Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

वरूड इजारा गांव: मंजूर रस्ता भी नहीं बना, अंतिम यात्रा में कीचड़ का सामना

SRSHRIKANT RAUT
Sept 20, 2025 04:32:14
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या वरुड इजारा गावात स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता कागदोपत्री मंजूर असताना देखील त्याचे काम न झाल्याने अंत्ययात्रेसाठी नागरिकांना चिखल तुडवत जावे लागत आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने अंत्ययात्रेवेळी ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. गावात विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने किमान मूलभूत सुविधा तरी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Sept 20, 2025 06:06:10
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri old man kailas puri Pune 20-9-25 feed by 2c ऍंकर : पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या जनता दरबारात 79 वर्षीय सुभाष बोधे पोहचले. या आजोबांनी पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रशासक काळात झालेल्या कारभार मांडला. बोधे कुटुंबियांच्या घरासमोर पालिकेने रस्त्याचं केलेलं काम, त्यातून झालेला त्रास आणि मिळालेली उत्तरं या आजोबांनी अजित दादांसमोर मांडली. आधी घराला समांतर रस्ता होता, मात्र आता रस्ता पाच फूट खाली आणि घर वर झाल्यानं ते गाडी पार्क करू शकत नाहीयेत. अशात गाडी बदलण्याचा अजब सल्ला पालिकेकडून मिळाला. नेमकं काय-काय घडलं हे आजोबांकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी... kailas वन टू वन : सुभाष बोधे - आजोबा + vis
1
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 20, 2025 06:03:13
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ‌‌‌...... exclusive video स्किप्ट ::- वाहत्या पाण्यातलं धाडस जीवावर बेतल होतं... नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला... लातूर जिल्ह्यात काळजाचा ठोका चुकवनार्या घटनेचा व्हिडिओ आला समोर.... AC ::- राज्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नद्या-नाले वाहत आहेत. अनेक कमी उंचीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. लातूर जिल्ह्यात अशाच एका अरुंद पुलावरून तरुणाचा जीव थोडक्यात वाचल्याची घटना घडली. बुधोडा ते एरंडी रस्त्यावर तावरजा नदीच्या उपनदीवर असलेल्या पुलावर मुसळधार पावसामुळे तुफान पाणी वाहत होते. या काळात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र या परिस्थितीत काही तरुण पुल ओलांडण्याचे धाडस करत होते. त्यात एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. सुदैवाने पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो काठाला आला आणि जीव वाचला.प्रशासन आणि पोलिसांनी अशा वेळी पुलावरून प्रवास करण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे. कारण प्रत्येक वेळेस नशीब साथ देतंच असं नाही.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 06:03:03
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट तालुक्यात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस, पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला - अक्कलकोट तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला, सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी. - पावसामुळे पुन्हा एकदा कलहिप्परगे ते करजगी रस्ता बंद, पुलावरून वाहत आहे पाणी - शिरवळ बादोला गावाजवळील रस्ता गेला वाहून, वाहतुकीसाठी मार्ग करण्यात आला बंद. - अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणारे अनेक पूल पाण्याखाली. - अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठं नुकसान. - अक्कलकोट तालुक्यात अतिपावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. - अक्कलकोट तालुका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 20, 2025 06:02:51
Kalyan, Maharashtra:कल्याण शहाडमध्ये पालिकेच्या आरक्षित भूखंडावरून गोंधळ! गार्डनवर आरोग्य केंद्र-वास्‍तिगृह वाद… रहिवासी विरुद्ध पालिका आमनेसामने!" गार्डन दाखवून फ्लॅट विकले… पण पालिकेची आरक्षित भूखंडावर हालचाल आरोग्य केंद्राऐवजी वस्तीगृहासाठी पालिकेची कामाला सुरुवात ...रहिवासी आणि ठाकरे गटाचा संताप गोंधळ घालत काम पाडले बंद “आमचा रस्ता सोसायटीचा, परवानगीशिवाय काम नको” – नागरिकांचा आक्रमक पवित्रा बिना परवानगी पुन्हा काम सुरू केलं तर तीव्र आंदोलन करणार ठाकरे गटाचा इशारा तर स्थानिक रहिवाशांच्या विरोधावर तोडगा काढत लवकरच या ठिकाणी पोर्टा केबिन आरोग्य केंद्र उभारणार.. आरोग्य अधिकाऱ्याची भूमिका Anc..कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावरून नागरिक आणि पालिका आमनेसामने आले आहेत! विकासकांनी घर घेताना ‘गार्डन’ दाखवून फ्लॅट विकले… पण पालिकेने त्याच जागेवर वस्तीगृह उभारण्याचं काम सुरू केल्याने संतप्त रहिवासी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते थेट मैदानात उतरले! अखेर नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेला काम थांबवावं लागलं… सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे." byte. रहिवासी byte... डॉ मनीषा तिखे केडीएमसी आरोग्य अधिकारी
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 20, 2025 05:46:43
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे संपर्क मंत्री अशोक उईके यांनी बाभूळगाव तालुक्यात देखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार पाडले आहे. बाजार समितीचे संचालक आशिष सोळंके आणि काँग्रेसचे नेते प्रल्हाद डगवार यांचे सह मविआच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत भाजपात प्रवेश केला. कळंब, राळेगाव नंतर आता बाभुळगाव येथूनही कार्यकर्ते भाजपात गेल्याने काँग्रेस नेते, माजी मंत्री वसंत पुरके यांना झटका मानल्या जात आहे. भाजपात जुने आणि नवे कार्यकर्ते असा भेद नसून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून कार्यकर्ते भाजपात येत आहेत त्यामुळे भाजप परिवार मजबूत झाल्याचे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. भाजप सोबत जो कोणी बेईमानी करेल त्याचे राजकारण संपल्या शिवाय राहणार नाही असे सांगून पक्षातील विरोधकांचे देखील त्यांनी कान टोचले. बाईट : अशोक उईके , मंत्री आदिवासी विकास
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 20, 2025 05:36:23
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - तडीपारीच्या नोटिशीला आव्हान देणे पडले महागात, सोलापुरातील एका गुन्हेगाराला हायकोर्टाकडून एक लाखाचा दंड - सोलापुरातील एका गुन्हेगाराला तडीपरीच्या नोटिशीला आव्हान देणे पडले महागात - इब्राहिम खाजासाब कुरेशी या गुन्हेगाराने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या तडीपारीच्या नोटीस विरोधात घेतली होती उच्च न्यायालयात धाव - हायकोर्टाने अमूल्य वेळ वाया घालवण्याचा निष्कर्ष काढून ठोठावला तब्बल एक लाखांचा दंड - सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून शहरातील गुंडांची सुरू आहे साफसफाई - इब्राहिम कुरेशी याच्यावर 2009, 2015, 2016, 2018, 2021, आणि 2025 या कालावधीत विविध गंभीर गुन्हे दाखल - रिट पिटीशन दाखल करताना याचिकाकर्त्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवल्याचे समोर - सदरच्या आरोपीकडून एक लाख दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत भरणे बंधनकारक अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना महसूल कायद्याने रक्कम वसूल करण्याचे आदेश
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 20, 2025 05:36:12
Ratnagiri, Maharashtra: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संतापले, सुनावले खडे बोल गृहराजमंत्री योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघातील कोळबांद्रे जिल्हा परिषद गटातील आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती योगेश कदम चांगले संतापले महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत तुमचं नक्की चाललंय काय असा खडा सवाल करत पुढच्या सहा दिवसात मला सगळ्यांचे अर्ज निकाली काढून मला अहवाल सादर करा असे आदेशच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत घरकुल योजनेच्या कामासंदर्भात रखडलेल्या लाईट कनेक्शन बाबतही महावितरणच्या अधिकाऱ्यांना योगेश कदम यांनी चांगलेच झापले
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 20, 2025 05:35:40
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या माजी नगरसेवकांची मोर्चे बांधणी भाजपच्या माजी नगरसेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सेवा पंधरवडा निमित्त माजी नगरसेवकांकडून आज रत्नागिरी नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता साहित्याचं वाटप फावडं, गमबूट, हँडग्लोज, घमेलं, खुरपं आदी साहित्याचं वाटप आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही नेहमीच तयार भाजपच्या माजी नगरसेवकांची प्रतिक्रिया Byte-
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 20, 2025 05:35:29
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_RestHouse Feed on - 2C ---------------------------- Anchor - नांदेडच्या शासकीय विश्रामगृहातील सेवेवर मंत्री चंद्रकांत पाटील खुश झाले आणि जाताना कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये बक्षीस देऊन गेले. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते नांदेडच्या शासकीय विश्रामगृहावर मुक्कामास होते. रात्री आराम पूर्ण झाल्यावर सकाळी ते नियोजित कार्यक्रमासाठी निघाले. गाडीत बसल्यावर त्यांनी अचानक ड्रायव्हर ला थांबण्याचा इशारा केला. विश्रामगृह व्यवस्थापकांना बोलवून घेतले त्यांनी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले अन् टीप म्हणून संपूर्ण टीमला एकूण 5 हजार रुपयांची बक्षिस दिले. महत्वाचे म्हणजे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वतःच्या खिशातून हे पैसे काढून दिले. यामुळे विश्रामगृह कर्मचारी मात्र आश्चर्यचकित आणि खुश झाले. --------------------------
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 20, 2025 05:35:08
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_RANI_LOSS सात फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 नुकसानाची दखल न घेतल्याने शेतकऱ्याचा अनोखा निषेध; अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याने पिकात रोटाव्हेटर फिरविण्याच्या कार्यक्रमाचे छापले निमंत्रण पत्रक, कृषी विभागावर संतापाचा उद्रेक अँकर :- या वर्षी अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीसाठी सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र अतीवृष्टीमुळे परिस्थिती पालटली आणि सोयाबीन पिकांवर ‘येलो मोझॅक सारखा रोग आल्याने शेकडो शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः उद्‌ध्वस्त झाले. तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्यावर या आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांची संपूर्ण शेतीतील सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. यासंदर्भात त्यांनी आणि गावातील इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदने दिली, भेटी घेतल्या परंतु कुठलाही अधिकारी बांधावर फिरकला नाही. त्याचे पंचनामे देखील केले नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने शेतातील पिकावर रोटावेटर फिरवून पीक नष्ट करण्याचे ठरविले मात्र या करिता शेतकरी दयाराम राठोड यांनी कृषी विभागाचा निषेध करीत एक निमंत्रण पत्रिका छापली व ती कृषी विभागातील अधिकारी महसूल अधिकारी व गावातील सर्व नागरिक यांना वाटली व थेट अधिकाऱ्यांनाच पिके नष्ट करण्यासाठीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं. बाईट :- दयाराम राठोड, शेतकरी रोटावेटर कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रक व्हायरल* दयाराम राठोड यांनी छापलेल्या पत्रिकांमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की कार्यक्रम : नष्ट झालेल्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरविणे दिनांक : 22 घटस्थापनेच्या दिवशी वेळ : सकाळी ११ ते दुपारी २ स्थळ : दयाराम राठोड यांची शेती, सुजातपूर विशेष : पाहुण्यांसाठी अल्पोपहाराची सोय उपलब्ध!
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 20, 2025 04:49:34
Sangli Miraj Kupwad, Maharashtra: Sng_band स्लग - गोपीचंद पडळकरांच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही संताप, इस्लामपूर शहर बंद ठेवत निषेध.. अँकर - भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टिकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर बंद पाळण्यात येत आहे.जयंत पाटील समर्थकांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे.या बंदला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने त्याचबरोबर छोटे-मोठे व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले आहेत.भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे संतप्त पडसाद दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे पाहायला मिळत आहेत.
5
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 20, 2025 04:47:25
Yeola, Maharashtra:येवला /नाशिक ब्रेक नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक–संभाजीनगर महामार्गावर जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला देखील सडक्या कांद्याची माळ घालून निषेध... एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन सुरू. प्रहार संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा. कांद्याच्या दरवाढीसह शेतकऱ्यांना तातडीचे अनुदान आणि हमीभाव मिळावा या मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गळ्यात कांद्याच्या माळा घालून आणि डोक्यावर काळे वस्त्र बांधून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
comment0
Report
Advertisement
Back to top