421505
उल्हासनगरात शिवसेना आणि टीम ओमी कलानीची 'दोस्ती का गठबंधन' जाहीर!
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात कलानी आणि शिवसेना एकत्र , पुन्हा 'दोस्ती का गठबंधन' उल्हासनगरात विरोधी पक्ष उरणार नाही - खासदार श्रीकांत शिंदे आगामी महापालिका निवडणुकीत टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा Ulh sena kalani Anchor शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांची युती अबाधित आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात 'दोस्ती का गठबंधन' जाहीर करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरात भेट दिली. यावेळी टीम ओमी कलानीचे सर्वेसर्वा ओमी कलानी आणि त्यांच्या सदस्यांना पेढा भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीम ओमी कलानीचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी ओमी कलानी यांनी स्पष्ट केले. तसेच आगामी निवडणुका शिवसेना समवेत एकत्रित लढण्याची इच्छा ही यावेळी ओमी कलानी यांनी व्यक्त केली,उल्हासनगरात विरोधी पक्ष उरणार नाही अस समीकरण होत असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलीय Byte ओमी कलानी Byte गोपाळ लांडगे , जिल्हाप्रमुख सेना चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कृषिमंत्री भरणे पुणे में drought स्थिति का आकलन करेगा, किसान बांध पर संवाद करेंगे
Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज पुणे जिल्ह्यातील दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर संवाद साधणार आहेत. दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथून सकाळी साडेदहा वाजल्यापासून भरणे यांच्या दुष्काळ दौऱ्याला सुरुवात होणार आहे. दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा, बारामती तालुक्यातील मोरगाव, कुर्टी आणि पुरंदर तालुक्यातील नावळी, कोळविहिरे या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिमंत्री भरणे शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि दुष्काळ स्थितीचा आढावा घेतील. यावेळी त्यांच्यासोबत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे.0
0
Report
बारामती के सुपे में अहिल्यादेवी चौक पर फिर दुर्घटना, सीसीटीवी में कैद
Rui, Maharashtra:बारामतीच्या सुपे येथील अहिल्यादेवी चौकात पुन्हा अपघाताचा थरार पाहायला मिळाला. बंद पडलेली चार चाकी टोचन करून घेऊन जात असताना अचानक चैन तुटली आणि बंद पडलेली गाडी रस्त्यावरून धावून जाऊन एका विजेच्या खांबावर जाऊन आदळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.0
0
Report
फायनांस कंपनी के कर्मचारी ने खुद लूट की योजना बनाकर पैसे चुराने की साजिश रची, गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:फायनान्स कंपनीच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच स्वतःच्या लुटीचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या लासूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. फायनान्स कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी बाहेर पडला... त्यानंतर काही जणांनी हल्ला करून आपले हात-पाय बांधले आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याचा दावा त्याने केला. याबाबतचा एक व्हीडिओ सुद्धा viral झाला. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण लुटीच्या कटाचा पर्दाफाश झाला. स्वतःच्या मित्रांच्या मदतीने स्वतःलाच बांधून घेत कर्मचाऱ्याने लुटीचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. या गंगापूर पोलिसांनी कारवाई करत फायनान्स कर्मचाऱ्यासह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे रोख रक्कम हडप करण्यासाठी रचलेला हा ‘स्वतःच्याच लुटीचा प्लॅन’ आता पोलिसांच्या कारवाईमुळे चांगलाच अंगलट आला आहे.0
0
Report
Advertisement
स्पर्धा परीक्षा में असफलता से 23 वर्षीय वैष्णवी पाटील ने आत्महत्या की
Kolhapur, Maharashtra:स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने वैष्णवी पाटील या अवघ्या 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या भामटे या गावात ही घटना उघडकीस आलाॅय. वैष्णवी पाटील गेल्या दोन वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती, याच दरम्यान तिने रेल्वेची परीक्षा दिली होती, या परीक्षेत अवघ्या दोन मार्काने अपयश आल्याने काही दिवसापासून निराश होती. या नैराश्यातून तिने जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीने बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते, त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. त्यात वारंवार अपयश आल्याने ती निराश होती. रेल्वेच्या परीक्षेत आपण यश मिळवू असा विश्वास तिला होता , पण अवघ्या दोन मार्कांनी तिची ही संधी हुकली. यामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याच नातेवाईकांनी सांगितले.0
0
Report
वाशिम मानोरा में राजस्थानी जलविहार यात्रा भक्तों की भीड़ ने दिखाया जबरदस्त उत्साह
Washim, Maharashtra:वाशिमच्या मानोरा शहरात राजस्थानी समाजाच्या वतीने जलविहार यात्रेचे आयोजन करण्यात आले. बालाजी मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक शहरातून मार्गक्रमण करत अरुणावती नदीकाठी पोहोचली. याठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला नदीपात्रात स्नान घालून पूजा, आरती करण्यात आली. ‘जय कन्हैया लाल की’च्या जयघोषाने नदीकाठ दुमदुमून गेला. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यात्रेत महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.0
0
Report
दुष्काळ के बीच गणेश मूर्तियों का प्रतीकात्मक विसर्जन, दान की पहल पर जोर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील ज्या भागात पाऊस पडला नाही, तेथे गणेश मंडळांनी मोठ्या गणेश मूर्ती बसविल्या असतील तर त्यांनी यावर्षी त्या मूर्तीचे विसर्जन न करता, प्रतीकात्मक विसर्जन करावे, किंवा पुढील वर्षी विसर्जन करावे. तसेच श्रींची मूर्ती दान करण्याची संकल्पना आहे. त्यानुसारही काही निर्णय घ्यावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केले. त्यामुळं गणपती बाप्पाच्या सणाला दुष्काळाचा फटका बसताना दिसतोय...0
0
Report
Advertisement
प्रधानमंत्री आवास योजना: 3408 लाभार्थी, 2496 ने 10% जमा कर घर का अधिकार पक्का
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर प्रत्यक्ष साकार होत आहे. पहिल्या टप्यात लॉटरी लागलेल्या ३ हजार ४०८ लाभार्थ्यांपैकी २ हजार ४९६ जणांनी १० टक्के रक्कम जमा केली आहे. त्यामुळे घरावरील हक्क निश्चित झाला आहे. शहरात पाच ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी सुंदरवाडी येथील घरकुलांना नागरिकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. तेथील ८९६ पैकी तब्बल ८३९ जणांनी हिस्सा जमा केला. दुसरीकडे, ज्या लाभार्थ्यांना अद्याप - नोंदणी शुल्क भरता आले नाही त्यांना २४ सप्टेंबरपर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे.. त्यामुळे ही शेवटची संधी समजून नागरिकांनी पैसे भरावे असे आवाहन मनपाने केले आहे..0
0
Report
अम्बाबाई मंदिर संवर्धन मामले में अदालत ने समिति का दावा ठुकरा दिया
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संवर्धन कामातील श्रीपूजक गजानन मुनिश्वर आणि शिवकुमार शिंदे यांनी दाखल केलेला दिवानी दावा फेटाळावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दाखल केलेला अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे. कोर्टाने हा दावा पुढे चालणार असून दाव्यातील गुणवत्तेच्या आधारे याचा निर्णय होणार असं आदेश दिला आहे. एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला हा दणका मानला जात आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात संवर्धन विकास अंतर्गत कामे केली जात आहेत, पण यातील अनेक कामे आक्षेपार्य आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा निदर्शनास आल्यानंतर श्री पूजक गजानन मुनिश्वर यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.0
0
Report
सप्टेंबर के आखिर में बैंक पांच दिन बंद, नागरिकों को भारी असुविधा
Solapur, Maharashtra:solapur breaking - सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सलग पाच दिवस बँका बंद, बँक कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपामुळे नागरिकांना करावा लागणार गैरसोयीचा सामना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सलग पाच दिवस बँका राहणार बंद विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने तीन दिवसांची देशव्यापी संपाची दिली हाक शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर 28 ते 30 सप्टेंबर असे तीन दिवस बँकांचा असणार देशव्यापी संप त्यामुळे नागरिकांना 26 ते 30 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांमध्ये व्यवहार करता येणार नाही दरम्यानच्या काळात नागरिकांना डिजिटल बँकिंगचा, यूपीआयने करावे लागणार व्यवहार0
0
Report
Advertisement
वाशिम में ट्रक लूट: चाकू दिखाकर चालक-स्वामी से लूट, 2 गिरफ्तार
Washim, Maharashtra:ट्रक अडकवाकर चालक और मालिक को मारहाण कर चाकू दिखाकर लूटमार के मामले में वाशिम के दो आरोपियों को गिरफ्तार किया गया है। सांवरगाव बु. के पास घटने वाले इस घटना में आरोपियों ने 5 हजार रुपये नकद और 15 हजार रुपये मूल्य का मोबाइल समेत 20 हजार रुपये का माल लूट लिया था। पुलिस ने जांच कर अजय हरिभाऊ चव्हाण और आशीष नारायण चव्हाण को गिरफ्तार किया है, और उनके पास से लूट के मोबाइल जप्त किया गया है। इस प्रकरण के अन्य आरोपियों की तलाश जारी है।0
0
Report
मराठवाड़ा में पानी संकट गहरा, 243 टैंकर पानी पहुँच रहा है
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होताना दिसत आहे. भर पावसाळ्यात तब्बल २४३ टँकरने गावकऱ्यांची तहान भागवावी लागत आहे. दुसरीकडे धरणातील पाणीसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के तूट निर्माण झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ५६ टक्के पाऊस कमी झाला आहे. मराठवाड्यात भर पावसाळ्यात २४३ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर हे जिल्हे वगळता उर्वरित चार जिल्ह्यांतील १४२ गावे व ९१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. बीड मध्ये सर्वाधिक 120 टँकरने पाणी पुरवठा, तर छत्रपती संभाजी नगरात 96 टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट लातूर जिल्ह्यात ३०४ मिलीमीटरची आहे. छत्रपती संभाजीनगर ११९, जालना १२२, बीड १८०, धाराशिव २०२, नांदेड १८०, परभणी २९०, हिंगोली जिल्ह्यात २०२, २११ मिलीमीटर पावसाची तूट आहे. मराठवाड्यात ५१२ ठिकाणी विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे0
0
Report
सोलापूर के कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी को साखर उत्पादन के लिए राष्ट्रीय पुरस्कार
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादन के लिए देशपातळीवर सर्वोच्च सहकारी साखर कारखाना म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथे नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) द्वारे आयोजित सोहळ्यात, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून चेअरमन प्रशांत राव परिचारक यांनी हा पुरस्कार स्वीकारला0
0
Report
Advertisement
फुलंब्री मध्ये जिल्हा परिषद के अधिकारियों ने प्राथमिक शाळा सहित केंद्रों की अचानक चेकिंग की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि इतर शासकीय कार्यालयांची पाहणी केली. अचानक झालेल्या या पाहणीमुळे स्थानिक प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती, पोषण आહાર, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि शाळेतील सुविधांची तपासणी करण्यात आली. शाळेत काही त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. कामात निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे.0
0
Report
रामनगर में स्मशानभूमि की जगह संकट अभी भी बना, प्रशासन ने स्थायी समाधान का आश्वासन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रामनगर येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने देत आंदोलनही केले. यापूर्वी জলसमाधी आंदोलन करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. रामनगर येथील हरणाबाई रामजी गायकवाड यांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी पुन्हा जागेचा प्रश्न निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपली भूमिका बदलली आणि हरणाबाई गायकवाड यांच्या मृतदेहावर दुसऱ्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला. मात्र, वारंवार तक्रारी, निवेदने आणि आंदोलन करूनही स्मशानभूमीचा प्रश्न कायम असल्याने प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
कोठारी गांव में लगातार ड्रोन उड़ान, लोगों में भय और उत्सुकता बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम: सलग दो रात्री आकाशात ड्रोनच्या फेऱ्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परवा रात्री ११ ते ११.३० आणि काल रात्री ९.३० ते १० वाजेदरम्यान ड्रोनने दोन ते तीन फेऱ्या मारल्याचे नागरिकांनी सांगितले. सलग दोन दिवस ड्रोन दिसल्याने गावात चर्चांना उधाण आले असून, अनेक नागरिक घराबाहेर पडून चौकाचौकात जमा झाले. हा ड्रोन नेमका कुणाचा आणि गावावरून तो का फिरत होता, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच चिंता निर्माण झाली होती.0
0
Report
Advertisement
