Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवलीत गोव्याच्या राज्यपालांचा मल्याळम भाषेत भाषण, व्हिडियो व्हायरल!

ABATISH BHOIR
Jul 11, 2025 18:30:09
Kalyan, Maharashtra
डोंबिवलीत भाषेचा विषय पुन्हा एकादा चर्चेत मराठमोळ्या डोंबिवलीत गोव्याच्या राज्यपालांनी केलं मल्याळम भाषेत भाषण.... व्हिडियो झाला व्हायरल केरळ समाजम् मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन आणि उत्सव समारंभास आले होते गोव्याचे राज्यपाल डॉ. पी.एस. श्रीधरन पिल्लई मनसे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी केली एक्स पोस्ट होतेय व्हायरल एक्स करत मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्यांचे टोचले कान "प्रत्येकाने आपापली भाषा व संस्कृती जपावी पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मान ही ठेवावा हीच अपेक्षा असते.यात कोणत्या भाषेचा व लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांनी काय केली पोस्ट आज डोंबिवलीत गोव्याचे राज्यपाल डॉ. पी.एस. श्रीधरन पिल्लई हे केरळ समाजम् डोंबिवली अंतर्गत मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन आणि उत्सव समारंभास आले होते .या मल्याळम कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण संवाद मल्याळम मध्ये साधला. आपल्या भाषेवर इतकं प्रेम असणारे हे दक्षिणेकडील राज्यातील लोक आपल्या भाषेसाठी इतके कडवट असतात. अर्थातच त्यांचा हा कडवट पणा त्यांच्या भाषेवर असलेल्या प्रेमापोटी असतो व तो असलाच पाहिजे.याच संस्थेचे अध्यक्ष श्री.वर्गीस सर हे आम्ही भेटल्यावर उत्तम मराठी बोलतात हे ही इथे प्रकर्षानं सांगावेसे वाटते. सांगण्याचा हेतू हाच आहे की इथे राहणाऱ्यांनी त्यांचा वेगळेपणा जपत इथल्या संस्कृतीशी एकरूप झाल्यावर आपल्या देशातील विविधतेतील एकताच आपल्याला दिसते ना ? प्रत्येकाने आपापली भाषा व संस्कृती जपावी पण सोबतच ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील राजभाषेचा मान ही ठेवावा हीच अपेक्षा असते.यात कोणत्या भाषेचा व लोकांचा द्वेष करण्याचा प्रश्न येतोच कुठे ? साउंड.. byte
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top