Back
नागपुरात तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू: कारणे आणि प्रतिक्रिया
AKAMAR KANE
FollowJul 11, 2025 04:35:55
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडले आहे
-----------------------
*नागपुरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू* झाल्याची घटना घडली आहे....
१) पहिली घटना नागपूर जवळच्या लाव्हा शिवारात घडली... लाव्हा परिसरात असलेल्या जुन्या खदानीच्या खोल खड्ड्यात साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन 15 वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.. धीरज नानवरे आणि नैतिक वानखेडे अशी मुलांची नावे आहेत... गुरुवारी दुपारी पाच मित्र पोहण्यासाठी लाव्हा शिवारातील खदानीच्या पाण्यात गेले होते.. मात्र तेव्हा पोहताना धीरज आणि नैतिक पाण्यात बुडाले...
२) दुसरी घटना नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत कच्छी विसा मैदानात घडली.. या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम टॅंक मध्ये खेळताना 7 वर्षीय बालक महेश थापाचा बुडून मृत्यू झाला आहे... गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या पूर्वी महापालिकेने कच्छी विसा मैदानात एका कोपऱ्यात गणेश विसर्जनाचा कायमस्वरूपी कृत्रिम टॅंक उभारला होता... त्यामध्ये भरलेल्या पाण्यात बुडून महेश थापाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कामासंदर्भात रोष व्यक्त केला आहे...
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 11, 2025 09:07:14Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KAMBAND तीन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन; कामकाज ठप्प, रुग्णांना त्रास
अँकर :– विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्याचे वेतन मिळालेले नाही. यामध्ये कक्ष सेवक, सापसफाई कामगार, लिप्ट कामगार, स्टोर कामगार, टेलिफोन ऑपरेटर या कामगारांचा समावेश आहे. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रहार कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. सक्षम फॅसिलिटी मुंबई दादर या कंत्राटदारा विरोधात यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. या आंदोलनातून दर महिना पेमेंट वेळेवर देण्यात यावे, वर्क ऑर्डर नुसार नमूद असलेले वेतन देण्या यावे, तीन वर्षातील बोनस व आतापर्यंतची पगारातील तफावत रक्कम मिळणे, पीएफ व एसआयसी च्या चलान नावसाहित चार वर्षाच्या सादर करण्यात यावा, शासनाच्या निर्णयानुसार डीए लागू झालेला तो कर्मचान्यांना द्यावा अशा विविध मागण्या या कामबंद आंदोलनातून करण्यात आली आहे.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 11, 2025 09:04:40Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1107ZT_WSM_GAS_TRUCK_ACCIDENT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या अनसिंग येथील इंडियन गॅस एजन्सीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने अपघाताची शक्यता सतत निर्माण होत आहे. आज या रस्त्यावर गॅस सिलिंडर वाहून नेणारे इंडियन गॅसचे वाहन पलटी झाले.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भविष्यातील धोका लक्षात घेता नागरिकांनी रस्त्याच्या त्वरित रुंदीकरणाची मागणी केली आहे.या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहने, विशेषतः गॅस वाहतूक करणारी, ये-जा करतात.रस्ता अरुंद आणि खड्डे मय असल्यामुळे वाहनांना वळण घेणे कठीण जाते आणि त्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडतात.त्यामुळे प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन रस्त्याचे रुंदीकरण व डागडुजी करण्याची मागणी केली जातं आहे.
2
Share
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJul 11, 2025 09:04:28Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_TREE_PLANT पाच फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
डॉ. आंबेडकर महाविद्यालयामध्ये सामाजिक पंधराव्या उपक्रम; एक झाड एक विद्यार्थी उपक्रमाने कार्यक्रमाला सुरुवात
अँकर :- माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच डॉ. कमलताई गवई यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सामाजिक उपक्रम पंधरवाडा हा राबवण्यात येतो आहे. आज एक झाड एक विद्यार्थी हा उपक्रम सुरू करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरामध्ये एक वृक्ष लावावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या परिसरात बोधी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचं आयकार्ड देऊन विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्वागत करण्यात आले. यावेळी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कीर्ती अर्जुन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक आणि संस्थेचे संचालक उपस्थित होते
बाईट :- कीर्ती गवई, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 11, 2025 09:01:48Ratnagiri, Maharashtra:
अँकर - रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. त्यासाठी मंदिर कमिटी या संदर्भातील विचार करतेय. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घालण्यावर बंदी घातली जाणार आहे. संस्कृती जपणारे कपडे घाला या संदर्भातील देखिल निर्णय़ लवकर अपेक्षित आहे. दरवर्षी लाखो भाविक गणपतीपुळ्यात गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवळात ड्रेसकोड लागू झालाय., आता या देवळा प्रमाणे आता गणपतीपुळे मंदिराची सुद्धा यात भर पडणार आहे. काल गणपतीपुळे मंदिर कमिटीची सायंकाळी बैठक झाली. यात ड्रेस कोडचा निर्णय अपेक्षित होता. मात्र या कमिटीच्या बैठकित याबाबतचा निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे कमिटी या संदर्भात निर्णय़ घेण्यासाठी लवकरच आणखी एक बैठक घेणार आहे. ड्रेसकोड बाबात गणपती आधी निर्णय़ होण्याची शक्यता आहे.
1
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 11, 2025 08:34:37Pune, Maharashtra:
अहिल्यानगर
खासदार निलेश लंके यांचं उपोषण सुरू...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं सुरू....
नगर-मनमाड महामार्गचे रखडलेले काम सुरू व्हावे यासाठी बेमुदत उपोषण.....
तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया होऊनही काम सुरू न झाल्याने लंके यांचा उपोषण
सध्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे
3
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 11, 2025 08:10:20Navi Mumbai, Maharashtra:
Story slug -पनवेल महापालिका शाळेतील प्रकार शौचालयात धुतात ताट
स्कुल मे टॉयलेट मे धोये जा रहे हे प्लेट
Ftp slug - nm panvel school
Shots-
Reporter- swati naik
Navi mumbai
Anchor - पनवेल महापालिकेच्या धाकटे खांदा कॉलनी येथील श्री गणेश मंदिर शाळा क्रमांक 6 येथील व्हेएडिओ व्हायर झाला आहे ,यात मध्यांनभोजन ची ताट मुलांकडून शौचालय धुताना चा व्हेएडिओ व्हायरल करण्यात आला याप्रकरणात म्हापलीक आयुक्त मंगेश चितळे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे ,
8
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 11, 2025 08:05:13Beed, Maharashtra:
बीड :भूमिहीन, दलित-आदिवासींसाठी आक्रोश मोर्चा; मालकी हक्क देण्याची मागणी
Anc : बीडच्या वडवणीत आझाद क्रांती सेनेच्या वतीने भूमीहीन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक व शेतमजुरांच्या हक्कांसाठी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गायरान, वन जमीन व अतिक्रमणावर कायमस्वरूपी हक्क देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात हजारो गायरान धारकांनी हजेरी लावली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तहसील कार्यालयावर धडकला. शासनाने तत्काळ अंमलबजावणी केली नसल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 11, 2025 07:36:23Beed, Maharashtra:
बीड : पावसाने घेतली उसंत, खरिपाची पीके संकटात..!
Anc: मान्सूनपूर्व पावसावर विश्वास ठेवून बीडच्या शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र गत तीन आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली असल्याने खरिपाची पीके आता धोक्यात आली आहेत. मान्सूनपूर्व पावसाने अनेक पाणी प्रकल्प तुडुंब झाले आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे. परंतु जिल्ह्यातील शेती केवळ पावसावरच अवलंबून आहे. अनेक भागातील शेतीमधील ओलावा संपला आहे. अशात पाऊस झालाच नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे.
12
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 11, 2025 07:34:28Shirdi, Maharashtra:
Anc - राहाता तालुक्यातील लोणी गावाजवळ असलेल्या सादतपुर शिवारात शेतकरी पती-पत्नीचा एकाच दिवशी गूढ मृत्यू झालाय.. पत्नीचा मृतदेह स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला.. मृत्यू मागे घातपात आहे की आत्महत्या याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
V/O - सादतपूर शिवारात गायकर वस्तीवर राहणारे 60 वर्षीय रेवजी मुरलीधर गायकर आणि 55 वर्षीय पत्नी नंदा गायकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.. नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात तर रेवजी यांचा मृतदेह घरात संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.. सासरी राहणारी गायकर दांपत्याची मुलगी आई वडिलांना फोन लावत होती मात्र समोरून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता.. शेवटी तिने जवळच राहणाऱ्या चुलत भावाला संपर्क साधून विचारणा केली.. चुलत भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावले.. रेवजी यांच्या पत्नी नंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला.. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करत आश्वी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.. मात्र रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कुणी पाजले? हे तपासात समोर येईल.. यासह नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांचा घातपात झाला? याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.. संशयपासद दोन मृत्यूच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे..
2
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 11, 2025 07:33:57Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - महापालिका विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन, संतप्त शिवसैनिकांनी घेतल्या नदीत उड्या..
अँकर - सांगली महापालिकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्यावतीने थेट कृष्णा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे.नदीच्या पात्रात उतरून नदी शिवसेनेच्यावतीने महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
प्रवीण पालिकेकडून दखल घेण्यात येत नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी कृष्णा नदीमध्ये उड्या घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला,मात्र यावेळी नदीकाठावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी शिवसेनेच्या तिघा कार्यकर्त्यांना पाण्यातून बाहेर काढले. शिवसेना शिंदे गट आणि सांगली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने चार महिन्यांपूर्वी कृष्णा नदीच्या काठावर कृष्णामाई महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं होतं.या आयोजनासाठी पालिकेकडुन निधीची तरतूद देखील करण्यात आली होती,मात्र उत्सव होऊन चार महिने उलटून देखील संबंधित ठेकेदारांची बिले महापालिकेकडून अदा करण्यात आलेली नाहीत,वारंवार मागणी करून देखील पालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्यावतीने महापालिकेचा निषेध म्हणून थेट कृष्णा नदीच्या काठावरच आंदोलन करण्यात आले आहे,कृष्णा नदीच्या पात्रामध्ये उतरत पाण्यात उभे राहून महापालिके विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
बाईट - महेंद्र चांडाळे - जिल्हाध्यक्ष - शिवसेना शिंदे गट,सांगली.
2
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 11, 2025 07:30:17Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1107ZT_CHP_RESULT_START
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 13 वर्षानंतर झाली निवडणूक, कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात सुरू झाली मतमोजणी, पहिले दोन निकाल काँग्रेसच्या बाजूने
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक पदाची निवडणूक 13 वर्षानंतर काल पार पडली. चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातल्या मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात आज मतमोजणीचा प्रारंभ झाला. यातील पहिले दोन निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. एकूण 21 संचालकांपैकी 17 संचालक निवडून आणत या बँकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला होता. दिनेश चोखारे आणि जयंत टेमुर्डे यांनी पहिल्या टप्प्यात विजय संपादन केलाय. फटाके फोडून या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला
बाईट १) दिनेश चोखारे, नवनिर्वाचित संचालक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 11, 2025 07:04:01Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_missing
नाशिकच्या बालसुधारगृहातुन मुलगी बेपत्ता
अँकर
नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या बालसुधागृहातून 16 वर्षीय मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे... मुलीच्या नातेवाईकांनी शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी आले आहे... जिल्ह्यातील वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे कुटुंब राहत या कुटुंबातील सोळा वर्षाच्या मुलीला एका तरुणाने 16 जूनला फूस लावून पळून नेण्याची घटना घडली होती... याबाबत वावी पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता... यानंतर 26 तारखेला या मुलीच्या नातेवाईकांनी नाशिकच्या उंटवाडी परिसरात असलेल्या बालसुधागृहांमध्ये या मुलीला महिनाभरासाठी ठेवलं होतं... मात्र तेथून ही मुलगी गायब झाली आहे... या मुलीच्या कुटुंबातील व्यक्तीने मुलगी विकल्याचा आरोप बालसुधारगृहावर लावला असून , बालसुधागृहात सीसीटीव्ही कॅमेरा असताना मुलगी गायब झालीच कशी असा देखील प्रश्न विचारला आहे.... यानिमित्ताने नाशिकच्या बाल सुधार गृह च्या सुरक्षा वरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे....
बाईट- मुलीचे वडील
12
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 11, 2025 07:02:16Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी- समुद्राच्या पाण्याजवळ गाडी नेणे आले अंगलट
भाट्ये समुद्रकिनारी थार गाडी रुतली वाळूत
पोर्णिमेच्या भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने घटना
थार गाडी समुद्राच्या वाळूत रुतल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
स्थानिकांच्या मदतीने वाळूत रुतलेली थार गाडी काढली बाहेर
समुद्रकिनाऱ्यांवर गाडी भरधाव वेगाने नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढले
10
Share
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 11, 2025 07:01:24Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरातील विश्राम गृहात एक कोटी 84 लाख रुपयांचे रोकड सापडल्या प्रकरणी न्यायालयाने गंभीर दखल घेत, कठोर कलम लावत, गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलेली आहे. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणांमध्ये दखल पात्र गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली. मात्र यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणी गंभीर स्वरूपाची कलम लावत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कारण्यात आली होती. त्यावरती न्यायालयाने निकाल देत आता गंभीर स्वरूपाच कलम लावून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आदेश दिल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारी वकिलांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
byte - अनिल गोटे,माजी आमदार
प्रशांत परदेशी धुळे.
4
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 11, 2025 07:00:58Parbhani, Maharashtra:
सोबत- मयताचा फोटो आणि डीआर जोडला आहे...
पूर्णा पोलीस ठाण्याचे व्हिडीओ पाठवले आहे...
अँकर- परभणीच्या झिरो फाटा परिसरात असलेल्या हायटेक रेसिडेंशीयल स्कुलच्या संस्थाचालक दाम्पत्याने स्कुल मध्ये आपली मुलगी निवासी वसतिगृहात राहत नसल्याने टीसी आणि फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीमुळे या पालकाचा मृत्यू झालाय. परभणी तालुक्यातील उखळद येथील 42 वर्षीय जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी पल्लवी ही झिरो फाटा येथील प्रभाकर चव्हाण यांच्या हायटेक रेसिडेनशियल स्कुल मध्ये निवासी होती. पण ती लहान असल्याने आई वडिलांना सोडून निवासी वसतिगृहात करमत नव्हते,त्यामुळे पल्लवीला वडील जगन्नाथराव घरी घेऊन गेले होते, काल जगन्नाथ हेंडगे परत शाळेत येऊन आपल्या मुलीची टीसी आणि ऍडव्हान्स भरलेले पैसे शाळा व्यवस्थापणाकडे परत मागत होते, अजित पवार गटाचे नेते तथा शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी हिंगोली जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण या दोघांनी पालक जगन्नाथ हेंगडे यांना बेदम मारहाण केली. यात पालक हेंगडे यांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा पूर्णा पोलीस ठाण्यात मुंजाजी हेंगडे यांच्या तक्रारी वरून दाखल झालाय, या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजलीय,परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निवासी गुरुकुल शिक्षण पद्धती निर्माण झाल्या असून अनेक शाळा पालकांची पैश्यासाठी पिळवणूक करीत असल्याचा घटना नेहमीच घडत असतात, पण ही आजची घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी असून सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे, पूर्णा पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत असून शाळा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...
7
Share
Report