Back
वाशिममध्ये ज्वारीच्या दरात १६०० रुपयांची घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
GMGANESH MOHALE
Aug 06, 2025 04:20:07
Washim, Maharashtra
वाशीम:
File:0608ZT_WSM_SORGHUM_PRICE
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिमच्या बाजारात ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली असून परिणामी आवकही घटलीये सध्या ज्वारीला अवघा १ हजार ५१० ते १ हजार ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळतोय. हा दर सरकारने जाहीर केलेल्या ३ हजार ३७१ रुपयांपेक्षा तब्ब्ल १६०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळं सरकारनं नाफेड मार्फत ज्वारीची हमीभावानं खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowAug 06, 2025 08:46:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - भारतीय बेदाण्यावर ड्रॅगनचा डोळा ! महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय कोट्यावधीचा फटका..
अँकर - चिनी बेदाण्याने सध्या भारतीय द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे.कमी दरात मिळणारा चिनी बेदाणा भारताची बाजार पेठे काबीज करत आहे.त्यामुळे भारतातील विशेषता महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे..पाहूया ड्रॅगनच्या बेदाण्याचा स्पेशल रिपोर्ट..
व्ही वो- भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा गेल्या काही वर्षात बोलबाला आहे.आता यामध्ये भर म्हणून की काय शेतकऱ्यांच्या बेदाण्याला चिनी बेदाण्याने लक्ष केले आहे. नेपाळ,भूटान,बांगलादेश मार्गे भारतात येणाऱ्या बेदाणा हा भारतातल्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. चोरट्या मार्गे आणि कर चुकून येणाऱ्या बेदाण्यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे,अडीचशे ते तीनशे रुपये किलो दराने चिनी बेदाण्याची विक्री सुरू आहे.त्यामुळे भारतीय बेदाण्याच्या दरात
70 ते 100 रुपयापर्यंत घट झाली.
बाईट - युवराज पाटील - सभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती,तासगाव.
एक नजर टाकूया महाराष्ट्रातल्या बेदाणा उत्पादनावर..
ग्राफीक्स इन
2024,25 या वर्षामध्ये महाराष्ट्रात दोन लाख 46 हजार 65 टन इतक्या बेदाण्याचे उत्पादन झालं
2025 26 सालामध्ये एक लाख 54 हजार 870 टन इतकं बेदाण्याचे उत्पन्न झालं
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात 91,730 टणांची घट झाली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्या अखेर 1 लाख बेदाणा शिल्लक होता.
यंदाच्या वर्षी उत्पादन कमी असल्याने 52 हजार टन बेदाणा शिल्लक आहे.
ग्राफिक out
व्ही वो - देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक बेदाण्याचे उत्पादन घेतलं जातं यामध्ये सांगली नाशिक सोलापूर अशा जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यंदाच्या हंगामात बेदाण्याचे उत्पादन घटल्याने बेदाण्याचे दर हे वाढले होते पाचशे ते सहाशे रुपये किलो इतका सरासरी दर मिळू लागल्याने शेतकरयांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
बाईट - धागेराव थोरात - द्राक्ष उत्पादक शेतकरी -वाळवा, सांगली.
व्ही वो - चिनी बेदाणा आणि भारतात विशेषतः महाराष्ट्रात तयार होणाऱ्या बेदाणा मध्ये फारसा दिसण्यात फरक नाही बेदाण्याचा रंग हा हिरवा आहे,त्यामुळे तो दिसायला चांगला आहे,मात्र त्याची गुणवत्ता ही भारतीय बेदाण्यापेक्षा कमी आहे, शिवाय अडीचशे आणि तीनशे रुपये दर असल्याने ग्राहकांकडून या बेदाण्याला पसंती दिली जातेय.
बाईट - राजेंद्र कुंभार - अध्यक्ष - बेदाणा व्यापारी असोसिएशन,सांगली.
व्ही वो - यंदा बेदाण्याचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळत होता, मात्र गेल्या एक महिन्यापासून चिनी बेदाणा चोरट्या मार्गाने भारतात येऊ लागलाय आणि परिणाम हा बेदाण्याचे भारतातले दर गडगडले, त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा फटका महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
व्ही वो - विनायक हिंगमीरे - बेदाणा व्यापारी - सांगली.
व्ही वो - चायना मधून होणारी बेदाण्याची अवैध तस्करी थांबवावी भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या बेदाण्याच्या विक्रीवर बंदी आणावी अशी मागणी आता द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष संघटना आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे त्यासाठी मोर्चे देखील काढण्यात आलाय.
बाईट - अशोक बाफना - बेदाणा व्यापारी - तासगाव.
व्ही वो - अजित भारतीय बाजारपेठेवर ड्रॅगन चा वेळ का गेल्या काही वर्षात वाढत असताना आता शेतकऱ्यांच्या मालावर देखील ड्रॅगनची फुत्कार सुरू झाली असून स्वदेशीचा नारा देणाऱ्या केंद्र सरकारने चिनी बेदाण्या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि शेतीला प्रचंड फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे..
4
Report
AKAMAR KANE
FollowAug 06, 2025 08:19:21kolhapur, Maharashtra:
व्हिडिओ आणि बाईट असाइन्मेंट ला व्हाट्सअप केले आहे
-----
नागपूर
--- पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता
--- ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही एकच कविता दोन्ही वर्गात असल्याने पालकांना संभ्रम
--- महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ ?
--- पहिल्या वर्गात पान क्रमांक 28तर दुसरीच्या पान नंबर 16 वर तिच कवीता
--यंदा प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना सीबीएससीच्या धर्तीवर पहिलीचे पुस्तके देण्यात आली... त्यामुळे पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकात बर्ड्स कॅन फ्लाय ही कविता जशीच्या तशी आली.. जी अगोदरच दुसरीच्या पुस्तकात होती
--- केवळ चित्र बदलण्यात आले, पण दोन्ही वर्गात एकंच कविता....
--- त्यामुळे कॉपी पेस्ट करण्याचं प्रकार आहे की चूक आहे की यामागे बालभारतीची काही भूमिका आहे कळायला मार्ग नाही....
--मात्र त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होताय
8
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 06, 2025 08:04:03Ambegaon, Maharashtra:
Feed 2C
Slug: Ambegaon 19 Missing
File:01
Rep: Hemant Chapude(Ambegaon)
*आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमधील ९० बॅचमधील १९ जण उत्तराखंडमध्ये बेपत्ता?*
Anc :- आंबेगाव तालुक्य्तील अवसरी खुर्द येथील १९९० सालच्या १० वी च्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक समूह पर्यटनासाठी १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
Vo :- काल सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व समूह त्या भागातच असल्याचे सांगितले जात आहे.काल या समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून "आम्ही सर्वजण सुखरूप आहोत," असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया मंचर पुणे...
8
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 06, 2025 07:47:20Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग:
भरधाव कारची पादचाऱ्याला धडक..... पादचाऱ्याचा जागीच मृत्यू.
पादचाऱ्याला धडक देऊन वाहन चालकाचे पलायन.
कार चालक अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जयंत यांचा मुलगा असल्याची पोलिसांची माहिती.
आरोपी अभिजीत खताते याच्यावर चिपळूण पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल...मात्र अद्याप अटक नाही.
12
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowAug 06, 2025 07:46:49Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पोलीस कर्मचाऱ्यांने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोळीबारात पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उमेश सूर्यवंशी असे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कृषी बाजार समितीच्या परिसरात निवडणूक यंत्रांच्या निग्राणीसाठी सूर्यवंशी हे नियुक्त होते. कर्तव्ययावर असतांना त्यांनी स्वतःवाई गोळीबार करून घेतला. उमेश सूर्यवंशी यांनी स्वतःवर गोळीबार का केला हे अध्याय स्पष्ट झालेलं नाही पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत. आझाद नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, यां गोळीबाराच्या घाय्यानेमुळे संपूर्ण पोलीस दल हादरून गेले आहे.
प्रशांत परदेशी, धुळे.
13
Report
KJKunal Jamdade
FollowAug 06, 2025 07:46:21Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वैजापूर तालुक्यातील शनीदेवगावकडे रवाना...
शिर्डीच्या विमानतळावरून हेलीकॉप्टरने रवाना..
राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजनही सोबत..
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनी देवगाव येथे गंगागीरी महाराज सप्ताहाची होणार सांगता..
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 06, 2025 07:46:10Nashik, Maharashtra:
नाशिक
* नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी घेतली जाणार मुंबई पोलिसांची मदत
* मुंबई पोलिस देणार ट्रॅफिक बाबत नाशिक पोलिसांना ट्रेनिंग..
* मंत्री छगन भुजबळ लिहिणार मुंबई पोलिसांना पत्र..
* नाशिकमध्ये येऊन नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देण्याची करणार मागणी..
* शहरात वाहतुकीचा फज्जा..
* अनेक भागात दररोज होतेय तासंतास वाहतूक कोंडी..
* नाशिकची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घेतली जाणार आता मुंबई पोलिसांची मदत
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 06, 2025 07:34:35Nashik, Maharashtra:
nsk_stationmaramari
व्हिडिओ 1 images 2
Anc: नाशिकच्या अभोण्यातील संताजी चौक परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये रस्त्यावर व पोलीस ठाण्यात थेट हाणामारी झाली. या प्रकरणात वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांसमोरच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अभोणा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत फिर्यादी स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल दुसाने, हर्षल जाधव, महेश जाधव, गोपाल शेखावत, जयपाल शेखावत, विशाल शिरोरे व नयन आहेर (सर्व रा. अभोणा) यांनी मुसळे यांच्या गाडीला अडवून शिवीगाळ करत हातातील काठ्यांनी व फायटरने मारहाण केली. तसेच त्यांची स्विफ्ट गाडी (क्र. MH15 DM 1017) दगड व काठ्यांनी फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे. यावेळी जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने अमोल दुसाने याने दिलेल्या तक्रारीनुसार, स्वप्नील उर्फ गणेश मुसळे यांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ करत मुलांना गाडीने उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील तीन-चार तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमोल दुसाने व हर्षल जाधव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता, त्यांच्या मागोमाग स्वप्नील मुसळे व त्यांची पत्नी तेजस्विनी मुसळे तिथे दाखल झाले. यावेळी पोलीस ठाण्यातच दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले आणि शिवीगाळ व मारहाण सुरू झाली. हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, गांगुर्डे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडला असून, सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.
या प्रकारामुळे "पोलिसांपुढेच जर असा बेधडक मारहाणीचा प्रकार घडतो, तर नागरिकांमध्ये कायदा व पोलिसांचा धाक उरला आहे का?" असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अभोणा पोलीस ठाण्याने यानंतर अधिक कडक भूमिका घेतली असून, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
13
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 06, 2025 07:30:10Nashik, Maharashtra:
Nsk_Farande
feed by live u 51
ANchor- आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक शहरातील पी अन टि कॉलनीतील खड्ड्यांचे पाहणी केलीय. परिसरातील नागरिकांनी सुद्धा यावेळी आ. फरांदे यांच्याकडे समस्यांचे पाढे वाचले. पावसाळ्यांत परिसरात खड्डे पडत असून धूळ होत आहे. यामुळे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले असल्याच नागरिकांनी सांगितलय. खड्डे बुजविण्याच्या कामाची चौकशी करावी तसेच खड्डे बुजविण्याससाठी वापरण्यात येणाऱ्या गिट्टीची सुद्धा तपासणी महानगर पालिकेने करावी अशी मागणी यावेळी आ. फरांदे यांनी केलीय.
Byte आ. देवयानी फरांदे
- शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य पसरलंय
- खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी केली जाते
- ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करून घेतले पाहिजेत
- खड्डे भरतांना क्वालिटी कंट्रोल तपासणं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे
- दरवर्षी रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र तरीदेखील रस्ते खड्ड्यात जातात
- चांगले रस्ते तयार करून घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे
- खड्ड्यांची तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे, रस्त्यांवरील धूळ देखील स्वच्छ केली पाहिजे
14
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 06, 2025 07:17:54Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
*धाराशिव : ब्रेकिंग*
DHARA_CRIME
विकृतीचा कळस, बसस्थानकात मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पहात अश्लील हावभाव
धाराशिवच्या नळदुर्ग येथील बसस्थानकावर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या मौलवीवर गुन्हा दाखल
बसस्थानकात भर गर्दीच्या ठिकाणी महीला व शाळकरी मुलीसमोर पॉर्न लावुन अश्लील हावभाव केल्याचा संतापजनक प्रकार समोर
मौलवीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
फिर्यादी सुनिल माणिकराव गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौलवीवर कारवाई
कासीम अब्दुल रहीम इनामदार असं आरोपी मौलवीच नावं
आरोपी विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 च्या कलम 294(1), 294(2) व 296 अन्वये गुन्हा करण्यात आला दाखल
पोलीस मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत.
NOTE व्हिडिओ फोटो ब्लर करून वापरावेत
14
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowAug 06, 2025 07:17:10Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील चार तरुण अडकले
उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील चार तरुण अडकले
काल सकाळी 11 वाजता या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले होते
मात्र कालपासून चौघाचेही फोन लागत नसल्याची कुटुंबियांची माहिती
विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे सोलापुरातील चौघे उत्तराखंड गेलेले तरुण
सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघाची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय
NDRF ने सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार जीवितहानी झालेल्या मध्ये सोलापूरच्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नसल्याचे सांगितल्याने घाबरण्याचे कारण नाही
चौघा तरुणांच्या शोधासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु
14
Report
PNPratap Naik1
FollowAug 06, 2025 07:17:04Kolhapur, Maharashtra:
Anc:- कोल्हापूरच्या कागल- निढोरी राज्य मार्गावर व्हनाळी जवळील वाघजाई घाट या ठिकाणी चालत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. चालत्या ट्रक मधील इंजिन मधून अचानक दूर येऊ लागल्याने चालकाने प्रसंग अवधान राखत ट्रक बाजूला घेतला तोपर्यंत आग केबिनमध्ये पसरत चालली होती. ड्रायव्हरने बाहेर पडत आपला जीव वाचवला मात्र ट्रकच आधीच्या भक्षस्थानी पडल्याने मोठा नुकसान झालं आहे.
14
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 06, 2025 07:16:28Nashik, Maharashtra:
नाशिक -
- हृदयविकाराने विद्यार्थिनीचा शाळेत मृत्यू
- नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव
- शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असताना आली चक्कर
- शिक्षकांच्या हि बाब लक्षात येताच तिला खाजगी रुग्णालयात केले होते दाखल
- मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित
- या मुलीला हृदयाशी संबंधित आजार असल्याने तिला हृदयविकाराचा झटका आला असल्याची शक्यता
13
Report
JJJAYESH JAGAD
FollowAug 06, 2025 07:15:18Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील करतवाडी रेल्वे येथिल संतोष पंजाबराव चेचरे या 47 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय..आत्महत्या केलेला इसम शेतकरी असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहेय..मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही..पोलिसांच्या तपासात कारण पुढे समोर येणार असून पुढील तपास दहीहंडा पोलिस करित आहेय...
14
Report
TTTUSHAR TAPASE
FollowAug 06, 2025 07:04:03Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
3 FILES
SLUG NAME -SAT_DOLBY_VIRODH
सातारा = येत्या काही दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे.या गणेशोत्सवात मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईट चा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊन ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्या भेडसवु लागल्या आहेत.या मुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयविकारग्रस्त रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे सातारातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बी, डीजे, लेझर लाईट बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या सह पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
बाईट्स - ज्येष्ठ नागरिक
14
Report