413304
पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी उगवलेले धान्य, कमाईचे नवे मार्ग!
Pandharpur, Maharashtra:पीक पाणी 11082025 Slug - PPR_CEREAL_CROP file 02 ------ Anchor - पंढरपूर तालुक्यात ऊसा सारखी नगदी पिके तसेच द्राक्ष डाळिंब केळी अशा फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. एक बागायती तालुका म्हणून जिल्ह्यात याची ओळख आहे. वर्षभर काळजी घेऊन उत्पादन घेण्यापेक्षा आता कमी कालावधीची पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. यामुळे पंढरपूर तालुक्यात यावर्षी प्रथमच साडेसहा हजार हेक्टर वर विविध कड धान्याची खरीप हंगामात लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 2 हजार 400 एकरावर उडीद लागवड आहे. तीन महिन्यात येणारे पिक असून सध्या याला दर सुद्धा समाधानकारक आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक आहे. सोबत तूर, मूग, सोयाबीन ,भुईमूग लागवड सुद्धा वाढली आहे. --- Wkt - सचिन कसबे पंढरपूर0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोवा के बागा बीच पर लहरों से डूबे युवक, मौत
Oras Bk., Maharashtra:गोवा गोव्यातील प्रसिद्ध बागा हडफडे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाला लाटांसोबत मस्ती करणं अंगलट आलं. वादळी समुद्राच्या उधाणलेल्या लाटांसोबत मौजमजा करण्याचा प्रयत्न पर्यटकाच्या चांगलाच अंगलट आला. लाटांच्या तडाख्यात सापडलेला युवक बघता बघता समुद्रात बुडाला. बागा हडफडे समुद्रकिनाऱ्यावर अश्पाक मसली हा कर्नाटक मधील पर्यटक समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडला. काही वेळाने त्याचा मृतदेह किनाऱ्यावर वाहून आला.0
0
Report
केडीएमसी स्थायी समिति: पत्रकार प्रवेश पर रोक, ठिय्या आंदोलनों से हंगामा
Kalyan, Maharashtra:केडीएमसीत माध्यमांवर बंदीचा फतवा? स्थायी समिती सभेत इलेक्ट्रॉनिक पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने ठिय्या आंदोलन "मी सभापती आहे, माझा अधिकार आहे" सभापती मल्लेश शेट्टी याचा केडीएमसीत पत्रकारांना रोखल्याने नवा वाद तब्बल दोन तास सभागृहाबहेर पत्रकारांचे ठिय्या आंदोलन केडीएमसी पालिका उपायुक्त वंदना गुळवे यांना स्थायी समिती सभागृहात रोखण्याचं कारण विचारले असता चित्रीकरण करत असताना मोबाईल देखील खेचण्याचा प्रयत्न. महापालिका मुख्यालय आणि स्थायी समिती सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन झाले. याच निर्णयाविरोधात पत्रकारांनी विरोध नोंदवत निषेध व्यक्त केला. विधान: केडीएमसीची स्थायी समिती बैठक होती सभापतींच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. महासभेच्या वार्तांकनासाठी केवळ दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच सभागृहात प्रवेश देण्यात आला. अधिकृत मान्यता पत्र असतानाही स्थायी समिती बैठकीत प्रवेश नाकारण्यात आल्याने पत्रकारांनी निषेध नोंदवत महापालिका मुख्यालय आणि स्थायी समिती सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी जनसंपर्क अधिकाऱी वंदना गुळवे याबत जाब विचारला. मात्र दोन तासांच्या प्रतीक्षेनंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. जनसंपर्क विभागाकडून हा निर्णय सभापतींच्या निर्देशानुसार घेतल्याचं सांगण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी "मी सभापती आहे, कोणाला प्रवेश द्यायचा हा माझा अधिकार आहे," अशी भूमिका घेतल्याचे पत्रकारांनी सांगितले.0
0
Report
चलती स्कूटर पर महामार्ग पर पेड़ गिरा, चालक और तीन साल की बच्ची घायल
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चालत्या स्कुटीवर महामार्गावरील झाड कोसळले, स्कुटी वरील इसम आणि तीन वर्षाची मुलगी झाली जखमी, रस्त्यालगतच्या एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली घटना अँकर:-- चालत्या स्कुटीवर महामार्गावरील झाड कोसळून स्कुटीवरील इसम आणि तीन वर्षाची मुलगी जखमी झाले. ही घटना चंद्रपूर शहरालगतच्या चिचपल्ली गावात घडली. पावसाळ्याच्या दिवसातील जंगल भागातील प्रवासाचा धोका या घटनेने पुढे आलाय. रस्त्यालगतच्या एका दुकानातील सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली. जखमी अवस्थेतील स्कुटीस्वार आणि तीन वर्षाच्या मुलीला रुग्णालयात दा करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात जंगलव्याप्त भागातील विविध रस्त्यांवर मॉन्सून काळात वाहन चालवताना खबरदारी घेण्याची गरज यानिमित्ताने पुढे आली.0
0
Report
Advertisement
उल्हासनगर में विठ्ठलवाड़ी पुलिस ने गावठी रिवॉल्वर के साथ 21 वर्षीय युवक को गिरफ्तार किया
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी पोलिसांनी कारवाई करत गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 40 हजार रुपये किमतीचे गावठी रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. 23 जून 2026 रोजी रात्री पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना आदर्श नगर झोपडपट्टी, ब्ल्यू स्काय वॉकखाली, उल्हासनगर रेल्वे पटरीजवळ एक संशयित युवक फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीबी पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. पोलिसांना पाहताच युवकाने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीचे नाव आदित्य गौतम जोगदंड, रा. वीर तानाजी नगर, सेक्शन-40, उल्हासनगर-5 असे समोर आले. झडतीमध्ये त्याच्याकडे लपवून ठेवलेले गावठी रिव्हॉल्व्हर सापडले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.0
0
Report
सांगली‑मिरज में जोरदार बारिश, किसान खुश, मानसून प्रवेश से बुवाई तेज़
Sangli, Maharashtra:सांगली-मिरज शहरासह परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.काल सायंकाळ पासून रिमझिम स्वरूपात पाऊस पडायला सुरुवात झाली होती,मात्र आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा कडाका वाढला होता,पण दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन, सांगली आणि मिरज शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.तर मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून पेरणीच्या कामाला आता वेग येणार आहे.0
0
Report
स्थायी समिति ने इलेक्ट्रॉनिक पत्रकारों को प्रवेश रोककर मचा हंगामा
Kalyan, Maharashtra:आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेची सभा होती. या सभेच्या वार्तांकनासाठी केवळ दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात आला. तर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना बाहेरच थांबवण्यात आले. सभा संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना माहिती देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याचा पत्रकार आणि विरोधी पक्षातील काँग्रेस, उबाठा नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. या निर्णयाच्या निषेधार्थ पत्रकारांनी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे, अधिकृत मान्यता आणि पत्रव्यवहार असूनही स्थायी समितीच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आल्याने या निर्णयावर टीका होत आहे. आज स्थायी समितीसमोर तीन महत्त्वाचे विषय चर्चेसाठी होते. हे विषय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू नयेत म्हणूनच इलेक्ट्रॉनिक माध्यमांना रोखण्यात आल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात रंगली आहे.0
0
Report
Advertisement
जालना में भंडारे के बयान से नया विवाद, सर्वधर्म समभाव पर उथल-पुथल
Jalna, Maharashtra:जालना : सर्वधर्म समभाव हे जगातील सर्वात मोठे खोटे वाक्य ह.भ.प संग्राम बापू भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्य परतूरमध्ये किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कुलच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी हिंदूंचा मोर्चा अँकर - सर्वधर्मसमभाव हे जगातील सर्वात मोठे खोटे वाक्य आहे, असे वादग्रस्त वक्तव्य ह.भ.प संग्राम बापू भंडारे यांनी केलंय. जालन्यातील परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश शाळेच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. यावेळी मोर्चात भंडारे यांनी हे वक्तव्य केलंय.. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साउंड बाईट - ह.भ.प. संग्राम बापू भंडारे0
0
Report
वर्धा में जोरदार बारिश, किसानों को मिली राहत
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा वर्धा : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्धा जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली. बुधवारी दुपारनंतर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.सकाळपासूनच आकाशात ढगांची दाटी होती. हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाजही यावेळी खरा ठरला. अनेक भागांत सततधार पाऊस पडल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. दुसरीकडे, खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी दिवसभर लागवडीची लगबग सुरू ठेवली. यंदा पावसाच्या उशिरामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, लागवडीनंतर झालेल्या या पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळणार असून शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.0
0
Report
केतन अग्रवाल हत्या मामले में नए खुलासे, पुलिस के दावे की पड़ताल जारी
Varsoli, Maharashtra:लोहगडावरून खाली ढकलून केतन अग्रवालची हत्या करण्यात आल्याचा आरोप होत असताना या प्रकरणात दररोज नवे दावे आणि चर्चांना उधाण येत आहे. केतनचा मृत्यू झाल्यानंतर सिया गोयलने पार्टी केल्याची चर्चा, गहाळ झालेला पासपोर्ट, सिया आणि चेतन यांच्यातील कथित फोन कॉल्स, तसेच "How to Murder" असा गुगल सर्च केल्याच्या चर्चांमुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सर्व बाबींवर पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे, पाहूया हा रिपोर्ट... केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये अनेक दावे केले जात आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला दावा म्हणजे, केतनला लोहगडावरून खाली ढकलल्यानंतर सिया गोयलने पार्टी केली होती. मात्र, या दाव्याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. उलट अशा चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतनचा पासपोर्ट गहाळ झाल्याची बाब. तपासादरम्यान पासपोर्ट नेमका कसा आणि कुठे गायब झाला, याबाबतही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, या संदर्भातही पोलिसांनी सध्या तपास सुरू असल्याचे सांगितले असून कोणताही निष्कर्ष काढण्यास नकार दिला आहे. तपासादरम्यान सिया गोयल आणि चेतन यांच्यातील कथित फोन कॉल्सची माहितीही समोर आली आहे. या कॉल्सचे स्वरूप काय होते, त्यामध्ये नेमका कोणता संवाद झाला होता आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. याशिवाय, दोन्ही कुटुंबांमध्ये याआधी कोणतेही वाद, मतभेद किंवा वितुष्ट नव्हते. कारण अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सिया गोयलने गुगलवर "How to Murder" असा सर्च केल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, या बाबत पोलिसांनी प्रतिक्रिया देताना तपासाशी संबंधित सर्व डिजिटल पुराव्यांची पडताळणी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणतीही सूचना अधिकृतरीत्या समोर येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सध्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू आहे. सोशल मीडियावरील चर्चांपासून ते डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक बाबींची छाननी करण्यात येत आहे. मात्र, या सर्व दाव्यांमागचे सत्य तपास पूर्ण झाल्यानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.0
0
Report
Advertisement
तीन दशकों की दोस्ती पर शादी की राह में विपत्ति: केतन अग्रवाल की मौत
Varsoli, Maharashtra:Headline : तीन दशकांची मैत्री, ठरलेलं लग्न आणि केतनचा धक्कादायक अंत Anchor: अग्रवाल आणि गोयल कुटुंबाची तीन दशकांची मैत्री... दोन कुटुंबांमधील जिव्हाळ्याचे संबंध... आणि त्याच विश्वासातून ठरलेला शुभविवाह. गोयल आणि अग्रवाल कुटुंबीयांमध्ये जवळपास ३० वर्षांपासून सलोख्याचे संबंध असल्याने या नात्यात कोणताही संशय किंवा दुरावा कधीच निर्माण झाला नव्हता. याच विश्वासाच्या पायावर केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह ठरला होता. मात्र, नियतीने वेगळेच काही लिहून ठेवले होते. Vo: कौटुंबिक ओळख आणि परस्पर विश्वास यामुळे नातं जुळवताना कोणतीही सखोल पडताळणी करण्यात आली नाही, अशी चर्चा आता या प्रकरणानंतर सुरू झाली आहे. एका आनंदी विवाहसोहळ्याची तयारी सुरू असताना अग्रवाल कुटुंुबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू होती त्याच तरुणाचा मृतदेह कुटुंबीयांना पाहावा लागला. बाईट : विशाल अग्रवाल, मृत केतनचे वडील (file no.01) Vo 2: आज या घटनेमुळे केवळ एका कुटुंबाने आपला तरुण मुलगा गमावलेला नाही, तर विश्वास, नाती आणि नातेसंबंधांबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य नेमके काय आहे, याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.0
0
Report
धाराशिव महायुती में ओमराजे निंबाळकर के शिवसेना प्रवेश से तकरार तेज
Dharashiv, Maharashtra:ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यात महायुतीत धुसफूस चालू आहे. पाटील-निंबाळकर संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. अँकर: विकासाच्या मुद्द्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी धाराशिव जिल्ह्यात त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राज्यात महायुतीची ताकद वाढल्याचं चित्र असलं, तरी धाराशिवमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत. पाटील कुटुंबाविरोधातील संघर्ष आता नव्या टप्प्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे राज्यातील महायुती अधिक मजबूत झाल्याचं चित्र असलं, तरी धाराशिवमध्ये मात्र वेगळंच समीकरण तयार झालं आहे. पक्षप्रवेशानंतरही पाटील कुटुंबाविरोधातील संघर्ष कायम राहणार असल्याचं ओमराजेंनी स्पष्ट केलं. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर आला आहे. ओमराजेंच्या या भूमिकेनंतर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबाकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली. महायुती मजबूत होत असेल तर त्यासाठी सहकार्य करू, मात्र स्थानिक राजकारणात आपली भूमिका कायम राहील, अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली. दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी पाटील कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. योग्य वेळी जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भाजपच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेनेतही संताप व्यक्त केला जात आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यावर कोणीही अन्यायकारक टीका केली, तर त्याला शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल, असे इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. राज्यात महायुती अधिक मजबूत झाल्याचा दावा केला जा rata, धाराशिवमध्ये स्थानिक राजकारणातील जुना पाटील-निंबाळकर संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. हा संघर्ष केवळ शाब्दिक पातळीवर राहतो की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचे राजकीय परिणाम दिसून येतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
चंद्रपुर में कैंसरजनक थाई मांगुर मछली का 600 किलो का जखीरा पुलिस ने जप्त किया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात कर्करोगाला कारणीभूत असलेला थाई मांगुर माशाचा 600 किलोचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. केंद्र शासनाने थाई मांगुर हा मासा देशात संवर्धन, विक्री आणि खाद्य म्हणून प्रतिबंधित केला आहे. गुप्त माहितीनुसार रामनगर पोलिस ठाणे पथकाने माशांच्या साठ्याच्या जप्तीसाठी स्थानिक बंगाली कॅम्प मासळी बाजारात कारवाई केली. तेव्हा त्यांना हा प्रकार नजरेस पडला. आंध्रप्रदेशच्या इलुरु जिल्ह्यातील व्येंकटेश्वरराव ग्रुिपथीराव घंटासाला नामक मासे विक्रेत्याला पोलिसांनी बोलेरो वाहनासह ताब्यात घेतले. माशांची किंमत सुमारे 60 हजार आहे. नंतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मासे खोल जमिनीत पुरून नष्ट करण्यात आले. या कारवाईसाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी विशेष मदत केली.0
0
Report
Advertisement
कल्याण में नाबालिग के साथ फिर दुष्कर्म, पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया
Kalyan, Maharashtra:कल्याण शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार, पोलिसांनी आरोपीला केली अटक. सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे माहिती मिळाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर शिवसेना, भाजप ठाकरे गट, मनसे, राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते पोलीस स्थानकात दाखल झाले होते. या आधी कल्याणमध्ये अल्पवयीन मुली सोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. आरोपीला चौकात फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सहित सर्व पक्षीय नेत्यांनी केली आहे.0
0
Report
गरीबी के अड़चन के बीच रोहिणी का विश्व चैम्पियनशिप सफर
Kolhapur, Maharashtra:पट्टणकोडोली गांव, कोल्हापूर जिल्ह्यातील विठ्ठल-बिरुदेवाच्या भक्तीचं केंद्र, जगप्रसिद्ध येलो फेस्टिवलची भूमी आणि फरांडे महाराजांच्या भाकणुकीमुळे ओळखलं जाणारं गाव. याच गावातील एक लेक आज देशाचं नाव जगाच्या पटलावर नेण्याच्या तयारीत आहे.. रोहिणी खानू देवबा अस या राष्ट्रीय और आशियाई स्तरावर भारतासाठी पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटूचे नाव. आत्ता हीच रोहिणी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे. पण जागतिक स्पर्धेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्यासमोर आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणारी रोहिणी… पण आयुष्याच्या आखाड्यात ती आणि तिचं कुटुंब परिस्थितीशी दोन हात करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली या गावातील रोहिणीने लहानपणापासून कुस्तीची आवड जोपासली. मर्यादित साधनसामग्री, आर्थिक अडचणी आणि संघर्ष यांवर मात करत तिनं राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सात पदकं मिळवली. 2024 मध्ये थायलंड येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून तिनं भारताचा तिरंगा उंचावला. त्यानंतर 2025 मध्ये कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. आणि आता 2026 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ट्रायलमध्ये सुवर्णपदक जिंकून तिनं जागतिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.. रोहिणीच्या यशामागे तिच्या वडिलांचं मोठं योगदान आहे. विठ्ठल-बिरुदेव मंदिरात पुजारी म्हणून सेवा करणारे खानू देवबा यांनी मुलीच्या स्वप्नासाठी अक्षरशः स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं आहे. घरची परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी कधी मुलीच्या सरावात खंड पडू दिला नाही. नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी आणि खर्च भागवण्यासाठी त्यांनी घरातील शेळ्या मेंढ्या देखील विकल्या आहेत. कारण त्यांच्या मुलीचं स्वप्न अधिक मोठं आहे. एका बाजूला देशासाठी पदक जिंकण्याची जिद्द आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक अडचणी… या दोन्हींचा सामना करत रोहिणी वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत आहे. आज गरज आहे ती या गुणवंत लेकीच्या पाठीशी उभं राहण्याची. कारण उद्या जागतिक व्यासपीठावर भारताचा तिरंगा उंचावला गेला, तर त्या यशामागे एका बापाचे विकलेले पशुधन, त्याग आणि मुलीवरचा विश्वासही तितका मोठा असेल. संदीप पाटील प्रशिक्षक देशासाठी पदक जिंकण्याची क्षमता रोहिणीनं अनेकदा सिद्ध केली आहे. आता तिच्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्याची जबाबदारी समाजाची, लोकप्रतिनिधींची आणि शासनाची आहे. कारण ही केवळ एका खेळाडूची लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाची आणि भारताच्या तिरंग्याची लढाई आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
नागपुर में सोना-चांदी की चोरी: महिला मोनाली अवतकर गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपुरात ग्राहक बनून खरेदीच्या बहाण्याने चोरी करणारी सराईत महिला आरोपी अटकेत.. आरोपी महिलने सराफा दुकानदारांसह अनेक महिलांना जाळ्यात ओढून केली होती फसवणूक.. मोनाली अवतकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव.. चोरीचे CCTV फुटेज ..आरोपी महिलेला नंदनवन पोलिसांनी ठोकल्या बेड्या विश्वास संपादन करून दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेचा केला पर्दाफाश..0
0
Report
Advertisement
