Back
पाचगणी शाळेत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार: दोन मुलांचे विवस्त्र केल्याची घटना!
TTTUSHAR TAPASE
FollowJul 17, 2025 04:38:17
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE
4 FILES
SLUG NAME -SAT_ragging
सातारा: पाचगणी येथे एका प्रसिद्ध शाळेमध्ये नववी मध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचे वर्गातीलच मुलांनी रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... रॅगिंग दरम्यान दोन्ही पीडित मुलांना विवस्त्र केल्यामुळे दोघांनीही या शाळेतून पळ काढत पालकांना फोन करून सर्व हकिकत सांगितली आणि आम्ही दोघेही घरी येत असल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी पाचगणी पोलीस ठाण्यात येऊन संबंधित मुलांबाबत तक्रार दिली या प्रकरणातील सर्व मुले अल्पवयीन असल्यामुळे हे प्रकरण पोलिसांनी बाल न्यायालयात वर्ग केले आहे. शाळा प्रशासनाने देखील ज्या दोन विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली त्यात दोन विद्यार्थ्यांना देखील शाळेतून काढले असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे..पाचगणी पोलीसही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
9
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 17, 2025 13:02:16Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या वकिलांनी दिली अधिकच माहिती
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या वकिलांनी दिली अधिकची माहिती
- दीपक काटेसह त्याच्या सहकाऱ्याला आज अक्कलकोट येथील दिवाण व फौजदारी न्यायालयात दाखल केल्यानंतर मिळाली होती 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- मात्र आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर अखेर दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्याला जामीन मंजूर
बाईट-
हेमंतकुमार साका ( दीपक काटेचे वकील )
( ॲपवरून लाइव्ह सुद्धा दिलेले आहे )
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 17, 2025 13:02:00Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा
पानी के लीये हंडा मोर्चा
FTP slug - nm handa morcha
shots-
byet- women
reporter- swati naik
navi mumbai
anchor -खारघर मद्ये पावसाळ्यात देखील कमी पाणीपुरवठा होत असल्याने महिला वर्गात संतापाचे वातावरण असून सिडको निर्मित स्वप्नपूर्ती सोसयटी मद्ये पाणी येत नसल्याने येथील महिलांनी रायगड भवन वर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त केला झाले आहे, बुधवारी खारघर मधील माजी नगरसेवकांनी पाण्यासाठी सिडको कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते, आज महिलांनी मोर्चा काढल्याने खारघर मधील पाणी टंचाई भीषण असल्याचे स्पष्ट होत आहे ।
बाईट -महिला
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 17, 2025 12:36:13Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1707ZT_CHP_MEDIATION
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राबविण्यात येत आहे 90 दिवसांची विशेष 'राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम
अँकर:-- सर्वोच्च न्यायालयाच्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व मुंबई उच्च न्यायालयाच्या निदेशनुसार, चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत 'राष्ट्रासाठी मध्यस्थी' ही ९० दिवसांची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश प्रलंबित न्यायप्रकरणे पक्षकारांच्या परस्पर सहमतीने जलद सोडवणे, वेळ, श्रम व खर्च वाचवणे आणि न्यायालयीन भार कमी करणे असा आहे. दिवाणी, फौजदारी (तडजोड योग्य), चेक बाउन्स, बँक कर्ज वसुली, अपघात भरपाई, जमीन अधिग्रहण, भाडेकरू-विवाद, कौटुंबिक प्रकरणे, घरगुती हिंसा आणि अन्य प्रकरणे सामंजस्याने सोडविली जाणार आहेत. नागरिकांनी आपल्या प्रकरणांसाठी चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाईट १) पी.पी कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 17, 2025 12:34:29Baramati, Maharashtra:
JAVED MULANI
SLUG 1707ZT_BARAMATIHAKE
BYTE 3
बारामती_ ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट पॉइंटर
माहिती अधिकारी कार्यकर्ते पोपट धावडे यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे.
माळेगांव नीरा वागज या आजुबाजूच्या गावात ही भेटी दिल्या.
आगामी काळात राज्यातील ओबीसी जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांचा खूप मोठा लढा उभा राहतोय.
अधिवेशन संपताच त्याच्या बैठका राज्यात आम्ही सुरू करीत आहोत.
त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आलो आहे.
*ऑन_प्रवीण गायकवाड*
झालेल्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध करतो
आम्ही लोकशाही मानणारी मानस आहोत.
*संभाजी ब्रिगेडने गेल्या 15 ते 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात हेच केलं आहे ना ? त्यांनी गिरीश कुबेर सारख्या पत्रकारांचं तोंड काळ करण्याचं काम केलं आहे.*
अनेक ग्रंथालय फोडली,पुतळे उकडून फेकले.
*बहुजन समाजातील काही नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलं*
*आज गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बहुजनवर हल्ला झाला,पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला अस पुढे येत पण विधानसभेच्या अगोदर लक्षण हाके यांच्यावर हल्ला का झाला होता ? कोणत्या ब्रिगेडर ने केला होता ? त्यावेळी प्रवीण गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत*
*प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत नाव बहुजनांच घ्यायचं काम मात्र पवार कुटुंब, कोल्हापूर चे महाराज वतनदार झागीरदारंच करायचं संघर्ष करायची वेळ आली की घरात लपून बसायचं*
एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा पाईक आहे दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामांनी पक्ष दिला,निवडणुका लढल्या त्याच्या एकाही मुद्द्याचा फॉलो नाही करायचा.
*कसले तुम्ही पुरोगामी ? काय आहे तुमचा बहुजनवाद*
बहुजनवादात मराठा सोडून इतर कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिले आहे.
मी प्रवीण गायकवाड यांना साहित्यातला खूप मोठा पुरस्कार द्यावा म्हणून शिफारस करतो.
*चॅरिटेबल काम करून परिवर्तन होत नसत त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते*
वतनदारांचे जीवन जगून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत.
बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो.
*ऑन_लोकसभा उमेदवारी*
प्रवीण गायकवाड हे महादेव जानकर,आण्णासाहेब डांगे,शेंडगे कुटुंबाबद्दल बरंच बोलले आहेत.
रासपच्या पक्ष स्थापनेच्या पहिल्या स्टेजवर होतात तर मग नंतर कुठे गेलात ?
एका धनगराच पोरगं पक्ष चालवतेय म्हणून तुम्हाला तिथे जावं अस वाटल नाही
तिथे तुम्ही जात वर्चस्वाची भावना आड आली
*ज्या शरद पवारांची तळी उचलतात ना हे प्रवीण गायकवाड त्यांना सवाल आहे ज्यावेळी सोनिया गांधी बरोबर फारकत घेऊन पवार दिल्लीहून मुंबईत आले त्या विमानतळावर सर्वात पहिला har घालणारे आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते*
त्यावेळी शेंडगे बापूंच स्टेटमेंट होत की मी तमाम धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांना पाठिंबा देतोय.
शरद पवार यांनी शेंडगे यांना काय फळ दिलं तर पुढच्याच निवडणुकीत कवठे महांकाळ मतदार संघात शिवाजी शेंगडे यांचा प्रभाव केला
माढा लोकसभा मतदारसंघात 6 ते 7 लाख लोक होती तुम्ही माझ्या अडीचशे मतावर बोलताय
*मी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता*
महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते त्यांची काय ग्रामपंचायत होती का इथे ? तरी त्यांनी तुम्हाला घाम फोडला होता.
*आम्ही वंचित घटकातील आहोत आमची तेवढी हैशियत असती तर आम्ही तुम्हाला कशाला तिकीट मागायला आलो असतो.*
*प्रवीण गायकवाड बात बहुजनांची करतात पण काम वतनदारांच करतात*
*ऑन_आर एस एस चा कट*
प्रवीण गायकवाड नेहमी मनुवादी भाजपावर टीका करतात
अजित पवार त्याच मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधील खीर वरपण्याचं काम करत आहेत ना?
*अजित पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपत आहेत*
तुम्ही कधी बहुजनांची लढाई लढलात.
या पवारांनी,या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी एकूण बजेट मधील 1 टक्का तरतूद ओबीसी ला केली नाही.
प्रवीण गायकवाड यांनी नेहमी इतिहास उकरून काढला ब्राम्हणांवर टीका केली.कधी माळी तर कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं
महाराष्ट्रात दोन नंबर ला संख्या असणाऱ्या धनगर समाजाचं एकही कारखाना होऊ शकला नाही.
*प्रवीण गायकवाड अभी तो बात सुरू हुई है दूर तक जाएगी*
*ऑन _सामाजिक न्याय विभाग कामकाज नाराजी*
याला जबाबदार अजित पवार आहेत,जातीयवादी अजित पवार
आदिवासी विभागाचा शेकडो कोटींचा निधी, समाजकल्याण चा शेकडो कोटी निधी, ओबीसी च्या महाज्योतीची 150 कोटीचा बॅकलॉक सारथी च्या विद्यार्थ्यांना 8 लाख जमा करणारे हे अजित पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एक रुपया द्यायला तयार नाहीत.
*सोशल जस्टिस म्हणजे काय? अजित पवारांना काय कळत*
*महाराष्ट्रातील लोकांनी कारखानदारांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत*
*अजित पवारांकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही,फडणवीसांवर आच विश्वास,येऊ घातलेल्या काळात मुख्यमंत्री बोलले नाहीत तर संघर्ष पुढचा काळ ओबीसींचा असेल*
*प्रवीण गायकवाड आणि त्याची सर्व संघटना डुप्लिकेट आहे*
*ऑन_धनगर आरक्षण*
2014 ला बारामतीत सात दिवसाच उपोषण झालं त्यातला कार्यकर्ता आहे.
धनगर समाज ओबीसी मध्ये येत नाही हे सांगीतले कोणी ?
केंद्रामध्ये धनगर हा ओबीसी मध्येच आहे.
त्यामुळं आमच्या ताटातील आरक्षण वाचवणं आमची जबाबदारी आहे.
धनगर समाजाची एस टी ची लढाई चालू राहील पण अगोदर ताटातील वाचवलं पाहिजे.
*ऑन_अजित पवार*
आम्ही हक्क मागितला की जातीय व्देष का ?
अभिजित वंजारी यांनी काल विधानसभेत प्रश्न उभा केला तेव्हा उत्तर द्यायला काय मुख्यमंत्री आले होते का
अर्थमंत्री ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यानेच उत्तर दिल ना
उत्तरदायित्व अजित पवारांकडे आहेत तर आम्ही त्याच्यावरच बोलणार ना ?
नेहमी गुळाला मुंग्या चिकटतात तसं अर्थ खात कशासाठी हवं असतं.
*उत्पादन शुल्क खाते अजित पवारांना यासाठी हवा आहे की जय पवार यांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन एक लाख हजार लिटरचा आहे तो कारखाना चालवायचा आहे*
*त्या कायद्यामध्ये खडाखोड करायचे आहे त्यासाठी त्यांना या गोष्टी लागतात*
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 17, 2025 11:36:50Hingoli, Maharashtra:
अँकर -हिंगोली जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाच्या वतीने भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा विक्री केंद्रामध्ये तपासणी केली असता गोरेगाव येथील नऊ कृषी निविष्ठा विक्री केंद्रात अनियमितता आढळून आली होती. याचा अहवाल कृषी अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर हिंगोलीचे जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन या नऊ दुकानांचे परवाने निलंबित केलेत. काही दुकानांचे परवाने हे पंधरा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहेत तर काही दुकानांचे परवाने सात दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 17, 2025 11:36:40Raigad, Maharashtra:
स्लग - रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक ........ पशुसंवर्धन आयुक्तांना घातला घेराव ......... खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी ....... खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद नाहीत. ....... शासनाने निर्णय घेवून देखील अंमलबजावणी नाही .........
अँकर - पोल्ट्री कंपन्या व खाद्य पुरवठादारांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देवून त्यांनी आयुक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले. पक्षांना पुरवल्या जाणारया खाद्याच्या बँगांवर त्यातील अन्नघटक नमूद केले जात नाहीत. करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंगच्या नियमांचे पालन होत नाही. शासनाने याबाबतचा निर्णय घेवून देखील याबाबत अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारक संतापले आहेत. वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकरयांनी केलाय.
बाईट 1 – पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी
बाईट 2 – डॉ. सचिन देशपांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन ....
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 11:36:24Beed, Maharashtra:
बीड: कौटुंबिक कलहातून पतीकडून विष प्राशन करण्याचा प्रयत्न, बीड पोलिस अधीक्षक कार्यालयातील घटनेने खळबळ... पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले...!!
Anc- नवरा-बायकोतील भांडणे भरोसा सेलमध्ये आले. बायको नांदण्यास तयार होती, परंतू पतीने नकार दिला. त्यांच्यात मनजुळवणी सुरू होती, परंतू पती नकार देत होता. अशातच आपल्यावर गुन्हा दाखल केल्यास आपण आत्महत्या करू, असा ई-मेल सहा दिवसांपूर्वी पतीने पोलिसांना पाठविला. त्याप्रमाणे गुरूवारी दुपारच्या सुमारास या पतीने तळ मजल्यातील भरोसा सेलसमोरच विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी त्याला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला.
बबन श्रीराम पाखरे असे आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो शिरूर कासार तालुक्यातील पाडळी गावचा रहिवासी आहे. पती छळ करून मारहाण करत असल्याची तक्रार पत्नीने भरोसा सेलला केली होती. त्याप्रमाणे दोन तारखा झाल्या. या बबन यांच्याकडून समेट घडविण्यास पूर्ण नकार दिला होता. त्यामुळे त्याच्यावर छळाचा गुन्हा दाखल होणार होता. हे समजल्यानेच त्याने सहा दिवसांपूर्वी पोलिसांना ई-मेल करून माझ्यावर अन्याय झाल्यास मी आत्महत्या करेल, अशी धमकी दिली होती. त्यादृष्टीने पोलिस सतर्क होते. गुरूवारी दुपारी भरोसा सेलमध्ये बोलणे सुरू असतानाच बबन तेथून बाहेर पळाला आणि सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रोखत बाटली हिसकावली. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती.
0
Share
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJul 17, 2025 11:36:09Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Police Chor Zatapat
File:02
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
Anc: पुण्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरी करुन गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी चोरी करण्यासाठी आलेल्या दोघा सराईत चोरट्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झालीय, पोलिस हवालदार विकास पाटील व राम जाधव यांनी रात्रीच्या सुमारास पाठलाग करत चोरट्यांशी झटापट करुन अखेर शिताफीने चोरट्यांना पकडले आहे.
रात्रगस्त घालत असताना पोलिसांना दोन संशयित युवक दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र दोघेजण दुचाकीहून पळून जात असताना चोरट्यांच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक बसली नंतर ते दुचाकी सोडून पळ काढत असताना पोलिसांची आणि चोरट्यांची यावेळी झटापट झाली आणि पोलिसांनी चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे...
0
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 17, 2025 11:33:44kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
----
नागपुरात पावसाच्या जोरदार सरी मुळे पावसामुळे सखल भागात खासकरून रेल्वे अंडरपास मध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.. उत्तर पूर्व नागपुरातील खैरिपुरा मेहदीबाग अंडरपास मध्ये गुडघाभर पाणी साचला आहे... त्यामुळे वाहतूक बंद झालीच आहे.. शिवाय परिसरातील मुलांनी साचलेल्या पाण्याचा वापर स्विमिंग पूल सारखा करत तिथे पोहणे सुरू केले आहे..
3
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 17, 2025 11:10:49Beed, Maharashtra:
बीड: साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण; आरोपी पोलिस शिपाई शीतल कदमची जामीन रद्द करा.. साक्षीच्या आईची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे आर्त हाक..!!
Anc- बीडच्या केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या साक्षी कांबळे या तरुणीने छेडखानी आणि लैंगिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी अभिषेक एकनाथ कदम आणि रेल्वे पोलिस कर्मचारी असलेली त्याची बहीण शीतल कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी अभिषेक कदम याची जामीन रद्द करण्यात आली आहे. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी अनुसूचित जाती जमातीचे आयोग आज बीडमध्ये आले होते. यावेळी साक्षीची आई कोयना यांची आयोगाने भेट घेत विचारपूस केली. या प्रकरणातील जामीन रद्द झालेला आरोपी अद्याप अटकेत नाही. शिवाय त्याची बहिण आरोपी शीतल कदम हिचेही जामीन रद्द करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.
बाईट: कोयना, मयत साक्षीची आई...
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 17, 2025 11:05:46Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Dowry
Feed on - 2C
-----------------------------
Anchor - हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्या प्रकरणी नांदेड मध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथिल ताऊबाई चव्हाण हिचा विवाह 2 जुलै रोजी राठोडवाडी येथिल सुधाकर राठोड याच्याशी झाला होता. 7 तारखेला परतनीला माहेरी येऊन नवविवाहिता 8 तारखेला सासरी गेली. 9 तारखेला मुलीला उलट्या होत असल्याचा फोन माहेरी आला. सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपाचारासाठी हैद्राबादला हलवण्यात आले. उपाचारा दरम्यान 13 जुलै रोजी नवविवाहितेचा मृत्यू झाला. हुंद्यासाठीच मुलीला विष पाजवून मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. एकूण 6 लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. 5 लाख रुपये हुंडा लग्नात देण्यात आला होता. पण एक लाख रुपयासाठी विष पाजवून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खूण आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपी पतिसह सासू, सासरे अश्या चौघाना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजन्यात आले का तिने स्वतः विष प्राशन केले याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
Byte - वामन चव्हाण - मुलीचे वडील
Byte - अशोक राठोड - मुलीचा मामा
Byte - शांताबाई - नातेवाईक
Byte - अबिनाशकुमार
----------------------------------
1
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 17, 2025 11:04:49Raigad, Maharashtra:
स्लग - पेणच्या दुरशेत ग्रामस्थांचे बाळगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन ....... अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी ..... पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न ..... पोलिसांचे कडे तोडून आंदोलक नदीत उतरले ......
अँकर - पेण तालुक्यातील दुरशेत ग्रामस्थानी आज बाळगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन सुरू केलं. गावातील नागरिक मुलाबाळांसह या आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी कडे करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु कडे तोडून आंदोलक पाण्यात उतरले. गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होते आहे. त्यामुळे अपघातांची भीती आहे. दगड खाणींकडे जाणाऱ्या या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी यासाठी रास्तारोको आंदोलन केले होते परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं. म्हणून आता जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 17, 2025 11:03:04Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला केल्याप्रकरणी दीपक काटेला जामीन मंजूर
- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला केल्याप्रकरणी दीपक काटेसह त्याच्या सहकाऱ्याला जामीन मंजूर
- अक्कलकोट दिवाणी व फौजदारी न्यायालयाने तिला जामीन अर्ज मंजूर
- वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर करण्यात आली जामीन
- दीपक काटे व त्याच्या सहकाऱ्याला आजच कोर्टात हजर केल्यानंतर पंधरा दिवसांची मिळाली होती न्यायालयीन कोठडी
- मात्र दीपक काटे आणि सहकार्याने जामिनासाठी अर्ज ठेवल्यानंतर अक्कलकोट दिवाणी व फौजदारी न्यायालयाने केला जामीन अर्ज मंजूर
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 17, 2025 10:39:48Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबई शहराचा स्वच्छ सर्वेक्षणातील सुपर स्वच्छ लीग’ मधे समावेश
नवी मुंबई शहर को स्वच्छ शहर अभियान मे मानांकन प्राप्त
ftp slug - nm nmmc swach abhiyan
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -नवी मुंबई शहराचा स्वच्छ सर्वेक्षणातील ‘सुपर स्वच्छ लीग’ मधे समावेश होऊन त्यामध्ये उच्च मानांकन मिळालं आहे. नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ पारितोषिक वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्विकारला.
10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन मिळालं आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन मिळवलं आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट झालेल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएक कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखलं आहे.
gf-
1
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 17, 2025 10:38:49Wardha, Maharashtra:
*वर्धा ब्रेकिंग*
SLUG- 1707_WARDHA_CHETAN_121
- वर्ध्यात सफाई कर्मचाऱ्याला दिली शिक्षकाची जबाबदारी
- वर्ध्याच्या पुलंगाव येथील धक्कादायक प्रकार उघड
- वर्धा जिल्ह्यात शिक्षणाचा खेळ खंडोबा
- शिक्षण राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे चाललेय तरी काय ?
- पदोन्नतीचा आदेश काढतांना चेतन चंडाले देखील पूर्वकल्पना दिली नाही
- पदोन्नतीच्या आदेशाने चेतन चंडाले धक्का बसल्याची प्रतिक्रिया
अँकर- वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव नगर परिषदेत स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला प्राथमिक शाळेत शिकविण्याची जबाबदारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षण राज्य मंत्री म्हणून स्वतः पालकमंत्री असणाऱ्या जिल्ह्यात ही धक्कादायक बाबा एका पत्रामुळे समोर आली आहे...पदोन्नती करणाऱ्या चेतन चंडाले याला साधी मराठी देखील बोलता येत नाहीय..परंतु या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे सांगितले की जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाहीय..मात्र या आदेशाने देखील त्याला धक्का पोहचल्याची प्रतिक्रिया चेतन चंडाले यांनी दिली आहेय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी...
बाईट- 121,चेतन चंडाले,सफाई कर्मचारी,पुलंगाव
0
Share
Report