Back
पुण्यात तरुणांना शेळी-मेंढी व्यवसायाचे प्रशिक्षण, संधी गमावू नका!
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 02, 2025 08:33:44
Shirur, Maharashtra
Feed 2C
Slug: Pune Sheep Goat
File'01
Rep: Hemant Chapude(SHIRUR)
Anc: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळाकडून राज्यभरातील शेकडो तरूण तरूणींना व्यावसायीक प्रशिक्षण सूरू झालं असून पुढील तीन दिवस हि प्रशिक्षण बँच सुरू राहणार आहे,राज्यात शेळी मेंढी व्यावसायीकांची संख्या वाढावी नवयुवक व्यावसायीक सक्षम व्हावेत यासाठी महामंडळाकडून हे प्रशिक्षण दिलं जातंय,या व्यवसायासाठी तरूणांचा हि चांगला प्रतिसाद पहायला मिळतोय...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 17, 2025 09:40:46Latur, Maharashtra:
लातूर स्टोरी....
exclusive pkg.......
AC ::- लातूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्याची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आता समोर आली आहे… गेल्या 30 दिवसापासून पाऊस नाही… कर्ज काढून पेरणी केली…पण बियाणे वापलंच नाही म्हणून पुन्हा दुबार पेरणी केली पण आता डोळ्यांदेखत पावसाअभावी पीक वाळून जात आहे. मशागतीसाठी खिशात पैसे नाहीत… म्हणूनच एका बैलासोबत स्वतःला औताला जुंपून शेतात राबणाऱ्या या शेतकऱ्याने शेती विक्रीसाठी थेट फलक लावला आहे… खाजगी सावकाराच्या सावटाखाली अडकलेल्या या शेतकऱ्याची वेदनादायक कहाणी आता ZEE 24 TAAS ने समोर आणली आहे. पाहुयात याच संदर्भातील एक Zee 24 TAAS चा स्पेशल रिपोर्ट....
VO 01 ::- औसा तालुक्यातील नागरसोगा गावातील हे आहेत ७० वर्षीय गोरोबा आडसुळे… गोरोबा आडसुळे यांना चार एकर जमीन आहे. त्याची एक एकर जमीन हि त्यांच्या तळ्यात गेली आहे. त्याचा मोबदला हि त्यांना मिळाला नाही. शेती करण्यासाठी त्याने गावातील काही लोकांकडून खाजगी कर्ज घेतलं त्यासोबतच एका बँकेतून ही त्यांनी कर्ज घेतलं पण सततच्या नापिकीमुळे त्यांनी ते कर्ज फेडू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे असलेला बैल जोडीतील एक बैल त्याने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी विकला. पण पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने तो प्रश्न तसाच राहिला मग त्या शेतकऱ्याने पेरणीसाठी खाजगी सावकाराकडून पैसे व्याजाने घेतले…मात्र आता तेही पेरणी केलेले पीक पावसाअभावी वाळून जात आहे… खिशात मशागतीसाठी पैसे नाहीत…
म्हणून एका बैलाबरोबर स्वतःलाच औताला जुंपून हे वयोवृद्ध शेतकरी शेतात राबत आहेत…
बाईट::- 1 टु 1 शेतकरी आणि रिपोर्टर
VO 02 ::- शेती परवडत नाही… कर्जबाजारीपणाचा फास घट्ट होत चाललाय… आणि म्हणूनच गोरोबा आडसुळे यांनी आपल्या शेताच्या बांधावर थेट 'शेती विकणे आहे' असा फलक लावला… या फलकासह त्यांची वेदना संपूर्ण लातूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे…बँकेच्या आणि खाजगी सावकाराच्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आता शेती विकण्या शिवाय त्यांच्या हाती काहीच उरलेलं नाही.
सरकार दरबारी अनेक वेळेस अवैद्य सावकारी आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात विरोधक आवाज उठवतात पण सरकारकडून मात्र त्यावर कसलाही ठोस उपाय केला जात नसल्याचा आरोप आता होत आहे. माजी मंत्री अमित देशमुख यांनी अधीवेशनात विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकाच्या पातळीवरून अवैध सावकारकी रोखण्यासाठी चौकशी आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे
साऊंड बाईट ::- आमदार अमित देशमुख
बाईट ::- राजीव कसबे ( क्रांतिकारी शेतकरी संघटना )
VO 03 ::- दुष्काळ, महागाई, खाजगी सावकारी, आणि शासनाच्या आश्वासनांची फसवणूक…
या सगळ्यांनी शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे… लातूर जिल्ह्यात अवैध सावकारी ने डोके वरी काढल्यामुळे चित्रपटातील मुळशी पॅटर्नसारखी परिस्थिती लातूर जिल्ह्यातही निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने वेळीच या शेतकऱ्यांच्या वेदना ऐकाव्यात अशी मापक अपेक्षा शेतकरी करत आहेत....
.............................................................
वैभव बालकुंदे
ZEE 24 TAAS Latur
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 17, 2025 09:38:12Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1707ZT_WSM_NURSES_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं आज परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.यात वेतन त्रुटी,सेवा प्रवेश नियम,प्रशासकीय बदली,राज्य शुश्रुषा सेल स्थापन करणे, बाह्य स्रोत द्वारे कंत्राटी भरती बंद करा,केंद्र शासना प्रमाणे नर्सिंग भत्ता,गणवेश भत्ता, शैक्षणिक वेतन वाढ, पदनाम बदल आणि कर्तव्यावर असताना परिचारिकेवर होणारे हल्ले या संदर्भात ठोस उपाय योजना या मागण्यांना घेऊन वाशिम जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका आणि ब्रदर्स या आंदोलनात सहभागी झाले होते.
बाईट: देवशीला पायाळे,सचिव,महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना,वाशिम.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 17, 2025 09:37:46Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_LONG_MARCH
सातारा :
साताऱ्यातील कुसगाव येथील ग्रामस्थांनी मंत्रालयापर्यंतचा अनोखा लॉंग मार्च सुरू केला आहे. गावाजवळ सुरू असलेल्या ब्लॅक जेम स्टोन क्रशर प्रकल्पाला शासनाचा वरदहस्त आहे असा आरोप ग्रामस्थ करत असून, या क्रशर प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण, जलस्त्रोतांचे नुकसान आणि शेतीवरील परिणाम थांबवण्यासाठी प्रकल्प तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या आंदोलनाची खासियत म्हणजे ग्रामस्थांनी आपल्या गुरंढोरं, गाई, बैल, शेळ्या, बैलगाड्या, ट्रॅक्टरसह हा लॉंग मार्च सुरू केला आहे. संपूर्ण गावकरी कुटुंबियांसह या आंदोलनात सहभागी झाले असून, शांततामय मार्गाने मंत्रालयापर्यंत पोहचून आपली व्यथा शासनापर्यंत पोचवणार असल्याचं सांगण्यात आलं.या अनोख्या आंदोलनाचा आढावा आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
Wkt बाईट्स
3
Share
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJul 17, 2025 09:02:37Nala Sopara, Maharashtra:
Date-17july2025
Rep-prathamesh tawade
Loc-nalasopara
Slug-NALASOPARA DRIVER
Feed send by 2c
Type-AV
स्लग : नालासोपाऱ्यात ओला उबर चालकाची विष प्राशन करून आत्महत्या
अँकर : नालासोपाऱ्यात ओला उबेर चालकाने वीस प्रशांत करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे... सरोज सक्सेना असो या चालकाचे नाव असून तो नालासोपारा पूर्वेच्या बिलालपाडा परिसरात राहणार आहे.. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे...
सरोज सक्सेना (वय अंदाजे ४५), असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव असून तो नालासोपाऱ्यातील बिलाल पाडा भागात वास्तव्यास होता.
त्याने आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आर्थिक समस्येला कंटाळून त्याने हे पाऊल उचलण्याची माहिती समोर येत आहे..
एका दिवसापूर्वी जिगर मध्ये बोला उद्याच्या चालकांनी भाडेवाडीच्या मागणीसाठी आंदोलन केले होते, या त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज ओला उबेर चालकाने आत्महत्या केल्याने संताप व्यक्त केला जात आहे .. सरकारने तत्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
Byte : डॉक्टर : कविता जगदा
Byte : चालक
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 17, 2025 08:41:10Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - शक्तीपीठ मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारत केला आक्रोश,चौथ्या दिवशीही मोजणी रोखली..
अँकर - सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे.तासगाव तालुक्यामधील शक्तीपीठाची मोजणी गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे.सावळज येथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आक्रमक शेतकऱ्यांनी रोखून धरला,यावेळी अधिकाऱ्यांच्या समोर बोंब मारत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध दर्शवला आहे.नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या एक महिन्यांपासून मोजणीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे,मात्र ठीक ठिकाणी शेतकऱ्यांकडून याला विरोध होत आहे. दिवसेंदिवस हा विरोध वाढत चाललेला आहे, तासगाव तालुक्यात देखील गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.मात्र आक्रमक शेतकऱ्यांकडून हे मोजणी रोखून धरण्यात येत आहे.
बाईट - भाई दिगंबर कांबळे - जिल्हाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष.
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 17, 2025 08:39:51Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी जिल्ह्यात पावसाने मागील दहा दिवसांपासून दडी मारली होती,त्यामुळे पीक सुकून जात होते,पण आज परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यापैकी सेलू,जिंतूर आणि पाथरी या तीन तालुक्यात जोरदार पाऊस झालाय, ज्यामुळे पिकांना जीवनदान मिळालय,तर सेलू तालुक्यातील साळेगाव येथील नाल्याला पूर आल्याने काही तास वाहतूक बंद पडली होती. तसेच मोरेगाव -वालूर रस्त्यावरील खडकी नाल्याच्या पूलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकीस सकाळ पासून अडथळा निर्माण झालाय,एकीकडे अशी परिस्थिती असतांना दुसरीकडे मानवत,सोनपेठ,पालम, गंगाखेड पूर्णा आणि परभणी या सहा तालुक्यात मात्र पावसा अभावी पिके वाळून जात आहेत, या भागातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 17, 2025 08:36:52Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_UPDATE
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयित नराधमांनी अत्याचार केला आहे.लालासो पवार वय 55 आणि विकास जाधव उर्फ इब्र्या वय 25 अशी संशयीतांची नावे आहेत.. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले असून या दोन्ही आरोपींची नावे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे...या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आज या घटनेत आरोपींवर कडक कारवाईची मागणी करून गावातून निषेध मोर्चा काढला आहे.संबंधित अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे समुपदेशन केले जात आहे.रहिमतपूर पोलिसांनी मात्र प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा सवाल स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे.या घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे...
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 17, 2025 08:36:40Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 1707ZT_INDAPURMOHOL
BYTE 2
इंदापूर_*केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ बाईट पॉइंटर
*ऑन_वृक्षारोपण*
22 जुलैला देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे
लोकांच्या हिताचे लोकांना अपेक्षित असलेले कार्यक्रम करा असा आवाहन त्यांनी केल आहे.
राज्यामध्ये 22 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक मंडळ स्तरावरती रक्तदान शिबिर आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे हवामानात झालेले बदल आपण पाहत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पेड मा के नाम ही संकल्पना आणली.
एका वर्षात 145 कोटी वृक्ष या देशात लागले की खूप मोठी गोष्ट.
हेच डोळ्यासमोर ठेवून बातमीमध्ये वृक्षारोपण केल आहे.
*ऑन_विमान दुर्घटना अहवाल*
आमदाबाद मध्ये विमानाची दुर्घटना घडली त्यानंतर 24 तासात ए आय बी असेल डीजीसी असेल गुजरात सरकारच्या सर्व एजन्सी असतील या सर्वांनी चांगलं काम केलं 24 तासाच्या आत ब्लॅक बॉक्स आपल्याला त्या ठिकाणी मिळाला.
ब्लॅक बॉक्स प्राथमिक ए आय बी च्या कस्टडीत होता, एक महिन्याच्या आत त्याचा प्राथमिक रिपोर्ट दिला, त्यातून काही गोष्टी समोर आल्यात.
*अजूनही आम्हाला त्याच्यात जे समोर आलं ते अंतिम नाही अजूनही त्यात चौकशी करावी लागणार आहे*
*चौकशी अंतिम दुर्घटना का झाली हे समोर येईल पायलट आणि को पायलट मधला संवाद त्यामध्ये आला आहे, त्यात इंधनाचा पुरवठा बंद झाला की काय संवादाला आहे पण त्यावरती आताच बोलणं संयुक्तिक नाही*
अंतिम अहवाल हाती येईल आपल्यासमोर सर्व सत्य येईल.
*ऑन_मिशन बारामती*
पंतप्रधान मोदींचे काम बघून देशातील विकासाचं काम बघून जर आमच्याकडे काही लोक येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करत आहोत.
आम्हाला कोणालाही मोकळ रिकामा करायचं नाही.
*जे रिकामे होत आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की का होत आहेत*
देशातलं नेतृत्व म्हणून मोदीजींकडे तर राज्यात राज्यातील नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांकडे पाहिल जातं.
*भारतीय जनता पार्टी राजकारणासाठी पक्ष चालवत नाही*
जनहितासाठी या देशाच्या विकासासाठी आम्ही सरकार चालवतो. आम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता नको आम्हाला जनतेच्या विकासासाठी सत्तावी असते.
गेल्या दहा वर्षातील देशाची प्रगती पाहिली तर ते सिद्ध होत आहे.
*जागतिक अर्थव्यवस्थेत आपण 11 व्या स्तरावरून चौथ्या स्तरावर आलो.*
*देशातील 25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वरती आली*
या देशाच्या विकासात आपण सहभागी व्हावं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला ती संधी मिळावी या अपेक्षेतून ही सर्व लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.
*ऑन_उद्धव ठाकरे यांना फडणवीसांकडून थेट ऑफर*
मी छोटा कार्यकर्ता आहे, मला माझ्या स्तरावरचे प्रश्न विचारा
0
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 17, 2025 08:33:27Pandharpur, Maharashtra:
17072025
slug - PPR_JANKAR_CAST
feed on 2c
file 02
-----
Anchor
राष्ट्रवादी एस पी चे आमदार उत्तम जानकर यांची आमदारकी धोक्यात
माळशिरस राखीव मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी एसपी पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांना उच्च न्यायाने नोटीस दिली आहे.
माजी आमदार हणमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
आता 30 जुलै रोजी याची सुनावणी होणार आहे. याची नोटीस आमदार जानकर यांना दिली आहे
----
byte - संकल्प डोळस, याचिकाकर्ते
3
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 17, 2025 08:31:56Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरातल्या 13 कामांच्या पूर्ततेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनकडे मागणी
- सोलापूर शहरातला 13 कामांच्या पूर्ततेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनकडे मागणी
- सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतला पुढाकार
- आयटी पार्क, पूर्व भागात नवे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, 60 मीटर डीपी रोड सह 13 कामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
- मुंबईत पश्चिम महाराष्ट्राच्या आमदारांच्या आयोजित बैठकीत करण्यात आली मागणी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विकासकामांना तत्वतः दिली मंजुरी
- सोलापूर शहरातील 40 हजार घरकुलांची योजना मंजूर करण्याची करण्यात आली विनंती
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 17, 2025 08:03:48Latur, Maharashtra:
लातूर.....
AC ::- शेतकऱ्यांचे अर्थकारण ज्या हंगामावर अवलंबून आहे त्या खरीप हंगामातील सर्वच पिके आता धोक्यात आली आहे. पेरणी होताच गायब झालेला पाऊस अद्यापही परतलेला नाही. तब्बल 30 दिवसांची उघपीड असल्याने हलक्या प्रतिच्या जमिनीवरील पिकांनी माना टाकल्या आहेत. भर पावसाळ्यात पिके जगविण्यासाठी स्प्रिंक्लर चा आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागतोय. तर ज्याच्याकडे पाणीच उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. शेतकऱ्यांनी आता कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...
WKT ::- वैभव बालकुंदे रिपोर्टर लातूर
1
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 17, 2025 08:02:10Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करणाऱ्या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या शाईफेक प्रकरणात मोठी अपडेट..
- घटनेतील आरोपी दीपक काटे आणि त्याचा एक साथीदार याला अक्कलकोट न्यायालयाने दिली 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी..
- अक्कलकोट पोलिसांनी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याला न्यायालयात केलं होतं हजर..
- न्यायालयाने आज दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेत पंधरा दिवसाची दिली न्यायालयीन कोठडी..
- प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणी अद्यापही आठ आरोपींचा शोध सुरू..
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 17, 2025 08:01:54Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILE
SLUG NAME -SAT_RAHIMATPUR
सातारा - साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयित नराधमांनी अत्याचार केला आहे.लालासो पवार वय 55 आणि विकास जाधव उर्फ इब्र्या वय 25 अशी संशयीतांची नावे आहेत.या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले असून या दोन्ही आरोपींची नावे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे समुपदेशन केले जात आहे.रहिमतपूर पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा सवाल स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे.या घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे...
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 17, 2025 08:00:29Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME - SAT_MAHA_KARVAI
सातारा - महाबळेश्वर शहरातील रहदारीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महाबळेश्वर पालिकेने कारवाई केली.
मच्छी चौक आणि तानु पटेल स्ट्रीट येथील जावेद वारूणकर यांची टपरी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली.
कारवाईदरम्यान टपरी मालक आणि नातेवाईकांनी पालिका कर्मचाऱ्यांशी वादावादी केली.या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 07:38:01Beed, Maharashtra:
बीड: पर्यायी पूल वाहून गेल्याने सिरसाळा - पोहनेर वाहतूक ठप्प, परळीचा संपर्क तुटला
Ac - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे काल रात्री झालेल्या पावसामुळे रामेवाडी - पोहनेर मार्गावर असलेला पर्यायी फुल वाहून गेल्याने सिरसाळा ते पोहनेर दरम्यान असलेली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर परळीचा संपर्क देखील तुटला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे सरस्वती व गुनवरा अशा दोन्ही नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झालीय.
सरस्वती नदीवरील असलेल्या पुलाचे काम सुरू असल्याने बाजूला पर्यायी पूल उभारण्यात आला होता, मात्र नदीला पाणी आल्याने हा पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्याने सिरसाळा पोहनेर मार्ग पूर्णपणे बंद झालाय. त्यामुळे परळीचा संपर्क देखील तुटला आहे.
0
Share
Report