Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात विजेची समस्या कायम!

PPPRANAV POLEKAR
Aug 11, 2025 05:48:48
Ratnagiri, Maharashtra
ब्रेकिंग. बांधकाम मंत्रांच्या दौऱ्यानंतरही मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील विजेची समस्या कायम.... बोगद्यामधील वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे वाहन चालकांना अंधारातून करावा लागत आहे प्रवास... बोगद्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे वाहन चालकांना येत आहेत अडचणी. बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही महामार्गाचे समस्या कायम. कशेडी बोगद्यातील विजेच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज. अंधारातून प्रवास करताना वाहन चालकांना अपघाताची भीती.
14
comment
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Aug 11, 2025 08:35:10
Kolhapur, Maharashtra:
Kop Shivasena Highway Roko Feed :- Live U Anc :-कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घ्या या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संपूर्ण राज्यभर धरणे आंदोलन सुरू आहेत. कोल्हापुरात देखील शिवसेनेचे हे आंदोलन अधिकच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी थेट महामार्गावर धाव घेत महामार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापुरात शिवसैनिक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या सगळ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतल.
3
comment
Report
PNPratap Naik1
Aug 11, 2025 08:33:16
Kolhapur, Maharashtra:
*हसन मुश्रीफ byte* *On Rahul Gandhi* गेल्या काही दिवसापासून मत चोरीची तक्रार राहुल गांधी मांडत आहेत शपथ पत्र देऊन तक्रार करा असं निवडणूक आयोगाने त्यांना सांगितला आहे *पराभव हा पराभव असतो ती पचवण्याची ताकद लागते* मतदाना आधी कच्चा मतदार याद्या येतात मात्र कच्च्या मतदार याद्यांबद्दल एकही तक्रार आज कुठे नाही *विनाकारण आरोप करून राहुल गांधी देशाचा, संसदेचा आणि निवडणूक आयोगाचा वेळ वाया घालवत आहेत* येणाऱ्या बिहार निवडणुकीसाठीचा हा त्यांचा काहीतरी प्लॅन असावा ...... शरद पवार *शरद पवार यांच्या वक्तव्याबद्दल मला आश्चर्य वाटलं* *तसे दोन लोक शरद पवार यांना भेटले असतील तर त्यांनी तो प्रयोग करून पाहायला हवा होता* *शरद पवार गुगली टाकत आहेत* *अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून फक्त लोकांचं मनोरंजन होईल बाकी काही* ... *ऑन सेना मोर्चा* मंत्र्यांवर कोणतेही आरोप जर झाले तर ते न्यायालयाच्या माध्यमातून सिद्ध व्हावे लागतात सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे आणि तेच ते करत आहे ..... *ऑन स्थानिक स्वराज्य संस्था* फिनिक्स पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आहे *यावेळी सुद्धा कोल्हापूरचा महापौर राष्ट्रवादीचा होणार आमच्या पक्षाची कासवाची चाल आहे* स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढू मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर राष्ट्रवादीचाच होईल यासाठी आमचा प्रयत्न असेल ..... *ऑन सर्किट बेंच* सर्किट बेंच ची लढाई सहा जिल्ह्यातील जनतेने वकिलांनी आणि पक्षकारांनी जिंकली आहे सर्किट बेंच चा कार्यक्रम कसा घ्यावा हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सांगत असतात या कार्यक्रमात आमचा फारसा हस्तक्षेप नसेल सर्किट बेंचमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा फार मोठा विकास होणार आहे *सर्किट बेंच अंबाबाई विकास आराखडा जोतिबा विकास आराखडा यामुळे कोल्हापूरची 20% वाढ होणार आहे* *कोल्हापूरची हद्दवाढ सुधा आता करावी लागेल* ...... *ऑन शक्तिपीठ* *मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे आणि त्यांनी आपली भूमिका काही लपवून ठेवली नाही* मात्र त्यांना हा महामार्ग लदायचा नाही जिथं शेतकरी समाधानी आहे तिथे शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे *ऑन सतेज पाटील* *बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झाले ते मला माहित नाही* *त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झाले हे मला माहीत नव्हतं* *प्रकल्पाची चर्चा होत असतानाच त्याची रक्कम ठरत असते अशी कधीही त्याची रक्कम वाढत नाही* ...... *ऑन ट्रॅक्टर Gps* हा विषय मी अद्याप समजून घेतलेला नाही विमान मध्ये ब्लॅक बॉक्स अपघात कसा झाला हे कळण्यासाठी असतो ट्रॅक्टर मध्ये तो कशासाठी हवा हे मला माहित नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मी यासंदर्भात चर्चा करेन
3
comment
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 11, 2025 08:32:46
Parbhani, Maharashtra:
अँकर- ऐन श्रावण सोमवारी परभणी जिल्ह्यात कावड घेऊन चाललेल्या भाविकांचा अपघात झाला असून या अपघातात दोघे जण ठार झाले असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. परभणीच्या पाथरी-सेलू महामार्गावरील खेडूळा पाटी परिसरात आज पहाटे सकाळी 5 वाजता दरम्यान हा अपघात झालाय. कावड यात्रे सोबत असलेली भरधाव कार च कावड यात्रेत घुसली असल्याचे समोर आले, ह पण ही कार कशी काय शिरली हे मात्र समजू शकले नाहीये,या अपघातात दोन शिवभक्त जागीच ठार झाले असून इतर तिघे जण गंभीर जखमी झाले. मृतामध्ये डासाळा आणि सेलू येथील शिवभक्तांचा समावेश आहे. या अपघातामुळे ऐन श्रावण सोमवारी शिवभक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. श्रावण सोमवार निमित्त सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे आलेल्या कावड यात्रेतील शिवभक्त परतीच्या मार्गावर असताना हा अपघात झालाय.
3
comment
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 11, 2025 08:32:39
Raigad, Maharashtra:
रायगड ब्रेकिंग रायगड - रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा जन आक्रोश मोर्चा रायगड मधील मोर्चेकरी शिवसैनिक आक्रमक पोलिसांनी लावलेले बॅरिगेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी शिवसैनिक आग्रही पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद केले
4
comment
Report
PNPratap Naik1
Aug 11, 2025 08:17:27
Kolhapur, Maharashtra:
Kop Tractor Black Box PKG Feed :- 2C Anc :- : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संतप्त झालेत.या अधिसूचनेत ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद आहे. त्यामुळे ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा असल्याचा आरोप केला जातोय.. GFX In देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा नवा तुघलकी अधिसूचना. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद ही अधिसूचना म्हणजे थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा ट्रॅक्टर मालकांवर 30 हजार रुपयांहून अधिकचा अतिरिक्त आर्थिक बसणार - विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या तुघलकी अधिसूचनेमुळे शेतकरी संतप्त. GFX Out VO 1:- केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे देशभरातील शेतकरी संतप्त झालेत. विरोधी पक्षाने देखील या संदर्भात आवाज उठवला आहे. या अधिसूचनेनुसार 'हॉलेज ट्रॅक्टर'साठी जिपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस, प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये एआयएस-140 प्रमाणित लोकेशन ट्रॅकर बसवणे बंधनकारक केले आहे. ब्लॅक बॉक्स, अपघाताची नोंद ठेवण्यासाठी 'इव्हेंट डेटा रेकॉर्डर' अनिवार्य केले आहे. ट्रॉलीसाठी नवे महागडे मेकॅनिकल कपलिंग व इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक केली आहे, त्यामुळे या नव्या नियमांमुळे ट्रॅक्टर मालकांवर 30 हजाराहून अधिक रुपयाचा अतिरिक्त आर्थिक बोजा बसेल असं बोलले जातंय. ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही तांत्रिक साधने पूर्णतः अनावश्यक आहेत.. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. Byte :- आमदार सतेज पाटील VO 2:- शेती करणाऱ्या ट्रॅक्टरवर हवाई प्रवासासारखी तंत्रज्ञाने कशाला? असा सवाल शेतकऱ्यांनी देखील उपस्थित केलाय. शेतीमध्ये फक्त 10 ते 15 किमी वेगाने वापरला जाणारा ट्रॅक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार? शहरात बसलेले अधिकारी हे नियम तयार करताना शेतकऱ्याचे वास्तव विसरत आहेत त्याकडे केंद्र सरकारने लक्ष घालावे त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. Byte :- विश्वास बालेघाट, शेतकरी Byte :- बंडु पाटील,शेतकरी VO 3:- सरकारने 18 ऑगस्ट 2025 पर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्याची मुदत दिली आहे, त्यामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सर्व शेतकरी, ट्रॅक्टर मालक आणि शेतकरी संघटनांनी केंद्राकडे हरकती पाठवण्याचे आवाहन केले. इतकंच न्हवे तर सरकारने ‘हॉलेज ट्रॅक्टर’ची व्याख्या स्पष्ट करून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरना या नियमांतून वगळावे किंवा ही अधिसूचना तात्काळ रद्द करावी,” अशी मागणी केलीय. एकीकडे शेतकऱ्यांना आधीच महागाई, निसर्गाचा लहरीपणा आणि उत्पादन खर्चात वाढ यांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी हे नवे नियम त्यांना आणखी अडचणीत टाकणारे असल्याने केंद्राने हा नवा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी देशातील शेतकरी करत आहेत... प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
6
comment
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 11, 2025 08:15:53
Pune, Maharashtra:
रिपोर्टर - लैलेश बारगजे स्लग:- श्रावण सोमवार रामेश्वर मंदिर फीड 2C Anc:- श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी कमी केलेली पाहायला मिळते. या शिव मंदिरा व्यतिरिक्त राज्यात सर्वत्र आणि पुरातन शिव मंदिर आहे या शिव मंदिरांमध्ये देखील पंचक्रोशीतील भाविक श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी गर्दी करतात अहिल्यानगर शहराजवळच असलेल्या डोंगरगण येथील रामेश्वर मंदिरात देखील सकाळपासून भाविकांचे मांदियाळी पाहायला मिळत आहे...वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांनी याच परिसरात वास्तव्य केल्याची आख्यायिका असून त्यांनी स्वतः येथील शिवलिंग स्थापित केल्याचे इथले स्थानिक सांगतात म्हणूनच या मंदिराला रामेश्वर असे संबोधले जाते... राम विजय ग्रंथातील 13 व्या अध्यायात या मंदिराचा उल्लेख सापडतो... त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे बाईट:- विजय गुरव, पुजारी
5
comment
Report
ADANIRUDHA DAWALE
Aug 11, 2025 08:15:30
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_SENA_ANDOLAN पाच फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अमरावतीत महायुतीच्या मंत्र्यांविरोधात अमरावती ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन; एका व्यक्तीला साडी नेसून त्याच्या अंगावर उधळल्या नकली नोटा अँकर :– महायुतीच्या मंत्र्यांविरोधात अमरावतीत ठाकरे गटाने अनोखं आंदोलन केलं आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुखवटा लावून शिवसैनिकांनी नकली नोटा उडवल्या असून शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच एका व्यक्तीला साडी नेसून आणि अंगावर नकली नोटा उधळून शिवसैनिकांनी अनोख आंदोलन केलं आहे. यावेळी सरकार विरोधात ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली आहे. बाईट :- पराग गुडधे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमरावती
8
comment
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 11, 2025 08:04:25
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1108ZT_JALNA_ACCIDENT(9 FILES) जालना :बसच्या चाकाखाली चिरडून 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. बदनापूर नगरपंचायत कार्यालयासमोरील घटना घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त अँकर: जालन्यात बसच्या पाठीमागील टायरखाली चिरडून एका 48 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बदनापूर नगरपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडलीय. 48 वर्षीय संजय चंदनपाट असं मयताचे नाव आहे. संजय चंदनपाट हे त्यांच्या दुचाकी वरून जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जात होते. यावेळी बस मानव विकास मिशनच्या बसने त्यांना ओवरटेक करताना हा अपघात घडला. या घटनेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तातडीने बदनापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
10
comment
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 11, 2025 07:47:30
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या दारव्हा येथे महिलेवर सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या ३४ वर्षीय महिलेला दारव्हा-बागवाडी मार्गावरील एका ले-आउटमध्ये नेऊन पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. आरोपींमध्ये अत्याचाराबाबत चर्चा झाल्याने पोलिसांनी पीडित मुलीला बोलावून विचारपूस केली, याप्रकरणी काल पीडितेच्या बहिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. एक आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. पीडिता घटनेच्या दिवशी बहिणी कडून घरी परत येत असताना आरोपींनी तिला रस्त्यात गाठले व ले-आउटवर नेऊन अत्याचार केला. पीडितेच्या बहिणीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
11
comment
Report
AAABHISHEK ADEPPA
Aug 11, 2025 07:45:26
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - तिसरा श्रावणी सोमवार निमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात केली महाआरती - तिसरा श्रावणी सोमवार निमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात केली महाआरती - पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना सिद्धारामेश्वरांच्या दर्शनाने केली आपल्या कामाची सुरुवात - राज्य सुजलाम सुफलाम राहण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी घातले सिद्धरामेश्वरांना घातले साकडे - यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचे देखील प्रमुख उपस्थिती होती
10
comment
Report
SGSagar Gaikwad
Aug 11, 2025 07:16:40
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_tiranga_rally “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिकेची पर्यावरणपूरक तिरंगा सायकल रॅली उत्साहात संपन्न. अँकर -  भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशभक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य तिरंगा सायकल रॅली आज नाशिक शहरात उत्साहात संपन्न झाली. या अभियानाद्वारे देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. 2 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत नाशिक मनपातर्फे विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली जात आहे.
14
comment
Report
AKAMAR KANE
Aug 11, 2025 07:16:11
kolhapur, Maharashtra:
Ngp Ubt andolan live u ने फीड पाठवले ------------ नागपूर नागपुरात उध्दव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांकडून नागपूर अमरावती महामार्गावर वाडी टी पॉईंटवर तीव्र आंदोलन करण्यात आलं सरकारच्या मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आणि हातात फलक घेत मंत्रांचे राजीनाम्याची मागणी करण्यात आली... यावेळी प्रतिकात्मक पत्ते खेळत आणि डान्सबारला विरोध म्हणून नकली नोटा उडवत आंदोलन केले... नागपूर अमरावती महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला ... त्यामुळे काही वेळासाठी वाहतूकही खोळंबली होती. उद्धव ठाकरे सेनेच्या या आंदोलनावेळी तिथून आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
14
comment
Report
SKSACHIN KASABE
Aug 11, 2025 07:16:05
Pandharpur, Maharashtra:
11082025 slug - PPR_PUJA_MNS file 01 ----- Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठीचा अवमान करणाऱ्या मस्तवाल पुजाऱ्या मागील बोलवता धनी कोण हे तपासण्याची गरज आहे. हिंदी मधून पूजा करून घेणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई करण्याची, मनसे नेते दिलीप धोत्रे यांची मागणी. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी अर्चन पूजा करताना 35 पैकी 34 कुटुंब मराठी असताना एकाच कुटुंबासाठी देवाच्या दारात मराठीचा अवमान जर मंदिर समिती कडून होत असेल तर ही बाब गंभीर आहे. या प्रकरणी मनसे आक्रमक झाली असून पुजाऱ्यांना मराठीचा अवमान करून हिंदीचा एवढा पुळका का असा प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे. ---- Byte - दिलीप धोत्रे, मनसे नेते
14
comment
Report
JMJAVED MULANI
Aug 11, 2025 07:03:59
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1108ZT_INDAPURGADI FILE 5 इंदापुरात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात...... पुणे सोलापूर महामार्गावर हिंगणगावात आमदार महेश लांडगेंच्या उपस्थितीत केला जाणार रस्ता रोको..... यवत घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस खातं अलर्ट..... Anchor_ इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी आणि समाधीस्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आजपुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. शिवचरित्रकार अनिल महाराज देवळे आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत हा रास्ता रोको केला जाणार आहे. तत्पूर्वीच इंदापूर पोलिसांनी वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील काही अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सात ऑगस्ट रोजी या गढी परिसरात असणाऱ्या अतिक्रमणधारक 14 व्यक्तींना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. स्वतःहून अतिक्रमण धारकांनी आपापले अतिक्रमण काढावीत असा आदेश तहसीलदार जीवन बनसोडे यांनी पारित केला होता.मात्र अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे काढून न घेतल्याने तहसीलदार जीवन बनसोडे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या उपस्थितीत सोमवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणावर आता प्रशासनानं हातोडा चालवलेला आहे.
14
comment
Report
SKSudarshan Khillare
Aug 11, 2025 07:03:19
Yeola, Maharashtra:
अँकर:- श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी अंकाई डोंगरावर भक्तीचा महापूर उसळला. पहाटेपासूनच ‘ॐ नमः शिवाय’च्या घोषात वातावरण दुमदुमले आणि भाविकांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. अगस्ती मुनींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे यावेळेस बघण्यास मिळाली . याच अनकाई डोंगराला महादेवाच्या पिंडीचा आकार असून पावसामुळे डोंगर परिसर हिरवाईने नटला असून, थंडगार वाऱ्यात भाविकांना चढाईचा आनंद द्विगुणित झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भावी येथे येत असतात.
13
comment
Report
Advertisement
Back to top