Back
वडिलांना वाऱ्यावर सोडणारा मुलगा, राजेश मोरेने घेतले दत्तक!
ABATISH BHOIR
FollowJul 10, 2025 01:30:35
Kalyan, Maharashtra
झी 24 तास च्या बातम्या ची घेतली दखल..
Anchor-डोंबिवलीती राहणारे प्रेमराज कुमार या वयोवृद्ध वडिलांना मुलाने वाऱ्यावर सोडून तो पसारा झाला होता.
Vo-याबाबत मानपाडा पोलीस मुलाचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करतील ही बातमी झी 24 तास ने प्रसारित केली होती. दरम्यान झी 24 तासची बातमी बघून आज शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी वयोवृद्ध प्रेमकुमार यांना केडीएमसी शात्रीनगर रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तसेच वयोवृद्ध प्रेमराज कुमार यांना दत्तक घेतले असून यांच्या उपचारासह संपूर्ण जबाबदारी शिवसेना उचलणार असल्याची आमदार राजेश मोरे यांची माहिती दिली.
Byte-राजेश मोरे
आमदार.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowJul 10, 2025 07:38:16Buldhana, Maharashtra:
आमदार गायकवाडांना बुलढाणा रुग्णालयातील अस्वच्छतेचा दणका; तातडीने कचरा हटवला!
Anchor : काल मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये नासलेल्या डाळीवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच राडा घातला होता. या प्रकारानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, आता आमदार गायकवाड यांना त्यांच्याच मतदारसंघातील, बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेवरून चांगलाच दणका बसला आहे. या घटनेनंतर तातडीने रुग्णालयाच्या परिसरात साचलेला कचरा उचलण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांच्या डाळीवरून केलेल्या आंदोलनानंतर, अनेकांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघातील आरोग्य सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. विशेषतः, बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागून मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला होता, ज्यामुळे रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. या अस्वच्छतेच्या परिस्थितीवर झी २४ तासने आवाज उचलल्यानंतर, प्रशासनाला या गंभीर समस्येची दखल घ्यावी लागली. आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या बाजूला वर्षानुवर्षे पडून असलेला हा कचरा आता तातडीने उचलण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांच्या डाळीवरील आक्रमक भूमिकेनंतर, त्यांना त्यांच्याच मतदारसंघातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला. या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींनी केवळ प्रशासकीय त्रुटींवर आवाज उठवण्याऐवजी, आपल्या मतदारसंघातील समस्यांवरही लक्ष केंद्रित करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तर या ठिकाणाहून सदर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी...
Wkt - मयूर निकम, प्रतिनिधी
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 07:37:47Latur, Maharashtra:
लातूर PKG...
स्किप्ट ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस.... उदगीर तालुक्यात घोटाळा उघडकीस... अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने ९० फेक सर्टिफिकेट...अनुदान, शिष्यवृत्ती, साहित्य... योजनांचा गैरवापर... तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
AC ::- बांधकाम कामगार कल्याण योजनेत मोठा घोटाळा उघड झाला आहे... शासनाकडून कामगारांना मिळणाऱ्या सवलती, शिष्यवृत्ती आणि अनुदान यांचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांद्वारे तब्बल ९० बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे, ही सर्व नोंदणी एका अस्तित्वात नसलेल्या ग्रामपंचायतीच्या नावाने करण्यात आली होती.
VO 01 ::- उदगीर तालुक्यातील तोंडात गावच्या ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या 'वंजारवाडी हे नाव आहे. जरी हे गाव असल तरी ति ग्रामपंचायत अस्तित्वातच नाही. पण तरीही या नावाने बनावट शिक्के, खोट्या सह्या आणि लेटरपॅड वापरून कामगार नोंदणी प्रमाणपत्रं तयार करण्यात आलं आहे. याच आधारावर अर्जदारांनी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्ती, साहित्य, अनुदान आणि शैक्षणिक सवलती मिळवल्या. याबाबतच्या तक्रारी वाढत असल्याने संपूर्ण चौकशी नांदेडचे सहायक कामगार आयुक्त यास्मीन शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आणि यामध्ये फक्त एका गावात जवळपास ९० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे बनावट असल्याचं स्पष्ट झालं . या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात एजंट, बांधकाम ठेकेदार आणि मल्टिसर्व्हिस चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी )
VO 02 ::- बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत झालेल्या या ९० बोगस बांधकाम कामगारांमध्ये, अनेक जण प्रत्यक्षात शेतकरी होते, काहीजण खासगी नोकरी करणारे होते, तर काहींचा बांधकाम व्यवसायाशी काहीही संबंध नव्हता. यांनी शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण योजनेतून शिष्यवृत्ती, बांधकाम साहित्य, रोख रक्कम, भांडी आणि शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेतला. या अर्जांसोबत जोडण्यात आलेली प्रमाणपत्रं, ग्रामपंचायतीची शिफारस पत्रं, शिक्के आणि सह्या – सगळं वंजारवाडी नावाच्या बनावट ग्रामपंचायतीच्या नावाने तयार करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही वंजारवाडी नावाची ग्रामपंचायत प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. या सगळ्या बनावट कागदपत्रांची पडताळणी आता उदगीरच्या गटविकास अधिकाऱ्याच्या मार्फत करण्यात आली आहे.आणि यामध्ये तब्बल ९० प्रमाणपत्रं खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
बाईट ::- राजकुमार पुजारी ( पोलीस अधिकारी )
बाईट ::- गटविकास अधिकारी उदगीर..
VO 03 ::- या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती केवळ उदगीर तालुक्यापुरती नसून, राज्यभर अशा बनावट कामगार नोंदणी प्रमाणपत्रांचं जाळं पसरलेलं असण्याची शक्यता आहे. कामगार विभागाकडून राज्यस्तरावर तपासाचे संकेत मिळत असून, हा फक्त बनावट कागदपत्रांचा खेळ नाही. हे एका संगठित रॅकेटचं स्वरूप घेऊ शकतं.पुढे तपासात काय उलगडतंय, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे...
............
वैभव बालकुंदे
ZEE मिडिया लातूर
2
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 10, 2025 07:36:09Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - खडे मुक्त रस्ते व नागरी सुविधांसाठी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांचा रस्ता रोको आंदोलन..
अँकर - खड्डेमुक्त रस्ते करा यासह नागरी सुविधांसाठी सांगलीमध्ये काँग्रेसच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या आंबेडकर रोडवर रास्ता रोको करत पालिकेच्या कारभारा विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एका तरुणीचा मृत्यू देखील झाला होता,वारंवार प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची आणि नागरी सुविधांचे मागणी करून देखील पालिका प्रशासना कडून दुर्लक्ष करण्यात येत,असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे आंबेडकर रोड ते एसटी स्टँड मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती.तातडीने पालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा आणि खड्डे मुक्त रस्ते न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.
बाईट - मंगेश चव्हाण - नगरसेवक - सांगली महापालिका.
0
Share
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 10, 2025 07:34:21Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - बैल पोळा निमित्ताने कसबे डिग्रज मध्ये निघाली बैलांची अनोखी मिरवणूक, गजा बैलाच्या सांगाडा ठरला मिरवणुकीतील आकर्षण..
अँकर - बिंदूर सणा निमित्ताने सांगलीच्या कसबे डिग्रज या ठिकाणी बैलांची अनोखी मिरवणूक पार पडली.या मिरवणुकीमध्ये चक्क गजा नामक बैलाच्या सांगाड्याचे देखील मिरवणूक काढण्यात आली. गजा बैल हा पंचक्रोशीसह महाराष्ट्रात तिच्या देहयष्टी मुळे प्रसिद्ध होता.गेल्या वर्षी गज्या बैलाचे निधन झालं होतं,त्या बैलाची आठवण म्हणून गज्याचा सांगाडा जतन करण्यात आला आहे.दरवर्षी बेंदूर सणा निमित्ताने गजा बैलाची जंगी मिरवणूक गावातून काढण्यात येत होती,त्यामुळे गजाची आठवण म्हणून यंदाच्या बेंदूर सणा निमित्ताने इतर बैलांबरोबर गजाच्या सांगाड्याची मिरवणूक देखील काढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार गावातून जंगी अशी बैलांची मिरवणूक पार पडली आणि यामध्ये गजा बैलाचा सांगाडा हा सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय बनला होता.
बाईट - कृष्णा सायमोते - गजा बैल मालक- कसबे डीग्रज.
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 07:33:00Yavatmal, Maharashtra:
Anchor : प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेत आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी सह विविध सतरा मागण्यांसाठी बच्चू कडू यांची पदयात्रा भर पावसात निघाली असून, यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील लाखखिंड येथे मनसेचे नेते बाळा नांदगावकर पदयात्रेत सामील होतील. बच्चू कडू च्या मागण्यांना मनसेने पाठिंबा दिला असल्याचे प्रहार पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान ही लढाई शेतकऱ्यांच्या मन:परिवर्तनाची असून सरकारच्या हाती शून्य राहणार आहे, त्यामुळे मन:परिवर्तन होण्याच्या अगोदर सरकारने मागण्या पूर्ण कराव्या असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.
बाईट : बच्चू कडू
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 10, 2025 07:32:46Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn sanjay shirsath avb
Byte attached
संजय शिरसाठ याना आयकर विभागाची नोटीस शिरसाठ यांची कबुली
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या वर गेल्या काही दिवसात भ्रष्टाचार बाबत अनेक आरोप झालेत त्यावर संजय शिरसाठ यांनी फक्त शांत राहण्याची भूमिका घेतली होती मात्र संभाजी नगरात एक कार्यक्रमात संजय शिरसाठ यांचे एक वक्तव्य मात्र चांगलेच चर्चेत आले आहे...आता यापुढं ब्लॅक चे पैसे चालणार नाही असे विधान त्यांनी केलंय, पुढं जाऊन हे विधान फक्त माझ्या साठी असल्याचं त्यांनी म्हंटलय, आणि त्यानंतर हशा पिकला, सोबतच मला आयकर विभागाकडून नोटीस आल्याची त्यांनी जाहीर कबुली दिलीय, 2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली असे विचरल्याचे त्यांनी सांगितले आणि याबाबत मला 9 तारखेला खुलासा करण्याचे सांगितल्याचे ही त्यांनी सांगितले..पैसे कमावणे सोपे आहे मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं ही ते म्हणाले... नंतर सीए ला फोन केला आणि नोटीस आली पाहून घ्या असे सांगितल्याचे ते म्हणाले... मात्र यावरून संजय शिरसाठ याना आयकर विभागाची नोटीस आली आहे हे मात्र स्पष्ट होताय, आता शिरसाठ यांच्या बाबत इम्तियाज जलील यांनी आयकर विभागात तक्रार केली होती त्यामुळे ही नोटीस आली की रुटीन नोटीस आहे याबाबत मात्र जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत... शिरसाठ यांनी जुलै महिन्यातच संभाजी नगरात एक कार्यक्रम मध्ये हे वक्तव्य केले आहे आणि तो व्हीडिओ आता व्हायरल होतोय....
Byte संजय शिरसाठ सामाजिक न्याय मंत्री....
0
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 10, 2025 06:34:21Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn govt offices pkg
Feed by 2 c , फ़क्त कलेक्टर ऑफिस शॉट्स पाठवले आहे,बाकी थोडं जनरल वापरावे लागेल... ते पत्र सुद्धा जोडले आहे 2 सी ला
Anchor : शासकीय कार्यालयात गेलेला सामान्य नागरिक अनेक वेळ सरकारी अधिकारी व्यस्त असल्याने तिष्ठत बसतो, कधी कुणी वाढदिवस साजरा करत असतो कोणी फोनवर बोलत असतं तर कोणी मित्र आले म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत असतो त्यामुळं सामान्य माणूस खोळंबतो, म्हणूनच आता राज्य सरकारने असल्या कामचुकरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे , कार्यालयीन वेळेत असे काही आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत...
Vo 1...
सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करताय सावधान
काम सोडून फोनवर बोलताय तर कारवाई होणार
राज्य सरकारच्या पत्रानंतर जिल्ह्यधिकारी अकॅशन मोडवर
राज्य सरकारचे हेच ते पत्र ज्यामुळं सर्वच सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.. या पत्रात सांगितल्या प्रमाणे सरकारी कार्यालयात काम सोडून वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण, वैयक्तिक समारंभ करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळं सामान्य लोकांची काम होत नाही म्हणून इथून पुढं अस काही आढळल्यास नियंत्रण अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यास महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार कारवाई करण्यात येईल असं पत्रात म्हंटले आहे... फक्त वैयक्तिक समारंभ नाहीत तर कुणी काम सोडून फोन वर बोलत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई होईल असे याबाबत संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे...याबाबत तक्रार आल्यावर कारवाई करण्यासोबत त्या संबंधित कार्यालयाचे प्रमुख ही असल्या घटनांवर लक्ष ठेवून असणार आहे...
कशा कशावर असणार लक्ष
कार्यालयात वाढदिवस, अनिवर्सरी, कुठलाही वैयक्तिक कार्यक्रमांवर नजर असणार
सरकारी काम सोडून फोन वर अवांतर बोलत दिसल्यास कारवाई
सतत कार्यालयीन काम सोडून बाहेर जाणे, जागेवर न बसने यावर कारवाई होणार
कार्यालयीन वेळेत कार्यालयात मित्रांसोबत गप्पा मारण्याची सवय असणाऱ्यांवरही लक्ष असणार
कार्यालयीन वेळेत कार्यालयात गाणे म्हणणे...
सोबतच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सन्मान न दिल्यास नागरिकांचे प्रश्न समजून न घेतल्यास कारवाई
याबाबत तक्रारी आल्यास वा कार्यलयीन प्रमुखांच्या ही बाब लक्षात आल्यास कारवाई करण्या बाबत निर्णय घेण्यात आलाय...
Byte दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी
Vo 2... खरं तर या बाबत शासनाची नियमावली स्पष्ट आहे आणि कार्यालयीन कामाच्या वेळेत असला कामचुकारपणा केल्यावर शिक्षेची ही तरतुद आहे...
काय आहे शिक्षेच्या तरतूदी
किरकोळ शिक्षा
1.समज देणे
2..ठपका ठेवणे
3.. त्याची पदोन्नती रोखून ठेवणे
4.. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणाने अथवा त्याने आदेशाचा भंग केल्याने शासनाला आर्थिक नुकसान झाल्यास त्याच्या वेतनातून रक्कम वसूल करणे
5.. वेतनवाढ रोखून धरणे
6 वेतन श्रेणीत खालच्या टप्प्यावर आणणे
जबरी शिक्षा
निलंबन करणे, सक्तीची सेवानिवृत्ती , सेवेतून काढून टाकणे, सेवेतून बडतर्फ करणे..
नियम इतके स्पष्ट असल्यावरही कार्यालयात कामचुकार पण आढळून येतो त्यामुळं महसूल विभागाने नव्याने पत्र काढून आता कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय... याबाबत कर्मचाऱ्यांना समुपदेशन ही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी सांगताय मात्र तरीही तक्रारी आल्यास शिस्तभंगाची कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले...
Byte दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी संभाजी नगर
Vo 3.. नियम अनेक आहेत मात्र त्याचे पालन होत नाही किमान आताच्या नव्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर सरकारी कर्मचारी चोख काम करतील अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल हीच अपेक्षा आहे...
विशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
5
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 10, 2025 06:33:06Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1007_BHA_DRONE_VIDEO
FILE - 1 VIDEO
टीप - ड्रोनने घेतलेला व्हिडिओ आहे...
भंडारा जिल्ह्यात पावसाचा कहर....
ड्रोन द्वारे टिपलेले व्हिडिओ.
Anchor :- भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाची संततदार सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना काळजी घ्यावी असा इशारा देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला असल्याने ड्रोन द्वारे टिपलेले व्हिडिओ.
2
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 06:32:54Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- बहिणीची टि सी काढायला गेलेल्या भावाला शिक्षकांकडून मारहाण... शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मारहाणीचा व्हिडिओ आला समोर...शिक्षकांवर आधी हात उचलल्याचा शाळेचा दावा...
AC ::- शाळेत विद्यार्थिनीच्या टीसी काढण्यासाठी गेलेल्या भावाला शिक्षकांनीच मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार अहमदपूर शहरात घडला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आला असून संबंधित शिक्षकांविरोधात अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, या घटनेनंतर आता शाळेकडून एक नवा व्हिडिओ समोर आलाय.
ज्यात त्या विद्यार्थिनीच्या भावानेच आधी शिक्षकावर हात उचलल्याचं दिसतंय....शाळा प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलंय की शिक्षकांवर पहिल्यांदा हात उचलण्यात आला आणि त्यानंतरच ही हाणामारी सुरू झाली.
दोन व्हिडिओ समोर आलेत... आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप सुरू आहेत. या सर्व प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून... शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, दोन्ही व्हिडिओच्या आधारे सत्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 10, 2025 06:05:16Beed, Maharashtra:
बीड: वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी तरुण शेतकऱ्याचे अनोखे जुगाड...
Anc- बीड जिल्ह्यात काही भागात चांगला पाऊस झाल्याने खरिपाचे पीक सध्यातरी जोमात आहे. अशात वन्यप्राण्यांचे वावर जास्त असल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे संरक्षण करण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याने शेतातच देशी जुगाड केले आहे. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील संतोष कानडे या शेतकऱ्याने प्लास्टिकच्या टाकाऊ बाटलीपासून वाऱ्याच्या साह्याने फिरून आवाज करणारे अनोखे जुगाड तयार केले आहे. बॉटलच्या मधोमध तार गुंफून बाटलीचा काही भाग कापण्यात आलाय. आणि त्याला एका काठीचा देखील आधार देण्यात आला आहे. जसा वारा येईल त्याच वेगाने बॉटल फिरते आणि मोठ्याने आवाज येतो. त्यामुळे वन्यजीव इकडे फिरकत नाहीत. सध्या या शेतकऱ्याच्या जुगडाची परिसरात चर्चा रंगली आहे.
बाईट: संतोष कानडे, शेतकरी
12
Share
Report
MAMILIND ANDE
FollowJul 10, 2025 06:05:07Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 1009_WARDHA_LOSS
- वर्ध्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने शेतीचं अतोनात नुकसान
- नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
- वर्धा, हिंगणघाट, देवळी व समुद्रपूर तालुक्यात मोठं नुकसान
- शेती सोबतच रस्त्यांचीही झालीय मोठ्या प्रमाणात वाताहत
अँकर - वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.नदीकाठावरील शेतीत साचून असणाऱ्या पाण्यामुळे पिकं सडण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा मुसळधार पावसाचा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे..तर हिंगणघाट तालुक्यात पवनी, आलमडोह परिसरात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती मात्र ती देखील वाहून गेल्याचं सांगितलं जातं आहेय..
11
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 10, 2025 06:01:52Pandharpur, Maharashtra:
10072025
Slug - PPR_SILVER_DOOR
feed on 2c
file 01
-------
Anchor - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केली आहे.
विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीने मढवण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चातून देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे. अत्यंत सुरेख अशी कलाकुसर केलेला केलेला दरवाजा राजस्थानातील उदयपूर येथे तयार करण्यात आला आहे.
6
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 10, 2025 05:36:13Beed, Maharashtra:
बीड: पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Anc- हाणामारी करणे आणि त्याचा व्हिडिओ चित्रित करून समाजमाध्यमात व्हायरल करणे जणू हे बीडचे ट्रेंड बनले आहे. बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच चार जणांची तुंबळ हाणामारी झाली. तीन जणांकडून एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तब्बल दहा मिनिटे हाणामारीच्या प्रकार सुरू होता. भर रस्त्यावर हाणामारी होत असताना वाहतूक खोळंबली होती. अखेर स्थानिक पोलिसाने मध्यस्थी करून हे भांडण थांबवले.
14
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 10, 2025 05:34:50Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1007ZT_WSM_GURU_MANDIR
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर : वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या प्रसिद्ध नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात गुरु पौर्णिमे निमित्य भाविकांची गर्दी पाहायला मिळत असून,मंदिर फुलांनी सजवण्यात आलेले आहे.आज या मंदिरात दत्त याग,रुद्र याग आणि व्यास पूजेचं विशेष आयोजन केलं जातं,संपूर्ण विदर्भातून भाविक इथं दर्शनासाठी येतात.१४ व्या शतकत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा याच ठिकाणी जन्म झाला होता ते श्री दत्ताचे दुसरे अवतार असल्याचं मानलं जातात. गुरुपौर्णिमेनिमित्त भक्त दर्शन घेण्यासाठी येतात.
15
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 10, 2025 05:34:26Beed, Maharashtra:
बीड: दोन वर्षापासून एकही शिक्षक नाही, संतप्त पालकांचा विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या..
Anc- बीडच्या माळापूरी इथल्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेला गेल्या दोन वर्षापासून एकही शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान होत आहे. अनेक वेळा शिक्षकाची मागणी करून देखील प्रशासनाकडून कसलीही दखल घेण्यात आली नाही. अखेर संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या घातला. यावेळी आम्हाला केवळ शिक्षक द्या या मागणीने जोर धरला होता. विद्यार्थी पालकांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता.
बाईट: समीर शेख, पालक
14
Share
Report