Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

रघुनाथ दादा पाटील: आपदा में पठानी वसुली स्थगित करें, मदद पहले

SMSarfaraj Musa
Sept 24, 2025 11:29:35
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - अवकाळी मदत जरूर द्या,पण त्याआधी पठाणी वसुलीला स्थगिती द्या - शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटलांची सरकारकडे मागणी अँकर - राज्यात अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने मदत देण्याआधी शेतकरयांकडून सुरू असलेली पठाणी वसुली थांबवावी,अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे.पावसामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हातबल झाला आहे,त्यामुळे राज्य सरकारने पंचनामे-मदतीचा उद्योग जरूर करावा, पण त्याआधी सर्वात पहिल्यांदा सरकारने शेतकऱ्यांचे पीक कर्ज व इतर सर्व कर्ज वसुली आणि वीज बिल वसुलीला स्थगिती द्यावी,अशी मागणी ररघुनाथदादा पाटलांकडून करण्यात आली आहे. बाईट - रघुनाथदादा पाटील - ज्येष्ठ नेते - शेतकरी संघटना.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Sept 25, 2025 14:01:12
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 25, 2025 14:00:59
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे byte ---- ऑन -- चिपी विमानतळ नाव ( नाथ पै ) --- चीपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी होतीच पण याचा आमदार दिपक केसरकर यांनी पाठपुरावा केला. प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला असून लवकरच बॅरिस्टर नाथ पै साहेबांचं नाव चिपी विमानतळाला दिलं जाईल. ऑन --- ऑन विरोधक टीका ( राज्य सरकार मदत ) --- पंचनामे सुरू आहेत. माहिती घेण्याचं काम सुरू आहे. थोडा संयम ठेवा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मंत्री शेतात जात आहेत. शेतकऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. योग्य निकषांमध्ये बसून चांगल्यातली चांगली मदत देण्याची मानसिकता आणि तयारी आमच्या सरकारची आहे. पंजाबला जशी मदत मिळाली तशी मदत महाराष्ट्राला मिळेल. ऑन संजय राऊत ( दौरा भास ) --- भांडुप मध्ये बसून आरोप करणे सोपे आहे. त्यांचे मालक मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय आश्वासन दिलेले. तेव्हा लाल कार्पेट टाकून शेतकऱ्यांना भेटायचे.. तुम्ही काय केले ते सांगा आणि आम्ही काय करतो ते येणाऱ्या दिवसात दिसेल. ऑन संभाजी भिडे --- गुरुजी हे आदरणीय आहेत ज्येष्ठ आहेत. ते काही मार्गदर्शन करत असतील तर त्यावर आम्ही भाष्य करू नये. गुरुजींनी हिंदुत्वासाठी केलेले काम आपण विसरलोय का ?? त्यांना असे सल्ले देण्याचा अधिकार आहे. ऑन उद्धव ठाकरे ( पंचांग बघताय का ? झुकवण्याची ताकद ) --- ( स्मित हास्य करत ) पहिल स्वतः वाकून दाखवायचं आणि मग आम्हाला झुकवायचा प्रयत्न करायचा मानेचा, पाठीचा प्रॉब्लेम... उगाच अशा मोठ्या गोष्टी करू नये. तुम्ही जे काही करू शकला नाहीत तेवढं आमच सरकार करेल. ऑन स्विफ्ट कार जाळपोळ --- त्याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. आमच्या महाराष्ट्रात आम्ही गोमांस तस्करी वैगरे अशा गोष्टी खपवून घेणार नाही योग्य ती कारवाई होईल. गाडी पकडली आहे पोलिस चौकशी करत आहेत थोड्या दिवसात कळेल दांड्याचा आवाज कुठून येतो ते. Byte --- नितेश राणे मंत्री feed on desk
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 25, 2025 14:00:48
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर भाविकांची अलोट गर्दी तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर गेली 55 वर्षे नवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी 1967 मध्ये येथे भाविकांसाठी दर्शनाची परंपरा सुरू केली होती. आजही ती परंपरा अखंड सुरू आहे.यंदा नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीपासून फक्त तीन दिवसांत तब्बल दोन लाख भाविकांनी दुर्गामातेच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे. आगामी दिवसांत ही संख्या आणखी वाढेल दर्शनासाठी स्वतंत्र रांगा, सीसीटीव्ही नजर, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा यांसारख्या आवश्यक सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे.भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे दुर्गाडी किल्ल्यावरचा नवरात्र उत्सव यंदाही अत्यंत भव्य आणि सोहळामय ठरत आहे. Byte रवी पाटील ( कल्याण शहर प्रमुख शिंदे गट )
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 13:49:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - संजय राऊतांनी कधी नगरपालिकेची निवडणूक लढली नाही,संजय राऊतांच्या प्रश्नावरून चंद्रकांत पाटील भडकले.. अँकर - संजय राऊतांनी कधी नगरपालिकेचे निवडणूक लढली नाही,काय संजय राऊतंच लावून बसलाय,सरकार चालवा मग कळेल, अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे संजय यांच्यावर भडकले,तर दोन वर्षे सरकार चालवताना तुमची फ्या-फ्या झाली,कोविडने तुम्हाला साथ दिली म्हणून 2 वर्ष घरी बसून राज्य चालवता आले,असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला आहे. यांच्यावरील आरोप शेतकऱ्यांच्या बाबतीत अजित पवार आणि गिरीश महाजन कडून करण्यात आलेल्या विधानावरून संजय राऊतांनी केलेल्या टिकेवरून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 25, 2025 13:49:44
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : आमच्या खात्यातून शेतकऱ्यांना रोजगार आणि बांधबंधिस्ती करण्यासाठी मदत करू - मंत्री गोगावले ऑन 50 हजार हेक्टरी मदत - शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. - हरियाणा, चंदीगड ही राज्य छोटी आहे पण महाराष्ट्र खूप मोठे राज्य आहे. - त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. - NDRF चा निकाल बदलून आपण जसं म्हणालात (50 हजार हेक्टरी) त्याप्रमाणे आमचा प्रयत्न राहील. - रोजगार हमी फलोत्पादन हे खातं माझ्याकडे आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी प्रयत्न करू. - सर्वांनी हातभार लावला तर शेतकऱ्याला पुन्हा उभा करता येऊ शकतो. *- ऑन माती खरवडून गेली :* - एखाद्या वेळी पीक आलं नाही किंवा कुजलं तर ते परत घेता येत. मात्र जमीनच खरवडून गेल्यानंतर कातळावर त्यावर काय घेणार. - मात्र आमच्या खात्यातून शेतकऱ्यांना रोजगार आणि बांधबंधिस्ती करण्यासाठी मदत करू. *- ऑन फळबाग मदतीसाठी दिल्लीला जाणार :* - जी परिस्थिती आहे ती आम्ही पाहिली आणि कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे मांडणार आहोत - पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सांगून मी दिल्लीला जाणार - दिल्लीकडून जास्तीत जास्त निधी आणून शेतकऱ्यांना कसं उभा करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार. - ऑन अजितदादा पवार विधान :* - अजितदादा हे .. दादा आहेत... - एकनाथ शिंदे साहेबांनी 50 गाड्याद्वारे दहा हजार किट सोबत घेऊन आले होते. - माढा, बार्शी या गावात पाच पाच दिवस गावात पाणी साचले आहे. आणि गावात वीज नाही जेवण नाही. Byte : भरत गोगावले (रो.ह.यो मंत्री)
3
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 25, 2025 13:49:25
Buldhana, Maharashtra:अखेर! 'सह'मंत्री पोहोचले 'बांधा'वर, नुकसान पाहण्यासाठी 'मिळाला' वेळ! अँकर - बुलढाणा जिल्ह्यातील सोनोशी महसूल मंडळात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान होऊनही, सह पालकमंत्री संजय सावकारे यांना पाहणीसाठी यायला उशीर झाला. अखेर स्थानिक दबाव व शेतकऱ्यांच्या मागणीनंतर त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि "शासनाकडे भरीव मदतीची मागणी करू," तसेच शेडनेटसाठीही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही पाहणी सुरू असतानाच संतप्त शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवून आपला रोष व्यक्त केला, कारण त्यांना मंत्र्यांपर्यंत आपले गार्हाणे मांडायला मिळत नव्हते; यानंतर साहेब गाडीतून उतरले आणि त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, ज्यामुळे 'देर आये दुरुस्त आये' अशा वातावरणातही शेतकऱ्यांच्या असंतोषाची झलक दिसली. आता आश्वासन दिलेली 'भरीव मदत' कधी आणि कशी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. byte - संजय सावकारे, सह पालकमंत्री बुलढाणा
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 25, 2025 13:17:56
Buldhana, Maharashtra:बुलढाणा... आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोच्या संख्येने धडकला बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा... अनुसूचीत जमाती प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याची प्रमुख मागणी... Anchor - हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात याव या प्रमुख मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला.. या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते.. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.. या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान "एक मराठा लाख मराठा" असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने "एक गोर, सव्वा लाखेर जोर" हे घोषवाक्य देखील पाहायला मिळाल.. सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे... बाईट - रायसिंग महाराज, महंत बाईट - नंदिनी चव्हाण, बंजारा युवती
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 25, 2025 13:02:01
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 12:49:04
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - वाशी मार्केट आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीसाठी उपोषण करणार - मंत्री चंद्रकांत पाटील.. अँकर - मुंबईच्या वाशी मार्केट आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीसाठी उपोषणाचा इशारा थेट भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलाय, उपोषणासाठी प्रसंगी मंत्रीपद काढून घ्या,असं सांगू ना पण आता सोडणार नाही,असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांना दिला आहे,ते सांगलीमध्ये भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होतो. साऊंड बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 25, 2025 12:37:04
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 25, 2025 12:33:34
Raigad, Maharashtra:स्‍लग – बंदी असतानाही ऑनलाईन गेमिंग जुगार सुरूच ........ रायगड पोलीसांनी केला पर्दाफाश ......... राजस्‍थानमधून एकाला घेतले ताब्‍यात, पाचजणांचा शोध सुरू ......... 19 कोटी 44 लाख रूपये रकमेची 44 बँक खाती गोठवली ........... अँकर- भारतात ऑनलाईन जुगाराला बंदी असतानाही अॅप्‍सच्‍या माध्यमातून जुगाराचे प्रकार राजसोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. रायगड पोलीसांच्या सायबर सेल विभागाने अशाच एका ऑनलाईन जुगाराचा उलगडा गेला आहे. राजस्थान मधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणात कोट्यावधींचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे यात काही बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी भारमल हनुमान मिना याला राजस्‍थानच्‍या सवाई माधवपूर येथून ताब्यात घेतले आहे. अन्य पाच आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीसांनी 44 बँक खाती त्‍यातील 19 कोटी 44 लाख रूपयांच्‍या रकमेसह गोठवली आहेत. बाईट - आँचल दलाल , पोलिस अधीक्षक
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 25, 2025 12:18:35
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 7 FILES SLUG NAME -SAT_VISHBADHA सातारा - नवरात्र उत्सवातील उपवासादरम्यान वरीचा पिठाची भाकरी खाल्ल्याने 20 हून अधिक महिलांना विषबाधा तर 10 हून अधिक पुरुषांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.वरी पिठाची भाकरी खाल्ल्याने 8 हून अधिक नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बाधित झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.माण- खटाव भागातील मांडवे, पळशी, दहिवडी, बोंबाळे,किरकसाल, वडूज यांसारख्या अनेक गावांमधील महिला पुरुष यांना ही विषबाधा झाली आहे.वैभव ट्रेडर्स, अरियंत ट्रेडर्स, साई बाजार या दुकानातून स्थानिक दुकानदारांना वरीच्या पिठाचे विक्री ग्राहकांना त्याचबरोबर अन्य दुकानदारांना केली होती.. या दुकानांना सील करण्यात आला आहे.वरी पिठाची भाकरी उपवास असलेल्या लोकांनी खाऊ नये असा आव्हान देखील आता प्राथमिक आरोग्य केंद्र कडून करण्यात येत आहे.. बाईट्स -
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 25, 2025 12:05:38
Raigad, Maharashtra:स्‍लग – पेणमध्‍ये हुतात्‍मा नाग्‍या कातकरी यांचा स्‍मृतीदिन साजरा अँकर – भारतीय स्‍वातंत्रय लढयातील चिरनेर जंगल सत्‍याग्रहातील आदिवासी हुतात्‍मा नाग्‍या कातकरी यांचा स्‍मृतीदिन आज पेणमध्‍ये साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍ताने अंकुर ट्रस्‍ट व इतर सेवाभावी संस्‍थांच्‍या वतीने पेण शहरात रॅली काढण्‍यात आली. या आदिवासी बांधव आपल्‍या पारंपारीक वेशभूषेत मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. महात्‍मा गांधी वाचनालयात झालेल्‍या सभेत सामुहिक वनहक्‍क दावे मंजुर करावेत अशी मागणी करण्‍यात आली. अंकुर ट्रस्‍टच्‍या डॉ. वैशाली पाटील, खासदार धैर्यशील पाटील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top