Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में नारोला नदी में भीषण बाढ़, संपर्क टूट गया

NMNITESH MAHAJAN
Sept 28, 2025 02:01:15
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2809ZT_JALNA_NAROLA(4 FILES) जालना | बोडखा बुद्रुक येथील नारोळा नदीला पूर बोडखा बुद्रुक ते घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटला मुसळधार पावसामुळं पुलावरून पाणी वाहू लागले अँकर|  जालना जिल्ह्यातल्या बोडखा बुद्रुक येथील नारोळा नदीला पूर आलाय.. त्यामुळं बोडखा बुद्रुक ते घनसांवगी तालुक्याचा संपर्क तुटला आहे.. मागच्या काही दिवसांत जिल्ह्यात सतत पाऊस पडतोय. त्यामुळं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.. तीन दिवसांच्या उघडीपानंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लगावलीये.. त्यामुळं नारोळा नदीला पूर येवून बोडखा बुद्रुक ते घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटला आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Sept 28, 2025 03:34:10
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 28, 2025 03:32:25
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2809ZT_MAVAL_ZENDU Total files : 03 Headline : मावळात झेंडूची शेती मातीमोल पावसामुळे झेंडूवर वाढला बुरशीजन्य रोग Anchor : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाचा मोठा फटका आता झेंडूच्या फुलांच्या पिकांना बसू लागला आहे. दसरा आणि दिवाळी सणासाठी केलेली झेंडूची लागवड बुरशीजन्य रोगांनी पोखरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः मातीमोल नुकसान झाले असून पुढील उत्पादन धोक्यात आले आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात सलग पडणाऱ्या पावसामुळे झेंडूच्या पिकांवर बुरशीजन्य रोग जलद गतीने पसरत आहेत. आर्द्रता वाढल्याने झेंडूच्या रोपांवर काळपट डाग, देठ कुजणे आणि फुलकळ्या गळत असल्याचे चित्र दिसत आहे. दसरा आणि दिवाळीच्या आगोदर मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड करण्यात आली होती. मात्र रोगराई वाढल्याने फुलांचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे तर संपूर्ण रोपवाटेचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील मागणी आणि भाव लक्षात घेऊन मोठ्या अपेक्षेने उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बाईट : शेतकरी (file no.02,03)
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 03:30:27
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..... स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यात ५६ मार्गावरील वाहतूक ठप्पच....गेल्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाचा हाहाकार.....मुसळधार पावसामुळे ६० पैकी तब्बल ३८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद.....नदीकाठी पुरस्थिती कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी....पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन.... AC ::- दोन दिवसापासून पावसाने लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे ६० पैकी तब्बल ३८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरणांचे व बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आल्याने सर्वच नद्या-नाल्यांना महापूर आला असून, त्याचे रौद्ररूप धारण केलेले पाणी गावागावांत शिरले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पुरामुळे ५६ मार्ग बंद पडले असून, जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे ठप्प झाली आहे. नदीकाठी पुरस्थिती कायम आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.... बाईट ::- पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 28, 2025 03:18:22
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2809ZT_MAVAL_RICE_DAMAGE_N Total files : 05 Headline : मावळात भात पिकांवर करपा रोगाचे संकट गडद -भातपिक उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त -हातातोंडाशी आलेला भात पिकांचा घास निसर्ग हिरावतोय Anchor : मावळ तालुक्यात खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे भात. मात्र याच भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मावळ तालुक्यातील विविध भागांत भाताच्या शेतात करपा रोगाची लक्षणं दिसू लागली आहेत. पानांवर काळपट डाग, कोमेजलेली रोपे आणि वाढ खुंटल्याने उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक वातावरणातील आर्द्रता आणि अनियमित पावसामुळे हा रोग झपाट्याने पसरतोय. काही ठिकाणी करपा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पसरल्याची शेतकऱ्यांची माहिती आहे.कृषी अधिकाऱ्यांनी योग्य कीटकनाशके फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतभेटींद्वारे मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. करपा रोगावर वेळीच नियंत्रण न मिळाल्यास भात उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा करत आहेत. याच शेताच्या बांधावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt Chaitralli (file no.03) बाईट : शिवाजी राक्षे, शेतकरी (file no.04) बाईट : अंकुश राक्षे, शेतकरी (file no.05)
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 28, 2025 03:17:34
Virar, Maharashtra: Date-28sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VIRAR RAIN Feed send by 2c Type-AV Slug- वसई विरार मध्ये रात्रीपासून दमदार पाऊस नाला ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावर रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप अँकर - वसई विरार मध्ये काल रात्री विजांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह अचानक जोरदार पावसाने सुरुवात केली... अवघे काही तास पडणाऱ्या पावसाने शहरातील रस्ते सखल भाग जलमय झाले आणि त्यामुळे शहरातील वाहतूक कोलमडलेली पहायला मिळाली... विरार पूर्वेच्या हिल पार्क येथील डोंगराळ भागातून येणारा मुख्य नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत होता, त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते... या पाण्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर यातून वाट काढताना दुचाकी चालकांची चांगलीच दमचाक झाली... तसंच कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे पावसामुळे हाल झाले..
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 28, 2025 03:16:10
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 28, 2025 03:03:33
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 2809_BHA_PIKPANI FILE - 6 VIDEO नवरात्रीत झेंडू फुलांच्या मागणीत वाढ.... फुल उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय फायद्या...... Anchor : भात शेतीला फाटा देत लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील प्रगतशील शेतकरी अंकुश नंदनवार यांच्या कडे 13 एकर शेती आहे. त्यात 4 एकर बागायती शेती करीत असून पाऊण एकर शेती मध्ये मे-जून महिन्यापासून झेंडू फुलांची लागवड केली आहे.गणेशउत्सव ते नवरात्रीत झेंडू फुलांचे मागणी मोठ्या प्रमाणात असून फुलांच्या मागणीत वाढ झालेली आहे.आता पर्यत झेंडू फुलामुळे शेतकऱ्यला एक ते दीड लाखापर्यंत फायदा झाला आहे. मात्र सद्या येत असलेल्या पावसामुळे फुल तोड्याला अडचणी येत असून याचा सामना शेतकरी नंदनवार यांना पडत आहे. बाईट - अंकुश नंदनवार शेतकरी
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 03:03:24
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 28, 2025 03:03:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn jayakwadi av Free attched छत्रपती संभाजी नगरच्या पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडण्यात आले आहे नियमित 18 दरवाजांसह नऊ आपातकालीन दरवाजे सुद्धा उघडण्यात आले आणि त्यातून 95 हजार क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे नाशिक भागात पाऊस झालाय त्यामुळे पाण्याची मोठी आवक धरणात सुरू आहे सोबतच परिसरातही पाऊस सुरू आहे त्यामुळे दरवाजे उघडण्याची ही वेळ आली आहे परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणाचा  विसर्ग एक लाखापेक्षा जास्त झाल्यात परिसरात पूर येण्याचा धोका आहे त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी आहे नागरिकांनाही खबरदार राहण्याचं सांगण्यात आलंय
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 28, 2025 03:01:22
Bhandara, Maharashtra:तहसीलदारांच्या बदलीसाठी सरपंच आक्रमक.... ३० सप्टेंबरला आंदोलनाचा सरपंच संघटनेचा इशारा Anchor : भंडाऱ्याचे तहसीलदार संदिप माकोडे यांनी सरपंचांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप होत असून त्यांच्या विरोधात सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. सरपंच काही काम निमित्ताने तहसीलदार यांच्याकडे गेले असताना त्यांनी सरपंचनां गैर वर्तन केले. त्यामुळे असा मग्रूरी तहसीलदार माकोडे यांची तीन दिवसात बदली करावी जर बदली झाली नाही तर ३० सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. म्हणून आता जिल्हाधिकारी महोदय काय निर्णय घेताय ते पाहण्यासारख असेल
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 28, 2025 03:01:12
Ratnagiri, Maharashtra:अँकर - रत्नागिरी जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलंय उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला होता तर दक्षिण रत्नागिरीत पाऊस रिपरिप कोसळतोय... आज आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे समुद्रात वादळ असल्याने मच्छिमारांनी 29 सप्टेंबर पर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन मत्स विभागाने केलंय. वादळाच्या धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटाही लावण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारीचे आणखी काही दिवस वाया जाणार आहेत. पावसाळी मासेमारी बंदी नंतर 1 ऑगस्टपासून पारंपारिक तर 1 सप्टेंबर पासून पर्ससीन मासेमारी सुरु झाली. मासेमारी सुरु होते तेव्हा लगेचच पुर्ण क्षमतेने मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पारंपारिक आणि पर्ससीन नेट नौकांची मासेमारी गेले अनेक दिवस होऊ शकलेली नाहीत. त्यातच आता हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह समुद्रातील वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्रात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून मच्छिमारांनी 29 सप्टेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top