Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में मौसम बदला, डास-गंदे पानी से वायरल फिवर का डर बढ़ा

GMGANESH MOHALE
Sept 14, 2025 05:51:07
Washim, Maharashtra
वाशिम: File:1409ZT_WSM_EPIDEMIC_DISEASES रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होतं आहे.कधी जोरदार पावसाने परिसर ओला-चिंब होत आहे,तर कधी कडक उन्हामुळे उकाडा जाणवतो.रात्री मात्र गारवा निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.या बदलत्या हवामाना बरोबरच डासांचा प्रादुर्भाव आणि दूषित पाण्याचा प्रश्नही तीव्र झाला आहे.यामुळे जिल्ह्यात व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले असून ग्रामीणभागासह शहरांमध्येही सर्दी,खोकला व ताप अशी लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.दररोज अनेक नागरिकांना उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे, उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे,तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Sept 14, 2025 08:31:10
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 08:22:50
Thane, Maharashtra:भिवंडी.... भारत पाक मॅच विरोधात शिवसेना उबाठा गटाचे राज्यव्यापी आंदोलन.. भिवंडीत आंदोलनाचे पडसाद, आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी..... ॲंकर.... भिवंडी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत भारत देश पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनीच्या सिंदूराचा अपमान करण्याचे काम करत आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज शिवसेना उभाटा गडाच्या वतीने राज्यव्यापी छेडण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भिवंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते. भिवंडी लोकसभा महिला संपर्क संघटिका आशाताई रसाळ, जिल्हा संघटिका वैशालीताई मेस्त्री , यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध करण्यात आला. महिला कार्यकर्त्यांनी आंदोलना नंतर प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांनी कुंकवाच्या डब्ब्या एका सरकारचा निषेध केला. हमारा सिंदूर-हमारा देश याची जाणीव सरकारला करून देण्यासाठी हा बॉक्स देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 08:21:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn drug pkg Feed on 2 c and on what's app both Anchor :. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेसाठी 'कोडेन फॉस्फेट' या खोकल्याच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस आयुक्तांचे विशेष पथक, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, १२ जणांना अटक करून ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Vo 1... नशेच्या औषधांचे मोठे रॅकेट संभाजी नगरात उघड औषधांच्या 2504 बाटल्या केल्या जप्त 12 पेडलर्स ला अटक , 39 पेडलर्स रडारवर औषधांच्या  या बाटल्या उपचारासाठी नाही तर या सगळ्या नशेसाठी संभाजी नगरात आल्या होत्या मात्र येताच पोलिसांच्या कचाट्यात हे रॅकेट अडकले आणि मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला... गेल्या दोन वर्षांपासून अनेक एमआर, मेडिकल चालक शहरातील कुख्यात गुन्हेगार, अमली पदार्थांच्या संपर्कात आले. पन्नासपेक्षा अधिक जणांचे हे सिंडिकेट तयार होऊन त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात जाळे पसरविले. बनावट परवाने तयार करून औषधी कंपन्यांना वेदनानाशक, गुंगीकारक औषधांची ऑर्डर दिली जायची. नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी, नशेखोरापर्यंत दहापट अधिक रकमेने पोहोचवून त्यांना नशेची लत लावली जाई, आणि या पद्धतीने हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू होता पोलिसांचे पथक गेल्या ३ महिन्यांपासून या रॅकेटवर बारीक लक्ष ठेवून होते. पोलिसांनी एका पेडलरला पकडल्यानंतर चौकशीत आरोपी रुपेश पाटील याचा फोन नंबर मिळाला. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर, १२ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हा वाळूज येथील व्हीआरएल लॉजिस्टिक्सच्या गोदामातून औषधांचे पार्सल घेण्यासाठी येणार होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १३ जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक पेडलर्सचे नेटवर्क चौकशीत समोर आले आहे... Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी Vo 2... सिंडिकेटची कार्यपद्धती पूर्वी एमआर असलेले अविनाश, रूपेश व अमोल यांनी पगार पुरत नसल्याने मेडिकल दुकान  सुरू केले. मात्र, त्यातही त्यांचे जीएसटी व औषधी परवाने रद्द झाले. त्याच बंद जीएसटी व परवान्यावर ते औषधांची ऑर्डर देत होते. अमोलच्या मेडिकलच्या पत्त्यावर पोलिसांना वॉटर प्लांट आढळून आला. विविध औषधी दुकाने, एजन्सीचालक, डॉक्टरांच्या कागदपत्रांचा यासाठी वापर होई...एकमेकांच्या संपर्कासाठी अन्य चॅटिंग अॅप, दुसऱ्यांचे बँक खाते, वाहनांचा वापर केला जातो. यातून हे सगळे औषध नशेसाठी खरेदी केल्या जात होते आणि शहरातील पेडलर्सला विकला जात होते आरोपी रूपेश गेली काही वर्षे हा व्यवसाय करत होता मात्र  त्याच्या अतिघाईमुळे  तो पोलिस जाळ्यात अडकला. उत्तराखंडहून औषधांचे एक मोठे कन्साइनमेंट त्याने वाळूज येथील व्हीआरएल कंपनीच्या गोदामात मागवले होते. साधारणपणे, ही औषधे गोदामातून नाशिकला पाठवली जातात, पण या वेळी तसे झाले नाही. अनेक दिवसांपासून डिलिव्हरीची वाट बघून वैतागलेल्या रूपेशने कंपनीच्या व्यवस्थापकाला फोन केला. अनेक पेडलर्सना औषधांची तातडीने डिलिव्हरी द्यायची असल्यामुळे त्याला धीर धरवला नाही. त्याने कंपनीच्या व्यवस्थापकाला सांगितले, याच घाईमुळे संशय बळावला आणि कारवाई झाली... Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त Vo 3... संभाजीनगर सध्या नशेच्या गोळ्यांचा नशेच्या औषधांचा सुळसुळाट  झाला आहे,  पोलिसांची कारवाई सुरू आहे मात्र तरीसुद्धा ही औषधं या गोळ्या राजरोसपणे मिळतात मात्र या कारवाईनंतर पेडलर्सचे एक रॅकेट उध्वस्त झाले , ही लोक औषधं नशेसाठी विकत होते सोबतच यातील काही लोक नशेच्या गोळ्या आणि आणखी काही साहित्य विकत होते असाही पोलिसांचा संशय आणि त्यातून आता सखोल चौकशी केली जाईल आणि त्यातून एक मोठा रॅकेट उद्ध्वस्त होईल यात शंका नाही विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 14, 2025 08:19:45
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_protest *नाशिकच्या उभाठा गटाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर भारत पाकिस्तान सामन्या विरोधात आंदोलन* अँकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोर भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याच्या निषेधार्थ उभाठा गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर ची डबी पाठवणार असे देखील सांगण्यात आले पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर भारत पाकिस्तान सामना खेळून आमच्या भगिनींच्या सिंदूर चा अपमान करण्याचं काम होत  असून याची सरकारला याची जाणीव व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले.
3
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 14, 2025 08:18:19
Thane, Maharashtra:भिवंडीत तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल... दहा वर्षात ३० हून अधिक बोगस डॉक्टरांवर अटकेची कारवाई... ॲंकर... भिवंडी शहराची कामगारांचं शहर म्हणून ओळख आहे. शहारातील झोपडपट्टी भागातील गरीब आणि अशिक्षित नागरिकांच्या असहायतेचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टर दवाखाने थाटून बसलेत. मागील १० वर्षात ३० हून अधिक बोगस डॉक्टरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागनं पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली आहे. भिवंडी शहरात तीन बोगस डॉक्टरांविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळं बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी आपले दवाखाने बंद ठेवून पळ काढला आहे. भिमराव कावडे, मोहम्मद शमीम सिध्दीकी, मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ असं गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या पथकानं शांतीनगर परिसरातील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांच्या दवाखान्यावर कारवाई केली. त्यांच्याकडं बी.ई.एम.एस. या पदवीचं प्रमाणपत्र आढळलं. त्यांनाही शहरी भागात परवानगी नसताना त्यांच्याजवळ ॲलोपॅथीचे उपचार करण्यासाठी वैद्यकिय उपकरणे आणि औषधं आढळली. तर पथकानं तिसरी कारवाई गायत्रीनगर परिसरातील नूरी नगर डोंगरपाडा इथं केली. तिथं एका गाळ्यात मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ ही व्यक्ती दवाखाना थाटून बसली होती. त्याच्याकडं वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडं कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचं समोर आलं. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना मोहम्मद अयुब मोहम्मद हानीफ अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं आढळलं. त्याच्या दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर ॲलोपॅथीचे वैद्यकिय उपकरणं आणि औषधे जप्त केली, असं डॉ जयवंत धुळे यांनी सांगितलं.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 14, 2025 08:16:23
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 14, 2025 08:03:05
Raigad, Maharashtra:स्लग - अलिबागमध्ये माझं कुंकू माझा देश आंदोलन ....... ठाकरेंच्या शिवसेनेची केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी ....... अँकर - पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देखील पाकिस्तान बरोबर क्रिकेट सामना खेळण्यास हिरवा कंदील दाखवणाऱ्या केंद्र सरकारचा शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध केला जात आहे. त्यासाठी माझं कुंकू माझा देश हे राज्यव्यापी आंदोलन आज होत आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं ठाकरेंच्या शिवसेनेने निषेध आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी कुंकू एकत्र करण्यात आलं. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. बाईट - राजश्री मिसाळ, महिला पदाधिकारी
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 14, 2025 08:01:09
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज – नाशिक राजीव नगरमधील विशाखा कॉलनीतील नुरानी मशीद व अंजूमन ट्रस्टवरील वादाला शेवटी तोडगा महानगर पालिकेच्या आदेशानंतर ट्रस्टने स्वतःहून मिनार आणि घुमट हटवायला सुरुवात निवासी परवान्यावर उभारलेल्या धार्मिक बांधकामाबाबत अनेक वर्षांपासून वाद हिंदू जनसंपर्क कार्यालय प्रमुख सागर देशमुख यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा फळाला २५ वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी; स्थानिकांमध्ये समाधानाचा माहोल anchor गेल्या अनेक वर्षांपासून राजीव नगर मधील विशाखा कॉलनीतील नुरानी मस्जिद व अंजूमन ट्रस्टने अनधिकृतपणे उभारलेली मशीद हटविण्याची मागणी हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात येत होती. नाशिक महानगर पालिकेत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर मशीदीला टाळे ठोकण्यात आले होते. मात्र निवासी इमारतीचा परवाना असतानाही धार्मिक स्थळाचे रूपांतर करण्यात आल्याचे हिंदू जनसंपर्क कार्यालय प्रमुख सागर देशमुख यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मशीदीचे स्वरूप असलेला घुमट आणि मिनार त्वरित काढून टाकण्याचे आदेश नाशिक महानगर पालिकेने दिले होते. नाशिक महानगर पालिकेने बजावलेल्या नोटिसेची मुदत संपूनही अतिक्रमण जैसे थे असल्याने सागर देशमुख आणि स्थानिक रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आज नुरानी मस्जिद व अंजूमन ट्रस्ट यांनी स्वतःहून धार्मिक स्वरूप प्राप्त होत असलेले दोन मिनार आणि घुमटाचे बांधकाम हटवायला सुरवात केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 14, 2025 07:50:53
Kolhapur, Maharashtra:Kop UBT Sena Maharati Feed: Live U Anc:- भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करण्यासाठी आणि त्याचबरोबर अंबाबाई देवी सरकारला सुबुद्धी देवो यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला महाआरती केली जात आहे. पाकिस्तानकडून भ्याड हल्ला होऊन देखील केंद्र सरकार भारत पाकिस्तान मॅच होताना पाहात आहे. ही मॅच म्हणजे संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे अशी भावना अंबाबाई देवीला साकडे घालणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्याची आहे. त्यामुळेच ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहेत.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 14, 2025 07:47:45
4
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 14, 2025 07:47:09
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_CHILD_NEWS सातारा - साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे.एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे.आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता.त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसरणार आहेत.मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. व्हिओ 1- सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे .कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या २७ वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला... त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं...! गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे.अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 14, 2025 07:46:58
Nashik, Maharashtra:nsk_educationscam मालेगाव शिक्षण घोटाळ्याप्रकरणी शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर गुन्हा दाखल... नितीन बच्छाव यांची जामीनासाठी मालेगाव कोर्टात धाव... महात्मा फुले शिक्षण संस्था या.ना. जाधव विद्यालय बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा... अटक होऊ नये म्हणून दवाखान्यात उपचारासाठी दाखल नितीन बच्छाव यांच्यावर याआधीही सटाणा पोलिस ठाण्यात ९/१२/२०२४ मध्ये बेकायदेशीर रित्या शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी दाखल आहे गुन्हा.. मालेगाव बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणची आणखी मोठी कारवाई मात्र अद्याप नितीन बच्छाव यांना अटक नाही... सूत्रांची माहिती
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 14, 2025 07:46:45
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत ठाकरे गट-मनसेचा आंदोलन.. पंतप्रधान नरेंद्र मोदीना सिंदूरच्या डब्यांनी पाठवली भेट.. भारत सरकारचा निषेध करत, पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. Anc..दुबईत आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून असताना, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यामध्ये डोंबिवलीतील तिघांचा समावेश असल्याने संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे एकत्र रस्त्यावर उतरून पाकिस्तानविरोधात आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला या वेळी डोंबिवली पूर्वेतील इंद्रा चौकात उद्धव ठाकरे गटातील आणि मनसे च्या महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं. हातात सिंदूरच्या डब्या घेऊन कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला. "मोदी सरकारचा करायचं काय – खाली डोकं वर पाय", "पाकिस्तान मुर्दाबाद", "भारत सरकार होश में आओ" अशा घोषणांनी इंदिरा चौक दणाणून गेला.दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे पाकिस्तानविरोधात आवाज बुलंद केला. आंदोलनादरम्यान नेत्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सिंदूरची किंमत मोदी सरकारला कळणार नाही… त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही सिंदूरच्या डब्या पाठवत आहोत,” असे सागितले Byte... दीपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख ubt
0
comment0
Report
Advertisement
Back to top