Back
कासारसाई धरणात प्लास्टिक कचरा: काय होणार पुढे?
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 10, 2025 02:01:10
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1007ZT_MAVAL_KASARSAI_DAM
Total files : 01
Headline : कासारसाई धरणात प्लास्टिक बॉटलचा कचरा
बेकायदेशीर आस्थापनाचा केर कचरा थेट धरणात
Anchor:
मावळ, मुळशी तालुक्यातील दहा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण परिसरात ब्लू लाईनवर अनेक हॉटेल्स रिसॉर्ट चे अतिक्रमण झाले असून या बेकायदेशीर आस्थापनाचा केर कचरा थेट धरणातील पाण्यात जात असल्याचं चित्रं दिसून आले आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून कासारसाई धरणात पाणीसाठा नव्वद टक्यांच्या जवळपास पोहोचला असून धरणाच्या भिंती जवळ प्लास्टिक बॉटल चा कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे..या प्लॅस्टिक कचऱ्याची अडचण भविष्यात कासारसाई धरणातील पाण्यावर होऊ शकते.. मात्र ब्लू लाईनवर अतिक्रमणे झाली आहे त्याकडे कासारसाई धरण अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष देण्याची गरज आहे.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowJul 10, 2025 11:43:31Dhule, Maharashtra:
ANCHOR - धुळे शहरात मुलींची छेड काढणाऱ्या दोघा रोड रोमियोना शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप दिला. धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथे दोघेजण मुलींची छेड काढत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहचले. संबंधित रोड रोमिओ घटनास्थळावरून पसार झाले होते. शिवसैनिकांनी त्यांचा शोध घेत त्यांची गली नंबर चार येथेच चांगला चोप देत समाचार घेतला. मारत मारत या रोड रोमिंयोंची धिंड काढत या रोडरोमोयोंना केले पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
byte - शिवसेना कार्यकर्ता
प्रशांत परदेशी, धुळे.
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 10, 2025 11:34:17Nashik, Maharashtra:
Feed send by TVU 51
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_student_suicide
अँकर - बातमी आहे नाशिक मधून, नाशिकमध्ये १६ वर्षाच्या तरुणाने गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. जीवन संपविण्याचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नेमकं नाशकात काय घडलंय, पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट.
Vio/1
-फोटोत दिसणारा हा आहे नाशिकच्या नगर परिसरातील जय भवानी रोड या ठिकाणी राहणारा सम्राट भालेराव, अवघ्या १६ वर्षाचा तरुण..... एकुलता एक मुलगा... दोन बहिणींचा लाडका भाऊ... त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलीये. त्याच्या आत्महत्याचे कारण ऐकून कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळत असतांना त्यात तो १२०० रुपये हरला होता. त्यातून निर्माण झालेल्या तणावातून त्याने आपली जीवन यात्रा संपवलीये.... यामुळे भालेराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... अवघ्या सोळा वर्षाच्या मुलांना आत्महत्या केल्याने संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाल...
माझा मुलगा नेहमी मोबाईल मध्ये गुंतून असायचा तासनतास फोन मध्ये असायचा... असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं... आणि त्याने ऑनलाइन गेम खेळत असताना पैसे हरले आणि तो मानसिक तणावात केला आणि त्यांनी हे कृत्य केलं असं त्याच्या नातेवाईकने सांगितलं...
बाईट- नातेवाईक
बाईट - सम्राट भालेरावचे नातेवाई ( आज्जी आणि आत्या )
Vio/02
याबाबत उपनगर पोलिसांनी सम्राटच्या मृत्यूप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करत तपास सुरू केलाय. तपास करत असताना सम्राटचा मोबाईलही उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलाय... तू कुठला ऑनलाईन गेम खेळत होता, आणि या ऑनलाइन गेम खेळत असताना त्याने किती पैसे गुंतवले होते याबाबत पोलीस तपास करत आहे....
बाईट - जयंत शिरसाठ - पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे
Vio/03
- खरंतर ऑनलाईन गेमच्या नादात अनेकांचा गेम झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातून नागरिकांनी धडा घेणे गरजेचे असताना आणि सायबर पोलिसांनी ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकू नये असा वारंवार आवाहन केले....मात्र नागरिक त्याला बळी पडतात ही शोकांतिका आहे. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग च्या जाळ्यात पडू नये असा आवाहनही सायबर पोलिसांकडून करण्यात आलेय....
बाईट - सुभाष ढवळे - पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस
Vio/05
दरम्यान सायबर पोलिसांकडूनही एका बाजूला आवाहन केलं जात असताना दुसऱ्या बाजूला सायबर तज्ञांनी टेक्निकल बाजू मांडल्यात. आपली मुलं काय करतात याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिलाय... एकविसाव्या शतकात आता पती-पत्नी हे दोघेही नौकरी करतात.... यामुळे मुलांकडे लक्ष केंद्रित होत नाही मात्र यावर देखील टेक्निकल पर्याय तयार करण्यात आला आहे... आपला पाल्य काय करतो आपल्या मोबाईलवर किती वेळ गुंतून असतो यासाठी गुगल वर मेल करून याबद्दल माहिती घेऊ शकतो... यामुळे पाल्यांकडे देखील पालकांचं लक्ष केंद्रित राहतं....
अनेक वेळा नवरा बायको हे
बाईट - भूषण देशमुख - सायबर तज्ञ
Vio/05 -
ऑनलाइन गेमिंग जाळ दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यावर नियंत्रण मिळवणं सायबर पोलिसांचं काम आहे, याबरोबरच नागरिकांनीही आपला पाल्य नेमकं काय करतोय यावर लक्ष देण्याची गरज आहे... नाशिकच्या घटनेत नेमकं काय घडलं हे प्रकरण समोर येईलच, मात्र तुम्ही आम्ही सर्वांनीच ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकू नये हीच या निमित्ताने अपेक्षा....
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 10, 2025 11:34:08Yavatmal, Maharashtra:
AVB
गल्लीत आणि दिल्लीत तुमचं सरकार आहे, तर मग केंद्र सरकारकडून पैसे आणा आणि शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करा. शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा त्यांचा सातबारा कोरा करा अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावंकर यांनी सरकारला धारेवर धरले. नांदगावकर यांनी यवतमाळच्या लाखखिंड येथे असलेल्या बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेत सहभागी होऊन मनसेचा पाठिंबा दर्शविला. सरकारकडे पैसे नाहीत तर मग घोषणा करता कशाला, साडेनऊ कोटीचे कर्ज राज्यावर आहे. असेही नांदगावंकर यांनी सुनावले.
बाईट : बाळा नांदगावकर : मनसे नेते
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 10, 2025 11:32:28Latur, Maharashtra:
PKG...
स्किप्ट ::- आमदार गायकवाडांचा बैल 'मारका'? लातूर जिल्ह्यात त्या बैलाचीच चर्चे...
AC ::- शेतकऱ्याच्या मदतीसाठी पुढे आलेल्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या ‘बैलजोडी’ची सध्या लातूर जिल्ह्यात मोठीच चर्चा आहे. कारण – मदत म्हणून मिळालेल्या बैलजोडीतील एक बैल शेतकऱ्याच्या अंगावर धावून येत आहे. शेतकरी जवळ गेला, तर बैल पाय मागे घेतो, डोळे वटारतो आणि शिंगं हलवतो... जणू काही समोरच्या व्यक्तीलाच आव्हान देतोय. त्यामुळे या बैलाला सांभाळण्यासाठी तिन माणसं लागत आहेत....
V001 ::- बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतेच लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार यांना मदतीचा हात पुढे करत एक बैलजोडी भेट दिली.
हे तेच अंबादास पवार ज्यांचा स्वतःच्या खांद्यावर औत ओढतानाचा व्हिडिओ समोर आला आणि जनतेच्या मनात खदखद निर्माण झाली होती. बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी मोठ्या भावना व्यक्त करत शेतकऱ्याच्या बांधावर बैलजोडी सुपूर्द केली. मात्र, त्यातील एक बैल मात्र शेतकऱ्यालाच जवळ येऊ देत नाही. त्याच्याकडे गेलं की बैल आक्रमक पवित्रा घेतो आणि अंगावर धावून यायच्या तयारीत दिसतो. त्याला सांभाळण्यासाठी आता अंबादास पवार यांना तिन दोन माणसं ठेवावे लागलेत.
बाईट ::- चंद्रकांत पवार ( अंबादास पवार यांचे भाऊ )
VO 02 ::- दरम्यान, अभिनेता सोनू सूद यांनी देखील पवार यांच्या बँक खात्यावर थेट ४५ हजार रुपये जमा केल्याचं समोर आलं. त्यावर गावात थेट मिश्कील चर्चा सुरू झाली. बरं झालं सोनूनं बैल न पाठवता पैसे दिले… नाहीतर तोही बैल ‘मारका’ निघाला असता तर ?...
बाईट ::- नागरीक
VO End ::- एकीकडे मदतीचा हेतू कौतुकास्पद असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडल्याचं चित्र दिसत आहे. बैलजोडी मिळाली खरी… पण आता शेतकऱ्याला शेतात कामापेक्षा बैल संभाळण्यातच दिवसभर घालावा लागतो.शेतकऱ्याला मदत करताना भावना कितीही मोठ्या असल्या, तरी मदत ‘उपयोगी’ ठरावी लागते.
नसता – ती फक्त फोटोपुरती उरते... किंवा मग, मारक्या बैलासारखी 'ओझ' बनते !
..............................
वैभव बालकुंदे
ZEE मिडिया लातूर
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 10, 2025 11:30:31Kalyan, Maharashtra:
पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाकडून आमदार राजेश मोरे यांची पलावा ब्रिज ची पाहणे..
विरोधकाच्या ठीकेनंतर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी आज कार्यकर्त्यांसोबत केली मला ब्रिजची पाहणी..
कल्याण शीळ रोडवरील पलावा पुलाची पाहणी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचा ठाकरे गट ,मनसेसह विरोधकाना टोला
लोकांच्या सोयीसाठी पूल सुरू केला ..
टीका करणार्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार
पलावा पुलाची पाहणी केली ..
वाहतूक सुरळीत झाली पाहिजे यासाठी पुलाची पाहणी
या पाहणीदरम्यान पुलावर स्टोन क्रेशर टाकण्यात आले होते त्यात पाऊस पडल्याने खड्डे पडल्यासारखे दिसत होते मात्र प्रत्यक्षात खड्डे पडलेच नव्हते
टीकाकारांचे काम टीका करण्याचे आहे आमचं कामविकास कामे करण्याचे आहे ..टीका करणार्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार
पुलावर खड्डे नाही ..अपघात झाल्याची कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही
विरोधकानी खोटेनाटे पसरवले होते ..त्यामुळे टीका काराकडे आम्ही लक्ष देत नाही
पुलाचे उदघाटन झाले नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केला
Byte - राजेश मोरे ( आमदार शिवसेना शिंदे गट)
0
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 10, 2025 11:09:57Thane, Maharashtra:
गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर केले अभिवादन
विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त विचारे यांनी केले अभिवादन
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 10, 2025 11:07:38Parbhani, Maharashtra:
अँकर- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टीच्या वतीने औंढा नागनाथ तहसिल समोर आसूड आंदोलन करण्यात आले. पिक विमा निकषांमध्ये सरकारने केलेले बदल तातडीने रद्द करून 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. जर वेळीच ह्या मागण्या पूर्ण न केल्यास सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा ईशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय....
बाईट- किरण घोंगडे- प्रदेशाध्यक्ष,युवा रिपब्लिकन पार्टी
2
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 10, 2025 11:06:02Manmad, Maharashtra:
मनमाड ब्रेकिंग
दारू उधार दिली नाही यांचा मनात राग धरून बार मालकावर दोन तरुणांनी सुरीने केला प्राणघात हल्ला..
सुदैवाने बारमालकाचे वाचले प्राण.. हल्ल्याचा थरार सिसिटीव्हीत कैद......
पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करून गुन्हा केला दाखल......
हल्ल्याचा व्यापारी महासंघाने निषेध करून आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्याची केली मागणी....
2
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 11:05:33Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_VIJAY_DAMAGES
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भागात गोसेखुर्द धरणाचे पाणी आणि वैनगंगेच्या पुराने झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देणार ,या भागाचे आमदार व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात गेले तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. एक जून पासून आतापर्यंत वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 37% पाऊस पडून गेला आहे. मात्र गेल्या तीन दिवसातील पावसाची आकडेवारी अधिक आहे. दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाची सर्व दारे उघडली गेल्याने खालच्या भागात असलेल्या ब्रह्मपुरी या चंद्रपूर जिल्ह्यातील उपविभागात वैनगंगा नदीला मोठा पूर आलाय. या पुराचा फटका वैनगंगा नदीकाठच्या दहा गावांना बसलाय. या गावात पुराचे पाणी शिरले याशिवाय शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. या परिसरात धान हे प्रमुख पीक आहे. यातील आवत्या प्रकारातील धान रोबणीचे या पुराने मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पूर ओसरल्यानंतर सर्वेक्षण करून मदत मिळवून देणार असल्याची प्रतिक्रिया या भागातील आमदार व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
बाईट १) विजय वडेट्टीवार, आमदार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
5
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 11:03:18Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_BANK_VOTINGG
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी 13 वर्षानंतर आज होत आहे निवडणूक, प्रमुख राजकीय पक्षांनी झेंडा रोवण्यासाठी चालवली आहे निकराची लढाई, काँग्रेस आणि भाजपने केले दावे- प्रतिदावे
अँकर:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज तब्बल तेरा वर्षानंतर निवडणूक होत आहे. बँकेत एकूण 21 संचालक जागा आहेत. यापैकी नऊ जागा अविरोध निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी ही बँक आपल्या ताब्यात राहावी यासाठी आटोकाट प्रयत्न चालवले आहेत. भाजपकडून स्वतंत्र फिल्डिंग झाली असून काँग्रेसनेही परंपरागत मतदारांना आकृष्ट केले आहे. ओबीसी गटातून चार, अनुसूचित जाती -जमाती गटातून पाच तर भटक्या विमुक्त गटातून तीन संचालक पदांसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 14 मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे. काँग्रेसचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व कायम ठेवण्यासाठी खा. प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार एकत्र आले आहेत. दुसरीकडे भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात भाजपनेही सर्व शक्तीनिशी प्रयत्न चालवले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजप आमदारांना एकत्रित प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत.
बाईट १) आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
बाईट २) आ.किशोर जोरगेवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 10, 2025 10:37:46Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_fairing
अँकर
नाशिकरोड भागातील फर्नांडिस वाडी या ठिकाणी रात्री दोन गट आपसात भिडले जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडलीय.... दोन्ही गटाकडून 15 ते 20 राउंड फायर करण्यात आले आहे.... विशेष बाब म्हणजे एका गटा कडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरी देखील दगड फेक व कांचीच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या आहे.... नाशिकरोड भागात फर्नांडिस वाडी येथे काल रात्री बेद आणि जॉनवाल गँग समोर समोर येउन एक मेकांच्या दिशेने फायरिंग केली जवळपास पंधरा ते वीस राउंड दोन्ही गटाकडून बाहेर करण्यात आल्याचा अनेक नागरिकांनी सांगितला आहे.... तर घटनास्थळावरून आठ राऊंड फायर केलेल्या काडतूस मिळाले आहे तसेच त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला वकिलांच्या घरावर देखील दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आली.... त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी नाव घेतल तीन संशयतांना ताब्यात घेतले आहे.... एकूणच वर्चस्वाच्या वादातून गँगवार भडकल्याने टोळी युद्ध थांबण्याचा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा मोठा आव्हान पोलिसांसमोर उभा राहिला आहे....
बाईट : मोनिका राउत (पोलीस उपयुक्त झोन 2)
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:36:36Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_FLOOD_WOES
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात सततच्या पावसामुळे मार्ग आहेत बंद ,ब्रह्मपुरी शहरालगत भूती नाल्यावर सुरू असलेल्या पूलाच्या संथगती बांधकामाने नागरिक संतापले
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात सततच्या पावसामुळे लहान- मोठे 20 हुन अधिक मार्ग बंद आहेत. ब्रह्मपुरी शहरालगत भूती नाल्यावर सुरू असलेल्या पूलाच्या संथगती बांधकामाने नागरिक संतापले आहेत. दुसरीकडे आरमोरी मार्ग पुराच्या पाण्याने वेढला असल्याने गडचिरोली जिल्ह्यात जाणारे ल मालवाहू ट्रक मोठ्या संख्येने अडकले आहेत. पुराचे पाणी ओसरण्याची वाट बघत तब्बल 12 तासांपासून मालवाहू वाहने व चालक खोळंबले आहेत.
बाईट १) ,२),३) त्रस्त नागरिक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:36:11Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1007ZT_CHP_CHAUPAL
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात संततदार पावसाने शेत पिकांचे नुकसान, गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीवाटे शेत शिवारात येत असल्याने शेतकऱ्यांना सतत होत आहे नुकसान
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात संततदार पावसाने शेत पिकांचे नुकसान झाले आहे. गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पुरावाटे शेत शिवारात येत असल्याने शेतकऱ्यांना सतत नुकसान होत आहे. अधिक नुकसान आणि तोकडी नुकसान भरपाई यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. एकीकडे गोसीखुर्द धरणाचे पाणी इतर भागात उपकारक ठरले असताना ब्रह्मपुरी तालुक्यातील धान आणि भाजीपाला पिके घेणाऱ्या लाडज -पिंपळगाव -अ-हेर नवरगाव या भागांमध्ये मात्र संकट ठरले आहे.
---- शेतकरी चौपाल-------
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
13
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:35:37Chandrapur, Maharashtra:
आधीच असाईनमेंट नंबरवर टाकली...
आता फक्त 2 C करतोय
Feed slug :--- 1007ZT_CHP_BANK_RADAA
( single file sent on 2C)
टायटल:-- आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणुकीत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये राडा, एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून केलं बंद, तर दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक बाहेर देत राहिले धडका
अँकर:--आज होत असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पद निवडणुकीत चंद्रपूर शहरातील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये राडा झालाय. एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून बंद केले तर दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक बाहेर दारावर धडका देत राहिले. परिस्थिती तणावाची झाल्यानंतर केंद्रप्रमुखानी स्वतः दखल देत मार्ग मोकळा केला. हे केंद्र सुभाष रघाताटे नामक उमेदवाराच्या समर्थकांनी काबीज केलं असल्याने या केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी दुसऱ्या गटाचे उमेदवार दिनेश चोखारे यांनी केली. या घटनेने केंद्र परिसरात मोठ्या तणाव निर्माण झाला.
बाईट १) दिनेश चोखारे, उमेदवार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
12
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 10, 2025 10:31:37Chandrapur, Maharashtra:
आधीच असाईनमेंट नंबरवर टाकली...
आता फक्त 2 C करतोय
Feed slug :--- 1007ZT_CHP_BPURI_DRONE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी भागातील पुराची ड्रोन दृश्य
अँकर:--चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित झालं. जीवनदायिनी वैनगंगा नदीच यामुळे एक वेगळे स्वरूप पुढे आलं, गोसेखुर्द घरातील विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि या नदीचे पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतात आणि गावांमध्ये पसरलं. वैनगंगा नदीच्या या पुराचं ड्रोन च्या माध्यमातून ब्रह्मपुरी येथील हौशी फोटोग्राफर शिवम मेहर यांनी चित्रण केलं आहे. या चित्रणामुळे वैनगंगा नदीच्या पुरामुळे किती मोठं क्षेत्र बाधित झालं हे स्पष्ट होतं.
ड्रोन vis
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
2
Share
Report