Back
दारुच्या पैशासाठी घर पेटवणारा सुरेश काळे अटक!
SGSagar Gaikwad
Aug 05, 2025 06:16:28
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_home_fire
दारु पिण्यास पैसे न दिल्याने उत्तमनगरला घर पेटविले
अँकर
दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यास नकार दिल्याच्या रागातून राहते घर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या उत्तम नगर परिसरातील भगवती चौकात घडलाय... सुरेश काळे असं स्वतःचं घर पेटवून देणाऱ्या संशयीताच नाव आहे... याप्रकरणी अंबड पोलिसांनी काळे याला अटक केली आहे.. याबाबत काळे यांच्याच नातेवाईक असलेले संतोष काळे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती...संतोष काळे त्यांच्या दुमजली घराच्या तळमजल्यावर संशयित सुरेश काळे एकटा राहतो. काल दुपारी त्याने वरच्या मजल्यावर जाऊन कुटुंबीयांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यास नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात खाली उतरून घरासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीमधून पेट्रोल काढून तळमजल्यावर घरात जाऊन पेट्रोल ओतून देत घर पेटविले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून पसार झाला होता. घरातून बाहेर धूर येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाला माहिती कळविली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राच्या जवानांनी धाव घेत तातडीने पाण्याचा मारा करत आग विझविली. घरातील संसारपयोगी वस्तू या आगीत बेचिराख झाल्या आहेत....
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 05, 2025 15:04:32Khed, Maharashtra:
Feed 2C
Slug: Khed Kidnap Twist
File:07
Rep: Hemant Chapude(Khed)
“सैराट निघाला गैराट”
SLUG:
सैराट निघाला गैराट… खरपुडीतील आंतरजातीय विवाह प्रकरणात नवीन वळण
ANCHOR:काल पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं खरपुडी गाव संपूर्ण राज्याच्या चर्चेचा विषय ठरलं... कारण होतं – विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा आंतरजातीय विवाह. मात्र हा विवाह काहींना मान्य नव्हता… आणि त्यातूनच सुरू झाली एक सैराटसदृश घटना… पण आज या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे…
Vo...खरपुडी गावातील प्राजक्ता आणि विश्वनाथ गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला… पण प्राजक्ताच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता.
त्यामुळेच तिच्या आई, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी प्राजक्ताला मारहाण करत जबरदस्तीने घेऊन गेल्याचा प्रकार घडला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सैराटसारखी कथा खऱ्या आयुष्यात घडल्याचं चित्र निर्माण झालं.
Byte: विश्वनाथ गोसावीचा व्हिडिओ
(व्हिडिओचा छोटा अंश दाखवावा – "माझ्या पत्नीचं अपहरण झालंय... तिला धोका आहे")
Vo...ही घटना गंभीर बनली आणि खेड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तातडीने तपास सुरू केला.
संध्याकाळपर्यंत प्राजक्ताच्या वडील, आई आणि भाऊ प्राजक्ताला घेऊन थेट खेड पोलीस ठाण्यात आणत कोर्टात हजर केलं
Byte: अमोल मांडवे, पोलीस उपविभागीय अधिकारी:
Vo...प्राजक्ताने पोलिसांसमोर स्पष्ट भूमिका घेत, "माझ्या आई-वडिलांना आणि पतीला काहीही त्रास होऊ नये," असं सांगितलं. तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
मात्र, दुसरीकडे काशीद कुटुंबियांनी विश्वनाथ गोसावीबद्दल गंभीर आरोप केले आहेत.
"विश्वनाथ याचं आधीचं लग्न झालं आहे, आणि त्यांनी हे लपवलं. तसंच त्यांच्या आश्रमात अंधश्रद्धा पसरवली जात आहे, हे सत्य बाहेर यावं."
या आश्रमात ४० हून अधिक गाड्या, आलिशान खोल्या, आणि मोठी शेती असल्याची माहितीही समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर विश्वनाथ गोसावीचं चारित्र्य, त्याचं पूर्वीचं लग्न, आणि प्राजक्ताशी झालेलं नातं यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Byte: राजाराम काशिद (प्राजक्ताचे वडील)
Byte: वकील निलेश आंधळे (आरोपींच्या वतीने):
End Vo...तर खरपुडीतील सैराटसदृश प्रकरण आता अनेक वळणं घेत आहे...
मुलीच्या जबाबावर, आरोपींच्या चौकशीवर, आणि पोलिसांच्या तपासावर हे प्रकरण अवलंबून राहिलं आहे.
खरंच... सैराट निघाला गैराट...
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
4
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 05, 2025 14:16:06Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - माधुरी हत्तीनीला परत आणण्याचीच शिवसेनेची भूमिका - अनंत अंबानीशी लवकरच चर्चा करणार - उद्योग मंत्री उदय सामंत.
अँकर - माधुरी हत्तीन पुन्हा नांदणीला आणण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न प्रयत्न केले जातील,माधुरी हत्तीबाबत लवकरचं अनंत अंबानीशी चर्चा केली जाईल,अशी माहिती
शिवसेना शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.अनंत अंबानीशी संपर्क करण्याबाबतची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली, सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा जाऊन, माधुरीला परत आणण्याची शिवसेना शिंदे गटाची भूमिका असल्याचेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं,ते सांगलीमध्ये बोलत होते.
बाईट - उदय सामंत - उद्योग मंत्री.
10
Report
SMSarfaraj Musa
FollowAug 05, 2025 14:00:43Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - जम्मू-कश्मीर मधील सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी एक हजार तरुण विशेष रेल्वेने रवाना - मंत्री उदय सामंतांनी दाखवला झेंडा.
अँकर - देशाच्या जवानांच्यासाठी जम्मू कश्मीर मध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्स्प्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला.एक हजार तरुण 9 ऑगस्ट रोजी जम्मू कश्मीर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ महाराज शिंदे यांच्या उपस्थितीत
पार पडणाऱ्या सिंदूर महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत,यावेळी रक्तदात्यांना उदय सामंत यांनी शुभेच्छा देत,जवानांना रक्तदान करणारे रक्तदाते नसून रक्तवीर असुन यापुढे जवानांना रक्तदान करणाऱ्यांना रक्तवीर म्हणून संबोधले जाईल,असा विश्वास व्यक्त केला.शिवसेना शिंदे गटाचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर रक्तदान शिबिराचा आयोजन थेट जम्मू- काश्मीरमध्ये करण्यात आले आहे.
बाईट - उदय सामंत - उद्योग मंत्री.
बाईट - चंद्रहार पाटील - डबल महाराष्ट्र केसरी
14
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowAug 05, 2025 14:00:22Vasai-Virar, Maharashtra:
Date-5aug2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI ST BUS
Feed send by 2c
Type-AV
Slug-- महामार्गावर अर्नाळा- पंढरपूर एसटी बसला अपघात
अँकर - एसटी महामंडळाच्या अर्नाळा -पंढरपूर बसला महामार्गावरील वसईच्या सातिवली खिंडीजवळ अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बसमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
सकाळच्या वेळेत पंढरपूर-अर्नाळा एसटी बस विरार पश्चिमेच्या अर्नाळा आगरातून पंढरपूरला जाण्यासाठी रवाना झाली होती. यावेळी सातिवली खिंड येथून जात असताना बसला मागून डंपरची धडक दिली. या धडकेमुळे बस समोरच्या डंपरला धडकली त्यामुळे हा अपघात घडला.
यावेळी बसमधून १० प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी दोन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय अर्नाळा आगाराचे पथक ही घटनास्थळी पोहचले.
या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.
11
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 05, 2025 13:34:08Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात बोगस डॉक्टर श्रीकृष्ण कुमावतला अटक
यापूर्वीही कल्याणमध्ये गुन्हा दाखल
Ulh doctor arrest
Anchor उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या एसएसटी कॉलेज रस्त्यावर वैधकीय व्यवसाय पदवी नसताना विनापरवाना क्लिनिक चालविणाऱ्या श्रीकृष्ण कुमावत ह्या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आलीय,महापालिकेने बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम उघडल्यावर या डॉक्टरांचा पर्दापाश झाला आहे.
Vo उल्हासनगर महापालिकेने गेल्या वर्षी बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम सुरु करून २६ डॉक्टरांना नोटीस देऊन १६ पेक्षा जास्त डॉक्टरावर गुन्हे दाखल केले. डॉ श्रीकुष्ण तुकाराम कुमावत या बोगस डॉक्टरांचे नाव महापालिकेच्या २६ जणांच्या यादीत होते. मात्र कुमावत यांचे क्लिनिक आशेळेपाडा एसएसटी कॉलेज येथे असून ही हद्द कल्याण-डोंबिवली महापालिका मध्ये येत असल्याने कारवाई टळली होती. मात्र डॉ कुमावत यांच्या बाबतची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिका आरोग्य विभागाला दिली होती. अखेर कल्याण-डोंबिवली महापालिकेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय,
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
12
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowAug 05, 2025 13:33:43Ambernath, Maharashtra:
वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची दूरवस्था
वांगणीकरांना दररोज
खड्ड्यातून करावा लागतो प्रवास
रस्ता दुरुस्तीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष
Vangani road
Anchor - वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पुरती दुरवस्था झालीय. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहनं चालवणही कठीण होऊन बसलय. मात्र या खड्डेमय रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केलय.
वांगणीत पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा एकमेव रस्ता आहे. मात्र पूर्वेकडील रस्त्यावर रेल्वे फाटकातच खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी बाईकस्वार पडून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केल्याचं दिसून येत नाहीत. भर पावसात या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं असतं. रेल्वे फाटकातील या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनं पूर्व-पश्चिम भागात ये-जा करत असतात. वांगणी पश्चिमेकडे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे रुग्णांना देखील याच रस्त्यावरून जावं लागतं. शिवाय विद्यार्थीही स्कूल व्हॅन मधून याच रस्त्यावरून ये-जा करतात. या सगळ्यांनाच वांगणी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांमधून होतीय.
चंद्रशेखर भुयार , वांगणी
14
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowAug 05, 2025 13:33:33Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0508_BHA_BJP_SENA
FILE - 1 VIDEO 1 IMAGE
अखेर परिणय फुके यांनी जाहीर माफी मागितली.... पत्रानंतर आता शिवसेना शिंदे गटाने हा वाद इथेच संपला
Anchor :- 1 ऑगस्टला भंडारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात परिणय फुके यांनी मीच शिवसेनेचा बाप आहे. अस वक्तव्य केलं होत. त्यावर शिवसेनेच्या वतीने राज्यभर प्रतिक्रिया उमटत होत्या अखेर
भाजपा आमदार परिणय फूके यांनी जाहीर माफी मागितली आहे...
भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मी केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते. कुणाला दुखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे.
परंतु माझ्या विधानामुळे आमच्या मित्र पक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांच्या भावना दुखविल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. अस या पत्रात लिहिलं आहे.... या पत्रानंतर आता शिवसेना शिंदे गटाने हा वाद इथेच संपला असल्याचं भाष्य केलं आहे..
BYTE :- संजय कुंभलकर, शिवसेना शिंदे गट, भंडारा गोंदिया लोकसभा संपर्क प्रमुख
11
Report
SNSWATI NAIK
FollowAug 05, 2025 13:32:57Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मनपा अधिकारी विरोधात नवी मुंबई मुख्यालय समोर कंत्राटदार आमरण उपोषणास
मनपा मुख्यालय मे आमरण उपोषण
FTP slug - nm municipal corporation agitations
byet-
shots -
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -नवी मुंबई महानगर पालिकेच्या गटार मीटर वॉटर ची कंत्राट देतांना त्याचे टेंडर न काढता अधिकारी वर्गाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्या विरोधात नवी मुंबई महापालिका समोर स्थानिक कंत्राटदार आपल्या कुटुंब समवेत म्हापलीक मुख्यालय समोर उपोषणास बसले आहेत, महापालिकेने स्थनिक कंत्राटदारांची बिले न देता , परस्पर टेंडर न काढता टेंडर काढून 20 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा केला असल्याचे आरोप उपोषणकर्ते कंत्राटदार प्रशांत भगत यांनी केला आहे ।याबाबत आयुक्त ब्रोरबर मुख्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे पण कुठलीच कारवाई होत नसल्याने उपोषण मार्ग अवलंबला असल्याचे भगत यांनी सगीतेल।
बाईट - प्रशांत भगत- उपोषणकर्ते
13
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 05, 2025 13:02:55Ratnagiri, Maharashtra:
लोकेशन - चिपळूण
भास्कर जाधव..byte
चिपळूण
उद्या गुहागर मध्ये भास्कर जाधवांचा मेळावा..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुहागर दौऱ्यानंतर भास्कर जाधव यांचा उद्या गुहागर मध्ये मेळावा..
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमच्याबरोबरच्या काहींचा पक्षप्रवेश तेथे घेण्यात आला..
27 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काही लोकांनी जाणीवपूर्वक हा पक्ष प्रवेश करून घेतला..
शिंदे सेनेचा जिथे मेळावा झाला तिथेच त्याच ठिकाणी मी उद्या मेळावा घेणार आहे..
उद्याच्या मेळाव्याला आधीच्या मेळाव्यापेक्षाही कितीतरी पटीने लोक जास्त जमतील..
On राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे.. एकत्रित
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात लोकांच्या मनात काहीही संभ्रम राहिलेला नाही..
निवडणुका होतात की होत नाहीत हा संभ्रम कालपर्यंत होता..
उद्धव ठाकरेंनी पाच जुलैला सांगितले आम्ही एकत्र आले आहोत.
कालच राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय आम्ही दोन भाऊ वीस वर्षानंतर एकत्र येत आहोत तर तुम्हा कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची काय अडचण आहे..
याचा अर्थ युती संदर्भातला संभ्रम काल संपलेला आहे..
On मनपा निवडणूक
जय जय महाराष्ट्र वरती प्रेम करतात, ज्यांना ज्यांना असं वाटते की मुंबई ही महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे ते सगळेजण या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या पाठीमागे निश्चितपणे उभे राहतील..
On शिवाभोजन थाळी आणि शिधा..
सर्वसामान्य माणसाकरता देण्यासाठी या सरकारकडे पैसे नाहीयेत..
परंतु त्यांच्या मंत्र्यांचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार करण्याकरता, निवडणुकी करता,निवडणूक जिंकण्या करता हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून वाटण्याकरता या सरकारकडे आहेत..
कोण म्हणतंय हजार कोटी घ्या रुपये घ्या हे आमचे नाही हे आमच्या सरकारचे बापाचे पैसे आहेत..
गोरगरिबाची असलेली शिव भोजन थाळी दहा रुपयात जेवू शकतो ते दहा रुपये देण्याकडे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत..
सणासुदीचा आनंदाचा शिधा फक्त शंभर रुपयाचा ते सुद्धा देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत..
लोकांना पैसे देण्याकरता लोक,विकत घेण्यात करता,दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते विकत घेण्या करता यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत..
या भ्रष्टाचाराला आळा या गरीब जनतेने घातला पाहिजे..
On सरकार..सत्तेतले वाचाळ विरार मंत्री..
सरकार मधले अनेक आमदार,खासदार,मंत्री ज्या प्रकारची ज्या पद्धतीने विधाने करतायेत मला असं वाटतं की तीन पक्षांमध्ये ही स्पर्धा लागलेली दिसते..
On भरत गोगावले..
मान या न मान.. मै तेरा मेहमान.. अशी त्यांची परिस्थिती होणार आहे..
On जरांगे पाटील मुंबई मोर्चा
जरांगे पाटलांचा अण्णा हजारे होऊ नये एवढी माझी इच्छा आहे कारण तो योद्धा आहे..
त्यांनी आपली लढाई अर्ध्यावर सोडू नये अशी माझी इच्छा आहे..
On फुके..
ओके म्हटले शिवसेनेचा बाप मीच आहे हे खरं आहे नक्की कुठल्या शिवसेनेचा..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा..
याआधी भारतीय जनता पार्टीचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा आमदार सुद्धा म्हणाला होता तुमच्या सर्वांचा बाप देवेंद्र फडणवीस आहे..
भाजपवाले सर्वांचे बाब होऊ इच्छितात..
On कबुतर खाना
या विषयात जैन समाज मोठा दुखावलेले आहे..
बदल तरी जैन धर्मियांचे फार जुनं देऊळ या सरकारने पाडलं होतं..
म्हणून या सरकारला वाटतं की आपण राजकारणात कबूतरबाजी केली की ती फळाला येते..
On जिल्हा नियोजन निधी..
जिल्हा नियोजनचा निधी सत्ताधारीच पक्षांना दिला जातोय जे सत्तेत नाहीत त्यांना दिला जात नाहीये भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप..
चिपळूण आणि संगमेश्वर मतदार संघालाच निधी देत आहेत..
या संदर्भात मी अधिकाऱ्यांवरती हक्कभंग आणणारच आहे..
On मुंबई गोवा महामार्ग.. गणेशउत्सव
मी गणपती गजानन ला प्रार्थना करतो की तुझे हे भक्त मोठ्या भक्ती भावाने गावाला येत असतात..
चाकरमान्याचा प्रवास सुखकर व्हावा अशी प्रार्थना करतो पण या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी काही आहे का..
तेरा वर्षे झाली मुंबई गोवा हायवे रस्ता पूर्ण होत नाही..
जो मंत्री उठतो तो एक तारीख देतो 13 वर्ष आज तारखाच देत आहेत..
पण लाज नाही मला आणि भेटायला आलो तुला अशी या सरकारची परिस्थिती झालेली आहे..
निर्लज्जपणे पुढच्या तारखा देण्याचे काम प्रत्येक मंत्री आणि प्रत्येक माणूस करतो..
On कुंभार्ली घाट.. रस्ता दुर्दशा..
सरकारची प्रत्येक योजना ही आता लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर संपली आता लाडके कॉन्टॅक्टर योजना ही सुरू झालेली आहे..
हे सरकार प्रचंड बहुमत मिळाले असल्याने प्रचंड मस्ती मधलं सरकार आहे..
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 05, 2025 12:50:43Kolhapur, Maharashtra:
Kop Kolhapurkar Byte
Feed :- Live U
Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्ती परत यावी यासाठी जनचळवळ उभी आहे. एकीकडे ही दृश्ये असताना सोशल मीडियावर सध्या कोल्हापूरची बदनामी करणारा मजकूर एका इन्स्टा इन्स्प्लोररने टाकले आहे.. या विरोधात कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असून संबंधित सोशल मीडिया इन्सुलिन्सर हिंदू भाऊ याला कोल्हापूरकरानी सडेतोड उत्तर दिलय. राजकारण्यांच्या मागे लागून कोल्हापूरकर पेटा आणि वनताराची बदनामी करत असल्याचं या हिंदू भाऊने म्हटले आहे. यावर कोल्हापूरकर नेमकं काय म्हणाले ते पाहूया..
Play Byte:-
1) हर्षल सुर्वे, शिवसैनिक शिंदे शिवसेना
2)मनजीत भोसले, शिवसैनिक ठाकरे शिवसेना
3) हरी भोसले, सामान्य कोल्हापूरकर
4) शुभम शिरहट्टी, सामाजिक कार्यकर्ता.
14
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 05, 2025 12:50:11Pandharpur, Maharashtra:
05082025
slug PPR_BJP_BALAJI_DARSHAN
file 01
-----
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील 300 लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमा पूर्वीच विमान आणि रेल्वेने भाजपकडून तिरुपती बालाजीचे दर्शन
माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा जोरदार बांधणी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील 300 लाडक्या बहिणींना भाजपकडून तिरुपती बालाजीचे दर्शन घडवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.
भाजपने पक्ष बांधणीसाठी आता लाडक्या बहिणीना थेट दक्षिणेतील बालाजीच्या दर्शनाची वारी घडवल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे
14
Report
JMJAVED MULANI
FollowAug 05, 2025 12:49:22Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 0508ZT_INDAPURSAND
FILE 2
इंदापूरमधील गंगावळणात अवैध वाळू उपसा उघड, ४८ हजारांचा साठा पोलिसांच्या ताब्यात..
भीमा नदीतून यांत्रिक बोटीने वाळू उपसा एकावर गुन्हा दाखल...
Anchor — इंदापूर तालुक्यातील गंगावळण गावच्या हद्दीत उजनी जलाशयातील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता नंदकुमार गलांडे असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून ४८ हजार रुपये किमतीची आठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.ग्राममहसूल अधिकारी करिष्मा मोहनराव बोबडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. यामध्ये यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा करून साठवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
14
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 05, 2025 12:32:19Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरातील सिंधी कॅम्प परिसरामध्ये एका छोट्या कारखान्याला आग लागली. या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जात होते. त्यादरम्यान अचानक मशनरीला आग लागल्याने धावपड उडाली. मात्र वेळेत अग्निशमनदादाच्या पथकाने या ठिकाणी दाखल होत आग विझवली. विशिष्ट फोमचया माध्यमातून हे आग विझवण्यात आली. सिंधी कॅम्प येथील सदाशिव फूड्स पोंगे व कुरकुरे बनवण्याच्या कंपनीत ही आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी जाऊन अग्निशमन कार्य केले. सदर आगेत कोणीही जखमी किंवा जीवित हानी झाली नाही.
प्रशांत परदेशी, धुळे.
14
Report
NMNITESH MAHAJAN
FollowAug 05, 2025 12:32:07Jalna, Maharashtra:
FEED NAME : 0508ZT_JALNA_MOSAMBI(1 FILE)
जालना : बाजार समितीत 5 दिवसांत 2 हजार 185 क्विंटल मोसंबीची आवक,
अँकर :जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 5 दिवसांत 2 हजार 185 क्विंटल मोसंबीची आवक झालीय.मोसंबीला सरासरी 950 रुपये क्विंटल बाजारभाव मिळालाय.कमी बाजारभाव मिळत असल्यानं मोसंबीची आवक काही प्रमाणात घटली आहे.आणखी काही दिवस मोसंबीची आवक वाढण्याची शक्यता कमी आहे.मोसंबीचे दर घटल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी दरात वाढ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
14
Report
SMSATISH MOHITE
FollowAug 05, 2025 12:18:28Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Pikpani
Feed on - 2C
----------------------------
Anchor - सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिक धोक्यात आले आहे. औषधाची फवारणी करूनही अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात सोयाबीनवर अळीचा हल्ला झाला आहे. शेळगाव परिसरात शेकडो एकर सोयाबीनवर एन शेंगा लगडण्याच्या स्थितीत अळी पडली आहे. ही अळी पाने खात असल्याने पिक धोक्यात आले आहे. कुठल्याही औषधाचा परिणाम या अळीवर होत नसल्याने कृषी विभागाने सल्ला द्यावा अशी विनंती शेतकरी करताहेत.
Byte - संजय पाटील - शेतकरी
-----------------------
14
Report