Back
अमरावतीत गणेशोत्सवाची जय्यत तयारी, 1900 मंडळे सज्ज!
ADANIRUDHA DAWALE
Aug 27, 2025 03:31:47
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_GANPATI नऊ फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यात 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे; 384 ठिकाणी एक गाव-एक गणपती संकल्पना
अँकर :- अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी झाली असून यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत झाली असून त्यापैकी 384 ठिकाणी एक गाव-एक गणपती ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात एक गाव-एक गणपती या उपक्रमाने वेग घेतला होता. 2024 मध्ये 347 गावांनी हा प्रयोग यशस्वी केला होता. या संकल्पनेमुळे गावांतील वैमनस्य, राजकीय भेद मिटवून सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाला. तसेच अनावश्यक स्पर्धा, पैशांचा दुरुपयोग आणि ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळाले. त्यामुळे यंदा या संकल्पनेचा अधिकाधिक विस्तार होईल अशी अपेक्षा प्रशासन व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HPHARSHAD PATIL
FollowAug 27, 2025 06:33:16Palghar, Maharashtra:
पालघर जिल्ह्यात 9776 घरगुती गणेश मूर्ती तर 1912 सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना झाली आहे. या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता एक अप्पर पोलीस अधीक्षक, चार पोलीस उपाधीक्षक, 67 पोलीस अधिकारी, 732 पोलीस अंमलदार, 500 होमगार्ड 50 वाहतूक अंमलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे चार स्ट्राइकिंग फोर्स ,दोन दंगल नियंत्रण पथक, दोन जलद कृती दल व एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी जिल्हाभरात लक्ष ठेवून असणार आहे .
0
Report
Waghapur, Maharashtra:
यवतमाळ बस स्टँडपासून आर्णी रोडवरील वनवासी मारुती मंदिरापर्यंतच्या मार्गावर वारंवार अपघात होत असून नागरिकांनी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषद कार्यालय, शाळा आणि रुग्णालये या परिसरात असल्याने धोका वाढला आहे. तक्रारी असूनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. तसेच विद्युत भवनसमोरील मोठ्या खड्ड्यामुळेही अपघात वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
0
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 06:02:24kolhapur, Maharashtra:
Ngp patole byte
live u ने फीड पाठवले
-------
* सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
* आज गणेश चतुर्थी आहे.. *गणपतीचे विचार सरकार ने आत्मसात केले असते, तर आज आंदोलनाची गरज पडली नसती..*
* मराठा, obc मागासवर्गीय सर्वांना या सरकारने फसविले.. व्यसनाधीन समाज सरकार निर्माण करत आहे..
* आंदोलनाची धग थांबवायची असेल तर गणपतीचे विचार सरकार ने स्वीकारावे.
* काँग्रेस ने वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे.. *जात निहाय गणना करा, त्यातून हे सर्व आरक्षणाचे प्रश्न निकाली निघतील..*
* जात निहाय गणनेच्या आमच्या मागणीनंतर मोदी सरकार ने त्याबद्दलचे निर्णय घेतले, मात्र प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही
* *जरांगे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे. मात्र सरकारने ही त्यांच्याशी बोलले पाहिजे.. चर्चा केली पाहिजे..*
* भाजपचे खोटेपणा अनेक वर्ष देश पाहात आहे.. मोदी फडणवीसच्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही.. मग सरकार वर कोण विश्वास ठेवणार.. शेतकरी आत्महत्या करताना सरकारचे नाव घेतले.. सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे..
* *सरकार ने दोन पाऊल पुढे जाऊन जरांगे सोबत चर्चा करावी.. जरांगे यांना मुंबईत का येऊ द्यावे..*
* *गणेशोत्सव महाराष्ट्राचा सण असून सरकार ने आंदोलनाची झळ लोकांना बसणार नाही याची काळजी घ्यावी..*
* आरक्षणाचा प्रश्न सोडवायचे असेल तर जात निहाय गणना झालीच पाहिजे.. आम्ही सत्तेतून बाहेर गेल्यावर हे बोलत नाही आहोत, आधीपासून आमची हीच भूमिका आहे..
* Obc pm असताना obc ला न्याय दिला जात नाही..
* *कोणाच्या हिश्यातून कोणाला देण्याची गरज नाही, जात निहाय गणनाच त्यावर उपाय आहे..*
3
Report
SKSACHIN KASABE
FollowAug 27, 2025 06:02:02Pandharpur, Maharashtra:
27082025
slug - PPR_RIKSHAW_JARANGE
file 01
---
Anchor - मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज पंढरपुरातून शंभर रिक्षाची रॅली मुंबईकडे रवाना झाली.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या आंदोलनाला पंढरपुरातील रिक्षा मालक आणि चालकांनी पाठींबा देत आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
....
2
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 27, 2025 06:01:33Washim, Maharashtra:
वाशीम:
File:2708ZT_WSM_DAM_OVERFLOW
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशीम
अँकर: मागील १० ते १२ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दुसरीकडे जिल्ह्यातील १६२ प्रकल्पांपैकी १०६ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.यापैकी ११ बॅरेजचे दरवाजे बंद केल्यानंतर ते देखील पूर्ण क्षमतेने भरतील. तसेच अजून १६ प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.तर सोनल व एकबुर्जी हे मध्यम प्रकल्प आधीच ओव्हरफ्लो झाले आहेत.लघुपाटबंधारे विभागातील ७५ प्रकल्पांपैकी ३६ प्रकल्प तुडुंब भरलेअसून मृद व जलसंधारण विभागातील ८५ प्रकल्पांपैकी ६८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.उर्वरित प्रकल्पही लवकरच भरतील,असा अंदाज असून पाणी साठ्याच्या दृष्टीने हा पाऊस रब्बी हंगामासाठी दिलासादायक ठरणार आहे.
1
Report
KJKunal Jamdade
FollowAug 27, 2025 06:00:59Shirdi, Maharashtra:
Anc - शिर्डी शहरात वेश्याव्यवसायांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील चार हॉटेल्सना एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी या हॉटेल्सवरपिटा अंतर्गत कारवाई केली होती.त्या कारवाई नंतर पोलिस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला होता न्यायालयाने निकाल देत ज्या ठिकाणी वेशाव्यवसाय सुरू होता त्या आस्थापना सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्या आदेशाहून शिर्डी शहरातील हॉटेल साई वसंत विहार , हॉटेल शिर्डी साई इन , हॉटेल साई वीरभद्र , हॉटेल साई शीतल या हॉटेलवर कारवाई करत सदर हॉटेल एक वर्षासाठी सील करण्यात आलेत..
1
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowAug 27, 2025 05:51:14Parbhani, Maharashtra:
अँकर- मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यामागणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची मराठा समाजाला हाक दिली आहे. या हाकेला साद देत परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईकडे जरांगे पाटलांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी काल पासूनच निघाले आहेत. अनेक गावामधून शेकडो तरुण मिळेल त्या वाहनाने जमेल तसं मुंबईकडे रवाना होत आहेत. परभणीच्या कातनेश्वर गावात भव्य रॅली काढून मराठा तरुणांना मुंबईकडे आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाठवले आहे...
1
Report
SKSudarshan Khillare
FollowAug 27, 2025 05:51:06Manmad, Maharashtra:
अँकर :- राज्यात लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत होत असताना यंदा मात्र नाशिकच्या मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये होणारी गणरायाची रेल्वे वारी हुकणार आहे. दरवर्षी चाकरमानी मोठ्या भक्तिभावाने गणरायाची पासबोगीमध्ये प्रतिष्ठापणा करतात आणि दहा दिवस गणरायाची मनमाड - मुंबई वारी होत असते.गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा आहे.गोदावरी एक्स्प्रेसचा गणेशोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.मात्र रेल्वे प्रशासनाने गोदावरी एक्सप्रेस धुळ्यापर्यंत वाढविल्याने धावत्या रेल्वेत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यास अडचण येणार असल्याने यंदा गोदावरी एक्सप्रेस गणेश मंडळाने गणपती न बसविण्याचा निर्णय घेतल्याने 28 वर्षांनंतर प्रथम गणरायाची रेल्वे वारी खंडित होणार असल्याने गणेशभक्त, चाकरमानी तसेच प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
1
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 05:50:58kolhapur, Maharashtra:
Ngp Ganesh arrival
live u ने फीड पाठवले
-------
राज्याची उपराजधानी नागपूतही मोठ्या गणेश मोठ्या मंडळाच्या गणेश मूर्तीं वाजत गाजत मंडळाच्या मंडपाकडे रवाना झाल्या आहेत.... चितारोळ परिसरात ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात गणेशभक्त बाप्पाची मूर्ती घेऊन मंडळात स्थापने करता रवाना होत आहे.... यावेळी शासकीय दंत महाविद्यालयातील गणराया आणि छापूनगर चा राजा या दोन गणेश मंडळाच्या गणेश भक्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
---
wkt
3
Report
JMJAVED MULANI
FollowAug 27, 2025 05:30:31Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2708ZT_INDAPURPATILGANESH
BYTE 1
हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन
Anchor _राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक बाप्पाची विधिवत पूजा केलीय.
सदैव गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा अशी प्रार्थना हर्षवर्धन पाटील यांनी गणपती बाप्पा चरणी केली आहे.
वाईट हर्षवर्धन पाटील अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ माजी मंत्री
2
Report
AKAMAR KANE
FollowAug 27, 2025 05:16:395
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 27, 2025 05:15:51Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरी-
कोकणात गणेशोत्सवाला धुमधडाक्यात सुरवात
संगमेश्वर तालुक्यातील भातगाव खाडीतून चक्क होडीतून आणले जातात गणराय
खाडीच्या विशाल पात्रामधून आणले जातात गणपती
भातगाव आणि करजुवे गावाला जोडणारी हि खाडी
श्रद्धा आणि भक्तीच्या जोरावर ग्रामस्थ गणरायांना बोटीतून घरी घेवून येतात
ढोल ताशांच्या गजरात गणराय चक्क होडीतून होतं गणरायचं आगमन
त्यावेळी दणळवळणाची साधने नव्हती त्यामुळे गणपती कसे घरी आणले जायचे हे पुढच्या पिढीला कळण्यासाठी परंपरा कायम
5
Report
KJKunal Jamdade
FollowAug 27, 2025 04:46:32Shirdi, Maharashtra:
Rahuri News Flash
*राजू शेट्टी यांना धक्का...*
*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश...*
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश...
*रवींद्र मोरे स्वाभिमानीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष...*
शेतकऱ्यांसाठी अनेक लक्षवेधी आंदोलन करणारा नेता अशी मोरे यांची ओळख...
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र मोरे यांचा शिवसेनेत प्रवेश...*
मोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का...
मोरे यांची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती...
4
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 27, 2025 04:46:28Washim, Maharashtra:
वाशिम:
File:2708ZT_WSM_EPIK_PAHANI
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशीम
अँकर: ई-पीक पाहणी अँपमध्ये तांत्रिक अडचणींमुळे अर्धा हंगाम संपेपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करता आली नव्हती.यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले होते.मात्र आता प्रशासनाने अँपमधील त्रुटी दूर केल्या असून हे अँप सुरळीतपणे सुरू करण्यात आले आहे.तात्काळ आपल्या पिकांची नोंदणी ई-पीक पाहणी अँपद्वारे करून घ्यावी.या नोंदणीवर आधारित पिक विमा,अनुदान,शेतकरी कल्याणकारी योजना आणि इतर लाभ मिळणार असल्याने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.दरम्यान,ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
8
Report
JMJAVED MULANI
FollowAug 27, 2025 04:31:32Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 2708ZT_BARAMATIAJIT
FILE 4
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर ... इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे पार पडणार शेतकरी मेळावा......
Anchor_ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे. यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजता इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर AI तंत्रज्ञाना संदर्भात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत.याशिवाय आज सायंकाळी गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध मंडळांना ते सपत्नीक भेट देणार आहेत.
4
Report