Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

तळेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नागरिकांना त्रास!

CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 19, 2025 05:05:09
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 1907ZT_MAVAL_DOG_ISSUE Total files : 04 Headline -तळेगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नागरिक त्रस्त -नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष Anchor: तळेगाव दाभाडे शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा त्रास सर्वच प्रभागांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चाव्याचे प्रकार घडले असून अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. नाना भालेराव कॉलनीसह; अनेक भागांत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, या कुत्र्यांमुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉलनीतील रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणारा कचरा हे कुत्रे सैरावैरा पसरवतात, ज्यामुळे परिसरात घाण पसरते आहे. यापूर्वी नगर परिषदेने कोट्यवधी रुपये खर्चुन कुत्र्यांची नसबंदी केली होती. मात्र, तरीही त्यांची संख्या वाढतच आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील भटकी कुत्री पकडून मावळातील तळेगांव परिसरात सोडल्या जातात विजय मारुती खिंडजवळ भटकी कुत्री ही कुत्री पुढे तळेगाव शहरात पसरतात आणि त्यामुळे शहरातील संख्या झपाट्याने वाढते आहे. रात्रीच्या वेळी अंधाऱ्या व सुनसान रस्त्यांवरून जाताना कुत्र्यांचा अचानक हल्ला होण्याचे प्रकार वाढले असून, अनेक वाहनचालक अपघातग्रस्त झाले आहेत. काही नागरिकांना चावल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. शहरात कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी वारंवार मागणी, अरुण माने, सचिन भांडवलकर हे सजग नागरिक करत आहे. मात्र, नगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top