Back
नेवाळी पाईपलाईन रस्त्याची दुरावस्था: खड्डे की खड्ड्यात रस्ते?
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 10, 2025 01:30:50
Ambernath, Maharashtra
नेवाळी पाईपलाईन रस्त्याची दुरावस्था
नेवाळी नाका ते डवळ पाडा रस्त्याची झाली अक्षरशः चाळण
Amb road potholes
Anchor कल्याण कर्जत महामार्गावरील पाईपलाईन रस्त्यावरील नेवाळी नाका ते डवळपाडा पर्यत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे . या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे , या खड्ड्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे , या महामार्गावर 90 टक्के सिमेंट काँक्रीटकारण झालं असले तरी अजून या भागात अजूनही कॉम्प्युटर बाकी आहे . त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे .
चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 09:35:54Parbhani, Maharashtra:
अँकर- गाय गोठा योजना आणि मागेल त्याला विहीर या योजनेतील सिंचन विहिरीचे बिल 2021 पासून निघाले नाहीत,म्हणून परभणी जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोंसीकर यांच्या दालनात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलय,परभणी जिल्ह्यात विहिर न करताच हे अधिकारी विहिरीचे बिल अदा करीत असतांना ज्या शेतकऱ्यांनी खरोखर विहिरी तयार केल्या आहेत,त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत,त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना विहिरीचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन माघे न घेण्याचा पवित्रा या शेतकर्यांनी घेतलाय,
बाईट- किशोर ढगे- जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
1
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 10, 2025 09:32:53Pandharpur, Maharashtra:
10072025
slug - PPR_SANTPADUKA_GOD
feed on 2c
file 02
------
Anchor - गुरुपौर्णिमे निमित्त विठ्ठल मंदिरात पार पडला संत - देव भेटीचा अनुपम्य सोहळा , सर्व दहा मानाच्या संत पादुकांची विठ्ठल मंदिरात झाली लाडक्या विठुरायाशी भेट वर्षभराची ऊर्जा घेऊन आज पालखी सोहळ्यानी ठेवले परतीसाठी प्रस्थान
आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलाचे अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची आज देवाच्या समचरणाशी भेट झाली . देव आणि संत भेटीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी पालखी सोहळ्यातील शेकडो भाविकांनी आज मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती . आषाढी साठी आलेल्या संत निवृत्तीनाथ , संत सोपानकाका , संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत मुक्ताबाइ , संत नामदेव , संत एकनाथ या सात पालखी सोहळ्यांना वारकरी संप्रदाय , मानाच्या पालख्या म्हणून ओळखतो . याशिवाय शासनाने संत निळोबाराय , संत चांगा वटेश्वर आणि रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यालाही मानाचा पालखी सोहळा घोषित केल्याने आता दहा मानाच्या पालख्या झाल्या आहेत .
हे सर्व संत वर्षात फक्त एकदाच आषाढ पोर्णिमेला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात . वारकरी सांप्रदायात या संत - देव भेटीला फार महत्व असते . ज्या संतांचा जयजयकार सांप्रदाय आयुष्यभर करीत असतो त्या संतांची आज आपल्या लाडक्या विठुरायाशी भेट होत असते .
विठ्ठल सभामंडपात हरिनामाच्या जयघोषात मग या पादुकांना देवाच्या भेटीसाठी गाभाऱ्यात घेऊन जाण्यात आले . येथे संतांच्या पादुका देवाच्या सम चरणाजवळ ठेवत देवाची आणि संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा संपन्न झाला . मंदिराच्या वतीने गाभाऱ्यात प्रत्येक संतांच्या पादुका घेऊन आलेल्या मानकऱ्यांना उपरणे आणि मानाचा नारळ भेट म्हणून देण्यात आला . यानंतर हे सर्व पालखी सोहळे आपल्या मठात पोचले .
आज सर्वच पालख्या पंढरपूर मधून त्यांच्या गावी प्रस्थान ठेवतात
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 09:30:21Latur, Maharashtra:
बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस.... उदगीर तालुक्यात घोटाळा उघडकीस... अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने ९० फेक सर्टिफिकेट...अनुदान, शिष्यवृत्ती, साहित्य... योजनांचा गैरवापर... तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी उदगीर )
बाईट::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी उदगीर)
बाईट::- प्रविण सुरडकर ( गटविकास अधिकारी उदगीर )
P2C::- वैभव बालकुंदे रिपोर्टर लातूर
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 10, 2025 09:05:55Nagpur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडले आहे
---------------*
नागपूर
- नागपूर कामठी ते न्यू कामठी दरम्यान उड्डाण पुलाचा बांधकाम करण्यात येत आहे.. मात्र धक्कादायक बाब म्हणजे बांधकाम सुरू असतानाच नागपुरात रविवारी झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...
- कामठी ते न्यू कामठी जोडणारा उड्डाण पुलाच उदघाटन होण्यापूर्वी अजूनही बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाच्या वर ररस्त्यावर खड्डे पडणारी घटना अनेक प्रश्न उपस्थित करून जात आहे..
- या उड्डाण पुलाचा बांधकामाचा दर्जा बाबत प्रश्न आहेच... शिवाय नागरिकांच्या जीवाशी खेळ तर नाही ना असा प्रश्न समोर येतोय...
- सोशल मोडीयावर खड्डे पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डागडूगीचे करण्यात आली .. या
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 10, 2025 09:04:38Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट मध्ये पोलिसांचा विशेष बंदोबस्त
- अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात भाविकांची पहाटेपासून गर्दी..
- स्वामी महाराजांचे 22 तास दर्शन आज राहणार सुरू
- अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात भाविकांच्या दर्शनाची विशेष सोय..
- अक्कलकोट शहरात अनेक ठिकाणी पोलीस मदत केंद्राची उभारणी
- स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुषांची करण्यात आली वेगळी रांग..
- अक्कलकोट शहर पोलीस प्रशासनाकडून सहा पोलीस अधिकारी, दीडशे पोलीस कर्मचारी, एक एसआरपी तुकडी ही तैनात करण्यात आली आहे..
- भाविकांच्या पार्किंग साठी अक्कलकोट शहरात नियोजित जागा..
Byte : राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अक्कलकोट
4
Share
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 10, 2025 09:03:13Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- बनावट निविदा प्रकरणी गुन्हा दाखल
फीड 2C
Anchor
अहिल्यानगर येथे ग्रामविकास मंत्रालयाच्या नावे बनावट शासन आदेश काढण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता...दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे...अक्षय चिर्के नावाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे...संबंधित ठेकेदाराने बनावट शासन आदेश दाखवत त्या आधारे वाकोडी, बुऱ्हाणनगर, देऊळगाव सिद्धी, कामरगाव, चास, बाबुर्डी बेंद या नगर तालुक्यातील गावांतील कामांची पाहणी करण्याची मागणी चव्हाण यांच्याकडे केली त्यानुसार या कामांची अंदाजपत्रके बनवून नंतर कामांच्या निविदा मागवण्यात आल्या...यातील ५ कोटी ९५ लाख रुपये किमतीच्या ३३ विकासकामांना कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यारंभ आदेश दिला... ही सर्व कामे ठेकेदार चिर्के यानेच घेतली...चिर्के यांनी घेतलेल्या कामांपैकी १३ कामे पूर्ण झाली... त्यातील आठ कामांचे मोजमाप घेऊन बांधकाम विभागाने ४० लाखांच्या निधीची मागणी ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली मात्र या निधीस मंत्रालयाने मंजुरी दिली नाही आणि हा शासन आदेशच बनावट असल्याचे मंत्रालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले...तसेच ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश ४ एप्रिलला देण्यात आले... त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी २० कामे रद्द केल्या... उर्वरित ३३ कामांचीही ग्रामविकास मंत्रालय देयके दिली नाहीत... या संपूर्ण प्रकरणात अक्षय चिर्के आणि इतरांनी शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे...ठेकेदाराने आदेश दाखविल्यानंतर बांधकाम विभागाने इतक्या घाईघाईने निविदाप्रकिया पूर्ण कशी केली आणि एकाच ठेकेराच्या निविदा कशा मंजूर झाल्या असा प्रश्नही यात निर्माण झाला आहे.
बाईट:- अमोल भारती, पोलीस उपाधीक्षक
3
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 10, 2025 09:03:01Raigad, Maharashtra:
फीड मध्ये वाढदिवस कार्यक्रमाचे फोटो आणि अनिकेत तटकरे यांचा बाईट आहे.
स्लग - अखेर तटकरे कुटुंबीयांचे मनोमिलन ......
सुनील तटकरे यांच्या वाढदिवशी कुटुंबीय एकत्र ......
भाऊ अनिल तटकरे पुतण्या अवधूत तटकरे यांची उपस्थिती ...... तटकरे कुटुंबियात रंगली आनंदाची मैफिल ......
अँकर - राजकारणात मागील बारा वर्षांपासून तटकरे कुटुंबीयांत निर्माण झालेला दुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त दूर झाल्याचे पहायला मिळाले. एकेकाळी एकत्र असणारे तटकरे कुटूंब राजकीय मतभेदां मुळे एकमेकांचे राजकीय वैरी बनले होते माजी आमदार आणि सुनील तटकरेंचे मोठे बंधू अनिल तटकरे यांनी वेगळी चूल मांडली तर माजी आमदार आणि पुतणे अवधूत तटकरे यांनी शिवसेना व नंतर भाजप मध्ये पक्षप्रवेश केल्याने अधिकच दुरी वाढली होती बारा वर्षांत दोन्ही कुटुंबाचा संपर्क तुटला होता. मात्र सुनील तटकरे यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्ताने हे सर्व कुटुंबीय एकत्र आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी देखील कुटुंबीयांचे स्वागत केले आणि मग रंगली ती आनंदाची मैफिल.
बाईट - अनिकेत तटकरे, माजी आमदार
1
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 09:01:18Parbhani, Maharashtra:
अँकर -हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीचं काम सध्या सुरू आहे. आज वसमत तालुक्यातील जवळा बुद्रुक या गावातील शिवारात मोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे पथक पोचले होते. परंतु या गावच्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत मोजणीला विरोध केला आहे. या शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करीत शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय. आमच्या वडिलांची वारसा हक्काने कमावलेली ही जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणफ नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय.
बाईट -विजयमाला उघडे -शेतकरी महिला
2
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 10, 2025 08:35:35Kolhapur, Maharashtra:
Kop Shaktipith Virodhi Andolan
Feed:- 2C
Anc:- शक्तिपीठ महामार्ग विरोधात सत्ताधारी नेते देखील रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज मध्ये भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील यांनी थेट शक्तिपीठ विरोधी आंदोलनात सहभाग नोंदवत शक्तिपीठ विरोधात भूमिका मांडली आहे.. चंदगडचे स्थानिक आमदार शिवाजी पाटील यांचा समाचार घेत सरकारवर जोरदार टीका केलीय.. संपूर्ण महाराष्ट्रात शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असताना हा महामार्ग चंदगड मधून नेण्याचा घाट कशाला घातला जातोय असा संतप्त सवाल विचारण्यात आलाय.. गडहिंग्लज मध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने आज शक्तीपीठ विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती..
Play Sound Byte:- संग्रामसिह कुपेकर, नेते भाजप
Play Sound Byte :- राजेश पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार
1
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 10, 2025 08:33:21Nagpur, Maharashtra:
Ngp Flood Loss ( नुकसान झालेल्या लोकांचा चौपाल पाठवला आहे.... काही shots पण पाठवले आहे )
लाईव्ह u ने फीड पाठवले
( काल त्या परिसरात पावसाचे पाणी कसे घुसले होते त्याचे shots 2c ला जोडले आहे )
----------------
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुर शहरातील अनेक भागात ग्राम मध्ये पाणी घुसले होते... पूर्व नागपूर यातील सूर्य नगर येथे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते.... सिमेंट रस्ता झाल्यानंतर पाणी जाण्यासाठी मार्ग न ठेवल्याने घरामध्ये पाणी घुसत असल्याचे तक्रारी स्थानिक सूर्य नगर मधील रहिवाशांनी केले आहे.... प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी देऊनही ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे... त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
बाईट
नुकसान झालेल्या लोकांसोबत केलेल्या चौपाल वापरता येईल
4
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 10, 2025 08:03:49Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - मी महाराष्ट्रातील पंजाबी,मी मराठीतच बोलतो,सरदारजीने झळकवले मिरज शहरात डिजिटल फलक..
अँकर - राज्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरू असताना,सांगलीच्या मिरजेमध्ये एका पंजाबी व्यक्तीने अनोख्या पद्धतीने मराठी भाषेवरील आपलं प्रेम दाखवला आहे. शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये मिरजेत गेल्या 1970 पासून राहणाऱ्या दलजीतसिंग रामगाडिया यांनी,मी महाराष्ट्रात राहणारा पंजाबी,मी मराठीतच बोलतो,अशा आशियाचे बोर्ड झळकवत,महाराष्ट्राबद्दलचे आणि मराठी भाषे बद्दलचे प्रेम सरकारला दाखवून देत, मराठी भाषे विषयी अभिमान असल्याचा संदेश दिला आहे.त्यामुळे दलजीतसिंग रामगाडिया,या पंजाबी नागरिकांचा मिरजकरांनी भरभरून कौतुक केली आहे.
बाईट - दलजीतसिंग रामगाडीया - ( पंजाबी ) मिरज.
8
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 10, 2025 08:01:27Kolhapur, Maharashtra:
Kop gurupournima art flower
Anc :- गुरुपौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील कला शिक्षकाने चाफ्याच्या फुलावर गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांचे चित्र रेखाटले आहे. योगेश मोरे यांनी फुलांच्या लहान पाकळ्यावर रेखाटण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली कला सगळ्या वेगळ्या रूपात सादरीकरण करून गुरुदक्षिणा देण्याचा हा प्रयत्न या कलाशिक्षकाने केला आहे.
2
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 10, 2025 08:00:33Pune, Maharashtra:
hinjwadi issue
kailas puri pune 10-7-25
feed by 2c
Anchor - .... हिंजवडीच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. मात्र या बैठकीला हिंजवडी मधील अनेक संघटनांना बोलावलं नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हिंजवडीच्या प्रश्नाबाबत गेली कित्येक वर्ष आम्ही आवाज उठवत असतानाही आम्हाला याबाबत विचारणा केली नसल्याचं संघटनांनी म्हटलं.
बाईट - पदमजीत माने, फोरम ऑफ हिंजवडी आयटी इंडस्ट्री
2
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 10, 2025 07:38:16Buldhana, Maharashtra:
आमदार गायकवाडांना बुलढाणा रुग्णालयातील अस्वच्छतेचा दणका; तातडीने कचरा हटवला!
Anchor : काल मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये नासलेल्या डाळीवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातला होता. या प्रकारानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, आता आमदार गायकवाड यांना त्यांच्याच मतदारसंघातील, बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेवरून चांगलाच दणका बसला आहे. या घटनेनंतर तातडीने रुग्णालयाच्या परिसरात साचलेला कचरा उचलण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांच्या डाळीवरून केलेल्या आंदोलनानंतर, अनेकांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघातील आरोग्य सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. विशेषतः, बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागून मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला होता, ज्यामुळे रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. या अस्वच्छतेच्या परिस्थितीवर झी २४ तासने आवाज उचलल्यानंतर, प्रशासनाला या गंभीर समस्येची दखल घ्यावी लागली. आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या बाजूला वर्षानुवर्षे पडून असलेला हा कचरा आता तातडीने उचलण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांच्या डाळीवरील आक्रमक भूमिकेनंतर, त्यांना त्यांच्याच मतदारसंघातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींनी केवळ प्रशासकीय त्रुटींवर आवाज उठवण्याऐवजी, आपल्या मतदारसंघातील समस्यांवरही लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तर या ठिकाणाहून सदर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी...
Wkt - मयूर निकम, प्रतिनिधी
14
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 07:37:47Latur, Maharashtra:
लातूर PKG...
स्किप्ट ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस.... उदगीर तालुक्यात घोटाळा उघडकीस... अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने ९० फेक सर्टिफिकेट...अनुदान, शिष्यवृत्ती, साहित्य... योजनांचा गैरवापर... तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
AC ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे... शासनाकडून कामगारांना मिळणाऱ्या सवलती, शिष्यवृत्ती आणि अनुदान यांचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल ९० बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व नोंदणी एका अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने करण्यात आली होती.
VO 01 ::- उदगीर तालुक्यातील तोंडात गावच्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या 'वंजारवाडी हे नाव आहे. जरी हे गाव असल तरी ति ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही. पण तरीही या नावाने बनावट शिक्के, खोट्या सह्या आणि लेटरपॅड वापरून कामगार नोंदणी प्रमाणपत्रं तयार करण्यात आलं आहे. याच आधारावर अर्जदारांनी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्ती, साहित्य, अनुदान आणि शैक्षणिक सवलती मिळवल्या. याबाबतच्या तक्रारी वाढत असल्याने संपूर्ण चौकशी नांदेडचे सहायक कामगार आयुक्त यास्मीन शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि यामध्ये फक्त एका गावात जवळपास ९० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे बनावट असल्याचं स्पष्ट झालं . या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात एजंट, बांधकाम ठेकेदार आणि मल्टिसर्व्हिस चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी )
VO 02 ::- बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत झालेल्या या ९० बोगस बांधकाम कामगारांमध्ये, अनेक जण प्रत्यक्षात शेतकरी होते, काहीजण खासगी नोकरी करणारे होते, तर काहींचा बांधकाम व्यवसायाशी काहीही संबंध नव्हता. यांनी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्ती, बांधकाम साहित्य, रोख रक्कम, भांडी आणि शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेतला. या अर्जांसोबत जोडण्यात आलेली प्रमाणपत्रं, ग्रामपंचायतीची शिफारस पत्रं, शिक्के आणि सह्या – सगळं वंजारवाडी नावाच्या बनावट ग्रामपंचायतीच्या नावाने तयार करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही वंजारवाडी नावाची ग्रामपंचायत प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. या सगळ्या बनावट कागदपत्रांची पडताळणी आता उदगीरच्या गटविकास अधिकाऱ्याच्या मार्फत करण्यात आली आहे.आणि यामध्ये तब्बल ९० प्रमाणपत्रं खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी )
बाईट ::- गटविकास अधिकारी उदगीर..
VO 03 ::- या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती केवळ उदगीर तालुक्यापुरती नसून, राज्यभर अशा बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचं जाळं पसरलेलं असण्याची शक्यता आहे. कामगार विभागाकडून राज्यस्तरावर तपासाचे संकेत मिळत असून, हा फक्त बनावट कागदपत्रांचा खेळ नाही. हे एका संगठित रॅकेटचं स्वरूप घेऊ शकतं.पुढे तपासात काय उलगडतंय, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे...
............
वैभव बालकुंदे
ZEE मिडिया लातूर
13
Share
Report