Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413102

इंदापूरमध्ये सरपंच आरक्षण सोडत: राजकीय समीकरणे बदलणार?

JMJAVED MULANI
Jul 11, 2025 13:35:01
Baramati, Maharashtra
JAVEDMULANI SLUG INDAPURSODAT FILE 3 इंदापूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर ... ANCHOR : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील ९६ गावांची सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम शहरातील वाघ पॅलेस याठिकाणी पार पडलाय.. ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २३ एप्रिल म्हणजेच चार महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण रद्द करुन नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली.१५ जुलैपर्यंत आरक्षण नव्याने सुनिश्चित करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार नव्याने शुक्रवारी (दि.११जुलै) इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत पार पडलीय. त्यामुळे अनेक गावांतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली असल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. एकूणच नव्याने आरक्षण जाहीर झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंचांत कभी खुशी कभी गमची स्थिती पहावयास मिळत आहे इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, निवासी नायब तहसीलदार स्वाती राऊत,अविनाश डोईफोडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, महसूल सहाय्यक दीपक पवार ,राहुल पारेकर उपस्थित होते. यामध्ये अनुसूचित जाती स्री साठी सात गावे,अनुसूचित जमाती स्त्री 1,अनुसूचित जाती 7 गावांत, नागरिकांचा मागास प्रवर्ग14 गावे,नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री प्रवर्गासाठी 13गावे, सर्वसाधारण स्री 27 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 267 गावांत सरपंच आरक्षण चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आले आहे...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top