Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला!

PPPRAFULLA PAWAR
Jul 03, 2025 05:39:06
Raigad, Maharashtra
स्लग - काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला ..... तीन दिवसानंतर सापडला मृतदेह ..... अँडव्हान्स थर्मल ड्रोनच्या मदतीने शोध ....... अँकर - मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात सह्याद्री वन्यजीव संस्थेच्या बचाव पथकाला यश आलंय. तनिष्क मल्होत्रा असं या तरुणाचे नाव असून तीन दिवसांपूर्वी मित्रांसमवेत फिरायला आला असताना तो समुद्रात बुडाला. तटरक्षक दलाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही . आज सकाळी अँडव्हान्स थर्मल ड्रोनच्या मदतीने त्याचा मृतदेह सापडला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Sept 09, 2025 16:33:58
Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवलीतील रेरा घोटाळा प्रकरणातील 65 इमारतीं संदर्भात मंत्रालयात बैठक.. Anc..कल्याण डोंबिवली महानगरपालिका रेरा प्रकरणातील ६५ इमारतीं संदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली. ही बैठक प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या दालनात पार पडली. या आधी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते 65 इमारतींमधील कोणत्याही कुटुंबाला बेघर व्हावे लागणार नाही. त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत सूचना मांडण्यात आल्या. या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत. खरे गुन्हेगार विकासक असून त्यांच्यावर कारवाई व्हावी. शासनाने आज मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून भविष्यात या इमारतींवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून जनतेच्या न्यायासाठी ठोस निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.शासन यावर काय निर्णय घेतो याकडे सर्व रहिवासी चा लक्ष लागला आहे. या बैठकीस कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे , ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश म्हात्रे ,महसूल विभागाचे अधिकारी, नगर विकास विभागाचे अधिकारी तसेच ६५ इमारत बचाव समितीचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 09, 2025 16:16:18
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली छेडा रोडवर वृद्ध महिलेला ठेकेदाराच्या गाडीची धडक – CCTV मध्ये कैद! KDMC पथदिवे दुरुस्तीच्या गाडीने महिलेला उडवले, गंभीर जखमी अपघातानंतर पाऊण तास उलटला तरी पोलीस घटनास्थळी नाही – नागरिकांचा संताप. संबंधित ठेकेदार व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
14
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 09, 2025 16:16:08
Thane, Maharashtra:
ब्रेकिंग... रिल बनवण्याच्या नादात दोन बहीणीच्या जीवावर बेतला... वासुंद्री जवळ काळू नदीत दोन बहिणी बुडाल्या.. ॲंकर... कल्याण तालुक्यातील मांडा-टिटवाळा परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. मांडा येथील पाटील नगर परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी रिल बनवण्यासाठी वासुंद्री जवळ काळू नदीकाठी गेल्या असता नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साधारण सव्वा दोनच्या सुमारास पाटील नगरातील आलिया अन्सारी (१८) आणि तिची लहान बहीण सना अन्सारी (८) या दोघी रिल बनवण्यासाठी वासुंद्री जवळ काळू नदीकाठी गेल्या होत्या. दरम्यान, नदीत अचानक पाण्याची पातळी वाढल्याने व प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघींचा तोल गेला व त्या पाण्यात बुडाल्या. काही क्षणात ही घटना घडल्याने आसपासच्या लोकांना मदतीला धाव घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. या घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका टिटवाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. एपीआय नलावडे यांनी तातडीने केडीएमसीच्या अग्निशमन दलाला संपर्क साधून मदतीसाठी बोलावले. अग्निशमन दलाचे सब फायर ऑफिसर तडवी यांच्या मार्गदर्शनाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले. सब फायर ऑफिसर जयेश मोरे यांच्यासह दलातील जवानांनी नदीत शोधमोहीम राबवली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आलिया अन्सारीचा मृतदेह सापडला व तो बाहेर काढण्यात आला. दुर्दैवाने ती वाचू शकली नाही. मात्र तिची लहान बहीण सना अन्सारी हिचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. या शोधमोहीमेकरिता पथक नदीच्या खोल भागात जाऊन प्रयत्नशील आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील नगर परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. पाण्यात बुडून झालेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा नदीकाठच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 09, 2025 15:48:03
Kalyan, Maharashtra:
टिटवाळा मध्ये काळूनदीत दोन बहिणी बुडल्याची दुदैवी घटना... Anc...कल्याण-टिटवाळातील मांडा पश्चिमेतील वासुद्री रोड परिसरातील गणेश नगर परिसरातील राहणाऱ्या दोन बहिणी दुपारी कपडे धुवण्यासाठी काळूनदी शिवमंदिर येथील नदी काठी गेल्या असता.नदीत पाणी वाढले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघी बहिणी पाण्यात बुडल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात शोककळा पसरली. केडीएमसीच्या अग्निशमन दलाला कळविले असता अग्निशमन दलाचे टीमला पाठविले दोन तासाच्या अथ्थक प्रयत्नाने रिया अन्सारी 18 वर्षे वय हिचामुत्यु देह अग्निशमन दलाच्या हाती लागला तो पाण्याबाहेर काढण्यात आला.तर आठ वर्षीय सिना अन्सारी हिचा शोध सुरूआहे अग्निशमन दला कडून मिळाली. लागला नव्हता., तर बुडण्याचा आगोदर पाण्यात कपडे धुण्याचा व्हिडीओ हा अखेर चा ठरला आणि काळाने घाला घातला.
14
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 09, 2025 14:50:39
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 0909_WARDHA_SCHOOL_LOCK शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी ठोकले शाळेला कुलूप कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी पालकांचा एल्गार चार शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीनंतर तात्काळ शिक्षक देण्याची मागणी वर्धेच्या विजयगोपाल येथील प्रकार विजयगोपाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर विद्यार्थ्यांसह पालकांचा ठिय्या अँकर : वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील जिल्हा परिषद शाळेला चक्क शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळेच्या प्रवेश द्वारालाच कुलूप ठोकले आहे. 130 इतकी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पाच शिक्षक कार्यरत होते. अचानक चार शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आलीय. त्यामुळे विदयार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरनिवर आलाय. कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी होत आहेय. पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकत शाळेसमोर ठिय्या मांडलाय. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत कुलूप उघडदार नसल्यांचा पालकांनी पवित्रा घेतलाय. शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणांचा पालकांनी  निषेध नोंदविला. चार शिक्षकांची ऑनलाइन बदली झाल्याने एका शिक्षकावर 130 विद्यार्थ्यांना शिकवण्याचा भार आल्याने पालक संतप्त झाले. बाईट - किरण ठाकरे, आंदोलक
14
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 09, 2025 14:49:42
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला शहरातील रामदास पेठ परिसरात अचानक एका चारचाकी वाहनाला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, आगीत गाडी जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास रामदास पेठ पोलिसांकडून सुरू आहे.
14
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 09, 2025 14:49:28
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात खड्ड्यांमुळे मालवाहु  टेम्पो पलटी Ulh potholes Anchor  उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्ते धोकादायक बनले आहेत .या जीवघेण्या खड्ड्यांमुळे आज दुपारी शहरातील  कॅम्प नंबर 5 भागातील आनंद पुरी दरबार रस्त्यावर एक मालवाहतूक टेम्पो खड्ड्यात अडकून पलटी झाला.  सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही मात्र यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले .या रस्त्यामुळे शहरात रोज अपघात होत असतानाही महापालिका मात्र काहीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही.तर शहरातील लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष झालय, चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
14
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 09, 2025 14:01:16
Pandharpur, Maharashtra:
09092025 slug - PPR_MOHITE_DELHI. file 01 ---- Anchor - माढयातील मुरुम उत्खनन प्रश्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नेला थेट दिल्ली दरबारी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातील कुर्डू येथील वनविभागाच्या जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरूम उत्खननाच्या बाबतीत केंद्रीय वनसचिव श्री तनमय कुमार यांची भेट घेतली आहे. कुर्डू येथील वन जमीनित मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरूम उत्खनन सुरू आहे याला आळा घालण्यासाठी स्थानिक आरएफओ यांनी वारंवार प्रयत्न केले. परंतु कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातून या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती खासदार मोहिते पाटील यांनी केंद्रीय वनसचिवांना केली आहे. तसेच उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्याची विनंती केली आहे.
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 09, 2025 13:22:42
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत पोलिसांची मोठी कारवाई! मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांसाठी डोकेदुखी आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेडया.. बाईकच्या शोरूमच्या ऍड्रेस वरुण केला चोरांचा पर्दाफाश. अंतरराज्यातील चोरांमुळे महाराष्ट्र पोलिसांची डोकेदुखी वाढली.. Anc..मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करणाऱ्या उत्तरप्रदेशातील दरोडेखोर टोळीची डोंबिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीवर हत्या ,जबरी चोरी सह अनेक गुन्हे दाखल असून पोलिसांनी अटक केलेल्या अभय सुनिल गुप्ता ,अभिषेक ओमप्रकाश जौहरी , अर्पित उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला या तिन्ही आरोपीकडून डोंबिवली, मानपाडा, पुणे याठिकाणी केलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करत गावठी रिव्हॉल्वर ,लाखो रुपयांचा ऐवज, चोरीची मोटारसायकल देखील जप्त केली आहे विशेष म्हणजे या आरोपीच्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी 106 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची पाहणी करत, बाईकवर असलेल्या ऍड्रेस वरुण पोलिसांनी शोध लावत आरोपींना बेड्या ठोकण्यामध्ये यश मिळाले आहे.अभय सुनील गुप्ता ,​अभिषेक ओमप्रकाश जोहरी ​अर्पित उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला असे पोलिसांच्या तावडीत मिळालेले या आरोपींची नावे असून ​या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचा रिव्हॉल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि चोरीचे सोन्याचे दागिने असे एकूण 3 लाख 80 हजार 420 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केला या टोळीच्या अटकेमुळे ठाणे आणि पुणे जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे या टोळीतील अभिषेक जोहरी आणि अर्पित शुक्ला यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये खून, शस्त्र अधिनियम आणि दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना सध्या पोलीस कोठडी मिळाली असून, पुढील तपास सुरू आहे. बाईट...अतुल झेंडे ( कल्याण डीसीपी)
14
comment0
Report
Sept 09, 2025 13:06:02
Darwha, Maharashtra:
दारव्हा तहसील कार्यालयात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अवैध जन्म प्रमाणपत्र प्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे. २०२४ मध्ये दाखल झालेल्या १८०० जन्म दाखल्यांपैकी तब्बल ७०० अर्ज अवैध असल्याचं प्राथमिक तपासणीत समोर आलं. तहसीलदारांनी तपासलेल्या १५० अर्जांपैकी २५ अर्ज अवैध असल्याचं स्पष्ट झालं आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, दहा दिवसांत सर्व अपात्र अर्ज मागे घेऊन कारवाई केली जाईल, असं तहसीलदारांनी आश्वासन दिलं आहे."
16
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 09, 2025 13:00:30
Yavatmal, Maharashtra:
AVB यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्ष जातीयवादी असून मराठा कुणबी समाजालाच संधी दिल्या जाते व बहुजनांवर मात्र अन्याय होतो. राहुल गांधी यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना काँग्रेसमध्ये काहीच किंमत नाही, राज्यातील काँग्रेसची सूत्रे विशिष्ट जातीच्याच लोकांच्या हाती असल्याने बहुजनांना न्याय मिळत नाही. बंजारा समाजाला सन्मान जनक वागणूक मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सतरा उमेदवारांपैकी नऊ उमेदवार मराठा कुणबी समाजाचे होते तर विधानसभा निवडणुकीत 102 जागांपैकी 51 जागा मराठा कुणबी समाजाला दिल्या. अठरापगड जातीत विखुरलेल्या ओबीसी समाजावर मात्र अन्याय केला. काँग्रेसच्या सत्ता काळात 80 टक्के मराठा कुणबी समाजाचे मंत्री राज्य करीत होते असे त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे. येत्या 13 सप्टेंबरला भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
14
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 09, 2025 12:47:55
Dhule, Maharashtra:
Anchor- धुळे जिल्ह्यात जनावरांवर लंपी सदृश्य आजार असताना देखील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरवण्यात आला आहे, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका आणि धुळे शहरात या लंपी सदृश्य आजाराची जनावरे आढळून आले आहेत त्यामुळे प्रशासनाने काही निर्बंध घालण्यात आले आहेत, मात्र असताना देखील धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरवण्यात आला आहे. पावसाळ्याआधी जनावरांच्या किमती कमी झाल्या होत्या मात्र आता किमतीत देखील वाढ झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ऊस तोडीसाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि त्यामुळे या किमती वाढल्या असल्याच शेतकऱ्यांनी सांगितला आहे... प्रशांत परदेशी, धुळे.
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 09, 2025 12:47:27
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0909ZT_CHP_420_CONTRACTOR ( single file sent on 2C)  टायटल :--- चंद्रपूरमध्ये शासकीय कंत्राटदार असल्याचा बनाव करून ४० लाखांची चोरी,आंतरराज्यीय टोळीला एलसीबीकडून अटक अँकर :----चंद्रपूरमध्ये शासकीय कंत्राटदार असल्याचा बनाव करून तब्बल ४० लाखांचा कॉपर केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. बीएसएनएलच्या कनिष्ठ अभियंत्याने दिलेल्या तक्रारीवरून सुरू झालेल्या तपासात पोलिसांनी कोसारा परिसरात छापा टाकून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी उत्तरप्रदेशातील बदायु येथील असून, त्यांच्या ताब्यातून ४४ लाखांहून अधिक किमतीचा कॉपर केबल ल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. बाईट १) अमोल काचोरे , पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 09, 2025 12:34:56
Dhule, Maharashtra:
anchor - महाराष्ट्रातील भाजपाची सरकार आदिवासी विरोधी सरकार आहे, असा आरोप के.सी. पाडवी यांनी करत, बंजारा समाज आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये १९७६ मध्ये एस टी प्रवर्गामध्ये आले आहेत, त्यामुळे हे महाराष्ट्रात होऊ नये, असं पाडवी यांनी सांगत, महाराष्ट्रात भाजपशीत सत्ताधाऱ्यांनी एस टी त बंजारा समाजाला समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो, अणू बॉम्ब चा विस्फोट केल्यासारखा प्रकार घडेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. देशात आणि राज्यात कुणीही उठत आणि अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मागतो, राज्य घटनेत अनुसूचित जमाती ची सूची दिली आहे, त्या शिवाय दुसऱ्या जातींना यात आरक्षण देने शक्य नाही, असं पाडवी यांनी स्पष्ट केले आहे. सगळे बोगस जाती आदिवासीत समाविष्ट करण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे आदिवासींच्या सवलत बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असं आरोप्प पाडवी यांनी केला असून, केंद्रातील आणि राज्यातील सरकार आदिवासींच्या विरोधी आहे विशेषता भाजप सरकार हे आदिवासींच्या विरोधात आहे असं आरोप करती, महाराष्ट्रातील सरकार धनगरांच्या बाजूनी आहे, असा सांगत आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यामुळे न्यायालयाने देखील लढाई लढण्याची तयारी पाडवींनी व्यक्त केली. आम्ही न्यायालयाच्याही निकाल मानणार नाही कारण न्यायालयात पैशांच्या आधारावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणारी खूप आहेत, असा सांगत सरकारने ट्रायबल ॲडव्हायझर कमिटीला विचारल्याशिवाय कुठलाही निकाल घेतला तर सरकारला भारी पडणार, असा इशारा पाडवी यांनी दिला आहे byte - अड के सी पाडवी, माजी आदिवासी विकास मंत्री प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 09, 2025 12:30:59
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_RIVER_MURTI साताऱ्यात गणेशोत्सवानंतर संगम माहुली येथे कृष्णा नदी पात्रात झालेल्या गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर तिथे गणपतीमुर्ती या नदीपात्राच्या बाहेर आल्या होत्या या मुर्त्यांचं पुनविसर्जन आणि संगममाहुली घाटाची साफसफाई स्वच्छता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा , RSS , नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, गुरू एकॅङमी आणि माहुली ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले. यादरम्यान राजघाट आणि छत्रपती शाहुमहाराज समाधी परिसर स्वच्छता करण्यात आली..
14
comment0
Report
Advertisement
Back to top