Back
धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, सहा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू!
MMMahendrakumar Mudholkar
Aug 30, 2025 06:17:45
Beed, Maharashtra
बीड: पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे राहिले!
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना उडविले; सहा तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
Anc: बीड मधून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनासाठी सहा जण निघाले होते. मात्र नामलगाव फाटा येथील उड्डाणपूला जवळ भरधाव येणाऱ्या कंटेनरने या सहा जणांना उडवले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय.
आकाश कोसळे, दिनेश पवार, विशाल काकडे, किशोर तावरे, अनिकेत शिंदे आणि पवन जगताप अशी मृतांची नावं आहेत. यातील सर्वजण पंचविशीच्या आतील आहेत. यातील काही तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. या अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मृत झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आक्रोश करत हंबरडा फोडला.
धुळे सोलापूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी गडी जवळ सहा तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले होते. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट निर्माण झाल्याने प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 30, 2025 12:49:14Beed, Maharashtra:
बीड : सहा तरुणांचा अपघातानंतर मृत्यू संतप्त नातेवाईकांचा संताप; टोल नाका बंद , आयआरबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Anc : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. देवदर्शनाला निघालेल्या सहा तरुणांचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी अंत झाला. या अपघाताला थेट आयआरबीच्या निष्काळजी कामाला जबाबदार धरत मृतांच्या नातेवाईकांनी टोल नाका बंद करून आंदोलन सुरू केले आहे. महामार्गावर आयआरबीकडून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खोदलेले खड्डेच या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता आयआरबीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. संतप्त नातेवाईकाच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी धाव घेत आहेत.
0
Report
ABATISH BHOIR
FollowAug 30, 2025 12:47:06Kalyan, Maharashtra:
चेहरा ब्लर करणे....
इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग,
टिटवाळ्यात प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या,
टिटवाळा पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात,
Anc : सोशल मिडियाच्या माध्यमातून आधी मैत्री केली, आणि नंतर तिचे दागिनेही घेतले, सोशल मिडियावर व्हिडिओ टाकून तुला बदनाम करणार अशी धमकी प्रियकराने दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण नजीकच्या एका गावात घडली आहे, व्हिडिओ कॉल करुन तरुणीने आत्महत्या केली असल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला आहे, तिच्या प्रियकराने आणखीन काही तरुणींना अशाच प्रकारे फसविले असल्याचा आरोप केला जात आहे,ऋतिक रामदास राेहणे, या नावाच्या तरुणाला टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे,
Vo कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे, एका तरुणीने तीन दिवसापूर्वी घराच्या टेरीसवर जाऊन गळफास घेतला, नातेवाईकांनी मुलींना नजीकच्या गोविली शासकीय रुग्णालयात नेले, डॉक्टरांनी तिला मृत घाेषित केले, मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन टाकला, या प्रकरणात शवविच्छेदन झाले नाही, डॉक्टरांनी ते करणे गरजेचे होते, मात्र ते करण्यात आले नाही, मुलीच्या अंत्यविधीनंतर नातेवाईक घरी आले, मुलीचा मोबाईल हाती घेतला, तेव्हा हैराण झाले, कारण तरुणी ही एका तरुणाच्या संपर्कात होती, तो तरुण तिचा प्रियकर होता, तिने त्याला व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या केली, ऋतिक राेहणे, या नावाच्या तरुणाने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली, कोणत्या कोणत्या बहाणीने त्याने तिचे दागिेन घेतले, एकतर दागिने देत नव्हता, तरुणी जेव्हा विचारायची दागिने दे, तेव्हा तो तिला ब्लॅक मेल करीत होती, तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकणार असा तिला तो धमकावित होता, या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या, तरुणीच्या वडिलांचा आरोप आहे की, केवळ हा प्रकार माझ्या मुलीसोबत केला नाही, तर अन्य मुलीसोबतही ही असाच प्रकार केला आहे, माझ्या मुलीसोबत जे घडले, ते दुसऱ्यांच्या मुलींसोबत घडू नये,ऋतिक रोहणे, यांच्या विरोधात कठाेर कारवाई करा, याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी ऋतिक रोहणे, याला ताब्यात घेतले आहे,त्याने असा प्रकार अन्य किती मुलींसोबत केला आहे, याचा तपास आत्ता पोलिस करणार आहेत,
बाईट....मृत्यू तरुणीची, आई,
बाईट.. मृत्यू तरुणीचे वडील
0
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 30, 2025 12:34:29Raigad, Maharashtra:
स्लग - महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका ..... मंत्री भरत गोगावले यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर .....
अँकर - महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांना दिलंय. मनोज जरांगे पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यावर ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 4 महिन्यांची मुदत दिली होती त्यामुळे ते आले आहेत. यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ अजिबात नाही. पण त्यांना एकनाथ शिंदे यांनी मोर्चा काढायला लावला असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, आणि एकनाथ शिंदे असा विचार करणार नाहीत, असं गोगावले म्हणाले.
बाईट - भरत गोगावले,मंत्री
0
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 30, 2025 12:33:38Washim, Maharashtra:
वाशिम:
File:3008ZT_WSM_KADU_BYTE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम
अँकर:प्रहारचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा आज वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथून सुरू झाली.ही यात्रा शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या न्यायाच्या प्रश्नांसाठी राज्यभर काढण्यात आली आहे.कडू यांनी सांगितले की,28 ऑक्टोबरला मुंबईच्या दिशेने मोर्चा निघेल आणि कर्जमाफी व हमीभावाशिवाय परतणार नाही.मुख्यमंत्री व बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली असली तरी मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही,समितीचे अध्यक्षही नेमलेले नाहीत.मनोज जरांगे आंदोलनाबाबत ते म्हणाले की,आंदोलकांना शत्रू समजू नये,त्यांचे व्यवस्थापन योग्यरीत्या करणे ही सरकारची जबाबदारी आहे.हॉटेल-चहापाणी बंद करणे ही मोगलशाही आहे.कडू यांनी सरकारला प्रश्न विचारले की,ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी कधी होणार?सोयाबीनला वचन दिलेले सहा हजार,तसेच कापसाला हमीभावावर खरेदी व बोनस देणार का नाही?
बाईट :बच्चू कडू, प्रहार
0
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 30, 2025 12:31:29Pandharpur, Maharashtra:
30082025
Slug - PPR_JUGAR_ADDA
file 02
----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावात राज्य परराज्यातून जुगारींचा मेळा, हॉटेल मटन भाकरीच्या परिसरात जुगार चालत होता मोठा जुगारी अड्डा , पोलिसांनी केलेल्या कारवाईत 52 पत्त्यांचा डाव खेळत असताना 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये 2 कोटी 68 लाख 72 हजार 150 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.
सांगोला तालुक्यातील सोनंद याठिकाणी हॉटेल मटन भाकरीच्या परिसरात सिमेंट पत्र्याच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. विनापरवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) आणि शंभुलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी जि. बेळगाव) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली आहे .यामध्ये रोख रक्कम 16 लाख 9 हजार 62 रोख रक्कम, 62 मोबाईल, 26 चारचाकी वाहन, 61 दुचाकी वाहने आणि देशी विदेशी दारू असा एकूण 2 कोटी 68 लाख 72 हजार रुपये मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 50 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई पंढरपूर उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने केली आहे.
0
Report
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ: कापसावरील आयात शुल्क रद्द केल्याने शेतकऱ्यांची कोंडी होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. अमेरिकन कापूस विनाशुल्क भारतात येणार असल्याने देशातील कापसाला योग्य भाव मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यवतमाळच्या रातचांदना येथे शेतकरी नारायणगाव बेंडे, शुभम बेंडे व अभय बेंडे यांनी संभाजी ब्रिगेड व शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आक्रोश मांडला. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याची भूमिका संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे व शेतकरी आंदोलक सचिन मनवर यांनी स्पष्ट केली. शेतकरी संघटनांनी सरकारने तातडीने हा निर्णय पुनर्विचार करून कापसाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी केली आहे.
0
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 30, 2025 12:01:30Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी जरांगे बसले आहेत- हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका - मंत्री चंद्रकांत पाटील
अँकर - ना ईलाजला कोणताही इलाज नाही. ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.तसेच हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका,अशी भावनिक साद ही घातली,ते सांगलीच्या पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत, अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत. या आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत दिली आहे.कुणबी नोंद मराठवाड्यात लवकर सापडत नाही. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली त्यातून ५८ लाख नोंदी सापडल्या. एक नोंद दहा दाखले देऊ शकते. या देशाचा कायदा आहे जातीची नोंदी वडिलांकडून काढावी लागते.सरसकट मराठ्यांना कुणबी करा हे कोणत्याही कायद्यात नाही. सुप्रीम कोर्टाने देखील ते म्हटले आहे,अशी मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाही. प्रॅक्टिकल नियमांनी या. लोकशाहीत काहीही म्हणायला आणि आणायला परवानगी आहे. पण मुंबई सारखे शहर विस्कळीत करता येणार नाही. मुंबईतल्या सर्व सामन्यांचा काय दोष? ट्रॅफिक जाम झाले आहे. जरांगे यांनी आवाहन करून देखील त्यांचे कोणी ऐकत नाही.तोडगे जे जे काढत आले ते काढले. ना इलाज ला काही इलाज नाही, जे मान्य होणार आहे ते मान्य करू जे मान्यच नाही होणार याचा हट्ट का? तसेच
एकनाथ शिंदे यांनी कोणताही खोट आश्वासन दिले नाही. त्यांनी जे लिहून दिले ते सर्व आश्वासन पूर्ण झाले आहे. त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल कराव्यात.
बाईट :- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
2
Report
Waghapur, Maharashtra:
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा सन्मान
यवतमाळ : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन शहरातील अमोलकचंद महाविद्यालय सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख आणि पोलीस बॉईज राहुल सुभाष वंजारी यांना जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या हस्ते गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तसेच हॉकिसंघाचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 30, 2025 11:04:29Akola, Maharashtra:
Anchor : मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा माझा वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लक्ष्मण हाकेचं नाव न घेता मिटकरी म्हणाले की, या आंदोलनाला जाणीवपूर्वक काही लोक टीका-टिप्पणी करत आहेत तर आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.सरकारने संविधानिक मार्गाने आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली. तसेच, मुंबईत गेलेल्या आंदोलकांचे हाल होऊ नयेत, याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
Byte : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
4
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 30, 2025 11:04:03Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
फीड 2C
बाळासाहेब थोरात ऑन मराठा आरक्षण
Anc:-
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका सांगत असतानाच राज्य सरकारने ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ते गावोगावी भांडण लावत फिरत असल्याचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच नाव न घेता टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही प्रयत्न केला होता. पुन्हा तोच प्रयत्न होऊन आरक्षण मिळायला पाहिजे, जो मराठा समाजातील गरीब घटक आहे त्याला ती संधी मिळाली पाहिजे.. काही मंडळी दुर्दैवाने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत यात राजकारण करायला नको असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे.
बाईट:- बाळासाहेब थोरात, काँग्रेस जेष्ठ नेते
4
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 30, 2025 11:01:12Nashik, Maharashtra:
*Breaking.... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )*
Anc: बागलाण तालुक्यातील अंबासन गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील एका डुक्कर मालकाने स्वतःच्या डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची घटना समोर आली असून, यात सुमारे वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत काही मांजऱ्यांचाही बळी गेला आहे. विशेष म्हणजे ही घटना गावातील सावता चौक व अंगणवाडी केंद्राजवळ घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडी परिसरात लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे.
गावातील अंगणवाडी परिसरात विष दिलेले खाद्य टाकण्यात आले होते. परिणामी परिसरात फिरणाऱ्या अनेक कुत्र्यांनी ते अन्न खाल्ले आणि काही वेळातच तडफडून मृत्यूमुखी पडले. मृत्यूमुखी पडलेले कुत्रे आणि मांजरी काही काळ परिसरात पडून होते, त्यामुळे या दृश्याने गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली. जायखेडा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
2
Report
JMJAVED MULANI
FollowAug 30, 2025 11:00:58Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3008ZT_INDAPURCYCLEBHRNE
FILE 4
इंदापुरात कृषिमंत्र्यांचा सायकल वरून फेरफटका....* इंदापुरात सायकल बँक उपक्रमाचे मंत्री भरणे यांच्या हस्ते लोकार्पण....
Anchor इंदापूर पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने इंदापुरात सायकल बँक उपक्रम राबवण्यात आलाय. याद्वारे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना 111 सायकलींचे वितरण राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शालेय विद्यार्थिनींसोबत इंदापूर शहरातून सायकलवरून फेरफटका मारलाय..
2
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 30, 2025 11:00:33Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
फीड 2C
हर्षवर्धन सपकाळ ऑन मराठा आंदोलन
Anc:-
मागील दोन दिवसांपासून मुंबईत मराठा आंदोलक आरक्षणाची मागणी घेऊन आंदोलन करत आहेत...मात्र त्या ठिकाणी आंदोलकांचे हाल होत आहेत, त्यांना जेवण देखील मिळत नाही... यावरून सरकारवर टीका होत आहे, याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर निशाणा साधला असून हा सरकारचा कुटील डाव असल्याचा स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे... मराठा आरक्षणाचा आंदोलनाला सामाजिक आयाम आहे, त्या दृष्टिकोनातूनच याकडे पाहिलं पाहिजे... सागर बंगल्यावरून ओबीसीने मराठा जो बाद पेरला गेला त्याला कुठेतरी तिलांजली देण्याची वेळ आली आहे... मराठा आंदोलन काय झोपेतून उठून आंदोलनाला गेलेले नाहीत...त्यांच्या तारखा आधीपासून निश्चित होत्या, मग त्या वेळेला पोलीस यंत्रणा आणि सरकार काय झोपलेले होते का? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
बाईट:- हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
हर्षवर्धन सपकाळ ऑन काँग्रेस भूमिका
And:-
सुरुवातीपासूनच काँग्रेस मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे ज्यावेळी सर्व पक्षीय बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी घेतलेली भूमिका सर्वांना माहित आहे त्यानंतर विधानसभेमध्ये ज्यावेळेस आरक्षणाबाबत मतदान झालं त्यावेळी देखील काँग्रेसने मराठा आरक्षणाच्या बाजूनेच मतदान केला आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटल आहे... गेल्या वेळी नव्या मुंबईपर्यंत आलेल्या आंदोलकांना याच सरकारने कुठला शब्द दिला होता ज्यामुळे गुलाल उधळला गेला तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे त्या भूमिकेपासून त्यांनी आता पळ काढू नये राज्यात असलेल्या 52% आरक्षण हे वाढवून त्यामध्ये मराठा समाविष्ट सामावून घ्यावे ही काँग्रेसची भूमिका आहे या सरकारकडे 240 आमदार आहेत त्यामुळे काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी असं म्हणूनच चुकीचा आहे असं देखील सपकाळ यांनी म्हटलं आहे
बाईट:- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ ऑन obc आंदोलन
Anc:-
मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू झाले आहेत यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली असून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून चितावणी फोर वक्तव्य करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा काम सुरू आहे वास्तविक ओबीसी आरक्षणातील वेगवेगळ्या घटकाचे आरक्षण आणि मराठा आरक्षण यांचा संभ्रम निर्माण केला जातो तो तरकाला सोडून असल्याचं म्हटलं आहे केव्हा राजकारणाला राजकारण म्हणून असं करणं चुकीचं असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे
बाईट:- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ ऑन भाजप आमदार
Anc:-
मनोज जरांगे हे शरद पवारांचे सुसाईड बॉम्बर आहेत अशी टीका भाजपच्या आमदारांकडून होत आहे यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा स्वरूपाचे वक्तव्य करणं चुकीच आहे असं म्हंटल आहे... देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही स्वरूपातील मेरिटची चर्चा करत नाहीत... त्यांनी काही असे लोक सोडले आहेत ते केवळ विरोधकांवर टीका करतात... पूर्वीच्या काळात पूर्वी साहित्यिक, विचारवंतांना सोबत ठेवल जायचं, मात्र आता देवेंद्र फडणवीस हे केवळ वाचाळवीरांना आपल्या सोबत ठेवत आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली.
बाईट:- हर्षवर्धन सपकाळ , प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
2
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 30, 2025 10:35:47Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारी नोकरीत समावेशन व विविध मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. १५ टक्के मानधन वाढ तत्काळ लागू करणे, बदली धोरण, भविष्यनिर्वाह निधी व विमा योजना, शैक्षणिक पात्रता व कामाच्या जबाबदारीनुसार वेतन सुसूत्रीकरण, सेवेत असताना मृत्यू झाल्यास ५० लाख व अपंगत्व आल्यास २५ लाख सानुग्रह अनुदान आदी १८ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात, अशी आंदोलकांनी मागणी केली आहे.
बाईट :
7
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 30, 2025 10:33:57Washim, Maharashtra:
वाशिम :
File:3008ZT_WSM_KADU_HAKK_YATRA
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर: प्रहारचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा आज वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथून सुरू झाली असून
शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग, मेंढपाळ व मच्छीमार यांच्या न्यायाच्या प्रश्नांसाठी ही यात्रा राज्यात काढण्यात आली आहे.आज या यात्रेच्या जिल्ह्यातील शेंदुरजना, शेलुबाजार मार्गे जाणार जाऊन सायंकाळी कळंबा माहली येथे जाहीर सभा होणार आहे.उद्या ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे.
7
Report