Back
अकोला रस्त्याची दयनीय अवस्था: नागरिकांचा संताप!
JJJAYESH JAGAD
Jul 11, 2025 09:34:35
Akola, Maharashtra
7 फाईल्स आहेत AVBB
Anchor : अकोला जिल्ह्यातील हिवरा कोरडे ते मूर्तिजापूर रस्त्याच्या कामाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहेय..निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेय..रस्त्यावर बेफिकीरपणे टाकलेला कच्चा मुरुम आणि अपुऱ्या नियोजनामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनला आहेय..
Vo : या मार्गावरील खराब परिस्थितीमुळे मूर्तिजापूर,भातकुली,
अमरावती या मार्गावरील बससेवा मागील दोन-तीन दिवसांपासून बंद आहेय..कच्च्या मुरुमामुळे अनेक बसेस रस्त्यातच अडकल्याचे प्रकार घडले आहेत..रस्त्याच्या कामाच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅनर, फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहेय.. नागरिकांना जीव मुठीत घेऊन हा रस्ता पार करावा लागत आहेय..नागरिकांनी या गंभीर दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला आहेय..
नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण आणि नियमानुसार पूर्ण करण्याची मागणी केली असून तात्काळ पावले उचललेली नाही तर जन आंदोलन उभारण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहेय याप्रकरणी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची ही मागणी सुद्धा होत आहेय.. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होणार असल्याचे लक्षात घेता निकृष्ट दर्जाचे मुरूम व अपूर्ण कामामुळे ट्रकच्या हालचालीमुळे रस्ता अधिकच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..यामुळे भविष्यात अपघात आणि वाहतूक ठप्प होण्याचे प्रसंग टळणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जाते, या गंभीर परिस्थितीकडे मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयाचे आणि संबंधित अधिकाराचे लक्ष वेधले जात असून, कामाच्या दरम्यान एक बाजूला मार्ग खुला ठेवण्याची कायदेशीर व शासकीय जबाबदारी दुर्लक्षित करण्यात आली आहेय यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाज प्रभावित झाले असून जनतेत तीव्र नाराजी आहेय..
Byte : संदीप जळमकर, स्थानिक नागरिक.
Byte : नरेंद्र जामोदे, ग्रामस्थ..
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Waghapur, Maharashtra:
दारव्हा (प्रतिनिधी) – दारव्हा–तळेगाव या आठ किमी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने ऑटोचालक-मालक आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे बुजवून त्यात बेशरमाचे झाडे लावून प्रशासनाचा निषेध केला. अनेक तक्रारी व निवेदने देऊनही उपाययोजना न झाल्याने हा प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आला. या वेळी बिमोद मुधाने, काशीराम जाधव, प्रशांत रामटेके यांच्यासह तळेगाव, घाटकिन्ही, फुबगांव येथील नागरिक व ऑटोचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 31, 2025 13:02:09Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3108ZT_DAUNDMUMBAIHELP
BYTE 1
मुंबईत मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना दौंड तालुक्यातील आलेगाव ग्रामस्थ ठाम पाठीशी…
प्रत्येक घरातून भाकरी–चपाती आणि पाण्याच्या बाटल्या जमा करून थेट आंदोलनकर्त्यांकडे रवाना…
जोपर्यंत लढा. तोपर्यंत शिदोरी — ग्रामस्थांचा निर्धार..
ANCHOR — मुंबईत मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा क्रांती मोर्चा दौंड आणि आलेगाव ग्रामस्थ आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रत्येक घरातून चपाती भाकरी आणि पाण्याच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. आणि भरलेला एक पिकअप थेट मुंबईतील आंदोलनकर्त्यांकडे रवाना करण्यात आला.जोपर्यंत लढा, तोपर्यंत शिदोरी… सरकार आरक्षण देत नाही तोवर उपोषण थांबणार नाही. आणि तोवर आंदोलनकर्त्यांच्या अन्नाची जबाबदारी आम्ही आमच्या पद्धतीने उचलणार, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. तसेच आरक्षण का देत नाहीत? घेतल्याशिवाय राहणार नाही.असा सवालही त्यांनी सरकारला केला...
बाईट — आलेगाव ग्रामस्थ
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 31, 2025 13:01:53Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shirur Pawar Help Jarange
File:04
Rep: Hemant Chapude(SHIRUR)
Anc: शिरूर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत , पवार यांनी मुंबई मध्ये दाखल झालेल्या मराठा आंदोलकांना अन्न आणि पाण्याचा ट्रक पाठवून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा दिलाय, यावेळी बोलताना पवार यांनी सरकारने जरांगे पाटलांच्याही जीवाचा विचार करून आरक्षणावरती लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती पवार यांनी सरकारला केलीय...
Byte: अशोक पवार (माजी आमदार)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिरूर पुणे....
0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowAug 31, 2025 13:01:27Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज....
स्किप्ट ::- विघ्नहर्ता गणरायाच्या धूमधडाक्यात झालेल्या आगमनानंतर घरोघरी गौरी गणपतीचे आगमन.....
AC ::- विघ्नहर्ता गणरायाच्या धूमधडाक्यात झालेल्या आगमनानंतर घरोघरी सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.आणि या आनंदात भर घालत आता गौरी गणपतीचेही घराघरांत सोनपावलांनी आगमन झालं आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील दर्शन बिराजदार यांच्या घरातील हे गौरी-गणपतीचे दृश्य खास आकर्षण ठरत आहे. पारंपरिक पद्धतीनं गौरींची स्थापना करून भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला... घरोघरी महिलांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या तयारीनंतर आज घराघरांत उत्साह आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळतंय. गणरायाबरोबरच गौरींच्या आगमनानं सर्वत्र मंगलमय आणि जल्लोषाचा माहोल निर्माण झाला आहे.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 31, 2025 12:46:03Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवली ओबीसी समाज आक्रमक.
जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला आक्षेप...ओबीसी समाज बांधवांची कल्याण डोंबिवलीत महत्त्वाची बैठक ..
आमचे आरक्षण हिसकावून देणार नाही.. वेळ पडल्यास ५५ टक्के समाज रस्त्यावर उतरेल.. ओबीसी समाजाचा इशारा
Anc..मुंबई आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे .उपोषण आंदोलनासाठी लाखो मराठा बांधव हे मुंबईत धडकलेत . तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मनोज जरांगे यांच्या उपोषणावर तीव्र आक्षेप नोंदवले ओबीसी मधून आरक्षण देऊ नका , आम्ही आमच्या आरक्षण हिसकावु देणार नाही अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली . याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी कल्याण आजूबाजूच्या परिसरातील ओबीसी बांधवांची कल्याण मध्ये बैठक पार पडली . याबाबत बोलताना ओबीसी पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि प्रशासन जरांगेना पाठीशी घालत आहे. मराठा समाज आणि सरकारचा जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा हेतू साध्य करत आहेत. 2027 मध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ,जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला आमचा तीव्र आक्षेप आहे. एखाद्या व्यक्तीने असं उपोषण करून घटनेची पायमल्ली करून जर कोणाला आरक्षण देता येत असेल तर आमचा 52 टक्के समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आरक्षण आणि कुणाला हिसकाऊ देणार नाही सरकारने अशा प्रकारचा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील या नेत्यांनी दिला आहे
Byte : विश्वनाथ जाधव
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 31, 2025 12:45:54Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3108ZT_INDAPURRAIN
FILE 4
इंदापूर शहरासत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी...
इंदापूर आठवडे बाजारात पावसाचा फटका...
Anchor : पुणे जिल्ह्यातल्या
इंदापूर शहराने तालुक्यातल्या बऱ्याच भागात जोरदार पावसाने हजेरी लावलीय... रविवारी इंदापूरचा आठवडे बाजारात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची एकच धावाधाव उडाली... विक्रीसाठी आणलेला भाजीपाला शेतकऱ्यांना झाकून ठेवावा लागला... मात्र रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला पूर्ण भिजून मोठं नुकसान झालं आहे...
0
Report
JMJAVED MULANI
FollowAug 31, 2025 12:16:36Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3108ZT_INDAPURBHARNEMUSLI
FILE 2
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरातील श्री गणेशाची आरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते..
Anchor:- राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी निवासस्थानातील गणरायाची आरती ही तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात आली.
इंदापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम हे गुण्या गोविंदाने राहत असून हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा पॅटर्न ठरेल असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलय. यावेळी इंदापूर तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...
1
Report
SGSagar Gaikwad
FollowAug 31, 2025 12:15:36Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_Gelatin_121
नंदिनी नदीच्या किनारी स्फोटक समजल्या जाणाऱ्या जिलेटीन कांड्या आढळून आल्याने खळबळ
अँकर
नाशिकच्या नंदिनी नदीच्या किनारी स्फोटक समजल्या जाणाऱ्या जिलेटीन कांड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे..काही नागरिकांना एका गोणी मधे असलेल्या या कांड्या बघितल्यानंतर पोलिसांनी BDDS टीमला पाचारण केले.दरम्यान या कांड्या एक्सपायरी झालेल्या असल्याने धोका नसल्याचं पोलिसांनी सांगितलं असल तरी गोणीमधे कोणी या कांड्या टाकल्या याबाबत पोलीस तपास करत आहेत... याबाबत नंदिनी नदी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
1
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 31, 2025 11:47:45Malegaon, Maharashtra:
अँकर:- मालेगाव तालुक्यातील माळामाथा परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला असून कांदा, कपाशी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केला आहे मध्यरात्री आलेल्या पावसाने कंधाने ,झोडगे ,चिखल ओहोळ, शेंदुर्णी, साजवळ या गावांमध्ये मोठे नुकसान केले आहे
दरम्यान साजवळ येथे ठिकाणी विज पडून एक म्हैस ठार झाली असून अनेक ठिकाणी शेत शिवारात पाणी साचले आहे एकीकडे ढगफुटी सदृश्य पाऊस आणि दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा असंच काही चित्र नाशिकच्या ग्रामीण भागात दिसत आहे.
1
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 31, 2025 11:02:27Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_JALNA_OBC_MEETING(2 FILES)
जालना : जरांगेंचं मुंबईत उपोषण, भुजबळांचं जोरदार कमबॅक, ओबीसी नेत्यांना फोन करून बोलावली उद्या मुंबईत बैठक
भुजबळ -जरांगे पुन्हा भिडण्याची शक्यता
जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनाही भुजबळांचा फोन
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता-वाघमारे
अँकर : बऱ्याच दिवसांपासून आरक्षणावरून भुजबळ-जरांगे बंद झालेलं वाकयुध्द पुन्हा एकदा सुरु होण्याची शक्यताय.जरांगेंचं मुंबईत उपोषण सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यभरातील ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे.जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनाही भुजबळ यांनी फोन करून मुंबईत होणाऱ्या ओबीसींच्या बैठकीसाठी आमंत्रित केलंय.आता थेट ओबीसी नेते छगन भुजबळच आरक्षणाच्या लढाईत उतरल्यानं जरांगे आणि भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वार प्रतिवार होण्याची चिन्ह आहेत,दरम्यान उद्याच्या बैठकीत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दिशा ठरवली जाईल असं वाघमारे यांनी म्हटलंय.
बाईट : नवनाथ वाघमारे,ओबीसी नेते
8
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 31, 2025 10:32:37Ratnagiri, Maharashtra:
चिपळूण बाजार पेठेतील जुना स्टॅण्ड परिसरात एका इमारती समोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडाची भली मोठी फांदी एका मोटारसायकलस्वाराच्या पुढ्यात पडली. मात्र सुदैवाने ही फांदी अंगावर पडली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.. दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांनी नगर परिषदेच्या कारभारावर बोट ठेवलं आहे.. ही धोकादायक झाडं नगर पालिका आपले अधिकार वापरून का तोडत नाही, असे सवाल उपस्थित करत अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत..
3
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 31, 2025 10:31:34Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Police Aaropi Firing
File:05
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
शिक्रापूरमध्ये पोलिसांवर हल्ला; पोलिसांच्या फायरिंगमध्ये आरोपी ठार
सातारा शहर पोलीस स्टेशनची टीम शिक्रापूर परिसरात कारवाईसाठी गेली.
आरोपी लखन भोसले (क्रिमिनल ऑन रेकॉर्ड) याच्यावर साताऱ्यात 304 कलम 2 अंतर्गत गुन्हा दाखल.
तो मूळचा सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील आहे तो फरार होता
शोध मोहिमेदरम्यान आरोपी घराजवळ मिळाला आणि त्याने पोलिसांवर चाकूने हल्ला केला.
हल्ल्यात सुजित भोसले व तुषार भोसले हे पोलीस कर्मचारी जखमी; दवाखान्यात उपचार सुरू, प्रकृती स्थिर.
स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी फायरिंग केले; आरोपी लखन भोसले गंभीर जखमी.
त्याला प्रथम सूर्या हॉस्पिटल, नंतर ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर येथे हलविले.
कारवाईदरम्यान आरोपीसोबत त्याचा नातेवाईक गुलाब भोसले उपस्थित; त्याच्यावरही पुण्यात गुन्हा दाखल.
लखन भोसलेवर 34 गुन्हे नोंदवलेले, बहुतेक पुणे जिल्ह्यात व काही शेजारील जिल्ह्यांत.
2022 सालीदेखील त्याला पोलीस स्टेशन बाहेरून ताब्यात घेण्यात आले होते.
घटनेबाबत आरोपीच्या घरच्यांकडून किंवा नातेवाईकांकडून पोलिसांवर कोणताही आरोप नाही.
Byte: संदिपसिंह गिल (पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण)
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे...
9
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 31, 2025 10:19:52Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_JALNA_ANTARWALI(3 FILES)
जालना : ब्रेकिंग |अंतरवाली सराटी येथील ओबीसी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
ओबीसी आरक्षण बचावासाठी उद्यापासून अंतरवाली सराटीतील सोनियानगर येथे होणार होतं ओबीसींचं उपोषण
अंतरवाली सराटी येथे बाबासाहेब बटुळे यांच्यासह आणखी काही आंदोलक करणार होते उपोषण
आंदोलन स्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात
अँकर : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील ओबीसींच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीये.. अंतरवाली सराटी येथील सोनिया नगर येथे उद्यापासून ओबीसींचं आमरण उपोषण सुरु करण्यात येणार होतं. जरांगे यांच्या मागील अंतरवालीतील आमरण उपोषणावेळी याच ठिकाणी ओबीसींनी आंदोलन केलं होतं.. मात्र यावेळी पोलिसांनी इथल्या आंदोलनाची परवानगी नाकारली असून दुसरीकडे आंदोलन करावे अशी विनंती आंदोलकांना केलीये. तसेच या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. ओबीसी कार्यकर्ते बाबासाहेब बटुळे यांच्यासह आणखी काही आंदोलक उद्यापासून उपोषणाला बसणार होते.मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी हे आंदोलन करण्यात येणार होतं. त्यामुळं उद्या ओबीसी आंदोलक काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.
8
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 31, 2025 10:16:05Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3108ZT_JALNA_WAGHMARE(2 FILES)
जालना : ब्रेकिंग|
जरांगेंची चड्डी पिवळी कशामुळे झाली होती त्याची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करा
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी
जरांगे ज्या गोदडीवर बसून उपोषण करतायत त्या गोदडीला खिसे आहेत त्या खिशात काजू,बदाम आणि पाणी
गोदडीत झोपून तो काजू काढून खातो
जरांगेने उपोषण केलेले नाही, उपोषण ही त्यांची नौटंकी
जरांगेवर उच्च न्यायालयाने कारवाई करावी,त्याला बिन भाड्याच्या खोलीत टाका
जरांगेवर कारवाई करायला सरकार का घाबरतय.?
वाघमारे यांचा सवाल
अँकर :जरांगेंची चड्डी पिवळी कशामुळे झाली होती त्याची सरकारी डॉक्टरांकडून तपासणी करा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल अशी टिका जरांगे यांच्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलीय.
जरांगे ज्या गोदडीवर बसून उपोषण करतायत त्या गोदडीला खिसे आहेत. त्या खिशात काजू,बदाम आणि पाणी असून जरांगे गोदडीत राहून काजू बदाम खाऊन पाणी पितो, त्याने कोणतेही उपोषण केलेले नाही,तो धडाधड बोलतो असा वार देखील वाघमारे यांनी केलाय.जरांगे न्यायालयाने घालून दिलेले नियम मोडत असून त्याच्यावर उच्च न्यायालयाने कारवाई करून त्याला बिन भाड्याच्या खोलीत टाका अशी मागणी देखील वाघमारे यांनी केलीय.
बाईट : नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
1
Report
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ, दि. ३१ ऑगस्ट –
पुसद शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून २ किलो १७६ ग्रॅम गांजा जप्त केला असून गुलजमान ऊर्फ भु-या खान (४५), शेख फिरोज कुरेशी (४५) आणि सैफअली खान (२६) यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पल्सर मोटारसायकल, मोबाईलसह एकूण १.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
9
Report