निर्देश  दिले आहेत. तसेच पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी, अशीही सूचना त्यांनी केली
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 29, 2025 03:22:43
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील पूर परिस्थिती संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती ( 1 to 1 ) (((( माहितीसाठी - सदरचा वन-टू-वन हा काल रात्री साडेआठ वाजता केलेला आहे, पण कलेक्टर सरांना कल्पना दिली आहे की हे सकाळीच लागेल म्हणून ))) - सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थिती संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी झी 24 तासला दिली माहिती - जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या घरांचे पंचनामे अंतिम टप्प्यात तर शेतीचे पंचनामे लवकरच पूर्ण करण्याचे दिले आश्वासन - पूरग्रस्त भागातील लोकांना धान्याचे वाटप तर जनावरांसाठी चाऱ्याची करण्यात आली विशेष व्यवस्था - जिल्ह्यावर आलेल्या संकटामुळे शासकीय कार्यालय रविवारच्या दिवशी देखील सुरू - प्रत्येक तालुक्यामध्ये मदत कक्षाची उभारणी याविषयी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( 1 to 1 )
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 29, 2025 02:47:08
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 01:46:25
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2909ZT_JALNA_GODAWARI(11 FILES) जालना : जायकवाडीच्या विसर्गामुळे नदीकाठच्या 10 हजार नागरीकांना करण्यात आलं स्थलांतरीत परतूर,अंबड,घनसावंगी तालुक्यातील नागरीक स्थलांतरीत अँकर : जायकवाडीच्या विसर्गामुळे जालना जिल्ह्यातील सुमारे 10 हजार नागरीकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आलं आहे. यातील 6 हजार 870 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. तर 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत.अनेक शेतकर्‍यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येत आहे. बाईट : विजय चव्हाण,तहसीलदार ,अंबड
5
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 29, 2025 01:32:38
Ambernath, Maharashtra:जागतिक नदी दिनानिमित्त बदलापूर उल्हास नदीची स्वच्छता मोहीम  वनशक्ती संस्थेमार्फत राबविली मोहीम Bdl river cleaning Anchor – उल्हास नदीतलं वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन बदलापूर चौपाटी परिसरात वनशक्ती संस्थेनं नदी स्वच्छता  राबिवली यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात आला , बदलापूर आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून अनेकजण निर्माल्य, प्लास्टिक कचरा हा उल्हास नदीत टाकतात त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होत आहे . यासाठी वनशक्ती संस्थेनं नदी दिनाचा औचित्य  साधून स्वच्छता मोहीम राबवली . या मोहिमेत वनशक्तीचे  स्वयंसेवक, स्थानिक रहिवासी  सहभागी झाले होते.  चंद्रशेखर भुयार , बदलापूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 29, 2025 01:31:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग- मराठवाड्याला पुन्हा उभे करण्यासाठी एकरी मदत व राजकारण करण्यापेक्ष्या वेगळया पद्धतीचे काम करावं लागणार - आमदार विनय कोरे. अँकर - मराठवाड्याला पुन्हा उभे करण्यासाठी केवळ एकरी मदत आणि राजकारण करण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने मदत करण्याची गरज असल्याचं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे यांनी व्यक्त केला आहे.मराठवाड्यात शेतकऱ्यांचं केवळ पीकच नाही,तरी माती देखील वाहून गेली आहे,शेतीची हद्द फिक्स करणं देखील मुश्कील होणार आहे, अश्या मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत,त्यामुळे त्या दीर्घकालीन तिथल्या जनमानसाच्या जीवनावर परिणाम करणार आहेत,त्या उपाययोजनांच्यासाठी धरतीवरचे काम करावे लागणार असून आम्ही त्यासाठी आग्रह असणार असल्याचे ही आमदार विनय कोरे यांनी स्पष्ट केले आहे,सांगलीच्या मिरजे मध्ये पार पडलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. बाईट - विनय कोरे - आमदार - जनसुराज्य शक्ती पक्ष.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 15:16:37
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीमध्ये अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, तर धुळे शहरातील दोन पूल हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. पांझरा नदीत 18 हजार क्युसेक पाणी प्रवाह सोडण्यात येणार आहे. तसेच येवा वाढल्यास पूर्वसूचनेने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. धुळे शहरातील दोन लहान आणि एक मोठा पूल बंद करण्यात आला आहे. तरी पांझरा नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासन धुळे यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
6
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top