Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
नाशिकमध्ये आंदोलन: राहुल धोत्रे यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची कुटुंबाची भूमिका
YKYOGESH KHARE
Aug 30, 2025 05:45:31
Nashik, Maharashtra
nsk_protest feed by mojo anchor जोपर्यंत भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना पोलीस अटक करणार नाही तोपर्यंत राहुल धोत्रे याचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका धोत्रे कुटुंबियांनी घेतल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात गेल्या पंधरा तासापासून आंदोलन सुरू आहे पोळा सणाला उद्धव निमसे समर्थकांनी धोत्रे कुटुंबीयांवर हल्ला करत राहुल धोत्रे याला गंभीर जखमी केले होते त्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांनी एकूण या गुन्ह्यातील सात जणांना अटक केली असून चार जण फराळ झाले आहेत त्यामुळे प्रमुख सूत्रधार उद्धव निमसे यांना शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत.
13
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Aug 30, 2025 11:13:15
Waghapur, Maharashtra:
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा सन्मान यवतमाळ : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन शहरातील अमोलकचंद महाविद्यालय सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख आणि पोलीस बॉईज राहुल सुभाष वंजारी यांना जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या हस्ते गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तसेच हॉकिसंघाचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 30, 2025 11:04:29
Akola, Maharashtra:
Anchor : मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा माझा वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण हाकेचं नाव न घेता मिटकरी म्हणाले की, या आंदोलनाला जाणीवपूर्वक काही लोक टीका-टिप्पणी करत आहेत तर आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.सरकारने संविधानिक मार्गाने आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली. तसेच, मुंबईत गेलेल्या आंदोलकांचे हाल होऊ नयेत, याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. Byte : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
1
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 30, 2025 11:04:03
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे फीड 2C बाळासाहेब थोरात ऑन मराठा आरक्षण Anc:- ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका सांगत असतानाच राज्य सरकारने ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ते गावोगावी भांडण लावत फिरत असल्याचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच नाव न घेता टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही प्रयत्न केला होता. पुन्हा तोच प्रयत्न होऊन आरक्षण मिळायला पाहिजे, जो मराठा समाजातील गरीब घटक आहे त्याला ती संधी मिळाली पाहिजे.. काही मंडळी दुर्दैवाने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत यात राजकारण करायला नको असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे. बाईट:- बाळासाहेब थोरात, काँग्रेस जेष्ठ नेते
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Aug 30, 2025 11:01:12
Nashik, Maharashtra:
*Breaking.... विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )* Anc: बागलाण तालुक्यातील अंबासन गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील एका डुक्कर मालकाने स्वतःच्या डुकरांचे रक्षण करण्याच्या नावाखाली गावात फिरणाऱ्या कुत्र्यांना विष देऊन ठार केल्याची घटना समोर आली असून, यात सुमारे वीसहून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत काही मांजऱ्यांचाही बळी गेला आहे. विशेष म्हणजे ही घटना गावातील सावता चौक व अंगणवाडी केंद्राजवळ घडल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडी परिसरात लहान मुलांचा जीव धोक्यात आला आहे. गावातील अंगणवाडी परिसरात विष दिलेले खाद्य टाकण्यात आले होते. परिणामी परिसरात फिरणाऱ्या अनेक कुत्र्यांनी ते अन्न खाल्ले आणि काही वेळातच तडफडून मृत्यूमुखी पडले. मृत्यूमुखी पडलेले कुत्रे आणि मांजरी काही काळ परिसरात पडून होते, त्यामुळे या दृश्याने गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली. जायखेडा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 30, 2025 11:00:58
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 3008ZT_INDAPURCYCLEBHRNE FILE 4 इंदापुरात कृषिमंत्र्यांचा सायकल वरून फेरफटका....* इंदापुरात सायकल बँक उपक्रमाचे मंत्री भरणे यांच्या हस्ते लोकार्पण.... Anchor इंदापूर पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने इंदापुरात सायकल बँक उपक्रम राबवण्यात आलाय. याद्वारे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना 111 सायकलींचे वितरण राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शालेय विद्यार्थिनींसोबत इंदापूर शहरातून सायकलवरून फेरफटका मारलाय..
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 30, 2025 11:00:33
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे फीड 2C हर्षवर्धन सपकाळ ऑन मराठा आंदोलन Anc:- मागील दोन दिवसांपासून मुंबईत मराठा आंदोलक आरक्षणाची मागणी घेऊन आंदोलन करत आहेत...मात्र त्या ठिकाणी आंदोलकांचे हाल होत आहेत, त्यांना जेवण देखील मिळत नाही... यावरून सरकारवर टीका होत आहे, याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर निशाणा साधला असून हा सरकारचा कुटील डाव असल्याचा स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे... मराठा आरक्षणाचा आंदोलनाला सामाजिक आयाम आहे, त्या दृष्टिकोनातूनच याकडे पाहिलं पाहिजे... सागर बंगल्यावरून ओबीसीने मराठा जो बाद पेरला गेला त्याला कुठेतरी तिलांजली देण्याची वेळ आली आहे... मराठा आंदोलन काय झोपेतून उठून आंदोलनाला गेलेले नाहीत...त्यांच्या तारखा आधीपासून निश्चित होत्या, मग त्या वेळेला पोलीस यंत्रणा आणि सरकार काय झोपलेले होते का? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. बाईट:- हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ ऑन काँग्रेस भूमिका And:- सुरुवातीपासूनच काँग्रेस मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे ज्यावेळी सर्व पक्षीय बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी घेतलेली भूमिका सर्वांना माहित आहे त्यानंतर विधानसभेमध्ये ज्यावेळेस आरक्षणाबाबत मतदान झालं त्यावेळी देखील काँग्रेसने मराठा आरक्षणाच्या बाजूनेच मतदान केला आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटल आहे... गेल्या वेळी नव्या मुंबईपर्यंत आलेल्या आंदोलकांना याच सरकारने कुठला शब्द दिला होता ज्यामुळे गुलाल उधळला गेला तो शब्द त्यांनी पाळला पाहिजे त्या भूमिकेपासून त्यांनी आता पळ काढू नये राज्यात असलेल्या 52% आरक्षण हे वाढवून त्यामध्ये मराठा समाविष्ट सामावून घ्यावे ही काँग्रेसची भूमिका आहे या सरकारकडे 240 आमदार आहेत त्यामुळे काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी असं म्हणूनच चुकीचा आहे असं देखील सपकाळ यांनी म्हटलं आहे बाईट:- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ऑन obc आंदोलन Anc:- मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू झाले आहेत यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली असून वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून चितावणी फोर वक्तव्य करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा काम सुरू आहे वास्तविक ओबीसी आरक्षणातील वेगवेगळ्या घटकाचे आरक्षण आणि मराठा आरक्षण यांचा संभ्रम निर्माण केला जातो तो तरकाला सोडून असल्याचं म्हटलं आहे केव्हा राजकारणाला राजकारण म्हणून असं करणं चुकीचं असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे बाईट:- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ऑन भाजप आमदार Anc:- मनोज जरांगे हे शरद पवारांचे सुसाईड बॉम्बर आहेत अशी टीका भाजपच्या आमदारांकडून होत आहे यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा स्वरूपाचे वक्तव्य करणं चुकीच आहे असं म्हंटल आहे... देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही स्वरूपातील मेरिटची चर्चा करत नाहीत... त्यांनी काही असे लोक सोडले आहेत ते केवळ विरोधकांवर टीका करतात... पूर्वीच्या काळात पूर्वी साहित्यिक, विचारवंतांना सोबत ठेवल जायचं, मात्र आता देवेंद्र फडणवीस हे केवळ वाचाळवीरांना आपल्या सोबत ठेवत आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली. बाईट:- हर्षवर्धन सपकाळ , प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Aug 30, 2025 10:35:47
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारी नोकरीत समावेशन व विविध मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. १५ टक्‍के मानधन वाढ तत्काळ लागू करणे, बदली धोरण, भविष्‍यनिर्वाह निधी व विमा योजना, शैक्षणिक पात्रता व कामाच्या जबाबदारीनुसार वेतन सुसूत्रीकरण, सेवेत असताना मृत्यू झाल्यास ५० लाख व अपंगत्व आल्यास २५ लाख सानुग्रह अनुदान आदी १८ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात, अशी आंदोलकांनी मागणी केली आहे. बाईट :
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 30, 2025 10:33:57
Washim, Maharashtra:
वाशिम : File:3008ZT_WSM_KADU_HAKK_YATRA रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर: प्रहारचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा आज वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथून सुरू झाली असून शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग, मेंढपाळ व मच्छीमार यांच्या न्यायाच्या प्रश्नांसाठी ही यात्रा राज्यात काढण्यात आली आहे.आज या यात्रेच्या जिल्ह्यातील शेंदुरजना, शेलुबाजार मार्गे जाणार जाऊन सायंकाळी कळंबा माहली येथे जाहीर सभा होणार आहे.उद्या ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहे.
4
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Aug 30, 2025 10:31:05
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज… AC ::- लातूर शहराच्या अनेक भागात अचानक भूगर्भातून मोठा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे… सुभाष चौक, हत्ते नगर, गरुड चौक आणि विवेकानंद चौक परिसरात हा आवाज स्पष्टपणे ऐकू आल्याचं सांगितलं जातय‌. प्रशासनाकडून भूकंप मापक केंद्रात भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे… बाईट ::- लातूरकर
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Aug 30, 2025 10:30:53
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या पाथरी येथील अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली,मनोज जरांगे पाटलांनी ओसीबी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मागन्यांना आमदार राजेश विटेकर यांनी पाठिंबा दिलाय...
0
comment0
Report
Aug 30, 2025 10:13:06
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यातील वणी (कायर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती गंभीर असून डॉक्टर, कर्मचारी, औषधे व उपकरणांचा मोठा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने रिक्त पदे भरावीत, औषधे व उपकरणांचा पुरवठा करावा, अशी मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावेळी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Aug 30, 2025 10:04:22
Ratnagiri, Maharashtra:
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात आज मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.चालत्या ट्रेन मधून बेजबाबदार पणे उतरणारा तरुण पडला आणि ट्रेन खाली जात होता.पण प्लॅटफॉर्म वर सेवेत असलेल्या दोन आर पी एफ आणि एक विक्रेत्याच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आज सकाळी एल टी टी - सावंतवाडी सकाळी 6वाजून 41मिनिटांनी रत्नागिरी च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दाखल झाली.ट्रेन प्लॅटफॉर्म वर थांबण्यापूर्वीच यातील एक तरुणाने ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न केला.या चुकीच्या प्रयत्नांत हा तरुण चालत्या ट्रेन च्या खाली येणार होता.पण तो पडताच प्लॅटफॉर्म वर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन आर पी एफ जवान आणि एका विक्रेत्याने सतर्कता दाखवत त्याला वेगाने बाजूला ओढले.त्यामुळे त्याचे प्राण वाचले.कोकण रेल्वेचा आर पी एफ जवान रणजीत सिंह आणिमहेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी त्याला वेळीच ओढत ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले.त्याच्या बरोबर प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरुण गोळप रत्नागिरी येतील असल्याची माहिती पुढे आली आहे.या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.प्लॅटफॉर्म वर कार्यरत दोन आर पी एफ व विक्रेत्यांनी समयसूचकता दाखवत केलेल्या हालचालीमुळे केवळ त्याचे प्राण वाचले.या घटनेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांचे ही विशेष कौतुक केले आहे.संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तात्काळ त्यांना प्रदान करण्यात आले आहे. सोबत cctv फुटेज आणि फोटो जोडत आहोत
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 30, 2025 10:02:39
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3008ZT_CHP_TALAV_OVERFLOW ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील डोलारा तलाव ओव्हरफ्लो, प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड  नागरिकांच्या घरादारात पाणी शिरल्याने  शिवसेना लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी तहसीलदार ते जिल्हाधिकारी स्तरापर्यंत रेटला विषय अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील डोलारा प्रभागातला डोलारा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आसपासच्या वसाहतीत- घरात पाणी शिरले. यात अन्नधान्य, घरगुती साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, नगरपरिषद आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी तलाव ओव्हरफ्लो टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून मोटार पंपाची व्यवस्था केली जाते. मात्र, यावर्षी नागरिकांनी वारंवार निवेदन करूनही आवश्यक पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे या भागातील कुटुंबे पाण्याखाली गेली.  शिवसेना शिंदे गटाचे  लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी स्वखर्चाने डिझेल उपलब्ध करून दिल्याने मोटार पंपाद्वारे तलावातील पाणी उपसा करण्याची व्यवस्था सुरू झाली. या तातडीच्या मदतीमुळे स्थानिकांना काही दिलासा मिळाला. जिवतोडे यांनी तहसीलदारांना भेटून  नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत देण्याची मागणी केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रश्न रेटून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. बाईट १) पिडीत नागरिक बाईट २) मुकेश जीवतोडे, लोकसभा संघटक, शिवसेना ( शिंदे गट) आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 30, 2025 10:02:22
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 3008ZT_JALNA_GANPATI(3 FILES) जालना : 108 किलो वजनाचा बाप्पा ठरतोय आकर्षण अँकर : जालन्यात 108 किलो सोन्या-चांदीचा मुलामा असलेला बाप्पा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.अनोखा गणेश मंडळाच्या वतीनं या बाप्पाची स्थापना करण्यात आलीय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात या बाप्पाची स्थापना करण्यात आलीय.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ही मूर्ती तयार करण्यात आलीय.या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक एकच गर्दी करतायत.या बाप्पाच्या मुर्तीला 34 तोळे सोन्याचा मुलामा देण्यात आल्याची माहिती अनोखा गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी दिलीय. बाईट :;जगदीश भरतीया, अध्यक्ष, अनोखा गणेश मंडळ,जालना
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Aug 30, 2025 08:47:23
Pune, Maharashtra:
शरद पवार ऑन आरक्षण पॉइंटर शरद पवार सामाजिक ऐक्य अडचणीत येते की असा प्रश्न निर्माण झाला आहे.... महाराष्ट्रासाठी आरक्षण हे काय नवीन नाही राजर्षी शाहू महाराज यांनी मागास समाजासाठी आरक्षणाची गरज लक्षात घेऊन 50 टक्के आरक्षण दिले... सध्या आरक्षणावरून वादावादी सुरू झालेली पाहायला मिळते हा वाद समाजामध्ये कटूता निर्माण करते की काय अशी चिंता आहे... सध्या मराठा विरुद्ध ओबीसी अशी चर्चा सुरू झाली आहे या दोन्ही समाजामध्ये खूप अडचणी आणि मागासलेपण आहे हाल सहन करणारा खूप मोठा वर्ग आहे आणि प्रगतीत वाढ हवी असेल तर त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे.... मराठा समाजातील मोठा वर्ग शेती करणारा आहे मात्र शेतीतूनही प्रगती होत नसल्याने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हा पर्याय आहे... मात्र हे करत असताना दोन समाजामध्ये कटुता वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे... यासाठी काही धोरणात्मक निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्याचे गरज आहे.... आरक्षण देण्यासंबंधी सुप्रीम कोर्टाचे काही निकष आहेत त्यानुसार 50%,52% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही मात्र तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिलय आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टात देखील टिकल... केंद्र सरकारने याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागतो वेळप्रसंगी घटनेमध्ये बदल करून संसदेमध्ये असे निर्णय घ्यावे लागणार आहेत
7
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top