Back
समीर भुजबळ: ओबीसी चळवळ बळकट करण्यासाठी चंद्रपुरात घेतला आढावा!
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 0707ZT_CHP_SAMIR_BHUJBAL
( single file sent on 2C)
टायटल:-- महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी चळवळ बळकट करणार, कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांनी चंद्रपुरात घेतला संघटनेच्या विस्ताराचा आढावा
अँकर:-- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून विदर्भातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी माजी खासदार व संघटनेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ आज चंद्रपुरात पोचले. स्थानिक विश्रामगृह येथे त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातील संघटना कार्याचा आढावा घेत सद्यस्थिती जाणून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या संपूर्ण कामात समता परिषदेच्या माध्यमातून व विशेषतः महिला आघाड्यांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने माहिती नोंदली गेली पाहिजे याबाबत आपण आग्रही असून याच कामासाठी आपण विदर्भात विविध जिल्ह्यात दौऱ्यावर असल्याचे भुजबळ म्हणाले.
बाईट १) समीर भुजबळ, कार्याध्यक्ष, म. फुले समता परिषद
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ दलित महासंघाचा महापालिकेवर ढकल गाडा मोर्चा.
अंक - सांगली महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर ढकलगाडा मोर्चा काढण्यात आला.महापालिकेच्या आयुक्त सत्यम गांधींच्याकडून शहरातल्या हातगाडी- फेरीवाल्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे,मात्र याला दलित महासंघाने विरोध दर्शवला आहे,केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाले धोरण अंतर्गत हातगाडी फेरीवाल्यांना संरक्षण देण्याची भूमिका असताना आयुक्त गांधींच्याकडून मात्र केंद्राच्या आणि न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करण्यात येत असल्याचा आरोप करत महापालिका कार्यालयावर ढकलगाडा मोर्चा काढत कारवाईचा निषेध नोंदवला आहे,महापालिका कडून कारवाई सुरूच राहिल्यास आयुक्तांना कोंडून घालू,असा इशारा यावेळी दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.
बाईट - उत्तम मोहिते - अध्यक्ष,दलित महासंघ .
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0707ZT_WSM_FARMERS_BANK_ANDOLAN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिमच्या रिठद परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली अनुदान रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रने होल्ड केल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बँकेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आलं. 'आधी कर्ज भरा, मगच पैसे काढा' या अटीला विरोध करत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.पोलिस मध्यस्थीनंतर बँकेने होल्ड हटवून शेतकऱ्यांना रक्कम देण्यास सुरुवात केली.बँक मॅनेजरने यापुढे कोणत्याही खात्यावर होल्ड न लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असल्याचे आंदोलकांनी सांगितले
बाईट:सतीश इडोळे,आंदोलन शेतकरी
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - आजच्या राज्यकर्त्यांना शाहू , फुले आंबेडकर यांच्याबाबत आस्था किती ? ...... शरद पवारांनी व्यक्त केली शंका ..... महाराष्ट्राचे चित्र बदलावे लागेल ...... डाव्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज .........
अँकर - महाराष्ट्राचे चित्र बदलावे लागेल महाराष्ट्र पुन्हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आणावे लागेल आज ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सुत्र आहेत त्यांना शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या विचारांची किती आस्था आहे याच्या बाबतची शंका वाटते अशी टिका शरद पवार यांनी राज्य सरकार वरती केली. डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत रिपब्लिकन पक्ष देखील एकत्र आल्यास राज्यात बदल होऊ शकतो असे सुतोवाच त्यांनी केले अलिबाग येथे शेकाप नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
साऊंड बाईट - शरद पवार
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Anc - एका वर्षात पैसे दुप्पट करण्याचे आणि गुंतवणुकीवर भरघोस मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून "ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी"ने शिर्डीसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे पाटील याला शहादा येथे अटक झाली असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि राहाता येथे देखील गुन्हे दाखल झाले आहेत.. शिर्डीत साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांसह इतरांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलं असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
V/O - पैसे दुप्पट होण्याच्या आमिषामुळे अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची जवळपास 300 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय.. भूपेंद्र सावळे या ठगसेनाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने हा सगळा महाघोटाळा केलाय.. शेकडो लोकांची फसवणूक करून फरार झालेल्या भूपेंद्र सावळे याला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी परराज्यातून ताब्यात घेतले आहे.. शिर्डीत देखील या महाठगाने अनेकांना वर्षभरात दुपट्ट पैसे आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक केली आहे.. शिर्डी आणि परिसरातील 21 गुंतवणूकदारांनी आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे, वडील राजाराम भटू साळवे या बापलेकासह पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.. 21 गुंतवणुकदारांची 1 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
V/O - या फसवणुकीत अनेक सामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी , काहींनी सेवानिवृत्तीची रक्कम, तर साई संस्थानच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी कर्मचारी सोसायटीतून कर्ज काढून पैसे गुंतवले होते.. मुख्य सूत्रधार भूपेंद्र सावळे याने अत्यंत चलाखीने गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. "गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळायला अडचण येईल" असे खोटे सांगून त्याने गुंतवणूकदारांना फेब्रुवारी ते जून या काळात तक्रार करण्यापासून रोखले आणि याच काळात मोठ्या रकमेची विल्हेवाट लावली.. मात्र आता त्याचे पितळ उघडे पडले आहे..भूपेंद्र सावळे याने आपला साखरपुडा करत त्या साखरपुड्यात लाखों रुपयांचा खर्च केल्याचं व्हिडिओ मध्ये समोर येत आहे.आपल्या कष्टाचे पैसे परत मिळतील या आशेवर गुंतवणूकदारांचे लक्ष पोलिस तपासाकडे लागले आहे.. भूपेंद्र सावळे आणि त्याच्या साथीदारांनी आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास नागरिकांनी स्वतः पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करावी आणि अशा आमिषांना बळी पडू नये असे आवाहन शिर्डी पोलिसांनी केले आहे..
Byte - शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी
प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0707ZT_JALNA_FARMER(10 FILES)
जालना |जालना-नांदेड समृद्धी बाधीत शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत बसून आंदोलन
मुल्यांकनाच्या पाच पट मावेजा देण्याची मागणी
देवमूर्ती येथे मागच्या दोन महिन्यांपासून सुरु आहे धरणे आंदोलन
अँकर | जालन्यात नांदेड-जालना समृद्धी बाधीत शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून आंदोलन केलंय.. जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला मुल्यांकनाच्या पाच पट मावेजा देण्यात यावा. या मागणीसाठी देवमूर्ती येथे मागच्या दोन महिन्यांपासून समृद्धी बाधीत शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप या आंदोलनाची कोणतीही दखल सरकारने घेतलेली नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आज कोरड्या विहिरीत बसून सरकारचा निषेध केलाय.जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जमीन संपादित करू देणार नसून हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे.
बाईट- दिलीप राठी, आंदोलक शेतकरी
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_121 दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे अमरावती 9503131919
आम्हाला आंदोलन करायची हौस नाही; बच्चू कडू यांची बावनकुळेंवर टीका, भर पावसात बच्चू कडूंच्या पदयात्रेला सुरुवात
अँकर :– प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे. आजपासून बच्चू कडू 7/12 कोरा.. कोरा..कोरा.. यात्रा काढली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळ पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावा पर्यंत ही पदयात्रा निघाली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनावर बावनकुळे यांनी टीका करत बच्चू कडू यांची भूमिका जूतापी असल्याचा म्हटला आहे याला बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर दिला आहे. पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही पदयात्रा सुरू राहणार असल्याच यांनी सांगितला आहे. आम्हाला आंदोलन करण्याची हाऊस नाही आमच्या मागण्या सरकारने मान्य करावे ही पदयात्रा जल्लोष यात्रा म्हणून असेही बच्चू कडू म्हणाले आहे. याविषयी पदयात्रेतून बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
121 :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Share
Report
Buldhana, Maharashtra:
बुलढाणा ब्रेक
भर पावसात रखडलेले अनुदानासाठी शेतकरी बसले तहसीलच्या चिखलात....
तहसीलदार मात्र गायब.. शेतकऱ्यांचा आरोप
Anchor - मोताळा तहसील कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांनी भर पावसात ठिय्या दिला! "साहेब, पावसात उभं राहून तुमच्या सहीची वाट पाहतोय!" असं म्हणत बळीराजाने प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलंय. सन 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान अद्यापही मिळालेलं नाही, यामुळे संतप्त शेतकरी आज मोताळा तहसील कार्यालयात पोहोचले होते. पण धक्कादायक बाब म्हणजे, शेतकरी तिथे पोहोचल्यावर तहसीलदार मात्र 'गायब' झाले! असा आरोप शेतकरी शुभम घोंगटेनी केलाय. मोताळा तहसील बाहेर शेतकऱ्यांनी दिलेला ठिय्या हा केवळ अनुदानासाठी नव्हता, तर प्रशासनाच्या या असंवेदनशील वृत्तीचा निषेध होता. "बळीराजाला उपाशी ठेऊन, सरकारला दिवाळी साजरी करायची आहे का?" हा बोचरा प्रश्न आता मोताळ्याच्या पावसात भिजलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतोय.
byte - शुभम घोंगटे, शेतकरी
0
Share
Report
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0707_BHA_WATER_IN_HOUSE
FILE - 1 VIDEO
सिहोरा येथे पावसाचा पाणी शिरला घरात...
Anchor :- हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलं आहे.. तर रात्री पासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील अरविंद राऊत यांच्या घरात पावसाचा पाणी शिरला असून संपूर्ण घर जलमय झाला आहे.. तर आणखी पावसाची संततधार सुरू राहिली तर जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद होण्याच्या मार्गावर आहेत....
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Nsk_bjppraveshpkg
Feed by live u 51
Anchoe सध्या राज्यात महापालिका निवडणुकांसाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगलीय. भाजपाने शिंदे सेनेच्या नैसर्गिक स्पर्धक असलेल्या उबाठा वर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांना साम दाम दंड भेद नीती वापरत आपल्या पक्षात घेतले जातेय. नाशिक शहरात सध्या ही स्पर्धा टोकाला गेलीय.
Vo 1नाशिक शहरात सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी होताच महानगरप्रमुख मामा राजवाडे यांना नियुक्त करण्यात आले..मात्र त्यांच्यासह त्यांचे गुरु उपनेते सुनील बागुल यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले... त्यानंतर ते फरार झाले मात्र तीनच दिवसात भाजपा प्रवेश करण्यासाठी मुंबईत दिसले.. मात्र गुन्हेगारांना प्रवेश देण्यात येत असल्याचा राजकीय गदारोळा झाल्यामुळ हा प्रवेश टाळण्यात आला. यापूर्वीही सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या मुलावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता त्यानंतर त्याचा प्रवेश झाल्याने भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. नाशीमध्ये उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते वसंत गीते यांनी याबाबत आरोप करत दबावणीती चा वापर होत असल्याचं सांगितले आहे
Byte वसंत गीतेज्येष्ठ नेते उबाठा
GFX 2017 महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये 122 जागांवर 67 जागा जिंकून भाजप नंबर वन
शिवसेना 34 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 6 जागा तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर
मनसे घसरगुंडी होऊन पाचव्या स्थानावर
Vo 2 नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या 122 नगरसेवक आहेत.. यामध्ये उभा त्या गटातील 30 पेक्षा अधिक नगरसेवक हे शिंदे सेनेत गेले आहेत.. त्यामुळे भाजप आपली बाजू मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.. नाशिक महापालिकेत शत प्रतिशत भाजपचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे
Byte गिरीश महाजन वा राजकीय विश्लेषक
Vo 3 जसा जसा निवडणुका जवळ येतील तस तशी ही स्पर्धा टोकाला जाऊ शकते. मग त्यात पोलिसांचा वापर असो की चाणक्य नीति...भविष्यात नाशिक प्रमाणेच राज्यामध्ये चारही महानगरांमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळू शकते
0
Share
Report
Akola, Maharashtra:
10 फाईल्स आहेत..PKG
Anchor : अकोल्यातील १३५ वर्षे जुनी ऐतिहासिक ' कच्छी मशिदी ' आता तंत्रज्ञानाशी जोडल्या गेली आहेय...मुस्लिम बांधवांना आता रोज होणारी अजान थेट मोबाइलवर एकता येणार आहेय..
Vo 1 : अकोल्याच्या १३५ वर्षे जुन्या ऐतिहासिक कच्छी मशिदीने “ कच्छी मशिदी अजान ॲप ” लाँच करून डिजिटल युगाकडे एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहेय...गुगल प्ले स्टोअर मधून “ कच्छी मशिदी अजान ॲप ” डाउनलोड केल्यानंतर आता या ॲपद्वारे शहरात, देशात किंवा परदेशात कुठेही उपस्थित असलेल्या व्यक्तीला मशिदीतून थेट अजान ऐकता येईल, ज्यामुळे वेळेवर नमाज अदा करणे शक्य होईल..सध्या देशात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहेय..आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी-मर्यादा मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुढाकार घेत ही ॲप विकसित करण्यात आलीय..धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, कच्छी मशिदी ट्रस्टने पर्यावरण आणि सामाजिक सौहार्द लक्षात घेऊन ध्वनी प्रणाली नियंत्रित केली आहेय तसेच, नमाज्यांना सुविधा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रेरणादायी निर्णय घेण्यात आलाय..
Byte : जावेद झकेरिया ,कच्छी मस्जिद ट्रस्ट अध्यक्ष..
Vo 2 : अजानचा आवाज प्रत्येक नमाज्यापर्यंत पोहोचावा यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहेय..
अॅपची प्रमुख वैशिष्ट्ये :
* मशिदीशी जोडलेले पाचही वेळेचे थेट अजान..
* किब्ला दिशा जाणून घेण्याची सुविधा - कुठूनही योग्य दिशा..
* रमजान, जुमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांबद्दल वेळेवर माहिती..
* अचूक वेळेनुसार मशिदीशी थेट कनेक्शन..
* सोपा आणि स्मार्ट इंटरफेस..
* कार्यक्रमांची सूचना सुविधा
* तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल..
कच्छी मशिदीने सुरु केलेल्या या ॲपचा फायदा इतरही मशिदींनी घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले आहेय..
Byte : साजिद खान पठाण, काँग्रेस आमदार..
Vo 3 : कच्छी मशीद ही विदर्भातील पहिली मशीद आहे, ज्याने नावीन्यपूर्णतेचाच एक भाग म्हणून हे मोबाइल अॅप सादर केले आहेय..
हुडाज टेक्नॉलॉजीज, पुणेने ही ॲप तयार केली आहेय.. इतर समाजाने देखील आता कच्छी मशिदीने सुरु केलेल्या या ॲपचे स्वागत केले आहेय..
Byte : प्रभतसिंग बछेर , स्थानिक नागरिक
Final Vo : कच्छी मशीदने ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध म्हणून विशेष ॲप विकसित केले आहेय...या ॲपच्या माध्यमातून वापरकर्ते सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करत सामाजिक बांधिलकी जपण्यास सक्षम होणार हे मात्र निश्चित..
जयेश जगड,
झी मीडिया,
अकोला
0
Share
Report