Back
वर्धा के किसानों को हमी भाव कब मिलेगा? बच्चू कडू का प्रहार
MAMILIND ANDE
Sept 12, 2025 01:00:57
Wardha, Maharashtra
वर्धा
SLUG- 1209_WARDHA_BACCHU_KADU
सरकारला शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचाच नाही आहे
बच्चू कडू यांचा घणाघाती प्रहार
अँकर - सरकारला शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचाच नाही आहे. त्यामुळेच अमेरिकेतला कापूस भारतात येतो आहे. शंभर दीडशे कापड मिल मालकांच्या साठी हजारो शेतकऱ्यांच्या जीवावर सरकारने नांगर फिरवला आहे. यावर कुणी बोलायला तयार नाही. शेतकऱ्याची बातमी ब्रेकिंग न्यूज होत नाही. ती कुणी दाखवत नाही. त्यामुळेच शेतकरी मागे पडतो आहे. आम्हाला जाती धर्मात अडकवून ठेवले जात आहे. शेतमालाच्या भावापेक्षा जातिचा प्रश्न महत्वाचा वाटतो. असा संताप प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी व्यक्त केला. देवळी येथे दिव्यांग मेळावा आणि शेतकरी हक्क यात्रा आयोजित करण्यात आली. यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमाशी संवाद साधलाय.
बच्चू कडू ऑन हमीभाव -
1965 मध्ये आपण शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्याची योजना आणली. 1990 मध्ये स्वामीनाथन आयोग आला, 1965 पासून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना हमीभाव भेटला. भेटला तर शंभर पैकी वीस शेतकऱ्यांना. त्या शेतकऱ्यांपैकी 10 शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनीच खाल्ले. 1965 च्या योजनेची अजूनही पाहिजे तशी अंमलबजावणी नाही फक्त घोषणा करतात. अशी टीका त्यांनी हमीभावाच्या बाबतीमध्ये केली आहे. अमेरिकेतला कापूस 25 ते 30 हजार रुपये क्विंटल ने विकत घ्यायचा. आणि माझ्या या देशातल्या शेतकऱ्याचा कापूस सात हजार क्विंटल दराने घ्यायचा. हा कुठला प्रकार आहे. आम्ही पंधरा हजार रुपये क्विंटलने कापसाची निर्यात करतोय, त्यातील नफा तर आम्हाला द्या ना. अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे. हा शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे. याला याच्या भावापेक्षा जातीचे प्रश्न महत्त्वाचे आहे, याच्या धर्माचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आम्हाला अडकवून ठेवले जात आहे. शंभर दीडशे कापड मिल मालकांच्या साठी हजारो शेतकऱ्यांच्या जीवावर सरकारने नांगर फिरवला आहे. कोणी बोलायला तयार नाही.
बच्चू कडू ऑन शेतकरी आत्महत्या -
एवढ्या दोन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पंधरा दिवसांनी सोयाबीन हाती येते. मार्केटमध्ये काय 3500 रुपये भाव आहे. खरेदी केंद्र सुरू करण्याची व्यवस्था आहे काय? चढ-उतार निधी देणार होते, सोयाबीनचे सहा हजार रुपये देणार होते, हे मोदीजी बोलले होते. त्यांना माहित आहे गावातला आमचा भाजपचा झेंडा घेऊन तयार आहे.आमचे गुलाम त्यांना भाव भेटो किंवा नाही, काही घेणेदेने नाही.
बच्चू कडू ऑन कर्जमाफी -
कर्जमुक्ती हे इमर्जन्सी काम आहे. या सगळ्यामध्ये लूट आहे. आणि कर्जमुक्ती ही लुटीची वापसी आहे. 200 - 300 उद्योगपतींना 18 लाख करोड रुपये माफ करता येते. आमच्यासाठी एक लाख कोटी रुपये देखील लागत नाही आम्हाला तर 35000 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी तर देशासाठी दोन लाख करोड लागतील, तेही माफ करत नाही. काही घेण देणंच नाही, बाप मेला तरी नेता जिवंत राहिला पाहिजे!पार्टी सत्तेत आली पाहिजे! या भावना आहे.
बच्चू कडू ऑन देवेद्र फडणवीस -
सोयाबीन पाच ते साडेपाच हजार रुपये भावाने होईल! देवा भाऊ असे म्हणतात... दुष्काळ पडू द्या, आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला तर मग कर्जमाफी देऊ! निवडणूक काळात सात बारा कोरा करू म्हणाले.या विदर्भाचा मुख्यमंत्री आहे. या विदर्भात संत्रा आहे.त्याला भाव आहे का चांगला? संत्रा उत्पादक, धान उत्पादक, कापूस उत्पादक कोणता शेतकरी चांगला आहे ते सांगावे? तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री दुसऱ्यांदा खुर्चीवर बसले आहे. तुम्ही धान कापूस तूर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना काय दिलं! जय श्रीरामचे नारे, बटेंगे तो कटेंगे, आता तर तुम्हीच कापता आहेत शेतकऱ्यांना.. शेतकऱ्यांवर काटा मारून तलवार चालवताय. हिंदू शेतकऱ्यांवर. शेतकऱ्यांपैकी 75 टक्के शेतकरी हिंदू आहे यांना व्होट मारणारे! अशा प्रखर शब्दात बच्चू कडू यांनी घणाघाती प्रहार केला.
9
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 04:31:240
Report
MAMILIND ANDE
FollowSept 12, 2025 04:18:382
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 12, 2025 04:18:272
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 12, 2025 04:18:122
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 12, 2025 04:18:020
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 04:16:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 04:15:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 12, 2025 04:01:170
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 12, 2025 03:48:191
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 12, 2025 03:48:072
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 03:47:264
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 12, 2025 03:46:040
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 12, 2025 03:45:380
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 03:32:130
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 03:31:520
Report