Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

हिंगोलीत पावसाने आणले पूर, पैनगंगा धोक्यात!

GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 08:34:34
Parbhani, Maharashtra
अँकर - हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाने ओढे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पैनगंगा नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. विदर्भात होत असलेल्या पावसाचे पाणी हिंगोलीच्या ईसापूर धरणात येत असून त्यामुळे ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नदी काठच्या पीकांचे नुकसान होणार आहे. या पैनगंगेने आता रोद्र रूप धारण केले असून पैनगंगा धोक्याच्या पातळीने वाहत आहे, प्रशासनाच्या वतीने नागरिकांना नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. हिंगोलीच्या कण्हेरगाव नाका येथील पैनगंगेच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... wkt गजानन देशमुख
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Aug 18, 2025 10:19:45
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मोबाईलला कुर्ला नेहरूनगर येथे शांताराम वालावलकर शाळेसमोर रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर या शाळेत सुद्धा पाणी साचला आहे अनेक लहान मुलं या पावसाचा आनंद घेत आहेत तर यातून जाणारे वाहन बंद पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी  मनोज कुळकर्णी यांनी  Wkt  Feed send TVU १६ Slug -- Negarunagar Water loddging wkt 
7
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 18, 2025 10:19:38
Raigad, Maharashtra:
रायगड ब्रेकिंग स्लग - रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका निजामपूर बाजापेठेतील दुकानांमध्ये शिरलं पावसाचे पाणी दुकानात पाणी शिरून चीजवस्तूंचे नुकसान माणगाव - पुणे रस्त्यावर पाणीच पाणी पावसाच्या तडाख्याने नागरिक हैराण
7
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 10:18:56
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या सोनपेठ गंगाखेड मार्गावरील नरवाडी गावच्या ओढ्याला गेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने पूर आलाय. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सोनपेठ गंगाखेड नरवाडी मार्गावरील गावांचा संपर्क सकाळ पासून तुटलाय. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्ण पुणे ठप्प झालीय.तर दुसरीकडे पालम तालुक्यातील शिरपुर ते सायाळा मार्गावरील गळाटी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा ही मार्ग वाहतुकीसाठी बंद पडलाय. पुयणीचा पूल वाहून गेल्याने त्यापलीकडील आडगाव खडी, वनभुजवाडी नहावा,नवळगावाचा संपर्क पालम शहराशी तुटलाय...
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 18, 2025 10:18:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn vinod patil avb feed by tv u पुढील पाच दिवसात रोख मोबदला जाहीर करा, अन्यथा न्यायालयात आणि रस्त्यावर अशी दोन्ही लढाई सुरू करू - विनोद पाटील. Anc.... छत्रपती संभाजीनगरमधे बेकायदेशीररीत्या अतिक्रमण कारवाई सुरू असल्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनावर तातडीने कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांना आदेशित केले आहे. मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांनी तातडीने अतिक्रमण कारवाई थांबवावी व आतापर्यंत बाधित सर्व मालमत्त धारकांना मोबदला जाहीर करावा, व त्या नंतरचा पुढील अतिक्रमण कारवाई करावी. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पाच दिवसानंतर मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या विरोधात न्यायालयता धाव घेऊ व जनआंदोलन उभारून ज्यांची ज्यांची घरे पाडण्यात आली आहे. त्या सर्वांना घेऊन मनपा आयुक्तांच्या घरासमोर राहायला जाणार व मनपा आयुक्तांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिला आहे.. byte vinod patil , बाईट : विनोद पाटील, सामाजिक नेते.
5
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 18, 2025 10:18:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर.. *विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर बाईट* - आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली, त्यांनी सूचना दिल्या आहे. - ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी शाळेच्या सुट्टीबाबत सूचना,अडकलेल्या लोकांना राहण्या - खाण्याची सोय करणेची सूचना. - नांदेडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांची बचावकार्य सुरू आहे. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. जनावरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती. *मराठवाड्यात एकूण 6 नागरिकांचा मृत्यू...* - नांदेड - 3 मृत्यू. - बीड - 2 मृत्यू. - हिंगोली - 1 मृत्यू. - *पुण्यातून मागविलेली मिल्ट्रीची 20 लोकांची टीम नांदेडला रवाना झाली आहे.* - बीड जिल्ह्यात एन डी आर एफ.ची टीम तैनात करण्यात आली आहे. - NDRF चि टीम बिडला आहे. - Sdrf ची टीम नांदेड मध्ये आहे. - मराठवाडात सव्वालाख हेक्टर क्षेत्र शेतीचे बाधित झाले आहे. प्राथमिक माहिती. पाऊस सुरू आहे मात्र पंचनामा सुरुवात झाली आहे.
7
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 18, 2025 10:02:03
Parbhani, Maharashtra:
अँकर_ सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरल असून धरणाच्या 12 दरवाजातून 45 हजार 548 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे,ज्या पूर्णा नदीपात्रात पाण्याचा इतका मोठा विसर्ग सुरू आहे, धरणातून पाणी कसे सोडले हे बघण्यासाठी आलेला तरुण दुपारच्या सुमारास तोल जाऊन धरण परिसरातील पूर्णा नदी पात्रात कोसळल्याची घटना घडलीय. पोहन येत असल्याने सदर तरुण पोहून पाण्याबाहेर पडला आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
3
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 18, 2025 09:49:43
Kalyan, Maharashtra:
कल्याण डोंबिवलीत सखल भागात पाणी साचायला सुरवात.. कल्याण डोंबिवली परिसरात सकाळ पासून पावसाची संततधार सुरु आहे अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने कल्याण च्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर पाणी साचायला सुरवात मात्र मध्येच पावसाचा जोर कमी होतं असल्याने पाण्याचा निचरा देखील होतं आहे मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
9
comment0
Report
SKSudarshan Khillare
Aug 18, 2025 09:49:12
Lasalgaon, Maharashtra:
अँकर :- गेल्या आठवड्यात बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात बंदी हटवल्यानंतर आज लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ होणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते मात्र तसे न झाल्यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत असून विक्री झालेल्या व विक्री होणाऱ्या कांद्याला एक हजार रुपये अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी कायम... बांगलादेशातील व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त कांदा आयात करण्यासाठी परवाने न दिल्यामुळे भारतातून कांदा नाममात्र निर्यात होत असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत लासलगाव बाजार समितीमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नसल्याचे कांदा निर्यातदार व्यापारी सांगा आहे.... बाईट :- प्रवीण कदम ( कांदा निर्यात दर व्यापारी ) बाईट :- शेतकरी
8
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 18, 2025 09:49:00
Junnar, Maharashtra:
Feed Live Link Slug: Junnar Chhagan Bhujabal Rep: Hemant Chapude(Junnar) *छगन भुजबळ* ( पुण्यातील जुन्नरमधील शेतकरी मेळाव्यात छगन भुजबळ बोलत होते ) - देशात कृषिमंत्री म्हणून ज्यांचं लौकिक आहे, त्या शरद पवार साहेबांचे शेतीसाठी मोठे योगदान आहे. ते आपल्याला मान्य करायला हवं. *( शरद पवारांचे भुजबळांकडून कौतुक )* - सरकार आपल्याला भरीव मदत करते, मात्र त्याचा उपयोग आपण कसा करतोय, हे महत्त्वाचं आहे. मुळात मी हे बोलणं उचित नाही, कारण मी अन्न पुरवठा मंत्री आहे. तुम्ही जे अन्न तयार करता, त्यानंतर माझं काम सुरु होतं. त्यामुळं तुम्ही अन्न बनवलं नाही तर माझं काम बंद पडेल. - अन्न-धान्य साठवणूक हा देशात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल असं आम्ही सरकार म्हणून काही करणार नाही. म्हणूनच स्वदेशी हा नारा दिला आहे. मोदी साहेबांनी सुद्धा स्वदेशी कडे चला हा नारा दिलाय. - शेतकऱ्यांना महत्वाच्या दोन अडचणी आहेत. काही संकटं तर अस्मानी आहेत. पाणी आलं, नाही आलं, वाहून गेलं. हे अस्मानी संकट आहे आणि दुसरं संकट हे मानवनिर्मित आहे. पीक उगवलं की बंधनं आणली जातात. हे बंधन, ते बंधन. कधी आयात-निर्यात करा, मग लगेच करु नका. इथेनॉल करा, इथेनॉल बंद नका. कांदा सुरू, कांदा बंद. कशासाठी हे सगळं? आता याला तोंड द्यायचं म्हटल्यावर आपल्याला मानवी संकटं आणणाऱ्या यंत्रणा, त्यांना सुद्धा सांगावं लागेल. आपण स्वदेशीचा नारा देतो, त्यावेळी स्वदेशी मनुष्य सुद्धा जगवावा लागेल. जिथं-तिथं दोन पैसे मिळू शकतात, ती दारं आपल्याला उघडावी लागतील. तुम्हीचं त्याच्यावर आणखी-आणखी बंधनं आणून चालणार नाही. कपडा, गाड्या अनेक वस्तूवर आपण बंधनं आणत नाही. मात्र शेतकऱ्यांच्या मालावर तेवढं बंधनं आणतो. त्यामुळं विचार बदलण्याची आवश्यकता आहे. सगळं वाढवायचं अन करायचं हे बरोबर आहे, मात्र ही बंधनं हटवायला हवीत. पुण्यातील, नाशिक मधील अनेक नेत्यांनी यासाठी लढा दिला. पवार साहेबांनी सुद्धा याबाबत अनेकदा मदत केली, आजही ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते मदत करत असतात. Sound Byte: मंत्री छगन भुजबळ प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
11
comment0
Report
MKManoj Kulkarni
Aug 18, 2025 09:47:28
Mumbai, Maharashtra:
अँकर -- मुंबई जोरदार पाऊस पडत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेला आहे त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे चेंबूर सांताक्रुज लिंक रोडवर सहकार नगर चेंबूर या ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्य गतीने होत आहे सकाळच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पूर्णतः वाहतूक बंद होती. पावसाचा जोर कमी झाला आणि मुंबई महापालिकेने या ठिकाणी मोठे पंप लावल्याने पाण्याचा निचरा होत आहे या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी Wkt  मनोज कुळकर्णी  Feed send TVU १६ Sluh SCLR water loddhing 
4
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 18, 2025 09:47:21
Ratnagiri, Maharashtra:
आवशी गाव पाण्याखाली; शाळेसह अनेक घरांत शिरले पूराचे पाणी खेड – खेड तालुक्यातील आवशी गावात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गावातील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुंबई–गोवा महामार्गावरील चुकीच्या कामामुळे पाणी थेट गावात शिरल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. लोटे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक कंपन्यांच्या संरक्षण भिंतींमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असून त्यामुळे आवशी गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शाळेत राहिलेल्या शिक्षकांना पाण्याने वेढले आहे. गावातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. शेतजमिनी व अंगण पाण्याखाली गेल्याने आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी गावकऱ्यांचा संताप मात्र वाढलेला दिसून येत आहे. byte
8
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 18, 2025 09:47:14
Kalyan, Maharashtra:
तर एमआयडीसी कार्यालयाला ठोकू टाळे भाजप पदाधिकाऱ्यांचा इशारा दावडीतील पाणीटंचाई बाबत स्थानिक नागरिक आक्रमक Anchor- दावडी परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे आज भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढला गेल्या अनेक दिवसांपासून दावडीमध्ये अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने दावडीतील नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एसपी आव्हाड यांची भेट घेत त्यांना जाब विचारला त्यावर उत्तर देताना कार्यकारी अभियंता आव्हाड यांनी 22 तारखेनंतर सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचं आश्वासन दिलं. दरम्यान जर 22 तारखेपर्यंत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर एमआयडीसी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. Byte- नंदू परब जिल्हाध्यक्ष भाजप
9
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 18, 2025 09:47:00
Washim, Maharashtra:
वाशिम: File2:1808ZT_WSM_RAIN_CROP_DAMAGE_WKT WSM_RAIN_CROP_DAMAGE_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.अनेक नद्यांना पूर आल्याने ग्रामीण भागाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सर्वधिक फटका हा मालेगाव व रिसोड तालुक्यात ढगफुटीसरखा पाऊस झाल्याने सोयाबीन,तूर, कपाशी, मूग, उडीद, हळद या खरीप पिकासह फलबागाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.शेतकऱ्यांनी राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे पंचनामे न करता थेट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.या भीषण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी..
11
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 18, 2025 09:35:28
Akola, Maharashtra:
Anchor : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मन मॅरेज नदीचे नऊ दरवाजे उघडल्यामुळे बाळापुर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बाळापूर येथे व वरील परिसरामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बाळापुरात मन नदीला मोठा पूर आला असल्याने अनेक नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे..पुराच्या या पाण्यामुळे अकोला मार्गे बाळापूर येथे प्रवेश करणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे तर पर्यायी शेगाव मार्गे बाळापुरात प्रवेश करणारा मार्ग सुरू आहे.. फुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पुल ओलांडून नाही असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
11
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 18, 2025 09:31:05
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1808ZT_CHP_HEAVY_RAIN ( single file sent on 2C)  टायटल:-- मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले, एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या, सध्या तरी इरई  धरणातून विसर्ग नसल्याने थोडा दिलासा ,पाऊस असाच सुरू राहिल्यास चंद्रपूर शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता      अँकर:-- आज सकाळपासून ऊन असताना दुपारी मात्र अचानक चंद्रपूर शहर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अमरावती- यवतमाळ जिल्ह्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणाचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा नदी फुगली आहे. चंद्रपूर -हैदराबाद मार्ग त्यामुळेच बंद झाला आहे. मात्र चंद्रपूर शहराच्या जवळ असलेले इरई धरण सध्या सोडले गेलेले नाही यामुळे थेट चंद्रपूर शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता कमी आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिल्यास चंद्रपूरकरांच्या चिंता वाढणार आहेत. जिल्ह्यात सध्या वार्षिक सरासरीच्या 62% एवढा पाऊस नोंदविला गेला आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी चार प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून अन्य सर्व प्रकल्पांची क्षमता 60 टक्क्यांहून अधिक झाली आहे. या पावसाच्या धान ,कापूस व सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
9
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top