Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला में 16 वर्षीय पर लैंगिक अत्याचार: समुदाय ने न्याय की मांग तेज़

JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 01:00:34
Akola, Maharashtra
Anchor : 06 सप्टेंबर रोजी अकोला शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळाची गंभीर घटना घडली.या निंदनीय प्रकाराविरोधात अकोल्यातील मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात भेट देऊन अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले.या प्रसंगी मुस्लिम समाजातील सर्व प्रतिनिधींनी या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे तर गुन्हेगार कोणत्याही समाजाचा असो, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.मुस्लिम समाज पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा असून पिढीतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं ही ते म्हणाले... Byte : मुफ्ती अशफाक कासमी.
12
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 12, 2025 04:31:24
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : कुर्डू मध्ये झालेला मुरूम उपसा हा बेकायदेशीर होता त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे - मंत्री जयकुमार गोरे ऑन मंत्री गोरे सोलापूर पाहणी. - शहराच्या दृष्टीने कचऱ्याचा, पाण्याचा, ड्रेनेजचा विषय महत्त्वाचा आहे - सोलापुरातील काही झोपडपट्टी भागात ड्रेनेजची मोठी समस्या आहे. - यामुळेच शहरातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि तेथील वस्तुस्थिती समजून घेतलं. - जोपर्यंत वस्तुस्थिती समजत नाही तोपर्यंत तिथला उपाय करणं सोपं जात नाही. - सोलापुरातील सर्वात मोठी अडचण सार्वजनिक शौचालयाची आहे. - यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात बैठक घेतली. *- ऑन कुर्डू मुरूम उपसा अहवाल :* - *कुर्डू मुरूम उपसा प्रकरणाच्या अहवालावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया* *- कुर्डू मध्ये झालेला मुरूम उपसा हा बेकायदेशीर होता त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे.* *- त्या ठिकाणी जी काम मंजूर झाली होती त्याची मुदत संपलेली होती तसेच उत्खनन करण्यासाठी कोणतेही परवानगी घेतलेली नव्हती* - *- या प्रकरणामध्ये काही लोकांचा सहभाग आहे त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला वेठीस धरू नये* - जी वस्तुस्थिती आहे ती समोर आलीय. ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. समन्वयाने पुढे गेले पाहिजे. गाव बंद ठेवून प्रश्न सुटणार नाहीत. - ज्या गोष्टी आता घडल्या त्या पुन्हा घडू नये. - वाळू तस्करी मुरूम तस्करी यासाठी कोणीही कितीही प्रेशर आणला तरी या कारवाया थांबणार नाहीत. - ज्या घटना घडल्या त्याची योग्य की अयोग्य याची चौकशी होईल. - मात्र वाळू किंवा मुरूम उत्खनन जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे चालू दिले जाणार नाही. - सरकार म्हणून आम्ही शंभर टक्के अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू. कोणी कितीही प्रेशर आणले तरी कारवाई होणारच. *- मुरूम उत्खनन थांबवा ही अधिकाऱ्यांची भूमिका योग्यच होती* - काही लोक यात राजकारण आणून व्यवस्थेवर प्रेशर आणून स्वतःचे काम करून घेण्याचा प्रयत्न करतात. ते आम्ही होऊ देणार नाही. - जे उत्खनन सुरू होतं ते बेकायदेशीरच होतं. अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई होईल. - स्थानिक व्यक्तींकडून राजकीय व्यवस्थेचा गैरवापर करणे, लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देणे हे चुकीचंच आहे. - यामध्ये भविष्यात काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. *ऑन भुजबळ अराजकता विधान* *- हैद्राबाद गॅझेटचा जो विषय आहे, यासंदर्भात मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा झालेली होती.* - त्यांचे जे काही समज गैरसमज असतील त्याबाबत मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी चर्चा करतील आणि चर्चेतून मार्ग निघेल. - त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य जबाबदार व्यक्तींनी टाळली पाहिजेत. *- सामाजिक सलोखा राखणं, एकमेकांबद्दल कटूता निर्माण होणार नाही याची काळजी घेणं शासन म्हणून आपली जबाबदारी आहे.* - माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्याने सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. - सर्व समाज बांधवांचे प्रश्नही समजून घेतले आहेत आणि त्यातून ते मार्गही काढत आहेत. *- ऑन मराठा जीरआर विरोधी याचिका :* - आपला देश लोकशाही प्रधान देश आहे. यात व्यवस्था आणि शासन व्यवस्था आहे. ते आपलं काम करत असतात. - शासनाने सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ओबीसींच्या आरक्षणाचंही रक्षण केलं. *- ज्यांना असुरक्षित वाटतं ते न्याय देवताकडे जातील. न्यायदेवता योग्य तो निर्णय देईल.* *Byte : जयकुमार गोरे (पालकमंत्री)*
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Sept 12, 2025 04:18:38
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग SLUG- 1209_WARDHA_RAIN - वर्धा जिल्ह्यात पावसाची धो - धो - रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले - यशोदा नदी वाहतेय दुथडी भरून - सहाव्यांदा यशोदा नदीला आलाय पुर - शेकडो हेक्टरमधील उभी पिकं आलीय पाण्याखाली - जिल्ह्यातील प्रमुख मार्ग झालेय।वाहतुकीसाठी बंद - *यशोदा नदी दुथडी वाहत असल्यामुळं राळेगाव - वर्धा महामार्ग वाहतुकीसाठी झालाय बंद* - अलमडोह - अल्लीपूर मार्ग पुलावर पाणी आल्यानं झालाय बंद - चाणकी ते भगवा, कानगाव ते चणकी मार्गही झालाय बंद अँकर - वर्धा जिल्ह्याला दोन दिवसांपासून पावसाने धो धो धुतलंय. त्यामुळं नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वर्धा ते राळेगाव महामार्ग बंद झालाय. अलमडोह - अल्लीपूर, चाणकी ते भगवा, कानगाव ते चाणकी मार्गही वाहतुकीसाठी बंद झालाय. सहव्यांदा यशोदाला मोठा पुर आल्यानं शेकडो हेक्टरमधील उभं पिक पाण्याखाली आलंय. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे..
2
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 12, 2025 04:18:12
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Gondia Slug - 1209_GON_MURDER FILE - 1 VIDEO, 6 IMAGE दारुड्या वडीलाला ठार करणाऱ्या मुलास अटक... केशोरी पोलीसांत गुन्हा दाखल Anchor : - गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोंडगाव येथील विलास मानकर हा सायंकाळच्या सुमारास दारु पिऊन आपली पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करु मारहाण करू लागला... मुलाने शिवीगाळ करु नको म्हणून आपल्या वडीलांना समजविण्याचा खुप प्रयत्न केला परंतु वडील काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि पत्नी व मुलास शिवीगाळ करणे सुरुच ठेवले होते. वडीलांच्या कृत्याचा मुलाला खुप राग आल्याने त्याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लाकडी काठीने मारुन जागीच ठार केले. या प्रकरणी केशोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला अटक केली आहे.
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 12, 2025 04:16:25
Pandharpur, Maharashtra:12092025 Slug - PPR_D_LIVE file 02 ---- PPR_D_LIVE Anchor - माढा तालुक्यातील कुर्डू गाव मध्ये आज बंद ठेवण्यात आलेला आहे. प्रशासनानं केलेल्या कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामस्थांनी हा बंद ठेवलेला आहे.मात्र माढा तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहेत ज्या गटातून मुरूम उत्खनन सुरू होतं हे मुरूम उत्खनन बेकायदेशीर रित्या सुरू होतं. असा अहवाल सादर केलेला आहे.ग्रामस्थांचं जे म्हणणं आहे की पाणंद रस्त्यासाठी आम्ही मुरूम उपसा करतोय गावच्या विकासासाठी हे काम सुरू होतं मात्र तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून जी माहिती घेतली त्यामध्ये सदर कामाची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. त्यामुळे कुर्डू मध्ये सुरू असलेला मुरूमचा उपसा हे बेकायदेशीर रित्या सुरू होतो हे आता कायदेशीर शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या ज्या कारवाई साठी गेल्या होत्या ती बाब योग्य होती हे समोर येत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 04:15:43
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाने यंदा एक आगळावेगळा पराक्रम करून दाखवला आहे.नेहमी जीव वाचवण्याचे कार्य करणाऱ्या या पथकाने यावेळी मोबाईलचा रेस्क्यू करून दाखवला आहे.अकोला जिल्ह्यातील येडवण येथे एका व्यक्तीचा एपल कंपनीचा महागडा मोबाईल चक्क 26 फूट खोल विहिरीत पडला. या मोबाईलमध्ये महत्त्वाचा डाटा आणि माहिती असल्यामुळे मालक अक्षरशः अस्वस्थ झाला होता.मोबाईलचा शोध कार्य प्राण वाचवण्याइतकंच आव्हानात्मक होतं. मात्र, पथकाने तब्बल 24 तास अथक प्रयत्न करून 26 फूट खोल पाण्यातून हा मोबाईल शोधून काढला. विशेष म्हणजे मोबाईलला कुठलीही इजा झाली नसून तो सुरळीत सुरू आहे.मोबाईल परत मिळताच मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. या अनोख्या मोहिमेमुळे संत गाडगेबाबा शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.खऱ्या अर्थाने, हे पथक आता "प्राण आणि डेटा वाचवणारे" ठरत आहे..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 12, 2025 03:48:07
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn traffic issue av Feed attached छत्रपती संभाजी नगर शहरातील गोंधळलेल्या सिग्नल व्यवस्थेला आता एआय आधारित स्मार्ट सिग्नल प्रणालीचा आधार मिळणार आहे. त्यामुळे चौकांवरील गर्दी, वेळेचा अपव्यय आणि वाहतुकीतील अडथळे कमी होणार आहेत. स्मार्ट सिटी प्रशासनाने यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. स्मार्ट सिटी कार्यालयात  अभियंत्यांनी आराखडा सादर केला. त्यानंतर सेव्हन हिल्स किंवा क्रांती चौक येथे प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत वाहनांच्या रांगा  असेल तोपर्यंत हिरवा दिवा सुरू राहील, आणि वाहन संपताच लाल दिवा पुन्हा सुरू होईल त्यामुळे वाहतूक कोंडी टळू शकते आणि सिग्नल साठी खूप वेळ वाट पाहणं सुद्धा टळणार आहे
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 12, 2025 03:46:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn manpa av Feed attached छत्रपती संभाजीनगर मध्ये निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेले प्रभागाचे नकाशे, हद्द, व्याप्ती योग्य आहे किंवा नाही, याची खातरजमा गुरुवारी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या दुरुस्तीचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत घेतील. प्रभागांच्या आक्षेपांवर बुधवारी झालेल्या सुनावणीत अनेकांनी या चुका निदर्शनास आणल्या. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यांच्या उपस्थितीत आक्षेपांवर सुनावणी झाली. सुनावणीस २९२ आक्षेपकर्ते उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने बुधवारी रात्रीच नगररचना, वॉर्ड अभियंते, वॉर्ड अधिकारी यांना प्रत्येक प्रभागाची हद्द नकाशे, व्याप्तीनुसार तपासणी करण्याचे निर्देश दिले. गुरुवारी सकाळी ७विविध वाजेपासून पथकांनी सर्व प्रभागांची तपासणी केली. पाहणीचा अहवाल तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या अहवालानुसार जिथे त्रुटी, चुका आढळून येथील त्या दुरुस्त केल्या जाईल
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 12, 2025 03:45:38
Thane, Maharashtra:भिवंडी.. भिवंडी शहरातील धामणकार नाका परिसरामध्ये उघड्या गटारामध्ये टेम्पो फसला... शहरात अनेक भागांमध्ये गटार व नाल्यांवर झाकण नसल्याने अनेक अपघात होत आहे... टेम्पो चालकाने अनेक प्रयत्न केल्यानंतर हा टेम्पो एक ते दीड तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे.... मात्र या काळात या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती... टेम्पो फासल्याने अनेक नागरिकांनी यावेळी महानगरपालिके विरोधात संताप व्यक्त केला आहे... वारंवार तक्रारी करून सुद्धा महापालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे... एखादी मोठी घटना घडल्यावर पालीका प्रशासन आपलं लक्ष केंद्रित करेल काय, असा सवाल भिवंडीकर उपस्थित कर आहेत...
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 12, 2025 03:32:13
Nashik, Maharashtra:*Breaking... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* - मजुरांची पीक अप व कारचा भीषण अपघात... - अपघातात तीन मजुर ठार 10 ते 12 मजूर जखमी - सटाण्याच्या अंतापुर शिवारातील घटना... Anchor :- नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ताहाराबाद - मुल्हेर रस्त्यावर अंतापूर शिवारात मजुरांना घेवून जाणारे पिक अप वाहन व कार यांच्या झालेल्या भीषण अपघातात तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आशा सोनवणे हे तीन मजूर ठार झाले आहे तर 10 ते 12 मजूर जखमी झाले झाले आहेत.काल रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य राबवून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृत आणि जखमी सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत व असेरा परिसरातील रहिवाशी आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top