413133
कृषिमंत्र्यांच्या घरात मुस्लिम बांधवांनी केली गणेशाची आरती!
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 3108ZT_INDAPURBHARNEMUSLI FILE 2 कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरातील श्री गणेशाची आरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते.. Anchor:- राज्याची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी निवासस्थानातील गणरायाची आरती ही तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात आली. इंदापूर तालुक्यात हिंदू मुस्लिम हे गुण्या गोविंदाने राहत असून हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा पॅटर्न ठरेल असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलय. यावेळी इंदापूर तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिर्डी में छुट्टियों के कारण भक्तों की भारी भीड़, मोहरम से गूंजी साईं नाम
Shirdi, Maharashtra:सलग आलेल्या सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी... पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांवर देखील गर्दी.. मोहरम व त्याला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे शिर्डीत साईनामाचा जयघोष.. अनेक भागात मान्सून सुरू झाल्याने पर्यटन स्थळां सोबतच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी...0
0
Report
कामण में दुखद सड़क हादसा; महिला की मौके पर मौत
Vasai-Virar, Maharashtra:कामणमध्ये दुर्दैवी अपघात; महिलेचा जागीच मृत्यू वसई : वसई तालुक्यातील कामण येथील पोमण गावातील डोंगरीपाडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात जयवंती पडवले (रा. बामणपाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून त्यांचांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावरून आयशर ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सध्या कामण-भिवंडी रोडवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने कुठे कुठे दोन्ही लेनच्या गाड्या एका लेनवर चालू असतात. एका लेनवरुन दुसऱ्या ऐकेरी लेनवर जात असताना हा अपघात घडला. ठेकेदाराने सुरक्षेचे दृष्टीने योग्य नियोजन न केल्याचा आरोप होत आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
येवला रेलवे स्टेशन सुविधाओं के अभाव पर DRM का दौरा, पुणे-अमरावती एक्सप्रेस ठहराव मांग
Yeola, Maharashtra:पैठणी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराचे रेल्वे स्थानक हे अनेक सुविधांपासून वंचित आहे केंद्रीय रेल्वे मंत्रालयामार्फत येवला रेल्वे स्थानकात विविध विकास कामे सुरू असून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन चे बांधकाम पूर्णत्वास गेले आहेत या संदर्भात पाहणी करण्यासाठी पुणे डिव्हिजनल चे डी आर एम राजेश कुमार वर्मा, वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक आदींनी येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली. मात्र या ठिकाणी काही आवश्यक बाबी अपूर्ण असल्यामुळे पुणे अमरावती या एक्सप्रेसला थांबा अद्याप सुरू झालेला नाही तसेच आरक्षण खिडकी लवकरात लवकर सुरू करावी यासह आषाढी वारीनिमित्त या रेल्वे स्थानकावर पंढरपूर स्पेशल रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या विविध मागण्यांचे निवेदन डी आर यु सी सी सदस्य योगेश सोनवणे, प्रवासी संघटनेचे सदस्य अविनाश कुकर आदींनी डी आर एम राजेश वर्मा यांना दिले याप्रसंगी या निवेदनांची दखल घेऊन लवकरात लवकर पुणे अमरावती एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती वर्मा यांनी दिली0
0
Report
Advertisement
प्लेज़ेंट पार्क में एयरबैग खुलने से 25 वर्षीय मोहित सोनी की मौत, पुलिस जांच
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक प्लेजंट पार्कमध्ये गाडीतील एअरबॅग उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू मिरा-भाईंदर : प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, होंडा सिटी गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव मोहित सोनी (२५) असे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, गाडीत चालवताना , गाडीतील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली. या घटनेत मोहित सोनी यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहित सोनी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, गाडीतील एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली आणि या घटनेत अन्य कोणते तांत्रिक कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून, अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे.0
0
Report
Shirur DP theft hits farmers as cables stolen; approx. 3 lakh loss
Shirur, Maharashtra:ऐन दुष्काळाच्या सावटात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. घोडनदीवरील विद्युत रोहित्र म्हणजेच डीपी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही, तर या भागातील सुमारे २० हून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबलही चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या चोरीत शेतकऱ्यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुष्काळामुळे आधीच शेतकरी संकटात असताना, आता या चोरीमुळे त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, या भागात चोरण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, शेतकऱ्यांनी पोलिसांकडे वारंवार रात्रगस्त घालण्याची मागणी केली होती. मात्र, टाकळी हाजी पोलिसांना या घटनांचे गांभीर्य नसल्याचा संतप्त आरोप आता स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जातोय. पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार? असा सवाल आता उपस्थित होतोय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
यवतमाळ में उद्धव ठाकरे की रैली: शिवसेना प्रमुख आज संबोधित करेंगे
Yavatmal, Maharashtra:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज यवतमाळ येथे दोघ असून, ते सभेला संबंधित करणार आहेत0
0
Report
Advertisement
पिंपरी-चिंचवड पुलिस ने अवैध हथियार के साथ दो शस्त्रधारी आरोपी गिरफ्तार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने बेकायदा शस्त्रांविरोधातील कारवाईत यश मिळवत दोन सराईत आरोपींना अटक केलीय. या कारवाईत आरोपींकडून तीन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. आरोपी बावधन परिसरात शस्त्रांसह येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आर्यन जाधव आणि ओमकार मोरे या दोघांना ताब्यात घेतले. ओमकार मोरे याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्टसह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
धाराशिव में मल्हार पाटील ने ओमराजे निंबाळकर को चुनौती दी; MP2029 बैनर विवाद
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुञ मल्हार पाटलांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचले मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे धाराशिव शहरात लावले बॅनर खासदार ओमराजे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून MP2029 अशी केली बॅनरबाजी मल्हार पाटलांकडून ओमराजे निंबाळकर यांना खासदारीला चॅलेंज देण्यासाठी सज्ज झाल्याची शहरभर च चर्चा मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढण्याची तयारी?0
0
Report
कराड बस स्ट Stand पर धमकी देकर मंगलसूत्र झपटे; दंपति गिरफ्तार
Satara, Maharashtra:कराड बसस्थानक परिसरात महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पती-पत्नीच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. या बंटी बबली आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, तपासादरम्यान या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. आरोपी श्रावण कांबळे आणि त्याची पत्नी पूनम कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
Advertisement
भंडारा के मातोश्री पांदण रस्तों में गुणवत्ताहीन काम, आरोपित ठेकेदार और भ्रष्टाचार
Bhandara, Maharashtra:अंदाजपत्रकाला डावलून मातोश्री पांदण रस्त्यांची कामे?... निकृष्ट दर्जाच्या कामांवर ग्रामस्थांचा आक्षेप.... पांदण रस्ते ठरत आहेत कंत्राटदाराचे कुरण.... Anchor : भंडारा जिल्ह्यात मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम, मनरेगाच्या नियमांचे उल्लंघन आणि यंत्रसामग्रीचा वापर केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. VO : ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी मातोश्री पांडण रस्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांवर मुरूम व खडी टाकण्याची कामे केली जात आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप होत आहे. मजुरांना रोजगार देण्याऐवजी यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच बोगस मजूर दाखवून केवळ फोटो काढले जातात आणि प्रत्यक्ष काम यंत्रांद्वारे केले जाते, असा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक गरजू मजूर रोजगारापासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. तुमसर तालुक्यातील रूपेरा आणि मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील नागरिकांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी‑ंकडे लेखी तक्रार सादर केली आहे. या योजनेतील कामे काही कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांसाठी 'कुरण' ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. BYTE : मनोहर बिसने, तक्रारदार रूपेरा BYTE :- रत्न पुंडे, ग्रामपंचायत सदस्य नवेगाव VO : तांत्रिक मंजुरीनुसार पांदण रस्त्याच्या कामात प्रथम ६ इंच जाडीचा मुरूम टाकून त्याची योग्य दबाई करणे आवश्यक असते. त्यानंतर ८० एमएम व ४० एमएम खडीचे थर टाकून दबाई आणि शेवटी घोटाई करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक ठिकाणी या निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे शासनाचा निधी वाया जात असून कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. BYTE : प्रशांत पडोळे, खासदार Vo : ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
एमआईडीसी के लिए अरापुर के पास जमीन माप पूरी, किसान मुआवजे पर चर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रस्तावित एमआयडीसीसाठी आरापूर जवळपास दीड महिन्यानंतर जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. आता दरनिश्चितीच्या वाटाघाटी होणार असून या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सुलतानाबाद, आरापूर आणि गवळीशिवरा येथील शेतकऱ्यांची ही बैठक सकाळी ११ वाजता होईल. नमोजणीदरम्यान काही शेतकऱ्यांनी फळझाडे आणि बांधकामांचा प्रश्न उपस्थित केला होता. 'आधी जमिनीचे दर निश्चित करा, मगच मोजणी करा,' अशी मागणी त्यांनी केली होती. आता मोजणी पूर्ण झाली असली तरी मोबदल्याची योग्य रक्कम मिळावी यावर शेतकरी ठाम आहेत. दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही त्यांची जमीन एमआयडीसीतून वगळणार का, हा प्रश्नही या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर समेत जिले में मानसून सक्रिय, बारिश और आंधी की संभावना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात मान्सून सक्रिय झाला असून, पावसाचा जोर आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जून रोजी शहरात दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. आगामी २८ जून ते २ जुलै या कालावधीत आकाश अंशतः ढगाळ राहणार0
0
Report
Advertisement
शिवसेना ने मंत्री संजय राठोड को राष्ट्रीय नेता नियुक्त कर विमुक्त-भटक्या समाज के सशक्तिकरण का लक्ष्य दिखाया
Yavatmal, Maharashtra:विमुक्त व भटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेने मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केलीयानंतर मसानजोगी, पारधी, बंजारा, लोहार, गवळी, गोंधळी, जोशी, बहुरूपी आदी भटक्या समाजाकडून राठोड यांचे पारंपारिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भटक्या विमुक्त जमातीतील ही मंडळी आपापल्या पारंपारिक वेशभूषेत आले होते. यावेळी संजय राठोड यांनी किंगरी घंटा खजेरी आदी वाद्य वाजवून यापुढील काळात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा व्यापक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, जातप्रमाणपत्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधांपासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहे. त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरण हेच पुढील ध्येय असल्याचे देखील संजय राठोड म्हणाले.0
0
Report
मराठवाड़ा में जून तक मानसून की बारिश उम्मीद के मुताबिक नहीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित वेगाने पाऊस बरसत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 60.9 टक्के पाऊस झाला आहे. विभागाची जून महिन्याची सरासरी 116.1 मिमी असताना प्रत्यक्षात केवळ 70.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 96 मिमी पाऊस झाला होता. जिल्हानिहाय पाहता धाराशिवमध्ये सर्वाधिक 94.8 मिमी (86.2%) पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ बीडमध्ये 80.7 मिमी (72.5%) पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर लातूरमध्ये सर्वात कमी 59.8 मिमी (51%), परभणीत 61.9 मिमी (49.2%), नांदेडमध्ये 71 मिमी (52.7%), हिंगोलीत 76.2 मिमी (52%), छत्रपती संभाजीनगरमध्ये 63.1 मिमी (58.2%) आणि जालना जिल्ह्यात 66.9 मिमी (58.2%) पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने अनेक भागात उघडीप दिल्याने खरीप पिकांच्या पेरण्या, उगवण आणि पुढील शेतीकामांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. विभागातील आठही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.0
0
Report
कळमजापूर के खेत में बिजली गिरने से महिला की मृत्यु, छह महिलाएं अस्पताल में भर्ती
Amravati, Maharashtra:कळमजापूर येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू; सहा महिला जखमी काल झालेल्या वादळी पावसात कळमजापूर येथील शेतात काम करणाऱ्या महिलांवर वीज कोसळून दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत सुनंदा नरेश सहारे (वय ३७, रा. कळमजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलेच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी जखमी महिलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.0
0
Report
Advertisement
