Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

शिवेंद्रराजे भोसले यांचा धावता दौरा: मुंबई-गोवा महामार्गाचे काय होणार?

PPPRANAV POLEKAR
Aug 07, 2025 15:31:36
Ratnagiri, Maharashtra
ब्रेकिंगमुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा धावता दौरा..... मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा धावता दौरा..... मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम येथील घाटाची पाहणी न करताच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दौरा आटपला. परशुराम घाटातील वारंवार घडणाऱ्या दुरावस्थेकडे मंत्र्यांची पाठ. रायगड नंतर रत्नागिरी मधील महामार्गाची पाहणी करताना मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी टाकला टॉप गिअर. मंत्र्यांच्या धावत्या दौऱ्यामुळे महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Aug 07, 2025 17:45:42
Mumbai, Maharashtra:
anchor : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड असलेल्या विक्रोळी विधानसभेत आज ठाकरे गटाला शिवसेना शिंदे पक्षाने धक्का दिला आहे. आज मोठ्या संख्येने उबाठ चे शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले. शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज विक्रोळीत हा पक्ष प्रवेश पार पडला. विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीने पक्ष प्रवेश , विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षा चालकाना विमा वाटप ही करण्यात आले. ही पालिका निवडणुकीची नांदी आहे, कोणी किती ही एकत्र येऊ द्या महायुतीचा भगवाच फडकणार आणि पालकमंत्री बाबत होणार होणार अशी प्रतिक्रिया या वेळी भरत गोगावले यांनी दिली. तर आम्ही उबाठा ला विक्रोळीत खिंडार पाडल्याचे अनिल पांगारे म्हणाले. byte : भरत गोगावले byte: अनिल पांगारे
13
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 07, 2025 17:15:16
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_SUICIDE सातारा शहरालगत असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर आज संध्याकाळच्या सुमारास समर्थ मंदिर येथील एका व्यक्तीने घरामध्ये पत्नीसोबत झालेल्या भांडणातून अजिंक्यतारा किल्ल्यावर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. शांताराम लक्ष्मण पवार असे व्यक्तीचे नाव आहे... आज चार वाजण्याच्या सुमारास शांताराम पवार हे घरामध्ये पत्नी सोबत झालेल्या भांडणानंतर अजिंक्यतारा किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना हा व्यक्ती संशयास्पद रित्या किल्ल्याचा दक्षिण दरवाजा परिसरात आढळून आला याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अजिंक्यतारावर धाव घेत संबंधित युवकाला अर्धवट अडकलेल्या दरीतून मोठ्या शिताफीने बाहेर काढले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिले...मात्र या घटनेत तात्कळता तत्परता दाखवून युवकाला वाचवण्या साठी आलेल्या पोलिसांच्या रूपातील देवदूतांचे सर्वत्र कौतुक होत आहे....
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 07, 2025 16:46:37
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_MINOR_RAPE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, गुन्हा दाखल झाल्यावर फरार झालेल्या वनरक्षकाला गोंदिया येथुन अटक  अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे.  रंजीत दुर्योधन असे आरोपी वनरक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे  जात होती. रस्त्यात दुचाकी बंद पडली.  दोघेही दुचाकी दुरुस्त करत असताना, चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक रंजीत दुर्योधन त्यांच्याजवळ थांबला. त्याने मुलीच्या मित्राला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. यानंतर, त्याने अल्पवयीन मुलीला पुढच्या गावापर्यंत सोडतो, असे सांगून सोबत घेतले आणि चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर, घटनास्थळावरून पसार झाला. पीडित मुलीने पालकांसोबत बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीसांनी  आरोपी वनरक्षकाला गोंदिया येथून अटक केली आहे. बल्लारपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
14
Report
SMSarfaraj Musa
Aug 07, 2025 16:46:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - पैशाच्या वादातून वर्गमित्रानेचं केला मित्राचा डोक्यात दगड घालून खून... अँकर - पैश्याच्या वादातुन एका मित्राने मित्राचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या कुपवाड मध्ये घडला आहे. मयुर सचिन साठे,वय २४ वर्ष,असे मृत तरुणाचे नाव आहे,तर मित्राच्या खुनानंतर संशयित आरोपी मित्र प्रताप राजेंद्र चव्हाण , वय २४ वर्ष हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.दोघाही वर्गमित्र असून दोघांच्या मध्ये दारू पिल्यानंतर पैश्याच्या कारणातून मारामारीचा प्रकार घडला होता.हा राग मनात धरून प्रताप याने दारुच्या नशेत मित्र मयूर याच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे. कुपवाड औद्योगिक वसाहत मधील महावितरण कार्यालयाच्या शेजारी हा खुनाचा प्रकार घडला असून कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल झाला असून प्रताप चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.दरम्यान दोघा मित्रांचा दारूच्या नशेत केलेल्या मारामारीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. बाईट - प्रणिल गिल्डा - पोलीस उपाधीक्षक, मिरज.
14
Report
YKYOGESH KHARE
Aug 07, 2025 16:00:48
Nashik, Maharashtra:
nsk_leopard feed by 2C anchor नाशिक शहरात जयभवानी रोड येथे एस एस नेहरा यांच्या बंगल्या समोर आज बिबट्या सीसी टीव्ही कॅमेऱ्या मध्ये दिसला, नेहरा हे १० दिवसांपासून गावी आहेत , त्यांनी आपल्या मोबाईलवर सीसी टीव्ही कॅमऱ्यात बिबट्या बघितला, बिबट्या आज सकाळी ६. १२ मिनिटांनी फिरतांना दिसला परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केलीये दिवाळी परिसरात यापूर्वीही एकाच वेळी दोन बिबटे फिरताना दिसून आले होते लष्कराचा परिसर असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे
14
Report
ABATISH BHOIR
Aug 07, 2025 16:00:36
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली एमआयडीसी मधील एम्स हॉस्पिटल मधील धक्कादायक घटना तरुणाने एम्स हॉस्पिटल मधील चौथ्या माळ्यावरून मारली उडी तरुण जखमी उपचार सुरू Anchor :- डोंबिवली एमआयडीसी मधील एम हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली . सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने एम्स हॉस्पिटलच्या चौथ्या माळ्यावरून थेट खाली उडी मारली. रोहित कटके या तरुणाचे नाव आहे . त्याची आई एम्स रुग्णालयात उपचार घेत आहे .रोहित जवळपास अर्धा तास चौथ्या माळ्यावरील सज्जावर उभे राहून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत होता. त्याला अनेकदा विनवण्या देखील केल्या मात्र त्याने उडी मारली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल देखील त्या ठिकाणी पोहोचले मात्र याच दरम्यान या रोहितने चौथ्या माळ्यावरून खाली उडी मारली.या घटनेत या रोहितला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .रोहितची आई एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत .रोहितने उडी का मारली ?याचा तपास पोलीस करत आहेत.
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 07, 2025 14:32:31
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_RAKHI ( file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील 365 दिवस चालणाऱ्या पालडोह जि. प. शाळेतील विद्यार्थिनी बांधणार राष्ट्रपती मुर्मू यांना राखी, दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात पार पडणार रक्षाबंधन सोहळा      अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका जिवती च्या पालडोह या गावात जिल्हा परिषदेची  365 दिवस चालणारी शाळा आहे.  या  शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 9 ऑगस्टचे रक्षाबंधन खास ठरणार आहे.  दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात रक्षाबंधन सोहळा साजरा होणार आहे. त्याकरिता ३६५ दिवस चालणाऱ्या शाळेतील दिव्यंका बाजगीर, पूजा सोनवळे, पायल चव्हाण, माधुरी रूंजे, प्रतिक्षा आईतवाड या पाच मुली व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी असे एकूण सहाजण रवाना झाले आहेत. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर व पुणे या फक्त दोन जिल्ह्यांना हा मान मिळाला आहे. पालडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी हे सन २०१२ पासून ३६५ दिवस शाळा चालविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने करीत आहेत. या रक्षाबंधन सोहळ्याकरिता देशातील एकूण १९ राज्यातील ३१ शाळांची निवड करण्यात आली आहे. सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थी आपल्या पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून हा रक्षाबंधन सोहळा साजरा करणार आहेत. यानिमित्त देशाच्या राष्ट्रपतींशी पालडोह मधील एक छोट्या गावातील मुले संवाद साधतील. हा जिवती सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.  बाईट १) पूजा सोनवळे, सहभागी विद्यार्थिनी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
Report
SKSACHIN KASABE
Aug 07, 2025 13:48:48
Pandharpur, Maharashtra:
07082025 slug - PPR_JANSHAKTI file03 ---- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील महिंद्रा कोटक बँकेच्या कर्मचाऱ्यांची आडमुठी भूमिका सेविंग खात्यातील साडेतीन लाख हवे असतील तर 25 हजारांची इन्शुरन्स पॉलिसी काढा माढा तालुक्यातील उपळवटे येथील शेतकरी समाधान देवडकर यांनी त्यांच्या सेविंग खात्यामध्ये साडेतीन लाख रुपये ठेवले होते.दोन महिन्यांपासून सदर शेतकरी हे पैसे बँकेच्या कर्मचाऱ्यांना मागत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनी 25 हजाराची इन्शुरन्स पॉलिसी केली तरच पैसे मिळतील अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज चार वाजल्यापासून जनशक्ती शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे आणि कार्यकर्त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आतून कोंडून घेतल आहे. जोपर्यंत देवडकर यांचे सर्व पैसे त्यांच्या दुसऱ्या खात्यावर वर्ग केले जात नाहीत. तोपर्यंत आतून कोंडून घेतलेलं कुलूप काढले जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
14
Report
JMJAVED MULANI
Aug 07, 2025 13:48:05
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0708ZT_DAUNDPOLICE FILE5 दोघांचा महिलेवर जबरदस्तीने अत्याचार,दौंड पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल Anchor_दौंड तालुक्यातील माळेवाडी लिंगाळी येथे एका महिलेवर दोघांनी जबरदस्तीने अत्याचार केलाय. तर अन्य तीन व्यक्तींनी या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याची तक्रार दौंड पोलिसात दाखल करण्यात आलीय.पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजु काळे,संदीप राजु काळे,सुरज भावड्या पवार,निलेश जितेंद्र चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास दौंड तालुक्यातील माळेवाडी लिंगाळी येथे ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
14
Report
AAASHISH AMBADE
Aug 07, 2025 13:47:59
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0708ZT_CHP_BHUSE_MEETING ( single file sent on 2C)  टायटल:-- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चंद्रपुरात घेतली शिक्षण गुणवत्ता आढावा बैठक, आगामी काळातील शैक्षणिक उपक्रमांची घेतली माहिती अँकर:-- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चंद्रपुरात शिक्षण गुणवत्ता आढावा बैठक घेतली. त्यांनी बैठकीत आगामी काळातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. बैठकीत अनेक चांगल्या मुद्यांचे सादरीकरण झाले.  आयडॉल शिक्षकांच्या उपक्रमांचा इतरांनीही आदर्श घ्यावा. त्यांनी केलेले काम केवळ त्यांच्या शाळेपुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण केंद्रातील शाळांनी त्याचे अनुकरण करावे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावरील शाळांना भेटी द्याव्यात. त्यामुळे स्थानिक स्तरावर छोट्या छोट्या अडीअडचणींची माहिती होते व हे प्रश्न सहजासहजी सुटण्यास मदत होते अशी भूमिका भुसे यांनी मांडली. शाळांच्या भौतिक सुविधा पुर्ततेला शासनाने प्राधान्य दिले आहे. यात शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्वच्छ शौचालय, इमारतींची देखभाल दुरुस्ती, ई- सुविधा, वाचनालय, क्रीडांगण, लॅब या बाबींचा समावेश आहे. शाळांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर सी.एस.आर फंड, खनिज विकास निधी व इतर स्त्रोतातूनही निधी उपलब्ध होऊ शकतो. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पालकांच्या उपस्थित करावी. प्रत्येक विद्यार्थ्याचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा इयत्ता 4 थी आणि 7 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे दादा भुसे म्हणाले.  15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर कवायत उपक्रम राज्यस्तरावर राबविण्यात येणार असल्याची।माहिती त्यांनी दिली. बाईट १) दादा भुसे, शिक्षण मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
Report
JMJAVED MULANI
Aug 07, 2025 13:33:59
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 0708ZT_DAUNDMEETING BYTE 1 यवत पोलीस ठाण्यात पार पडली ग्रामस्थांची बैठक..... यवतमध्ये सामाजिक सलोखा राखण्याच पोलिसांच आवाहन Anchor_दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये एक ऑगस्ट पासून लावलेली जमावबंदी पुणे जिल्हाधिकारी यांनी आज पासून पूर्णपणे उठवली आहे. यानंतर यवत पोलीस ठाण्यात सर्व समाज बांधव यांची पोलिसांसोबत एक बैठक पार पडली आहे. सामाजिक सलोखा राखण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यवत घटनेची सीसीटीव्ही च्या आधारे पोलीस चौकशी करत असून यवतमधील स्थिती पूर्वीप्रमाणे नियंत्रणात राहण्यासाठी पोलीस विभागाची यवत मध्ये पुढील काही दिवस नजर असेल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांनी दिली आहे. बाईट _बापूराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड
14
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 07, 2025 13:33:51
Raigad, Maharashtra:
स्लग - मुंबई गोवा महामार्ग पूर्ततेसाठी नवीन डेडलाईन ...... डिसेंबर अखेर महामार्गाचे काम पूर्ण होणार ........ बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा दावा ..... मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची केली पाहणी ...... अँकर - गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. या महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलाय. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. रखडलेल्या कामाची कारणमीमांसा केली. अयोग्य ठेकेदार, भूसंपादनातील अडचणी आणि नैसर्गिक अडथळे यामुळे काम रखडलं ही वस्तुस्थिती आहे. परंतु माणगाव आणि इंदापूर येथील बायपास ची कामे वगळता महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असं शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केलं. बाईट - शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
14
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 07, 2025 13:06:46
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_DESAI_PHONE सातारा: साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या जलद कार्यपद्धतीमुळे प्रचलित आहेत.त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला की तडीस लावण्याचा त्यांचा हातखंडा आहे. असाच एक प्रत्यय आज जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात पत्रकार परिषद सुरू असताना आला. पत्रकार परिषद सुरु असताना अचानक जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरील लँडलाईन फोनची रिंग वाजली आणि तो वाजत असलेला फोन थेट पालकमंत्र्यांनी उचलला समोरील व्यक्ती बऱ्याच दिवसापासून सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत होता. याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांना करण्यासाठी फोन केला आणि जिल्हाधिकारी समजून संबंधित व्यक्तीने स्वतःचे तक्रार केली मात्र त्यांवर पालकमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न समजून घेऊन प्रांतधिकाऱ्यांना फोन लावून तात्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्या. यामुळे फोन करणाऱ्या वयक्तीने शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत. चुकून उचललेल्या फोन मुळे एकाचं काम मात्र मार्गी लागलं. Video सध्या चांगलाच व्हायरल होतोय *फोन सुरु असतानाच video*
14
Report
JJJAYESH JAGAD
Aug 07, 2025 13:05:13
Akola, Maharashtra:
Anchor : 'खालिद का शिवाजी' हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वादात अडकला आहे..या सिनेमाचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यावर काही महंतांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे..ते म्हणाले, "सिनेमा पाहिल्यावर त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल, पण न पाहता केवळ नावावरून किंवा टीझरवरून आक्षेप घेणं हे चुकीचं आहे."त्यांनी यावर पुढे प्रश्न उपस्थित केला की, "शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात हेच तथाकथित महान कुठे होते?" अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला..तथापि, मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे की सिनेमाच्या नावाला मात्र आपला विरोध आहे. Byte : अमोल मिटकरी , आमदार राष्ट्रवादी काँग्रेस..
14
Report
Advertisement
Back to top