Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413001

सोलापुर महापुर: सीना नदी गांवों में तबाही, किसान बेहाल

AAABHISHEK ADEPPA
Sept 22, 2025 11:02:45
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान ( WKT ) - सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीचे पाणी गावात शिरायला सुरुवात झालीय - मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी गावात नदीपात्रापासून 1 किलोमीटर अंतरावर शेतात पाणी घुसले - त्यामुळे सोयाबीन, तुर, कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय - सीना नदीमध्ये 2 लाख क्यूसेक वेगाने सीना नदीत विसर्ग सुरु असल्याने सीना नदीला महापूर आलाय - त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पूरस्थिती निर्माण झालीय याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 12:27:10
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: DHARA_SAWNT_VISIT पावसामुळे भूम, परांडा इथ हाहाकार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पूर मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी हा महाप्रलय आहे, अपघात म्हणाव लागेल 2016 साली शिवजल क्रांती त केलेल्या कामामुळे प्रवाह आटोक्यात राहिला, नाहीतर गावं दिसली नसती ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठ पुरावा , तानाजी सावंत सरकार खंबीरपणे उभा राहील, सरकारचे पंचनामे आणि मदत होईल, मात्र त्या अगोदर नुकसान ग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल तानाजी सावंत यांच्याकडून कार्यकर्त्यांना नुकसान ग्रस्तांच्या याद्या करण्याचे आदेश तानाजी सावंत यांच्याकडून नुकसान झालेल्या ना जीवनावश्यक वस्तू ची मदत केली जाणार, तिन्ही तालुक्यातील जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे - सावंत खरिपाची पिके गेली, रब्बीची पेरणी होणार नाही, पुढे मोठा पाऊस आहे, पेरण्या लांबल्या गेल्या तर ओल्या दुष्काळाची मागणी करून लावून धरू एन डी आर एफ नुसार मदतीची मर्यादा ही वाढवण्यासाठी ची मागणी लावून धरणार Byt: तानाजी सावंत, माजी मंत्री
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 22, 2025 12:26:32
Kolhapur, Maharashtra:नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी कमलालक्ष्मी देवीच्या रूपात अंबाबाईची पूजा feed:-1st Puja Anc :- शारदीय नवरात्रोत्सवाला आज प्रारंभ झाला असून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पहिल्याच दिवशी देवीची श्रीकमलालक्ष्मी माता या रुपातील सालंकृत पूजा बांधण्यात आली. सकाळी वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या घटस्थापनेनंतर या पूजेला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून सर्वप्रथम प्रगटलेली देवतारत्न म्हणजेच श्रीकमलालक्ष्मी. हिच्या तेजाने संपूर्ण विश्व प्रफुल्लित झालं होतं आणि दिग्गजांनी सुवर्ण कलशांतून अमृतस्नान घालून पूजन केलं होतं. त्याच दैवी स्वरूपाची प्रतिकृती आजच्या पूजेत स्थानापन्न करण्यात आली. सुवर्ण तेजाने उजळलेली, कमलासनस्थ, चार हातांत कमले धरलेली व वरद-अभय मुद्रा दाखविणारे देवीचे रुप पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले. या देवीच्या उपासनेने दुःख, शोक, दारिद्र्य नाहीसं होऊन सौभाग्य आणि प्रगती प्राप्त होते, असा विश्वास श्री पूजकांनी व्यक्त केला आहे. आजची पूजा श्रीपुजक बाबुराव ठाणेकर, प्रसाद लाटकर व योगेश जोशी यांनी बांधली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 22, 2025 12:15:31
Akola, Maharashtra:Anchor : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून अकोला शहरातील मूर्ती बाजारात सकाळपासूनच मंडळांचे कार्यकर्ते देवीची मूर्ती घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून आले. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.या निमित्ताने शहरभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भक्तांनी नऊ दिवस देवी दुर्गेची पूजा-अर्चा करण्यास सुरुवात केली आहे. अकोला शहरात गणेशोत्सवासारखाच नवरात्रोत्सवही मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 22, 2025 12:02:05
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_SULE_SHETKARI सातारा:राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाल असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत होताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी सत्तेत आल्यावर आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती.... याविषयी मी स्वतः अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रात सलग साडेचार महिने पाऊस असल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे.... कृषीमंत्र्यांनी दिवाळी गोड करणार हे जरी सांगितलं असलं तरी जून महिन्यापासून पंचनामे सुरू आहेत.आता दसरा सुद्धा गोड केला तर आणखी चांगलं होईल. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. बाईट: सुप्रिया सुळे
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 22, 2025 12:01:41
Parbhani, Maharashtra:अँकर- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये धनगर समाज बांधवांचा एस टी प्रवर्गात समाविष्ट करू अस आश्वासन बारामतीमध्ये दिलं होत. त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी परभणीमध्ये धनगर बांधव आज आक्रमक झाले होते, धनगर बांधवानी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत 2014 साली दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली, मुख्यमंत्री साहेब आपण दिलेल्या शब्द पाळावा अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडेधनगर बांधवानी निवेदनाच्या माध्यमातून केली. जालना येथे धनगर बांधवांचा एसटी प्रवर्गात समावेश करावा म्हणून उपोषण सुरू आहे,हे उपोषण सोडवून आम्हा धनगर बांधवांना एसटी प्रवर्गात सामाऊन घ्या आणि आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अशी ही मागणी करण्यात आली.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 22, 2025 12:00:55
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू.... अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प... AC ::- लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज दुपारच्या वेळी तुफान पाऊस झालाय... या पावसामुळे ओढे नाले यासह रस्त्यावरून ही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तर औराद शहाजनी परिसरात हि मुसळधार पाऊस झालाय... औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक गावांमधून जाणाऱ्या तेरणा आणि मांजरा या दोन्ही नद्यांच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथील निलंगा - कासारशिरसी येथील महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.. या पावसामुळे अनेक भागातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे....
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 22, 2025 12:00:33
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 22, 2025 11:46:09
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 22, 2025 11:31:57
Parbhani, Maharashtra: अँकर- परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टी वन युनिट टू साखर कारखान्याच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी पुंगी बजाव आंदोलन केले, २०२४-२५ गाळप हंगामात या कारखान्याने आश्वासनापेक्षा कमी बिल दिले. ऊसाचे उर्वरित २०० रुपये बिल देण्यात यावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. परिसरातील इतर कारखान्यांनी मागील वर्षी २७०० रुपये प्रति टन दर दिला पण ट्वेन्टी वन युनिट टू कारखान्याने कमी भाव दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक वेळा तोंडी व लेखी निवेदन करूनही कारखाना प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही करीत नसल्याने आज शेतकऱ्यांनी कारखाण्या समोर पुंगी वाजवत आंदोलन केले. शेतकरी संकटात सापडला असताना कारखाना प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केलीय. बाईट- रामेश्वर मोकाशे- शेतकरी
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 22, 2025 11:31:46
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ - पुसद ॲड गुणरत्न सदावर्ते ऑन - नवनाथ वाघमारे यांची गाडी जळाल्याचे प्रकरण. गाड्या जाळणे हे वैचारिक दिवाळखोरी, फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात हे सहन करून घेतले जाणार नाही. ऑन - मराठा मंत्री, लोकप्रतिनिधी आणि सुप्रिया सुळे जरांगेचे वैचारिक विचार हे माझ्या रॉयल बुटच्या धुळीची देखील बरोबरी करत नाही, कारण जरांगेचे गॉडफादर हे तोडातोडीचे राजकारण करतात, सत्तेतले मराठामंत्री आमदार खासदार हे एकत्र येऊन कुंभाड रचतात असा हल्लाबोल एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला, यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीकास्त्र डागले, माझी बहीण सुप्रिया सुळे या कन्फ्युज आहेत. आरक्षण देण्याची व्याख्या काय आहे, सामाजिक अपंगत्व कशाला म्हणतात, अनुसूचित जाती जमातीचे मागासलेपण का तपासले जात नाही. हे त्यांना कळत नाहीं. ऑन - बंजारा एसटी आरक्षण बंजारा समाजाला एसटीचे प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, जरांगे सारखी राजकीय खेळी आमच्या बंजाराच्या आरक्षणाला करण्याची गरज नाही. पुसद च्या नाईक कुटुंबातील सत्ताधाऱ्यांनी गत वैभव आणण्यासाठी बंजारा समाजाला एसटी मधून प्रमाणपत्र देण्याकरिता पुढाकार घ्यावा. ऑन - हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेटनुसार माझे मराठा भाऊ कुणबी होऊ शकत नाहीत हे विदर्भातून सांगतोय. विदर्भातला कुणबी हा तिरळे कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेती करणारा म्हणजे मागास नव्हे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 22, 2025 11:20:24
Navi Mumbai, Maharashtra:story slug - देवीच्या नारळाच्या शहाळा वरील नैसर्गिक मुखवट्या वाढती मागणी नारीयल के उपर बना रहे हे मुखवटे FTP slug - nm coconut fase byet- dilip patil shots - reporter- swati naik navi mumbai Anchor -: उरण मधील नागाव गावातील कलाकार दिलीप पाटील हे नारळाच्या शहाळावर देवीचा मुखवटा बनवतायत. बाजारात प्लास्टिकचे मुखवटे भेटत असले तरी कलाकार दिलीप पाटील हे नैसर्गिकरित्या नारळाच्या शहाळा पासून देवीचे मुखवटे बनवत आहेत. मागील 50 वर्षांपासून पाटील कुटुंबीय ही कला जोपासत आहेत. काही भाविक पाचव्या माळेला देवीच्या मुखवट्याची स्थापना करत असून नारळाच्या शहाळा वरील नैसर्गिक मुखवट्याना उरण पनवेलसह मुंबईतून मोठी मागणी आहे. बाईट- दिलीप पाटील - कलाकार
0
comment0
Report
Advertisement
Back to top