Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम: डैम भराव, 138 प्रकल्प 90% जलसाठा—रबी फसल उम्मीद ऊँची

GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 04:15:51
Washim, Maharashtra
वाशिम: File:1509ZT_WSM_DAM_OVERFLOW रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून बहुतांश प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.मृद व जलसंधारण विभागाच्या ८५ लघु प्रकल्पांपैकी तब्बल ८४ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर पाटबंधारे विभागाच्या ७५ पैकी ६४ लघु प्रकल्पांनी शंभर टक्के जलसाठा गाठला आहे. याशिवाय सोनल व एकबुर्जी हे दोन मध्यम प्रकल्प आधीच गच्च भरून वाहू लागले आहेत.एकूण १३८ प्रकल्पांमध्ये सरासरी ९० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 07:18:18
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सतत पडत असणाऱ्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात शिरले ड्रेनेजचे पाणी सतत पडत असलेल्या पावसामुळे आणि ड्रेनेज चोकअपमुळे सैफुल भागात 4-5 फुट पाणीच पाणी सोलापूर शहरातील सैफुल परिसरातील स्वामी विवेकानंद नगरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर पावसामुळे पाण्याचा ओघ वाढल्याने सैफुल भागातील परिस्थिती गंभीर तब्बल 4 -5 फूट पाणी साचले असून काही नागरिकांच्या घरात शिरले पाणी त्यामुळे अनेकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागत असल्याचे चित्र या भागातील जाण्या-येण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे मार्ग पाणीमय परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक झाले त्रस्त स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली असून तात्काळ उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत महापालिका प्रशासनाने अजूनही लक्ष नाही दिले तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती बाईट - स्थानिक नागरिक
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 15, 2025 07:04:47
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Dam Feed on - 2C ----------------------------- Anchor - नांदेड शहराजवळील विष्णुपूरी प्रकल्पाचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीला पुर आलाय. नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. सोबतच विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील बाजूसही मुसळधार पाऊस झाल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरु आहे. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या गोदावरी नदीपात्रात 1 लाख 13 हजार क्यूसेक प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ------------
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 15, 2025 06:32:09
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_DIMAGE जिल्ह्यात 100% क्षेत्रावर 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान एन डी आर एफ, एस डी आर एफ च्या नियमानुसार नुकसानीचे अनुदान मिळायला हवे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून घेण्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन Anchor धाराशिव जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान केले या नुकसानीची पाहणी भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केलीय. धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्के क्षेत्रावरती 33% च्या वर नुकसान झाले आहे त्यामुळे सर्व क्षेत्राला सरसकट आणि एस डी आर एफ एन डी आर एफ च्या नियमानुसार अनुदान मिळायला हवं असं मत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलंय. तसेच ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत 50% पेक्षा जास्त पाऊस झाला त्यासंदर्भात एनडी आरएफ, एस डी आर एफ च्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार असल्याची माहिती आमदार राणा जगजीत सिंह पाटील पाटील यांनी दिली Byte- आमदार राणा जगजितसिंह पाटील
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 06:30:34
Nashik, Maharashtra: नाशिक - जितेंद्र आव्हाड - आमदार ऑन कुंभ टेंडर - माझ्या माहितीप्रमाणे २०२१ नंतर सगळे टेंडर मॅनेज करून दिले - २१ टक्के टेंडर बिलो जायचे, पॉईंट ५ वर जायला लागले - उचलून मारण्यापर्यंत जाते - लेखी तक्रार त्या कंत्राटदाराने दिले - नियमबाह्य कामे नाशकात सुरू - कुंभाचं काम सांगून भावनिक सांगड घातली जाते भक्तांचा पैसे लुटण्याचे काम सुरू - इंजिनिअरिंग औटी फावडा घेऊन लुटत आहे - सरकारचा पैसा आहेत त्यावर दरोडा घालत आहे - मी सुरुवातीपासून बोंबलत आहे - अधिवेशन डिसेंबरला आहे - महाजन यांनी लक्ष घालावे ऑन पालकमंत्री नाही - पूजा अर्चा चालू आहे - पुढे बघू काय होते ऑन मुंबई पाऊस - मुंबई कुणाच्या हातात आहे - यापूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली - आता कोण जबाबदारी घेणात - दुसऱ्यावर टीका केली आता आपल्यावर आल्यावर काय - सगळ्या रस्त्यांची चाळण - भिवंडी यायला 2 तास, नाशिकला यायला सव्वा तास - मोनो रेल मुळे रस्ते छोटे झाले आहेत, गाड्यांची संख्या कमी झाली - रस्ते चांगले झाले तरी ट्रॅफिक जाम होणार - प्रकल्पांच्या प्लॅनिंग व्यवस्थित झाले आहे - आजही csmt बाहेर कधी ट्राफिक जाम नाही झाली - आपल्याकडे प्लॅनिंग नाही - पैसे खायचे आहे 500 कोटी खायचे - म्हणजे दोन तीन इलेक्शनचा खर्च ऑन फडणवीस - त्यांचा क्स वाय माहिती नाही ऑन मोर्चा - सरकार खोटं बोलत - त्यांना अलतिमेत काय द्यायचा - सातबारा कोरा करणारा म्हंटले - एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आश्वासन - प्रश्न विचारले तर x y ऑन भुजबळ - मंत्रिमंडळ जे आहेत त्यात तो जीआर पारित झाला - त्याबाबत विचार करायला हवा - ओबीसला अस्वस्थ आणि मराठा समाजाला फसवायचे आहे - महाराष्ट्र धर्म आहे तोरणा किल्ल्याला 18 पगड जाती - महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त होतो आहे - जातीपातीत भांडन लागत आहे - संशयाची प्रक्रिया सुरू झाली - संशय कल्लोळ निर्माण होईल - हे पाप सरकार करत आहे ऑन मॅच आर्थिक मदत - त्यांनी आजपर्यंत भारत पाक दोन शब्दांवर राजकारण केलं ऑन मुंबई प्रकल्प - सरकारने चौकशी करावी [15/09, 11:17] Kiran Tajne: नाशिक - सुप्रिया सुळे - खासदार ऑन त्र्यंबकेश्वर खड्डे - मी आज दर्शनाला गेली होते - कुंभाच्या बाबत मिटिंग होत आहे - अप्रतिम रस्ता असेल असे वाटले - पण प्रचंड खड्डे, आणि दुर्दशा होती - देवस्थान ठिकाणी जातांना खड्डे असतील तर सरकारचा निधी कुठे जातो - गडकरी साहेबांच बारीक लक्ष असतं - साहेब रस्ता चांगला नसेल तर ब्लॅक लिस्ट करतात - पण इथला रस्ता अतिशय खराब होत - मला जायला यायला 1 1 तास लागला ऑन आक्रोश मोर्चा - महाराष्ट्र समोर आव्हाने - १५ वर्षांपूर्वी जी स्थिती होती आता तशी नाही - सरकारने कितीही सांगितले इन्व्हेस्टमेंट आल्या पण तसे नाही - डेटा तसा सगळं सांगतो - हिंजवडीत नोकऱ्या गेल्या - टेरिफ मुळे आपल्या सॉफ्टवेअरचे काय होईल सांगता येत नाही - अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे होती - तशी झाली - जीएसटी बदल केले त्याचे स्वागत करतो - उशिरा केले - काळ ठरवेल किती बदल होईल - महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत - लाडक्या बहिन योजनेची २५ लाख नावे कमी झाली - महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे - योग्य वेळ आली आहे - महाराष्ट्रात सरसकट माफी झाली पाहिजे - नाशिकमधील शेतकरी अडचणीत - शेतकऱ्यांनी शेतात काळे झेंडे लावले आहे - दर ३ तासाला शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो - मकरंद आबाचे वाक्य आहे ऑन वक्फ - डिटेल्स ऑर्डरची वाट बघू - संसदेत हे बिल आले तेव्हा विरोधात होतो - जॉईन परलीमेंट्री बोर्डात सगळ्यांची मते घेतली नाही ऑन फडणवीस - सशक्त लोकशाहीत त्यांना मत मांडायचा अधिकार - पण प्रॉब्लेम आहेत ना - भारतात प्रत्येक जण अस्वस्थ ऑन मॅच पाक फायदा - हे वास्तव आहे - केंद्र पण मान्य करत आहे - हा व्यवहार आहे - हे दुर्दैव - ज्या कुटुंबाचे अश्रू पुसले गेले नाही - असे असतांना मॅच झाली - रक्त आणि पाणी, व्यवहार आणि चर्चा, आणि तिसरी एक लाईन होती असे ते सांगत होते - आतंकवाद संपला आहे का - क्रिकेट खेळले दुर्दैवी आहे - आम्ही त्यांच्यासोबत उभा राहिलो - 26 लोकं आपण गमावली - घुस के मारेंगे म्हणत होते - त्यात क्रिकेट होते हे माहिती नाही - इंदिरा जींचा सार्थ अभिमान, करारा जवाब दिला होता ऑन भारत विश्वासघात - आम्ही देशासाठी गेलो होतो - शरद पवार पहिले होते बरोबर - सरकारवर टीका केली नाही - आम्हाला फसविले आणि अस्वस्थ वाटत आहे - आम्ही त्या २६ कुटुंबाच्या घरी गेलो - त्या कुटुंबाचे दुःख समजू शकले नाही - असंवेदनशील सरकार पाहिले नाही ऑन क्रिकेटपटू - हॅन्ड शेक केला की नाही माहिती नाही - करारा जवाब मिलेगा म्हणत होते - सरकारच्या तीन लाईनचे काय झाले - पत्नीची डोळ्यासमोर त्या हत्यारांचा चेहरा समोर येतो ऑन एसआरए प्रकल्प - काँग्रेस सोबत बोलून माहिती घेते - पेपरला बघितले नाही - मोर्चा झाल्यावर बोलू ऑन लक्ष्मण हाके - म्हणून पवार साहेब म्हणत आहे - विस्कळीत पणा आला आहे - सर्वपक्षीय मिटिंग बोलवा - सेशन बोलवा - होऊद्या सर्व चर्चा - लोकशाही आहे दडपशाही नाही - भाजप मध्ये नवीन विचार येतोय - तो हानिकारक आहे ऑन भुजबळ - कुणाला उद्देशून होत मला माहिती नाही ऑन जीआर - कुणाला फायदा होईल माहिती नाही - कळत नाही काय आहे - फडणवीस यांनी सोप्या भाषेत सांगावे - हैद्राबाद गॅझेट बाबत प्रेझेंटेशन करावे आणि सांगावे - निर्णय त्यांचा आहे त्यांनी सांगितले पाहिजे - जसे २५ लाख लाडक्या बहिणी कमी केले आहे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 15, 2025 06:17:35
Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* *On पाकिस्तान भारत मॅच* पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे काल पाकिस्तान बरोबर भारत जिंकले त्याच्याबरोबर 25 महिलांचे कुंकू पुसलेले परत आले का यात भरपाई काय झाली पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माघार घेतली क्रिकेटच्या मैदानावरती ती काय फिक्सिंग मॅच होती कालच्या मॅचवर दीड लाख कोटींचा जुगार खेळायला गेला यात पाकिस्तानला सुद्धा त्याचे पैसे मिळाले असतील कालच्या मॅचमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले असतील तुम्ही पाकिस्तानला आमच्याविरुद्ध लढण्यासाठी महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करत आहात याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काही फरक पडत नाही कालच्या मॅचवर आम्ही थुंकलो आहे अशा मॅचवर आम्ही थुकतो एकूण कालच्या मॅच मध्ये दीड लाख कोटींचं गॅंगलिंग झालं आहे हे काय अमित शहा यांना कळत नाही हे काय भारतीय क्रिकेट बुडाला कळत नाही काल सुनील गावस्कर काय म्हणाले भारतीय संघाची खेळाची इच्छा नसली तरी संघाला खेळण्यासाठी भाग पाडले आहे सरकारने जर खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळायला नसता हे सुनील गावस्कर सारखा माजी क्रिकेटपटू सांगत आहे *On मोदी* मोदी गेले चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलेही नाही पण होते ना तुमच्यासोबत तसंच आहे मैदानामध्ये खेळलात ना मैदानावर सेकंड केलं नाही हे सांगताय तुम्ही कोणाला या देशाशी जनता मूर्ख आहे का लोक फासावर गेले देशासाठी पण तुम्ही एका मॅच साठी क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत नाही का पैशासाठी भगतसिंग राजगुरू हे देशासाठी फासावर गेले ना त्यांची नावे घेताना तुम्ही आणि तुम्ही काय सेकंड केलं नाही याचं काय कौतुक आहे भाजपला हे काय उत्तर झालं का *On शिंदे शिवसेना* बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंनी पाकिस्तान भारताच्या मॅचला विरोध केला होता एकनाथ शिंदे आम्हाला काय प्रश्न विचारणार अमितशाच्या मुलाला प्रश्न विचारा तुम्ही देशाच्या पालख्या वाहणार भारत पाकिस्तानच्या मॅच घरात बसून बघणार आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार *On देवेंद्र फडणवीस शरद पवार* राष्ट्रवादावरती प्रवचना जोडायची आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे हे भारताचे एक्स वाय झेडच आहे ना त्यांनी केलेली देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर बोललं तर जरा बरं होईल यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचं नेतृत्व हे महाराष्ट्रात आहे शरद पवारांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे मोदींनी तुम्हाला चिटकवले म्हणून तुम्ही नेते आहात तुम्ही काय सहकार्तुत्वावर झालेले नाही आहात पूर्वी सहकारी खात्यात चिटकवायचे जसं काय याला पोस्टात चिटकवल पीडब्ल्यूडी मध्ये चिटकवलं तसं त्यांना मुख्यमंत्रीच्या कार्यालयात चिटकवल आहे *On कबुतर खाना लोढा उद्घाटन* देवेंद्र फडणवीस यांचे यावर काय म्हणणं आहे तुम्हाला हे कोर्टाचा निर्णय मान्य नाही का तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याच्या विषय मान्य नाही का लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात त्यांचं साहित्य संघाशी काय संबंध येथे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे बिल्डर यांची राजकीय लॉबी आहेत्याच्यात साहित्य संघ,मुंबई मराठी पत्रकार संघाची जागा,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जागा , आझाद मैदानाची जागा इथे हे सगळे लोक घुसून मराठी माणसाच्या शिवाजी मंदिर या सगळ्या जागांवरती अशा पद्धतीने हळूहळू गोगलगायीच्या पायाने पद्धतीने कब्जा करून आहेत भालेराव यांच्या नावाने जेणे साहित्य संघ स्थापन केला त्यांच्या नावाने एक पॅनल डुबलीकेट उभा करून बोगस मतदान निर्माण करून साहित्य संघाची जागा तुम्ही ताब्यात घेत आहे ती मराठी माणसाच्या अस्मितेची जागा आहे पत्रकार संघाच्या जागेवर सुद्धा लक्ष आहे या सगळ्या जागांवर त्यांचं लक्ष आहे फडणीसांच्या सर्व बाजूने बिल्डरांचा बुंगाट आहे मराठी त्यांचं यावर लक्ष आहे अत्यंत धोकादायक आणि गंभीर असा हा विषय आहे यासाठीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन लढावं लागेल
4
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 15, 2025 06:16:20
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी गेले काही दिवस पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतल्याचं चित्र होतं.. पण काल संध्याकाळपासून पावसाने पुन्हा पुनरागमन केलं आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रात्री पावसाची संततधार सुरू होती. पण आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र आहे. सध्या ढगाळ वातावरण जिल्ह्यात आहे.. दरम्यान आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 27.05 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. मंडणगड, रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमध्ये 30 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे..
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 15, 2025 06:15:29
Beed, Maharashtra:बीड: अंबाजोगाई, परळी तालुक्यात पावसाचा हाहाकार; राक्षसवाडीचा तलाव फुटला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा Anc- मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी येथील तलाव फुटल्याने तलावातील पाणी गावात शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परळी तालुक्यात देखील सर्वच तलाव आणि नद्या तुडुंब भरून वाहतायत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
3
comment0
Report
Advertisement
Back to top