Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

बेलखेडा गावात २७व्या वर्षी मानाची पालखी, भक्तांचा उत्साह अद्भुत!

GMGANESH MOHALE
Aug 11, 2025 04:15:55
Washim, Maharashtra
वाशिम: File:1108ZT_WSM_SHRI_PALKHI रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बेलखेडा गावातून श्रावण महिन्यात भक्तिमय वातावरणात शेगावकडे जाणाऱ्या पायदळ दिंडीतील मानाची पालखीचं यंदा २७व्या वर्ष आहे.गावातील हनुमान मंदिराजवळ आरती करून आणि संपूर्ण गावाची प्रदक्षिणा घालून संत गजानन महाराजांच्या पालखीला पारंपरिक पद्धतीने प्रस्थान देण्यात आले.या मानाच्या पालखीत गावकऱ्यांचा अपार श्रद्धा व भक्तिभाव दिसून आला.यामध्ये केवळ बेलखेडाच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमधील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.यंदाच्या दिंडीत नवतरुणांचा उत्साह लक्षणीय होता. महिला व पुरुष भक्तांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे स्वागत केले.
14
comment
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Aug 11, 2025 07:03:59
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1108ZT_INDAPURGADI FILE 5 इंदापुरात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात...... पुणे सोलापूर महामार्गावर हिंगणगावात आमदार महेश लांडगेंच्या उपस्थितीत केला जाणार रस्ता रोको..... यवत घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस खातं अलर्ट..... Anchor_ इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधीस्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आजपुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. शिवचरित्रकार अनिल महाराज देवळे आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत हा रास्ता रोको केला जाणार आहे. तत्पूर्वीच इंदापूर पोलिसांनी वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील काही अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सात ऑगस्ट रोजी या गढी परिसरात असणाऱ्या अतिक्रमणधारक 14 व्यक्तींना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. स्वतःहून अतिक्रमण धारकांनी आपापले अतिक्रमण काढावीत असा आदेश तहसीलदार जीवन बनसोडे यांनी पारित केला होता.मात्र अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे काढून न घेतल्याने तहसीलदार जीवन बनसोडे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या उपस्थितीत सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणावर आता प्रशासनानं हातोडा चालवलेला आहे.
0
comment
Report
SKSudarshan Khillare
Aug 11, 2025 07:03:19
Yeola, Maharashtra:
अँकर:- श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी अंकाई डोंगरावर भक्तीचा महापूर उसळला. पहाटेपासूनच ‘ॐ नमः शिवाय’च्या घोषात वातावरण दुमदुमले आणि भाविकांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. अगस्ती मुनींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे यावेळेस बघण्यास मिळाली . याच अनकाई डोंगराला महादेवाच्या पिंडीचा आकार असून पावसामुळे डोंगर परिसर हिरवाईने नटला असून, थंडगार वाऱ्यात भाविकांना चढाईचा आनंद द्विगुणित झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावी येथे येत असतात.
0
comment
Report
SKSACHIN KASABE
Aug 11, 2025 07:02:03
Pandharpur, Maharashtra:
11082025 Slug - PPR_PUJA_BYTE file 05 ------ Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या तुळशी अर्चन पूजा या मराठी मध्ये होत असल्याचे मत या पूजे मध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी व्यक्त केले आहे. जे मंत्र श्लोक संस्कृत मध्ये आहेत ते त्याच भाषेत उच्चार केले जातात. हिंदीचा वापर होत नाही असा दावा आता भाविकांनी केला आहे. राहुल सातपुते या भाविकाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये पूजेसाठी हिंदीचा वापर अशी एक्स माध्यमावर आपले मत मांडल्यानंतर हा मुद्दा समोर आला होता. मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून ही याबाबत खुलासा करण्यात आला आहे. --- byte - भाविक
0
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 11, 2025 06:46:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
अंबादास दानवे PC ऑन आंदोलन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 36 जिल्ह्यात आंदोलन होत आहे. कलंकित आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री पायउतार व्हावे यासाठी आंदोलन आहे. या मंत्र्याची लाज वाटते ,एकीकडे कलंकित मंत्री असून हतबल मुख्यमंत्री आहेत. ऑन दिल्ली विरोधक आंदोलन परवानगी का द्यावी नाही, म्हणजे सरकार घाबरते, भाजपचे लोक विनापरवाना रस्त्यावर धिंगाणा करत आहे, आणि दुसरीकडे हे... ऑन उपराष्ट्रपती सुरळीत कामकाज करत होते,अचानक त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा संशयास्पद वाटते, त्यांनी भूमिका कुठे जाहीर करू नयेत, त्यामुळे त्यांना ठेवले असावे, अशी शंका शिवसेना उपस्थित करत आहे. ऑन मोहन भागवत रुग्णालयात सहज दोन लाख बिल होतात, पण सर्वसामान्य व्यक्तीची आर्थिक परिस्थिती नाही, शिक्षणाची तशीच अवस्था आहे, मुलाला तीस हजार पैसे कसे भरणार, हे उद्योगपती यांना सवलती मिळते, पण शिक्षणासाठी पैसे नाही ऑन संजय गायकवाड पाहिले नाही, एखाद्या कार्यक्रमात पोस्टर लावले नसतील पण पुढे काय करणार, कलंकित लोक आहे ते काही करणार नाही ओन बंब आरोप चौकशी करावी,काही हरकत नाही, आणि ते नाव विसरतील असे मलाही वाटत नाही पण जाहीर करण्याची हे वेळ नसावी म्हणून त्यांनी जाहीर केले नसावे असे मला वाटते.... ऑन निवडणूक आयोग नाव वगळले सत्य आहे, आम्ही फिल्डवर काम करतो, वर्षोनुवर्षे काम करणाऱ्या लोकांचे नाव कमी झाल्याचे आम्ही पाहिले, निवडणूक काळात आशा अनेक तक्रारी आहेत, लोकसभेत मतदान करणाऱ्या लोकांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता आला नाही ऑन पक्षप्रवेश सांगलीत शिवसेना मोठा नेता नाही, एखादा गावाचा सरपंच आला तरी ढोल वाजवत भाजप स्वागत करत आहे, त्यांच्याच पक्षात त्यांच्या लोकांना जागा नाही... ऑन शरद पवार हाके टीका शरद पवार मोठे नेते मानले पाहिजे, महिला आरक्षण ,विद्यापीठ नामांतर असे अनेक विषय आहे, पक्षाचे नुकसान होत असताना देखील त्यांनी निर्णय घेतले, कुणाला एकच दिसत असेल, हाके यांना ओबीसी नाटकी पध्दतीने दिसतात ऑन मनोज जरांगे फडणवीस आरोप मला वाटतं नाही, मराठा समाज स्वतःच निर्णय घेऊ शकतात, उचका उचकीला मराठा समाज जाणार नाही, कुणाच्या भूलथापांना न पडता ,दंगली भडकवणे बाबत खबरदारी घ्यावी ऑन कबुतर खाना एकीकडे अहिंसा सांगायचं, मग शस्त्र का उचलणार ,शस्त्र कोण उचलणार हे सांगावे,, आरोग्य प्रश्न निर्माण झाले, त्या भागातील लोकांचे तक्रारी आहे, आपल्या बंगल्यात खबुतूर ठेवावे ऑन राहुल गांधी कर्नाटक नोटीस राहुल गांधी यांनी कर्नाटक उदाहरण दिले आहे, राहुल गांधी यांनी एक मतदारसंघ निवडून उत्तर द्यावे, असे झाले यांनी सांगावे ,  यात नोटीस द्यायची गरज नव्हती..  आणि बिहार मध्ये जे  उत्तर निवडणूक आयोगाने दिले मान्य  बंधनकारक नाही असे कायद्याने सांगणे ठीक आहे, पण, नाव गाळले असल्यास तसे पत्र लावावे.. ऑन लष्कर प्रमुख वक्तव्य मला वाटत नाही, जे युद्ध करायचे होते, त्यातून माघार घेतली. पाकिस्तान विरुद्ध कुठे युद्ध लढले. एकनाथ शिंदे असे गेले जसे एच एके 47 घेऊन गेले होते, त्यांचं लवकरच ऑपरेशन होईल असे वाटते आणि भाजपसोबत...
3
comment
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 11, 2025 05:48:48
Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग. बांधकाम मंत्रांच्या दौऱ्यानंतरही मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील विजेची समस्या कायम.... बोगद्यामधील वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे वाहन चालकांना अंधारातून करावा लागत आहे प्रवास... बोगद्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे वाहन चालकांना येत आहेत अडचणी. बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही महामार्गाचे समस्या कायम. कशेडी बोगद्यातील विजेच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज. अंधारातून प्रवास करताना वाहन चालकांना अपघाताची भीती.
13
comment
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 11, 2025 05:48:32
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या दारव्हा येथे महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या ३४ वर्षीय महिलेला दारव्हा-बागवाडी मार्गावरील एका ले-आउटमध्ये नेऊन पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी काल पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. एक आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. पीडिता घटनेच्या दिवशी बहिणी कडून घरी परत येत असताना आरोपींनी तिला रस्त्यात गाठले व ले-आउटवर नेऊन अत्याचार केला. पीडितेच्या बहिणीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
14
comment
Report
AKAMAR KANE
Aug 11, 2025 05:47:55
kolhapur, Maharashtra:
Ngp BIke Dead Body 121 live u ने फीड पाठवले ------**----- व्हिडिओ सकाळी पाठवला आहे --- नागपूर बाईकवर पत्नीचा व्हिडिओ घेऊन जाणा-या पतीचा मन पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता... याबाबत बाईक चालवणाऱ्या पती अमित यादवने या घटनेबाबत झी मीडियाला माहिती दिली.. नागपूर जबलपूर महामार्गावर देवलापार येथे झालेल्या अपघातात पत्नीचा मृतदेह बाईकवर घेऊन जाण्याची वेळ त्याच्यावर का पतीवर आली? अपघात झाल्यानंतर पती अमित यादवला काहीही सुचले नसल्याचे अमित यादव ने सांगितले. हायवे असल्याने वाहतूक सुरू होती मात्र पावसामुळे केवळ मोठे वाहने धावत होती ती मदतीसाठी कोणतेही वाहन थांबले नसल्याचे अमित यादव ने सांगितले. ---- बाईट- अमित यादव,पती(121 केलाय) नागपूर अँकर- नागपूर जबलपूर महामार्गावर देवलापार येथे झालेल्या अपघातात पत्नीचा मृतदेह बाईकवर घेऊन जाण्याची वेळ पतीवर आली. अपघात झाल्यानंतर पती अमित यादवला काहीही सुचले नसल्याचे अमित यादव ने सांगितले. हायवे असल्याने वाहतूक सुरू होती मात्र मदतीसाठी कोणतेही वाहन थांबले नसल्याचे अमित यादव ने सांगितले. बाईट- अमित यादव,पती
14
comment
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 11, 2025 05:35:29
Ratnagiri, Maharashtra:
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचं आयोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे ३.३० वाजता खुलं केलं जाणार आहे. अंगारकी यात्रोत्सवानिमित्त प्रारंभी मुख्य पुजारी अभिजित घनवटकर यांच्या हस्ते 'श्रीं'ची पूजा अर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. पहाटे ३:३० ते रात्री १०:३० पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. या अंगारकी चतुर्थीचा योग पवित्र श्रावण महिन्यात जुळून आल्याने स्वयंभू 'श्रीं'च्या दर्शनासाठी घाटमाथ्यावरील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यांतून सुमारे ५० ते ६० हजार भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.. दरम्यान सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल, गणपतीपुळे खारभूमी मैदान येथे भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे..
14
comment
Report
VKVISHAL KAROLE
Aug 11, 2025 05:33:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn ubt prtst preparation wkt Feed by live u छत्रपती संभाजी नगर मध्ये उद्धव ठाकरे सेनेच्या गटाकडून आज राज्यातील आरोप असलेल्या मंत्र्यांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे , यासाठी क्रांती चौकात एक स्टेज उभारण्यात आले आणि तिथं मला लाज वाटते या आशयाचे फलक लावण्यात आलेले आहे आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
12
comment
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 11, 2025 05:02:21
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या पांढरकवडा येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटणबोरी इथल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 31 जुगार यांना अटक केली आहे. पाटणबोरीच्या जॅकपॉट रेस्टॉरंट आणि बियर बार मधील कॉल सिटी सोशल क्लब येथे हा जुगार सुरू होता. येथील जुगारांपैकी 29 जुगारी हे तेलंगानातील आहेत. पाटण परिसरात सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यांना पोलीस व लोकप्रतिनिधींकडून अभय मिळत असल्याने कारवाईनंतर पुन्हा हे अड्डे सुरू होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
14
comment
Report
SKSACHIN KASABE
Aug 11, 2025 04:47:16
Pandharpur, Maharashtra:
पीक पाणी 11082025 Slug - PPR_CEREAL_CROP file 02 ------ Anchor - पंढरपूर तालुक्यात ऊसा सारखी नगदी पिके तसेच द्राक्ष डाळिंब केळी अशा फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. एक बागायती तालुका म्हणून जिल्ह्यात याची ओळख आहे. वर्षभर काळजी घेऊन उत्पादन घेण्यापेक्षा आता कमी कालावधीची पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. यामुळे पंढरपूर तालुक्यात यावर्षी प्रथमच साडेसहा हजार हेक्टर वर विविध कड धान्याची खरीप हंगामात लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 2 हजार 400 एकरावर उडीद लागवड आहे. तीन महिन्यात येणारे पिक असून सध्या याला दर सुद्धा समाधानकारक आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. सोबत तूर, मूग, सोयाबीन ,भुईमूग लागवड सुद्धा वाढली आहे. --- Wkt - सचिन कसबे पंढरपूर
14
comment
Report
GMGANESH MOHALE
Aug 11, 2025 04:32:22
Washim, Maharashtra:
वाशिम: File:1108ZT_WSM_VEGETABLE_PRICE रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशीम अँकर:वाशिम भाजीबाजारात लिलावा मध्ये शेतकऱ्यांचा कष्टाने पिकवलेला भाजीपाला कमी दराने विकला गेला.भेंडी, बटाटा, पानकोबी,शेवगा यांसह इतर भाजीपाल्याला किलोमागे केवळ १२ ते १५ रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. पावसाचे अनिश्चित वातावरण,वाढता शेतीखर्च आणि बाजारातील आवक वाढ यामुळे शेतकऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. परिणामी,भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आर्थिक अडचणीची चिंता वाढली आहे.
14
comment
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 11, 2025 04:30:57
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_ACCIDENT तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती-मोर्शी मार्गावरील लेहगाव चौफुलीवर दोन वाहनांचा भीषण अपघात; पाच गंभीर जखमी अँकर :– अमरावती-मोर्शी मार्गावर लेहगाव चौफुलीवर पहाटे दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शिरखेड पोलीस ठाण्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर सकाळी चारच्या सुमारास घडला. नागपूर जिल्ह्यातील लोहारा येथून पर्यटनस्थळ चिखलदरा येथे जाणारी स्कॉर्पिओ आणि अमरावतीवरून मोर्शीकडे जाणारे मालवाहू पिकअप वाहन यांची लेहगाव चौकात समोरासमोर धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहनचालकाने गतिरोधक टाळण्याच्या प्रयत्नात वाहन विरुद्ध दिशेला नेले यावेळी नेर पिंगळाईकडून चांदूर बाजारकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओला जोरदार धडक बसली. अपघातानंतर दोन्ही वाहने पलटी झाली.
14
comment
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 11, 2025 04:17:57
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या पुसद तालुक्यातील वनवारला इथल्या कोंडेश्वर महादेव मंदिरात आज तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने बेलपत्र लाखोळी व अभिषेक करण्यासाठी महिलांनी रीघ लावली. येथे शिवलिंगावर एक लाख एक्कावन्न हजार बेलपत्र लाखोळी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी वहिल्या जातात. अभिषेक व महाप्रसाद देखील होतो. त्यासाठी पहाटेपासूनच भक्तिमय वातावरणात हा धार्मिक सोहळा सुरू झाला आहे.
14
comment
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 11, 2025 04:17:44
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_BHATAKULI_RAIN पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात जोरदार पाऊस; नदीला पूर आल्याने तुटला दगडागड गावाचा संपर्क अँकर :– अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात कालपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे दगडागड गावातील नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावात 50 घरे असून 160 लोकवस्ती असलेल्या नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर राहत असून गावात फक्त 160 लोक राहत असल्याने लोकप्रतिनिधीचे या गावाकडे दुर्लक्ष असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावात जाणाऱ्या नदीवरील पूल हा कमी उंचीचा असल्याने पुराचे पाणी वाढल्यावर गावाचा अनेकवेळा संपर्क तुटत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. गावात कुणी आजारी पडले उपचारासाठी गावाबाहेर कसे जावे असा प्रश्न गावातील नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
13
comment
Report
Advertisement
Back to top