Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402305

टीईटी अनिवार्यता से शिक्षक परेशान? सर्वोच्च अदालत का फैसला पलट सकता है

PPPRAFULLA PAWAR
Sept 19, 2025 02:16:50
Raigad, Maharashtra
स्‍लग - निम्‍मी नोकरी संपल्‍यावर शिक्षकांवर आता टीईटी परीक्षेचे ओझे ........... सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे मोठा पेच ........ अन्‍यथा शिक्षकांना नोकरी गमावण्‍याची भीती ........ राज्‍यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्‍या ........... सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्‍याची मागणी ......... अँकर – सेवेत कायम रहायचं असेल तर शिक्षकांना आता टीईटी म्‍हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं बंधनकारक करण्‍यात आलंय. वयाची ५२ वर्षे उलटून गेलेल्‍या शिक्षकांना यातून वगळण्‍यात आलंय. मात्र सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या एका निर्णयामुळे शिक्षकांपुढे मोठा पेच निर्माण झालाय. परीक्षा पास झाले नाही तर शिक्षकांवर नोकरी गमावण्‍याची वेळ येवू शकते. या विरोधात आता राज्‍यातील शिक्षक संघटना एकवटल्‍या आहेत. निम्‍मी नोकरी झाल्‍यावर शिक्षकांनी पात्रता परीक्षा द्यायची का असा सवाल या संघटनांनी उपस्थित केलाय. राज्‍य सरकारने सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निर्णया विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. बाईट – राजेश सुर्वे, राज्‍याध्‍यक्ष महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षक परीषद, प्राथमिक
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 19, 2025 04:04:31
Yavatmal, Maharashtra:AVB यवतमाळमध्ये सर्वत्र शिक्षा समिती नावाच्या NGO कडून शेकडो बेरोजगारांची फसवणूक झाल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली या NGO ने उमेदवारांकडून अर्जासाठी ३०० रुपये तर "सिक्युरिटी डिपॉझिट" च्या नावाखाली १५,५०० रुपये घेतले. कुठलीही शासकीय मान्यता नसताना या उमेदवारांना जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांतून "बालसंस्कार" कार्य देण्याचे आमिष दाखविण्यात आले; हा गंभीर प्रकार उजेडात येऊनही आरोपीवर कारवाईस शिक्षण विभागाकडून टाळाटाळ केल्या जात असल्याचा आरोप मनविसे चे अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केला. बाईट : अभिजीत नानावटकर अध्यक्ष मनविसे
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 19, 2025 04:04:17
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_fire देवळालीत दुचाकी पेटली अँकर नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात असलेल्य वडनेर रोडवरील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सार्वजनिक अभ्यासिकेत वाचनालयाच्या आलेल्या सूरज शहाणे या युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने परिसरात धावपळ उडाली. वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल राज यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. विद्यार्थी व नागरिकांच्या मदतीने फायर एक्सर्टिग्विशर व ड्राय केमिकल पावडर वापरून आग आटोक्यात आणून आग विझवण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचे नुकसान झाले. वायरीच्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचा अंदाज अग्निशमन जवानांनी व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 19, 2025 04:01:18
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Drowning Feed on - 2C ------------------------------ Anchor -तलावात बुडून पंधरा वर्षाच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील किवळा येथे घडली. नांदेडमधील काही युवक फिरण्यासाठी कंधारला गेले होते. परतताना ते किवळा गावाजवळील धबधबा पाहण्यासाठी गेले. तेथे फोटो काढताना आणि आंघोळ करण्याच्या दरम्यान दोघेजण पाण्यात बुडाले. बळीरामपूर येथील रहिवासी शेख बाबर शेख जाफर आणि जुन्या शहरातील उमर कॉलनीतील रहिवासी मोहम्मद रेहान मोहम्मद युसुफ हे दोघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गोदावरी जीव रक्षक दलाने विशेष प्रयत्न करून दोन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. ------------------
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 19, 2025 03:50:04
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Wagholi Rain Traffic File:01 Rep: Hemant Chapude(Wagholi) वाघोली उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग – वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त Anc :पुणे शहराच्या वाघोली उपनगरात आज पहाटे पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. मुसळधार पावसामुळे दुकानाभोवती मोठ्या प्रमाणावर पाणी साचून परिसराला तळ्याचे स्वरूप आलंय. पाण्यामुळे पुणे अहिल्यानगर महार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून दुचाकीस्वारांची चांगली तारांबळ झाली, अनेक वाहनं ठप्प झाली. परिणामी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. पादचार्‍यांचीही मोठी हालहाकी झाली असून प्रशासनाने नालेसफाई व पाणी निचरा याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया हवेली पुणे...
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 19, 2025 03:48:53
Mumbai, Maharashtra:अँकर -- महाराष्ट्रात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दहीहंडी, ईद-ए-मिलाद, मोहरम, शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती यांसह अनेक सण-- उत्सवादरम्यान सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मंडळ, एक पोलिस अंमलदार ही अभिनव योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय राज्यभरात 'एक मंडळ, एक पोलिस' योजना हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मंडळांची यादी तयार करण्यात येईल. एक अंमलदार एका (किंवा २-४) मंडळांसाठी नियुक्त केला जाईल. संबंधित अंमलदार मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहून आपली ओळख करून देईल. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सातत्यपूर्ण संवाद राखला जाईल. स्थानिक मंडळ व पोलिस प्रशासन यांच्यात थेट संपर्क, सणांदरम्यान अडचणींचे तत्काळ निवारण, कायदा-सुव्यवस्था टिकविणे व नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी, वाद, गैरसमज टाळून उत्सव शांततेत पार पाडणे आणि पोलिस-मंडळ समन्वय बळकट करून यशस्वी उत्सव साजरे करणे हा योजनेमागचा हेतू असल्याचे रश्मी शुक्ला यांनी आदेशात म्हटले आहे. अंमलदारांची जबाबदारी काय? मंडळाच्या कार्यक्रमांची माहिती संकलित करणे, परवानग्यांच्या पूर्ततेसाठी मदत करणे, मिरवणूक मार्ग, नियमांचे पालन याची खात्री करणे, ध्वनीप्रदूषण, आक्षेपार्ह गोष्टी टाळण्यासाठी दक्षता घेणे, वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे, उत्सवानंतर अहवाल सादर करणे ही पोलिस अंमलदारांचा मुख्य जबाबदारी असणार आहे. यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियमित बैठका घेऊन आढावा घेणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंमलदारांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. मनोज कुळकर्णी  Use file vdo 
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 19, 2025 03:48:47
Mumbai, Maharashtra:अँकर - एस टी ला गणपती पावला.  गणेशोत्सवादरम्यान केलेल्या जादा वाहतुकीच्या माध्यमातून राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला २३ कोटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागामधून ५ हजार बसद्वारे ५ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने प्रवास केला असून, ते आपापल्या गावी, वाड्या, वस्त्यांमध्ये सुखरूप पोहोचले. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये यंदा एसटीद्वारे ५ हजार जादा एसटी बसेसची सोय केली होती. या बसेसद्वारे १५ हजार ३८८ फेऱ्या कोकण मार्गांवर झाल्या. यासाठी राज्यभरातील १० हजारांपेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात चालक, वाहकांनी गणेशभक्तांची वाहतूक सुरक्षितरीत्या पार पाडली. ही कौतुकास्पद बाब असल्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी विविध आगारांतून आले होते. कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. मनोज कुळकर्णी  Use file vdo 
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 19, 2025 03:48:39
Nashik, Maharashtra:Breaking News - - नाशिकच्या इगतपुरी शहरात अवैध कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई - पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलांच्या सूचनेनंतर कारवाई - पोलीस निरीक्षक सारिका अहिराव यांच्या पथकाची कारवाई - घाटकोपरचा पारस भिसे व इगतपुरीचा नरेंद्र भोंडवे यांच्यावर गुन्हा दाखल - नामांकित बँका, फायनान्स व क्रेडिट कार्ड कर्ज वसुलीसाठी उभारलं होतं अवैध कॉल सेंटर - कॉल सेंटरवर ४० ते ५० कर्मचारी होते कार्यरत - कर्जधारक व नातेवाईकांना धमक्या, शिवीगाळ करून केली जात होती वसुली - पोलिसांनी २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल केलाय जप्त - इगतपुरी तालुक्यात आणखी किती अवैध कॉल सेंटर सुरू आहेत याचा शोध सुरू - यापूर्वीही इगतपुरीत अवैध कॉलसेंटर असल्याचे आले होते उघडकीस Byte - बाळासाहेब पाटील - पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 19, 2025 03:48:28
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_dhanyadukan ( धान्य दुकानांचे स्टॉक व्हिडिओ वापरा) सहा महिन्यांपासून उचल नाही, ३३ हजार लाभार्थीचे धान्य होणार बंद अँकर सहा महिन्यांपासून रेशन उचल न दुकानातून धान्याची करणाऱ्यांचा लाभ बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ३३ हजार ९५८ लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकान स्तरावर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आलेली असून, काम पूर्ण झाल्यानंतर लाभ बंद करण्यात येणारये....१२ हजार ६५३ रेशनकार्डच्या ३३ हजार लाभार्थ्यांनी सहा महिन्यांपासून धान्याची उचल केली नाही. यामुळे अशा लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यासाठी पुरवठा विभागाकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण लाभार्थ्यांच्या पडताळणीनंतर धान्य बंद करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 19, 2025 03:48:20
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_mobile कोटी १३ लाखांचे ६०३ चोरीस गेलेले मोबाइल परत अँकर हातातून हिसकावून मोबाइल लांबविणे, प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरणे अशा प्रकारातून हरविलेले ६०३ मोबाइल मूळ मालकांना नाशिक पोलिसांकडून परत देण्यात आले आहे..... बाजारात या मोबाइलची किंमत १ कोटी १३ लाख रुपये आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषकांची मदत घेऊन हरविलेल्या मोबाइलचा ट्रेस लावण्यात आलाय...पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार मोबाइल शोध विशेष पथक तयार करण्यात आले होते. यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ ते १५ स्वतंत्र कर्मचारी, तांत्रिक विश्लेषक यांचा समावेश होता. गुरुवारी झालेल्या विशेष कार्यक्रमात मोबाइल हरविल्याची फिर्याद देणाऱ्यांना मोबाइल सुपूर्द करण्यात आले. बाईट-संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 19, 2025 03:33:19
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पुरजन्य परिस्थिती, अक्कलकोट मधील भीषण परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा ( DRONE ) *ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर* - सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे आलापूर - जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आदी भागांमधील नद्यांना आला पूर - अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला - अक्कलकोट मधील पुराचा खास ड्रोन कॅमेराद्वारे आढावा घेतलाय नागेश राशिनकर यांनी... - पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट मधील अतिवृष्टीचा घेतला आढावा - ओढे, नाले ओव्हर फ्लो तर नैसर्गिक संकटामुळे शेतकरीराजा हतबल बाईट - जयकुमार गोरे ( पालकमंत्री, सोलापूर ) *ड्रोन सौजन्य - नागेश राशिनकर*
1
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 19, 2025 03:33:06
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1909ZT_CSN_MRI(1 FILE) छत्रपती संभाजीनगर |एमआरआय, सीटीस्कॅन आजपासून अर्ध्या शुल्कात घाटीत ६ वर्षांनंतर पुन्हा सवलतीत तपासण्या ANC : छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात म्हणजेच घाटीमध्ये अखेर आज १९ सप्टेंबरापासून सीटीस्कॅन, एमआरआय अर्ध्या शुल्कात होणार आहे. रुग्णांकडून जे शुल्क आकारले जाते, त्यातील ५० टक्के शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात येणार आहे. घाटीत गोरगरिबांना ७०० रुपयांत एमआरआय मिळण्यासाठी वर्ष २०१५-१६ मध्ये 'डीपीडीसी'मधून ५० लाख निधी देण्यात आला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये २० लाख निधी मंजूर झाला. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना सवलतीत 'एमआरआय' मिळू लागले. मात्र, २०१९ नंतर योजना बंद पडली. गोरगरिबांना पुन्हा 'एमआरआय' साठी २ हजार रुपये मोजण्याची वेळ आली होती. मात्र आज पासून रुग्णांचा यासाठीचा अधिकचा खर्च वाचणार आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top